Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर,प्रतिनिधी: संगमनेर शहरातील मेनरोडवर कोणत्याही सण, उत्सव किंवा मिरवणुकीमध्ये कर्कश आवाजातील डीजे वाजवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करत शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयात जात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना एक सामूहिक निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये, संगमनेर शहरातील मेनरोडवर डीजेच्या मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य मांडण्यात आले आहे. डीजेच्या दणदणाटामुळे दुकानांमधील विक्री व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, आवाजाच्या कंपनामुळे अनेक घरांमध्ये वस्तू खाली पडून नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मेनरोडवर कोणत्याही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, प्रतिनिधी: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४ (सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १६) राज्यात लागू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्रे उपलब्ध नाहीत. या कायद्यानुसार एसईबीसी प्रवर्गाला शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात १० टक्के आरक्षण मिळाले आहे. तसेच, न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी (ओबीसी) जातीची प्रमाणपत्रे…
आजच्या वेगवान डिजिटल युगात, जिथे बातम्या क्षणात जन्माला येतात आणि क्षणात विरून जातात, अशा स्पर्धेच्या काळात संगमनेरसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात ‘दैनिक प्रवरातीर’सारखे वृत्तपत्र सातत्याने आपले स्थान टिकवून आहे. या यशामागे आहे. एक तरुण, ध्येयवेडा आणि सामाजिक जाणिवेची जाणीव असलेला संपादक, धिरज आणि त्याचे वडील शिवपालसिंह ठाकूर. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी, धिरजने आपल्या वडिलांकडून मिळालेला पत्रकारितेचा वारसा केवळ पुढेच नेला नाही, तर त्याला सामाजिक कार्याची आणि आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांचे वडील, ज्येष्ठ संपादक शिवपालसिंह ठाकूर, यांनी ३० वर्षांपूर्वी संगमनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज धिरज त्याच पावलावर पाऊल टाकून यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. धिरजचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामात यश मिळेल आणि नवीन संधी चालून येतील. आर्थिक बाबींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर सहज मात कराल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतो. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. मिथुन: आज तुम्ही उत्साही आणि आनंदी राहाल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल, ज्यामुळे दिलासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील प्रवरा नदीच्या पात्रात मंगळवारी रात्रीच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी गेलेले विजय संभाजी कुटे (वय अंदाजे ४०) हा तोल जाऊन वाहत्या पाण्यात पडल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि प्रशासन कसून प्रयत्न करत आहेत. दरम्यान अद्यापही शोध कार्य सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीवरील छोट्या पुलावर घडली. मूळचे रंगार गल्ली, संगमनेर येथील रहिवासी असलेले विजय कुटे हे आपल्या स्कुटी गाडीवरून कचरा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती चर्चेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या प्रभा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. आमदार तांबे म्हणाले की, गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतं. गणेशोत्सव आपल्याला नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. संगमनेरकर नागरिक हे दहा दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. विविध गणेश मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी होते, तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी नागरिक उत्साही असतात. यावेळी बोलताना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक सुखी, समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. तसेच, मराठा आरक्षणाचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी आपल्या ‘सुदर्शन निवासस्थानी’ सपत्नीक गणेशाची स्थापना केली, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत कन्या डॉ. जयश्री थोरात आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. हसमुख जैन उपस्थित होते. यावर्षी काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी पाऊस कमी आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा, अशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन शिर्डी: शिर्डी शहर आणि परिसरातील धार्मिक वातावरणात अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, साई मंदिर परिसरातून अनैतिक व्यवसाय चालवणाऱ्या ४ हॉटेल्सवर छापा टाकून ती सील करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपनिरीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यापूर्वी पिटा कायद्यान्वये कारवाई झालेले हॉटेल सील करण्यासाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता मिळताच ही कारवाई करण्यात आली. या पथकाने शिर्डी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदा गणेशोत्सव काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महसूल आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये चित्रपट अभिनेते, अभिनेत्री आणि प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत. अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ५६ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एक मोठा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघत आहे. बुधवारी, (२७ ऑगस्ट) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सुरू होणारा हा मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढे जाणार असल्याने, जिल्हा प्रशासनाने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शेवगावपासून पारनेरपर्यंतच्या रस्त्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत. हा मोर्चा अहमदनगर जिल्ह्यात कर्हेटाकळी (ता. शेवगाव) येथे प्रवेश करेल आणि त्यानंतर घोटण, तळणी, शेवगाव शहर, ढोरजळगाव, मिरी, माका, जेऊर, दुधडेअरी चौक,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो. तुम्ही तुमच्या कामात लक्ष केंद्रित कराल आणि अपेक्षित यश मिळवाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन आनंदी राहील. वृषभ (Taurus): आज तुम्हाला कामात काही आव्हाने येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या संयमाने त्यावर मात कराल. कोणत्याही कामात घाई करणे टाळा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मिथुन (Gemini): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. तुमच्या बोलण्याने इतरांवर चांगला प्रभाव पडेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्क (Cancer): आज तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर, दि. २६ – अव्यावसायिक कार, जीप व व्हॅन वाहनांसाठी १५ ऑगस्ट २०२५ पासून वार्षिक टोल (फास्टॅग) पास सेवा सुरु झाली आहे. हा पास राजमार्ग मोबाईल ॲप किंवा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येईल, असे पुणे येथील प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी कळविले. वार्षिक टोल पासची किंमत ३ हजार रुपये असून त्याची वैधता एक वर्ष किंवा २०० एकेरी फेऱ्या, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढीच राहील. हा पास केवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गांवरील टोल प्लाझांसाठी वैध असेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरगाव पावसा टोल प्लाझावरही तो लागू राहील. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, विशेष प्रतिनिधी: मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. जरांगे यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज मंगळवारी (२६ ऑगस्ट) सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. विशेष म्हणजे, गणेशोत्सवामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने असेही स्पष्ट केले की, जरांगे यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे वापरून एका महिलेने महिला बचत गटातील सदस्यांच्या नावाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिला बचत गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी, एका महिलेविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेली महिला, फरीन खान मोहम्मद शेख, यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेने तक्रारदार महिलेच्या नकळत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड मिळवले. त्यानंतर, त्यांची खोटी सही करून ‘आयेशा महिला बचत गट’ आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: वेगळा विषयांवरील सामाजिक सलोखा राखणाऱ्या देखाव्यांची परंपरा असलेल्या संगमनेरच्या महाराणा प्रताप युवक मंडळ आणि महाराणा प्रताप महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका भव्य आणि आकर्षक देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेरच्या चव्हाणपुरा येथे मंडळाकडून यावर्षी उभारण्यात आलेल्या २५ बाय ४० फुटांच्या प्रशस्त मंडपात यंदा ‘नवदुर्गा मंदिर’ या विषयावर आधारित मनमोहक देखावा सादर करण्यात येत आहे. या देखाव्यात देवीच्या नऊ अवतारांचे विस्मयकारक दर्शन घडवण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच हा देखावा सर्व गणेशभक्तांसाठी खुला करण्यात येत आहे. मंडळाची आकर्षक देखाव्यांची परंपरा कायम राखत, हा देखावा संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. यासाठी या वर्षीचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: शहरातील मालदाड रोड परिसरात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सुमारे दोन लाख रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मालदाड रोड परिसरात माऊली कॉलनीमध्ये सेवानिवृत्त अधिकारी रामनाथ म्हातारबा सातपुते (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहतात. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरात ही घटना घडली. चोरट्यांनी वॉल कंपाउंड वरून उडी मारून घराच्या दरवाजाचा कडे कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व ९६…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन लैंगिक अत्याचारासाठी आपल्या लॉज, हॉटेल किंवा कॅफेचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मालकांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपींनाही तितकीच शिक्षा होते. त्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देणारे लॉज, हॉटेल चालक, मालक किंवा कॅफे मालक हेही आता कायद्यानुसार गुन्हेगार मानले जातील. काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात एक बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात असे समोर आले की, आरोपीने पीडित मुलीला दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कामामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ (Taurus): आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. मिथुन (Gemini): आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. कर्क (Cancer): आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहराच्या विकासाबाबत नवीन लोकप्रतिनिधींकडून अपूर्ण माहिती दिली जात असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला निळवंडे धरणातून थेट पाणीपुरवठा होत असून, जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधीही यापूर्वीच महाविकास आघाडीतील तत्कालीन नगर विकास मंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाल्याचे व प्रशासकीय काळात हे काम रखडल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी सोमवारी एकत्रित पत्रकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: आरोग्याला बाधा निर्माण होऊन देखील शहरातील गुळातील भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे. ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या दुकानातून मी गुळ खरेदी केला होता. तो खाल्ल्यानंतर माझ्या घरात दोन व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. त्यामुळे या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने मी नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल…
