Author: Annant Ppangarkar

रविवार, १७ नोव्हेंबर  एवढी कामे करून मी दुसऱ्या मतदारसंघात उभा राहिला असतो तर निवडून आलो असतो, इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे. आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत. खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही…

Read More

पायाखालची वाळू सरू लागली की माणूस सैरभैर होतो. काय करू, काय नको, असं त्याला होत असतं. राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संकटाची चाहूल लागलेले आतापासूनच वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यांना कधी ‘व्होट जिहादची’ स्वप्न पडतात तर कधी त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची भीती वाटते. खरं तर यातलं काहीही होत नसतं. पण अशी भीती घातली की हिंदू मतदार आपल्याच मतदान करतील, अशी त्यांची मानसिकता बनते. या माणसांचं राज्यात धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण व्हावी, असं वर्तन असतं. त्यांच्या या वर्तनाला घरातूनच विरोध होतो, हे मात्र त्यातल्या त्यात चांगलं लक्षण म्हणता येईल. महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेतील बहुमत आपल्याच हाती असलं पाहिजे या मानसिकतेत…

Read More

भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे. शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडचा आठवा बॉयलर अग्नि प्रदीपन व गणित हंगामाचा शुभारंभ रविवारी (१७ नोव्हेंबर) होत आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन रवींद्र बिरोले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्या हस्ते हा समारंभ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता नसलेल्या कौठे मलकापूरच्या माळरानावर आठ वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी रोवली होती. गेल्या सात वर्षात कारखान्याने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. कारखान्याला दरवर्षी कार्यक्षेत्र बाहेरून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागतो. यावर्षी देखील कारखाना व्यवस्थापनाने नव्या जोमाने गळीत हंगामाची तयारी…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी देखील सर्वच पक्षाचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अद्याप प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. एकीकडे ऐनवेळी दिलेला उमेदवार आणि दुसरीकडे उमेदवाराभोवती जमलेला लाभार्थ्यांचा मेळा यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी गोची झाली आहे. वर्षानुवर्ष विरोधात राहिल्यानंतर आता राजकीय तडजोडीमुळे ज्याला विरोध केला याचाच प्रचार करायची वेळ घेऊन ठेपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला विक्रीस काढले आहे. “साहेब, कार्यकर्ता विकणे आहे” अशा मिष्कील शब्दात राजकीय पक्षांचे निष्ठावंत (नाव न छापण्याच्या अटीवर) आपले दुःख व्यक्त करत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. कोणत्या…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ज्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निवडणुकीतील भाषणांना आणि थोरात यांच्यावरील टिकेला सुरुवात केली जाते, त्या खताळ पाटलांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सेलचे पदाधिकारी असलेले विक्रमसिंह खताळ यांनी शनिवारी शिर्डीमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचार सभेवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून विक्रमसिंह खताळ पाटील भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. गेल्या वेळी तसेच यावेळी देखील खताळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र दोन्ही वेळेला त्यांचा उमेदवारीचा पत्ता पक्षातील काही नेत्यांनी कापण्यात पुढाकार घेतला. एकीकडे खताळ पाटील यांच्या नावावर राजकारण करताना दुसरीकडे त्यांच्या नातवाला पक्षात डावले जात असल्याचे खाजगीत…

