Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या पराक्रमाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. आर्थिक गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. धन संचय करण्याच्या योजना यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिथुन: आजचा दिवस मानसिक शांतता आणि आनंद घेऊन येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर न्यायालयाने एका पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. नाजिम असगरअली अन्सारी असे न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आरोपीचे नाव आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२० अंतर्गत या प्रकरणाची सुनावणी येथील ३ रे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. गव्हाणे यांच्या न्यायालयासमोर सुरू होती. या खटल्यादरम्यान सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, तसेच विविध कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणातील एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. मात्र, सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबांमधील परस्पर विसंगती, पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न चांगलाच तापला असून, यामध्ये राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीवर नगरपरिषदेने अखेर कायदेशीर बडगा उगारला आहे. संगमनेरमधील भारतीय जनता पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या मुलाविरुद्ध विनापरवाना व बेकायदेशीर इमारत बांधकाम केल्याप्रकरणी आणि पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेश संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी शहर पोलिसांना दिले आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील भूमाफिया आणि बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक इथापे यांनी संगमनेर येथील सुकेवाडी रोड परिसरातील सर्व्हे नंबर १५३/१/१ मधील अंदाजे ६५० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर नगरपरिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक-पुणे हायवेवर शस्त्रांचा धाक दाखवून पिकअप वाहनावरील चालकाला मारहाण करत ९५,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. या गुन्ह्यातील आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून सातत्याने गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर नवीन कायद्यानुसार ‘भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३’ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या टोळीचा म्होरक्या अक्षय दादा चव्हाण याच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अपघातात गंभीर जखमी झालेल्या निमगाव टेंभी येथील एका १८ वर्षीय तरुणाचा ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभव विलास कदम (वय १८, रा. देवगड वस्ती, निमगाव टेंभी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. एका अपघातात वैभव गंभीर जखमी झाला होता, यामुळे त्याला उपचारकामी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ५ जून २०२६ रोजी दुपारी १४:१५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या मेमोच्या आधारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: बँकेतून पैसे काढून घराकडे चाललेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचे लक्ष विचलित करून, दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीला लटकवलेली पैशांची पिशवी चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवार, ३ जून रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुकेवाडी कुरण रस्त्यावर घडली. शेतकऱ्याकडील पिशवीत १ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ३ लाख रुपयांचे सह्या केलेले दोन धनादेश होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकेवाडी येथील ६९ वर्षीय शेतकरी सुरेश बाळकृष्ण शेटे यांनी एका व्यवहारापोटी मिळालेल्या तीन धनादेशांपैकी १ लाख ७५ हजार रुपयांचा एक धनादेश येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून वटवला होता. मिळालेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निंबाळे शिवारात वीज चोरी प्रकरणावरून हॉटेल चालकाकडे ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी वायरमनला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. गणेश माधव दातीर (रा. पिंप्रीलौकी, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वायरमनचे नाव आहे. या कारवाईनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी आरोपीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई काल (शुक्रवार ५ जून) दुपारी १ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हेवाडी रोड परिसरातील एका नामांकित हॉटेलला मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा लागतो. या हॉटेल चालकाने विजेचे पैसे वाचवण्यासाठी डीपीवरून चोरून वीज वापरण्यास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ५) संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला. ३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे आपले नादुरुस्त वाहन घेऊन मालपाणी बजाज शोरूममध्ये गेले होते. वाहनाची जबाबदारी स्वीकारून त्याची पावती देण्याबाबत चर्चा सुरू असताना, शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. नशिबाची भक्कम साथ लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे गतीने पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबापेक्षा स्वतःच्या कष्टावर अधिक विश्वास ठेवावा लागेल. वादविवादापासून दूर राहणे तुमच्या हिताचे राहील, विशेषतः कार्यालयात सहकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगा. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या समस्येमुळे पृथ्वीचे तापमान कमालीचे वाढले आहे. वाढती उष्णता, घटलेला पाऊस, सातत्याने जाणवणारा दुष्काळ आणि पर्यावरणाचा ढासळत चाललेला असमतोल हा मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीसाठी धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत गरजेचे असून, येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून त्यांचे प्रामाणिकपणे संवर्धन करावे, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आयोजित ‘दंडकारण्य अभियान’ आढावा बैठकीत ते बोलत होते. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात आज (शुक्रवारी ४ जून) दुपारी एक वाजेच्या सुमारास एका चालत्या कंटेनरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हा कंटेनर पुण्याहून नाशिकच्या दिशेने नवीन चारचाकी गाड्या घेऊन जात होता. कृष्णा लॉन्स परिसरात पोहोचताच कंटेनरमधून अचानक धूर निघू लागला. आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ती आटोक्याबाहेर गेली. घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ घुलेवाडी येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे चालक आकाश बनसोडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | शिर्डी: राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अत्यंत निर्दयपणे कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप वाहनांवर शिर्डी पोलिसांनी धाडसी कारवाई केली. सावळीविहीर जवळ सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ६ जनावरांची सुटका केली असून, एकूण ८ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गंगापूरच्या दिशेने गोवंशाची बेकायदेशीर तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सावळीविहीर परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. यावेळी गंगापूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन महिंद्रा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे:  जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला. पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल…

