Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त भंडारदरा, दि. २६ जुलै: भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छा फलकासह शहरात लावण्यात आलेला माजी खासदार सुजय विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पाठोपाठ हा दुसरा प्रकार समोर आला. अकोले नाका येथे जाजू पेट्रोल पंपासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यात आला होता या फ्लेक्स वर असलेले माजी खासदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: एका कांदा व्यापाऱ्याला ट्रान्सपोर्टद्वारे कांदा विक्री करूनही २६ लाख ४१ हजार ३७९ रुपये न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आंधळे यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केटमध्ये कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत मोहम्मद नदिम (रा. सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश), अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन आणि छोटे मिया अँड कंपनी (पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त शासनाकडून भरमसाट पगार मिळत असतानाही, अतिरिक्त कमाईच्या हव्यासापोटी लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका मजुराला यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही कारवाई करण्यात आली. मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा असताना, मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोने (२६), पवन तानसेन भितकर (३०) आणि नीलेश भास्कर तलवारे (३०) यांनी कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे मुरूम वाहतुकीच्या सर्व कायदेशीर पावत्या असतानाही, या कर्मचाऱ्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस दूध संघ) संचालकपदी खांडगाव येथील रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २५ जुलै २०२५ रोजी राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…
संगमनेर, प्रतिनिधी: महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…
अहिल्यानगर, दि. २५ जुलै: शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक पाऊल उचलले आहे. त्यांनी शालेय बस आणि इतर विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा शालेय बस सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या महत्त्वाच्या बैठकीला महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे आणि चंद्रकांत खेमनर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक शालेय बस किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनामध्ये सीसीटीव्ही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या चैतन्य नगर मधील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या घरावर मंगळवारी पहाटे काही ओळखीच्या लोकांसह १०-१२ लोकांनी सशस्त्र हल्ला करत वैष्णव मूर्तडक याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच हल्ले पोरांनी घराच्या पॅसेजमध्ये लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले. या घटनेमुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांचे बंधू शिवाजी मुर्तडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध तसेच १०-१२ अनोळखी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग आणि विधवा महिलांना अर्थसाहाय्य यासह विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (२४ जुलै) होणाऱ्या ‘चक्काजाम’ आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देताना, थोरात यांनी महायुती सरकारवर विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, महायुती सरकारने ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना १५०० रुपयेही मिळत नाहीत. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असलेल्या अहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तब्बल दीड कोटीचा ऑनलाईन लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचे पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याच्या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच आहेर यांची देखील आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आहेर यांच्या बदलीमागे देखील याच प्रकरणाचा वास असल्याची चर्चा पोलीस दलात रंगली आहे. दरम्यान आहेर यांच्या जागी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: १४० वर्षांपासून अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगमनेर येथील सर डी.एम. पेटीट विद्यालयाला त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. उद्योजक आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) कैलास सोमाणी यांनी या प्रयत्नांचे नेतृत्व करत, माजी विद्यार्थ्यांकडून यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी विद्यार्थ्यांच्या या एकोप्याने पेटिट विद्यालयाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात, सर डी.