Author: Annant Ppangarkar
नवी दिल्ली: प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेत प्रतिनिधित्व करेल. ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण चार जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. ॲड. निकम यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी मिळाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांचे नाव १९९३ च्या मुंबई…
‘हिंदी भाषिकांना मुंबईत मारणार्यांनो, हिंमत असेल तर ऊर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात कुत्रा देखील वाघ असतो, कोण कुत्रा कोण वाघ स्वत:च ठरवा. महाराष्ट्राच्या बाहेर या आपटून आपटून मारू, तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? कोणते उद्योग तुमच्याकडे आहेत? अशी दर्पोक्ती करणारा निशिकांत दुबे हा राज्यातल्या सरकारचा मानद जावई वाटू लागला आहे. त्याच्या या वक्तव्याने ज्याचं मस्तक भडकणार नाही, तो मराठी कसला? अनेक वर्षं महाराष्ट्रात राहणार्या असंख्य अमराठी तरुणांनी या मानद जावयाची चांगलीच उतरवली आहे. मराठीमध्ये मानद या पदनामाला अनन्यसाधारण महत्व आहे. एकार्थी ही व्यक्ती वर्तणुकीने कशीही असली तरी तिला दोष द्यायचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं. कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी मदतीचे आश्वासन देतानाच, या घटनेतील दुसरा मृत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्यावतीने भरीव मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शनिवारी आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी आणि संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार याचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना रियाज पिंजारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदार संघर्ष समितीने नाशिक विभागाचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक यांच्याकडे धाव घेतली आहे. प्रदीप भाऊसाहेब कुटे यांनी दाखल केलेला फेर-ऑडिट अर्ज (रिव्हिजन अर्ज ९७/२०२४) त्वरित फेटाळून लावण्यात यावा आणि ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तात्काळ परत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक १२६०४/२०२४ च्या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले आहे. ८१ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप आणि ठेवीदारांचे हाल ठेवीदारांनी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल ८१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक आणि इतर २१ आरोपी या गैरव्यवहारात सामील आहे. गोरगरीब…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, पक्षाकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यामुळे आणि शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या संघटनात्मक बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाची ही एक महत्त्वपूर्ण रणनीती मानली जात आहे. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफसफाईच्या कामात ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे घडलेल्या दुर्घटनेत अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनात केली आहे. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना नियमानुसार शासनाकडून ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे. मात्र, जीव धोक्यात घालून पवार याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रियाज पिंजारी याच्या कुटुंबीयांनाही शासनाने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे आणि बोगस भरती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मोठी कारवाई करत ट्रस्टचे सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली, तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची अपसंपदा जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हा मुद्दा स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. लंघे यांनी उघड केले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भाविकांकडून पूजेसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्तसेवा संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे एकाच दिवशी पती-पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा मृतदेह शेततळ्यात, तर पतीचा मृतदेह घरात संशयास्पदरीत्या आढळला आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याबाबतचे गूढ कायम असून, आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रेवजी मुरलीधर गायकर (वय ६०) आणि त्यांच्या पत्नी नंदा गायकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. रेवजी गायकर हे एका शिक्षण संस्थेत नोकरीला होते आणि तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. शेती आणि निवृत्ती वेतनावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. मुली सासरी असतात, तर…
मुंबई, ११ जुलै २०२५: आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर येथे भुयारी गटार साफ करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात मांडली. याप्रकरणी संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली असली तरी देखील अपूर्ण काम असताना गटार जोडणाऱ्या आणि या घटनेला जबाबदार असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आणि मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी तांबे यांनी यावेळी लावून धरली. आमदार तांबे यांनी संगमनेर मधील दुर्दैवी घटने संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. संगमनेर भुयारी गटार योजना २०१२ मध्ये मंजूर झाली होती, परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण होते.