Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विधिज्ञ ॲड. जगन्नाथ वामन, उपाध्यक्षपदी ॲड. प्रसाद भडांगे, महिला उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता सस्कर यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची पुन्हा फेरनिवड करण्यात आले आहे. १५ एप्रिल, २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वकील संघाचे कार्यकारिणी निवडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये निवडणूक कार्यक्रम न लावता सद्यस्थितीत काम करणाऱ्या, गेल्या वर्षभरात वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच वकिलांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची दखल घेत कार्यकारिणीलाच सन २०२५ ते २०२६ या वर्षांच्या कालावधीसाठी संधी देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. त्यामुळे जुन्याच कार्यकारिणीकडे नव्या वर्षासाठी ची सूत्रे सोपविण्यात आली. अध्यक्षपदासाठी ॲड. वामन, उपाध्यक्षपदी भडांगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल, तर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याच्या उर्वरित बांधकामावर आज पहाटेपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, यात तीन ते चार पोलीस जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अनधिकृत दर्गा ट्रस्टला आपले म्हणणे मांडण्यासाठी दिलेली मुदत आज, १५ एप्रिल रोजी संपली. यानंतर नाशिक महानगरपालिकेने (NMC) मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून उर्वरित बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. यापूर्वी याच दर्ग्यावर कारवाई करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी कोणतीही अनुचित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई | विशेष प्रतिनिधी राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीच्या नगराध्यक्षांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचे महत्त्वपूर्ण अधिकार आता थेट निवडून आलेल्या सदस्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण तरतुदींना आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहेत. यापूर्वी, कोणत्याही नगराध्यक्षांना पदावरून दूर करायचे असल्यास, निवडून आलेल्या एकूण सदस्यांपैकी किमान पन्नास टक्के सदस्यांच्या सह्या असलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाई. त्यानंतर, शासनाच्या स्तरावर या प्रस्तावावर विचार होऊन अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पार पडत असे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिला मतदारांना देताना दिलेल्या आश्वासनाचा युती सरकारला पद्धतशीर विसर पडला आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या दीड हजाराच्या रक्कमेतून चक्क हजार रुपये कमी होणार आहेत. ज्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली त्या योजनेलाच हात घालण्यात आल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर युती सरकारला बहिणींचा शाप लागेल असं म्हटलं आहे. निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर सहकारातील दोन दिग्गजांच्या समेटानंतर दोन्ही कारखान्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे तर दुसरीकडे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वाटचाल ही बिनविरोध निवडीकडे असून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडीमध्ये अन्य उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा अडसर असल्याचे दिसून येते. मात्र छाननीनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासदांनी निवडून द्यावयाच्या गटातून बिनविरोध निवड झाली आहे. अन्य मतदार संघातून कोणाची कारखान्याच्या संचालकपदी वर्णी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश आजपासून (१५ एप्रिल २०२५) ते २४ एप्रिल २०२५ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला शस्त्र बाळगण्यास किंवा जमाव करून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन करणे, लाठ्या-काठ्या, तलवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे घेऊन फिरणे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही जमाव करणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरात नुकत्याच पार पडलेल्या हनुमान जयंती उत्सवादरम्यान झालेल्या गोंधळ प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ११ आणि १२ एप्रिलला घडलेल्या या घटनांप्रकरणी १४ एप्रिलला रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक पुंडलिक गरुडकर, सौरभ रमेश उमरजी, शेखर शिवाजी सोसे, अमोल दशरथ क्षीरसागर, श्याम मधुकर नालकर, सोनू गोविंद नालकर, शुभम मनोज परदेशी, ओंकार ननवरे उर्फ चाव्या, मयूर जाधव उर्फ पप्पू, राहुल शशिकांत नेहूलकर व पियुष संतोष गोडसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर विश्वनाथ भालेकर (वय ६२, धंदा निवृत्त, रा. चंद्रशेखर चौक,…