एम. पेटीट विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तूंचे वाटप माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्राचार्य चौधरी, माजी प्राचार्य रामनाथ जगताप, श्रीकांत अरगडे, वनम सर, राधेश्याम राठी आदी मान्यवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहाता: कर्जमाफी, सातबारा कोरा, पीक विमा आणि वीजबिल माफीसारख्या अनेक समस्यांनी त्रस्त झालेले राहाता तालुक्यातील शेतकरी आता शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गुरुवारी (२४ जुलै) सकाळी १० वाजता राहाता येथे भव्य शेतकरी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे करणार असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), प्रहार जनशक्ती पक्ष, तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा विरभद्र मंदिर, राहाता येथून सुरू होऊन तहसील कार्यालय, राहाता येथे पोहोचेल. तेथे शेतकरी वर्गाच्या मागण्यांवर विविध नेत्यांची भाषणे होणार आहेत आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अकोले: अकोले तालुक्यातील तिरडे येथील एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक, त्याला मदत करणाऱ्या शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि एका शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहत असताना, हा प्रकार घडला. जेव्हा ती आठवीत होती, तेव्हापासूनच धुपेकर नावाचा शिक्षक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) तासिका संपल्यानंतर वर्गात येऊन तिच्या आणि तिच्या मैत्रिणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असे. एका जेवणाच्या सुट्टीत धुपेकर वर्गात आले आणि पीडित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: राज्यभरात महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७ (तुकडेजोड तुकडेबंदी कायदा) या कायद्याचा सर्रास भंग होत असताना, एकट्या संगमनेर तालुक्यात ११ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने महसूल विभागात तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात बेकायदेशीर तुकड्यांचे नियमितीकरण करून शासनाला २ कोटींहून अधिक महसूल मिळवून दिला असताना, कौतुकाऐवजी निलंबनाची शिक्षा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात दिलेल्या उत्तराने या प्रकरणाला अधिक धार दिली आहे. त्यांनी मान्य केले की, सर्वच मतदारसंघात शेतजमिनीच्या तुकड्यांचा प्रश्न गंभीर आहे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमध्ये सातत्याने वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लावणाऱ्या घटना समोर येत आहेत. कोणी विनयभंगाच्या, तर कोणी बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा डॉक्टरांकडून विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (22 जुलै) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कुरण येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मागील दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉ. राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: अहिल्यानगरच्या एलसीबी मधील पोलीस उपनिरीक्षकासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्याच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच संगमनेर येथे एका धक्कादायक घटनेने पोलीस दलात खळबळ उडवून दिली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक धनंजय महाले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. संगमनेर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीने हे प्रकरण सध्या संगमनेरमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. काय आहे प्रकरण? १९ जानेवारी २०२३ रोजी कतारी यांनी संगमनेर शहर पोलीस…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेत आणि निर्वाचक गण रचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) सरूनाथ सुखदेव उंबरकर यांनी केला असून या संदर्भात जिल्हाधिकारी (जिल्हा निवडणूक अधिकारी) यांच्याकडे हरकत अर्ज दाखल केला आहे. २१ जुलै २०२५ रोजी संगमनेर तहसील कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उंबरकर यांनी आपल्या हरकतीमध्ये म्हटले आहे की, संगमनेर तहसीलदार यांनी प्रारूप प्रभाग रचना आणि निर्वाचक गण रचना करताना शासकीय नियमांचे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या ४ ऑक्टोबर २०११ च्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक विभाग/निर्वाचक गण रचना उत्तर…
महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक तुषार छबूराव धाकराव, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापुसाहेब रावसाहेब फोलाणे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश प्रभाकर भिंगारदे यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तपास करत आहे. या प्रकरणातील फिर्यादीने ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त: पुणे शहरात दारूच्या व्यसनावरून होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका धक्कादायक घटनेत वडिलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. फुरसुंगी परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरेश बाबुराव जमदाडे (वय ५९, रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या आरोपी वडिलांचे नाव आहे. मयत प्रशांत याला दारूचे तीव्र व्यसन होते. या व्यसनामुळे तो घरात नेहमीच वाद घालत असे, ज्यामुळे कुटुंबातील शांतता भंग पावत होती.…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात प्रशासकीय अनियमितता आणि राजकीय हस्तक्षेपावरून मोठे वादळ निर्माण झाले आहे. शासनाच्या तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून येलो आणि ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर तुकडे पाडल्याप्रकरणी दोन मंडळ अधिकारी आणि तीन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच कारवाई करून पाच जणांचे निलंबन करण्यात आले होते. आतापर्यंत दहा जणांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळल्याने या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही होत आहे. प्राप्त माहितीनुसार, मंडल अधिकारी बाबाजी जेडगुले (समनापुर) व इराप्पा काळे (साकुर), तलाठी रोहिणी कोकाटे, तलाठी आलोकचंद्र चिंचुलकर, तलाठी धनराज राठोड या पाच महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर…