…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधील मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळ या उत्पादनात भेसळ असल्याच्या पुण्याच्या कियान लॅबच्या अहवालाने खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, गुळाच्या तपशीलामध्ये तफावत आढळली असून, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घालून दिलेल्या नियमांनुसार त्याचे मानांकन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या संदर्भात वारंवार अहिल्यानगरच्या अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करत कारवाईची मागणी करून देखील अन्न औषध प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. घुलेवाडी येथील रहिवासी शंकर रावसाहेब ढमाले यांनी २८ मे २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. ढमाले यांनी १६ मे २०२५ रोजी सागर किराणा येथून गुळ खरेदी केला…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार साफसफाई दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कर्मचाऱ्यासह स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज: महायुती सरकारच्या कार्यकाळात दिवसेंदिवस लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी कोणत्याही कामाच्या मोबदल्यात हल्ली लाखो रुपयांची लाच सर्वसामान्यांकडून मागत असल्याने या अधिकाऱ्यांना भिकेचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 6 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडले. सिमेंट रस्त्याच्या बिलापोटी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या नगर उत्थान योजनेंतर्गत सिमेंट रस्त्याच्या सुमारे 2 कोटी रुपयांच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी मुख्याधिकारी चव्हाण यांनी 3 टक्के दराने 6 लाख रुपयांची मागणी केली होती.…
संगमनेर, प्रतिनिधी: गुरु पौर्णिमेचा दिवस संगमनेरकरांसाठी धक्कादायक आणि दुःखदायक ठरला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज घडलेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला. गटारात काम करत असताना गटारीमध्ये निर्माण झालेल्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध पडून अतुल रतन पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ या दुर्घटनेतील दुसऱ्या जखमीचा हे मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समोर आले आहे. रियाज जावेद पिंजारी असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून गटारीच्या (ड्रेनेज) कामावेळी विषारी वाळूच्या संपर्कात आल्याने बेशुद्ध होऊन जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न या तरुणाने केला होता. मात्र हा तरुण देखील वायूच्या संपर्कात आल्याने तो देखील…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान आज (गुरुवार, ११ जुलै) एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली असून, कामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतुल रतन पवार असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून प्रकाश वसंत कोटकर व रियाज जावेद पिंजारी अशी जखमींची नावे असल्याची व जखमी पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने हाती…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील ४ थे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जि. व. भेंडे यांच्या न्यायालयाने संगमनेर शहरातील एका मारहाण प्रकरणी नुकताच निकाल दिला असून यात एका आरोपीला दोषी ठरवत अन्य दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. २४ जून, २०१५ रोजी राजाराम लक्ष्मण कढणे (तक्रारदार) यांनी संगमनेर बसस्थानकाजवळील गणेश फ्रूट्स येथून आंबे खरेदी केले होते. त्यातील दोन आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी ते पुन्हा दुकानात गेले असता, अमोल अशोक भवर याने आंबे परत घेण्यास नकार दिला आणि पैसे देण्यासही नकार दिला. त्यानंतर भवर यांच्यासह तिघा जणांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. आयुब कादर इनामदार याने तक्रारदाराला जीवे मारण्याची…
संगमनेर, प्रतिनिधी: जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले. यावेळी बोलताना डॉ. जयश्री…
मुंबई: नगर पालिका हद्दीत आणि हद्दीलगत नागरी वस्तीत लागू असलेल्या तुकडाबंदी कायद्यामुळे बाधित झालेल्या लाखो कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेले सर्व तुकडाबंदी व्यवहार नियमित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूलमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. सद्यस्थितीत तुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठे जागा घेतलेल्या नागरिकांना बांधकाम करण्यास किंवा त्या जागांचे व्यवहार करण्यास अडचणी येत होत्या. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, महसूलमंत्री बावनकुळे यांनी महानगरपालिका,…
संगमनेर, प्रतिनिधी: भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात मे आणि जून महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाण्याची चांगली उपलब्धता आहे, यामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात आहे, लाभक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. ही बाब लक्षात घेऊन, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांमधून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आणि माजी जलसंपदामंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्र्यांना लिहिलेले पत्र चर्चेत आले असून आपल्या पत्रात थोरात यांनी म्हटले आहे की, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या…
संगमनेर, ०९ जुलै २०२५-प्रतिनिधी: संगमनेर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली ३५ लहान वासरे ताब्यात घेऊन एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी कुरण येथील कब्रस्तानजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. कुरण येथील शौकतअली मोहम्मद शेख (वय ३०, रा. कुरण) याने आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. या माहितीच्या आधारे डॉ. सोनवणे यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक सोनवणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल…
