Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : योग साधना ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. अखिल मानवजातीला भारतामुळे लाभलेले हे वरदान आहे. भारताला विश्वगुरू बनविण्याचे सामर्थ्य योगामध्ये दडलेले आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सुसज्ज क्रीडा नगरीत तिसर्या राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार शुभारंभ सोहळा आज पार पडला. याप्रसंगी डॉ. मालपाणी बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक व खेलो इंडियाचे निरीक्षक शब्बीर शिकलकर, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक, स्पर्धा व्यवस्थापक निरंजन मूर्ती, सतीश मोहगावकर, विश्व योगासन प्रतिनिधी अॅड. उमेश नारंग,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या संगमनेरमधील शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२३ च्या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक इंद्रजित थोरात, शॅम्प्रो संस्थेचे अध्यक्ष आर. एम. कातोरे, उपाध्यक्ष सुभाष सांगळे, अरुण ताजणे, शांताराम डुबे, वसंत साबळे, भारत वर्पे, तान्हाजी आहेर, दगडू लांडगे, भिमा राहींज, राधाकिसन देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, बबनराव सावंत,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शारीरिक सुदृढतेसाठी आवश्यक असलेल्या आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या आंतर शालेय क्रीडा स्पर्धा संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडल्या. तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी सामूहिक खो-खो कबड्डी स्पर्धा पार पडल्या. दुसऱ्या दिवशी वैयक्तिक क्रीडा प्रकारात 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्लो सायकल, कुस्ती स्पर्धा पार पडल्या. तर समारोपाच्या तिसऱ्या दिवशी संगीत खुर्ची, क्रिकेट, फनी गेम्समध्ये पोता शर्यत, तीन पायी शर्यत आदी स्पर्धा पार पडल्या. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये मुलांसोबत मुलींनीदेखील मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांत घिरट्या घातल्या मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण आता हालचालदेखील करू शकत असून नेहमीप्रमाणे चालू शकतो आहे. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांचे रेखाटलेले हुबेहूब छायाचित्र भेट देऊन या रुग्णाने अनोखे आभारप्रदर्शन केले. घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवाशी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी विशेष विमानाने नागपूरहून त्यांना मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती मिळते. https://twitter.com/bb_thorat/status/1607287654697295876?t=0RxvLgFB82zgejUx8xVgfQ&s=19 सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून थोरात अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहे. सोमवारी सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून खाली पडले. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत असून त्यांची तातडीने अधिवेशनासाठी तैनात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे थोरात यांची वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : कुंभार समाजाला वीटभट्टी व्यवसाय सुलभरीत्या करता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीटभट्टी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने लाभलेल्या विविध जाचक अटी आणि वीट भट्टी चालकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह वीटभट्टी चालक उपस्थित होते. वीट भट्टी व्यवसाय संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी, माती वाहतूक, बिगर शेती अट, कामगारांचे प्रश्न यावेळी मंत्री महोदयांसमोर शिष्टमंडळाने उपस्थित केले. यातून मार्ग काढून हा व्यवसाय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पठाण चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या म्हणजेच तब्बल दोनशे कोटी किमतीला विकले गेले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही एवढ्या मोठ्या किमतीला ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले गेल्याने अनेक जण थक्क झाले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट यामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट नव्या वर्षात २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाण्यामुळे वादात अडकला. त्यामुळे बायकॉट पठाणचे नारे सुरू असताना त्याचे ओटीपी हक्क मात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची देवकौठेची असलेली सुहानी भारत कहांडळ हिची उपकर्णधारपदी निवड झाली असून रांची व जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या नॅशनल लिगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत नवनाथ कहांडळ हे पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांची सुहानी कन्या आहे. लहानपणापासून सुहानीला क्रिकेटची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून भारत कहांडळ व चुलते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी तिला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले. इयत्ता नववीमध्ये शिकणारी सुहानी ही सलामीची आक्रमक फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. सुहानी सध्या…
रविवार विशेष | प्रवीण पुरो मराठी शब्दकोषात निर्लज्जपणा या शब्दाचा अर्थ निलाजरेपणा असा निघतो. लायक नसलेला म्हणजे नालायक. पण त्याला नालायक म्हणू नये. निलाजरेपणा चालेल पण निर्लज्ज म्हणू नये. निलाजरेपणा हा त्यातल्या त्यात सौम्यता दर्शवतो. दोन्हींचा अर्थ सारखाच. पण तो उच्चारण्याची पध्दत त्याची तीव्रता दर्शवत असते. वेळ आणि काळानुसार त्या शब्दांची तीव्रता नोंदली जाते. गरजेप्रमाणे असे शब्द वापरले जावेत. मुळात असंसदीय असलेले असे शब्द संसदीय की असंसदीय हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात. राज्य विधानमंडळात असंसदीय असूनही अशा शब्दांचा वापर सर्रास केला जातो. जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी करणार्या प्रत्येकाच्या तोंडी याहून कठोर असंसदीय शब्द उच्चारले गेलेत. मुंबईला सोन्याची अंडी देणारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील मुस्लिम मावळा म्हणून गौरविलेल्या संगमनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुखाला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शाखाप्रमुख अजित याकूब मोमीन यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अज्ञात इसमाने मोमीनपुरा येथील घरी एक पत्र आणून दिले असल्याची माहिती मोमीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोबाईलवर दिली. फिर्यादी मोमीन यांनी सदरचे पत्र बघितले असता त्याचे पाकीट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात विविध कामांकरिता ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करा तसेच संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंढरपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं धक्कादायक विधान करत शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक असल्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात डॉ. स्वामी यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. स्वामी यांनी असं विधान करत देशातील व राज्यातील आपल्याच सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी शनिवारी (२४ डिसेंबर) पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : खरेदीवेळी ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी जागरूक असणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या संरक्षणासाठी सरकारने काही कायदे बनविले आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेरचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनी शनिवारी संगमनेरच्या तहसील कार्यालयामध्ये ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना विविध मान्यवरांनी त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी आपले आधारकार्ड ३१ डिसेंबर पर्यंत स्वस्तधान्य दुकानदारांकडे जमा करावेत. अन्यथा अशा शिधापत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेतून वगळण्यात येईल. असे आवाहन संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. संगमनेर तालुक्यातील प्राधान्य व अंत्योदय कुटूंब लाभार्थी योजनेच्या शिधा पत्रिकाधारक कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडण्यात आलेले नाही. अशा कुटूंबाच्या याद्या स्वस्तधान्य दुकानादार, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच गावातील व्हाट्सअप ग्रुप वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कुटूंब प्रमुख म्हणून घोषीत झालेल्या सदस्याचे आधारकार्ड ऑनलाईन प्रमाणालीमध्ये समाविष्ट झालेले नाही. अशा कुटूंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आपले नांव असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नगर येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात तब्बल 25 महिने आणि 90 सुनावण्या झाल्यानंतर अखेर मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेसह 11 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. नगर जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या न्यायालयासमोर हा खटला सुरू असून, आजच्या सुनावणीत हे दोषारोपपत्र सिद्ध झाले आहे. दरम्यान, या खटल्यातील एक महिला आरोपी अद्यापि फरार आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर उर्फ गुड्डय़ा शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश उर्फ तम्या वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ, महेश वसंतराव तनपुरे, जयंत अकुला…
महाराष्ट्र संवाद न्यूज उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातामध्ये लष्करातील १६ जवान ठार झाले आहे. तर चार जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने थेट दरीत कोसळला. भारतीय लष्कराने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, 23 डिसेंबरला उत्तर सिक्कीममधील गेमा येथे एका धोकादायक वळणावर लष्कराचा ट्रक उतारावरून घसरल्याने अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा एक भाग होता, जे सकाळी चाटणहून थांगूच्या दिशेने निघाले होते. उत्तर सिक्कीम हा अतिशय धोकादायक भाग असून तो पूर्णपणे बर्फाने झाकलेला आहे. गेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर लष्कराचे हे वाहन तीव्र उतारावरून घसरले. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज राजकारण परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे कोठे जाऊन काम करू शकेल हे निश्चित नसले तरी 2024 ची विधानसभा निवडणूक आपण लढविणार आहोत पण मामांच्या विरोधात नाही, असे स्पष्टच सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर भाजपची नजर असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तांबे म्हणाले पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांग विद्यार्थी हे विशेष विद्यार्थी असून त्यांच्यामधील कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी संग्राम निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून या विद्यार्थ्यांमधील नैपुण्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालय व संग्राम निवासी मूकबधिर विद्यालय आणि डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संगमनेरमध्ये संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर अंध मतिमंद मूकबधिर अस्थिव्यंग प्रवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यावेळी तांबे बोलत होते. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, सहाय्यक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्राॅपर्टी कार्डमधील चुका दुरूस्त करण्याचे अधिकार आता भूमी अभिलेख विभागातील उपअधिक्षकांना मिळाल्याने स्थानिक कार्यालयातच याबाबतचे निर्णय करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनूसार झालेल्या निर्णयाचा मोठा दिलासा असंख्य प्राॅपर्टी कार्ड धारकांना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. प्राॅपर्टी कार्डमधील होणाऱ्या चुकांबाबत असंख्य तक्रारी भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त होत होत्या. मात्र याबाबतचे अधिकार फक्त जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला असल्याने नागरीकांची मोठी अडचण होत होती. तक्रारींची संख्या आणि याबाबत निर्णय होण्यास लागणारा विलंब यामुळे नागरीकांच्या प्राॅपर्टी कार्ड मधील चुका वर्षानुवर्षे तशाच राहत होत्या. नगर येथील कार्यालयामध्ये हेलपाटे मारूनही असलेल्या चुका दुरूस्तीचे काम…