Read More

मुंबई, दि. १५ – विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा तपशील खालीलप्रमाणे…. १. चिखलोली-अंबरनाथ येथे नवीन दिवाणी न्यायालय: ठाणे जिल्ह्यातील चिखलोली-अंबरनाथ येथे कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. २. कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई धोरणाला मंजुरी: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पीडित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेर आणि पारनेरला दिलेला जोरदार झटका विरोधकांच्या कायम लक्षात राहील. आता श्रीरामपूरकडे लक्ष देणार असून, योग्य वेळी त्यांनाही झटका देऊ, असा स्पष्ट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले की, राजकारण हे गरीब लोकांना घरे मिळवून देणे, शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या मोठ्या गोष्टींवर आधारित असावे. श्रीरामपूरमध्ये बदल घडवायचा असेल, तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी…

Read More

संगमनेर, दि. १४ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात,…

Read More

अहिल्यानगर, दि. १४ प्रतिनिधी –  जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या जलसंपदा पंधरवड्याचा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान आणि जल पुनर्भरण यावर भर दिला जाईल. १८ एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांच्यात संवाद साधला जाईल, तर १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणींचे…

Read More

संगमनेर दि.१४ – प्रतिनिधी भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्‍या माध्‍यमातून जनतेला हक्‍क आणि अधिकार मिळवून दिले. त्‍यामुळेच भारताच्‍या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्‍ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्‍यघटनेच्‍या पवित्र ग्रंथाचे महत्‍व अधोरेखित केले असल्‍याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३४ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्‍यावतीने तसेच लोणी बुद्रुक येथे जनसेवा युवा प्रतिष्‍ठाणच्‍यावतीने आयोजीत करण्‍यात आलेल्‍या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्‍या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्‍यात आले. संविधान…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी –  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेतील समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींनी जगाला शांतता आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व संत आणि समाजसुधारकांच्या विचारांना एकत्र…

Read More

नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका २३ वर्षीय तरुणाचा डीजेच्या कर्कश आवाजामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन रणशिंगे असे मृत तरुणाचे नाव असून तो फुलेनगर, पेठ रोड येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आज आंबेडकर जयंती असल्याने शहरात विविध ठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. नितीन देखील एका मिरवणुकीत सहभागी झाला होता. दरम्यान, डीजेचा आवाज असह्य झाल्याने तो अचानक कोसळला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळल्यानंतर त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीनला क्षयरोगाचा त्रास असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याचा…

Read More

शिर्डी – शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले (वय अंदाजे ६०) यांचा रविवारी (दि. १३ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी केलेल्या या क्रूर कृत्यामुळे भोसले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वडील आणि मुलाचा दशक्रिया…

Read More

संगमनेर, दि. १३ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १३३ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एका अर्जावरील प्रलंबित निर्णय आता मंगळवारी (दि. १५) होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार छाननी शुक्रवारी (दि. ११) पार पडली. परंतु चार अर्जांवर हरकती आल्यामुळे त्या सदर्भात निर्णय घेण्यात आला असून  एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित असल्याने तो मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. थोरात कारखान्याच्या निवडणुकीतून विरोधकांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेलं मराठीसाठीचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर स्वत:च मागे घेतलं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून मराठी तरुणांची राज्यात होत असलेली घुसमट लक्षात घेता असं आंदोलन सुरू होणं ही आता काळ्या दगडावरची रेघ बनली आहे. राज्यात कायद्याचं राज्य राखणं ही दुय्यम बाब बनली आहे. बिहारसारख्या राज्यात निवडणुका असल्याने कायद्याहून निवडणुका जिंकण्याला महत्व अधिक. यामुळे कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्रात प्रांतीय आंदोलनाची सत्तेला अपेक्षा नाही. यातूनच मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन राज यांना केलं आणि राज यांनी ते थांबवलंही. गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी मोहीम सुरू करण्याची हाक दिली होती. मराठी बोलण्यास नकार देणार्‍यांना थपडेचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक, दि.१२ एप्रिल –  नाशिक जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आर.आर. राठी यांची तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झाली असून, जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. जगमलानी यांनी यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली होती. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.११ एप्रिल) सकाळी जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले आणि न्यायाधीश राठी यांनी सकाळी १० वाजता कार्यालयात नियमितपणे हजेरी लावली. त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीशांशी (Principal District Judge) काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना बदलीचे पत्र देण्यात आले. दरम्यान राठी यांच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजात काही…

Read More

संगमनेर, दि.१२ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली. परंपरेनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला. त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीत संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सहभाग घेतला होता. महिलांनी रथ ओढल्यानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजविण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले. हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक कार्यकर्त्यांमध्ये…

Read More