Read More

संपादकीय अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत जे नाट्य घडले, त्याने केवळ जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेतले. ‘नॉट रिचेबल’ उमेदवार, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा इशारा देणारे बंडखोर नेते आणि पडद्यामागे फिरलेली सूत्रे… हा सगळा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर सिनेमालाही मागे टाकणारा होता. पण सरतेशेवटी, महायुतीचे (भाजप) अधिकृत उमेदवार प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रकरणाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते; गरज असते ती योग्य वेळी अचूक ‘मास्टरस्ट्रोक’ मारण्याची, जी किमया आ. संग्राम जगताप आणि माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या जोडीने करून दाखवली. अहिल्यानगरमध्ये सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी येणे बाकी असलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभाचे उत्तम योग आहेत, नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. घरात एखाद्या धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि तीन सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या अपात्रतेच्या निर्णयाला नाशिकच्या अप्पर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी (दि. २ जून) तात्पुरती स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशानंतर सरपंच निर्मला राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ जुलै रोजी होणार आहे. घुलेवाडी ग्रामपंचायतीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथील लोकनियुक्त सरपंच निर्मला राऊत, तसेच सदस्य दत्तात्रय राऊत, सोनाली गिरी आणि अनिल राऊत यांनी गावातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्याचा वैयक्तिक लाभ उठवला, अशी तक्रार शिवसेना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकांचं जोरदार वारं वाहात आहे. एकूण १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून १८ जून रोजी या निवडणूक होत आहे. आज या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. ३ वाजेपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे होते. त्यानुसार, १७ पैकी अनेक मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सर्वाधिक समावेश आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल १५० कोटी खर्च केले असून एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी २५ कोटी दिल्याचा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | मुंबई/बुलढाणा: भारतीय जनता पक्षाला देशात लोकशाही नको असून, ‘इलेक्शन सिस्टिम’ ऐवजी ‘नॉमिनेशन सिस्टिम’ आणायची आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपाने सर्व नैतिक मूल्ये पायदळी तुडवली असून, चालू असलेल्या विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटले की, विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मर्यादित मतदार असतात. मात्र, या मर्यादित मतदारांच्या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’ असा उघड खेळ सुरू आहे.…

Read More

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून १७ पैकी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विविध मतदारसंघांत उमेदवारांनी माघार घेतल्याने काही ठिकाणी निवडणूक केवळ औपचारिकता राहिली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे विक्रम काकडे बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. मविआचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात दुश्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | पुणे: पुण्यातील प्रमुख आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका नामांकित आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका ४८ वर्षीय महिला कर्मचाऱ्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रचंड दबाव आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिला अधिकाऱ्याने पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे वाच्यता करत स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. याच कार्यालयात काम करणाऱ्या एका अन्य महिला कर्मचाऱ्याने तिच्यावर लग्न करण्यासाठी आणि धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव…

Read More