Read More

शनिवार, १६ नोव्हेंबर  विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका स्कार्पिओतून दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे ही स्कार्पिओ श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या कुटुंबीयांची असल्याची माहिती समोर येत असून या स्कार्पिओमध्ये नागवडे यांचा मुलगा देखील होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील महत्त्वपूर्ण लढतींचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण लढती असलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू असल्याचे समोर येत आहे. उमेदवाराला पक्षाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचे देखील चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. अशातच नागवडे यांच्या पुत्रासह काहीजणांना रोकड रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय जवळ बाळगताना पकडण्यात आले आहे. श्रीगोंदा मतदार…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर  मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला. विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर अहिल्यानगर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हाट्सअप ग्रुप वर विविध चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर व्हाट्सअप ग्रुप वरून खोटी माहिती प्रसारित केल्याने व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हा प्रकार घडला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे. काय होता मेसेज… जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हाट्सअप ग्रुप वर एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळली आहेत, म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्र. १७ भरुन आपले मतदार ओळखपत्र दाखवून…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे रांगोळी काढून व फुले देऊन स्वागत करण्यात आले. मतदाराच्या कुटुंबियांनी केलेल्या या स्वागताने हे पथक भारावून गेले. ‘सकाळी झालेल्या स्वागताने दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळाली’ अशी भावना मतदान पथकाने व्यक्त केली. संगमनेर तालुक्यात घुलेवाडी येथे वसुंधरा कृष्णराव डांगे (वय वर्ष ९०) या ८५ वर्षावरील मतदाराच्या गृह मतदानासाठी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे पथक सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना सुखद अनुभव आला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदान पथकाच्या स्वागतासाठी मतदाराच्या कुटुंबाने रांगोळ्या काढल्या होत्या. मतदान पथकातील सदस्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले. ‘पंढरीची वारी करी वारकरी, त्याच श्रद्धेने राष्ट्रीय…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर १६ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ७० हून अधिक वृत्तपत्रांना ‘पेड न्यूज’ देण्यात आलेल्या आहेत व त्यासाठी कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम देण्यात आली, अशी धक्कादायक पुराव्यासह माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे. या संदर्भातील त्यांची ट्विटरवरील पोस्ट समाज माध्यमात व्हायरल होत आहे. काय म्हटले आहे यात… निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सुमित शेलार या पुण्यातील व्यक्तीची निवड केली. या शेलारने मुंबईतील एका जाहिरात एजन्सीला हाताशी धरले व महाराष्ट्रातील जवळपास ७० हून अधिक मराठी, गुजराथी व उर्दू या तीन भाषेतील वृत्तपत्रांची यादी गोळा केली.…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर  राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना ‘धन्यवाद साहेब’ म्हटले आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ शिर्डीमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना थोरात यांच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले होते. या अनुषंगाने थोरात यांनी पवार यांना धन्यवाद म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले होते शरद पवार… येथे कधीही आल्यानंतर एका गोष्टीची चर्चा व्हायची, निळवंडे. हे धरण व्हावं यासाठी प्रयत्न होते. येथे कधीही आल्यानंतर आम्ही काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. पण त्या कामाला अनेक वर्षे झाली गतीच येत नव्हती. आणि ज्यावेळी या…

Read More

शुक्रवार, १५ नोव्हेंबर संगमनेर – मोहसीन शेख संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा कळीचा बनला आहे. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य प्रमुख उमेदवारांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी यासंदर्भात समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते वोहरा यांच्या पारड्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम चरणाकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी विविध समाजातील बहुचर्चित प्रश्नांवर बोट ठेवत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत…

Read More

गुरुवार १४ नोव्हेंबर अहिल्यानगर – ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने गृह मतदानाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत गुरुवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित अकरा विधानसभा मतदारसंघात गृह मतदानास (होम वोटिंग) सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १३७९ मतदारांनी गृह मतदान केले. या मतदारांचे मतदान टपालात बंद झाले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६…

Read More

गुरुवार, १४ नोव्हेंबर  संगमनेर – प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी १२२ मतदारांनी आपले मतदान नोंदविले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे. गृह मतदान करणाऱ्यांमध्ये ८५ वर्षावरील ९८ जेष्ठ नागरिकांचा तर २४ दिव्यांग नागरिक मतदारांचा समावेश आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ डी…

Read More

गुरुवार, १४ नोव्हेंबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कळमनुरी विधानसभेचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर मतदारांना पैसे वाटप करणे, विनापरवाना मंडप उभारणी करणे तसेच कार्यक्रमाच्या नावाखाली पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीदरम्यान बांगर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरीतील वाकोडी शिवारात महिलांना एकत्र करून पैसे वाटप केले जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया कारवाईनंतर शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर…

Read More

संगमनेर – मोहसीन शेख विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोठे दमछाक होत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा मात्र वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. मतदारांच्या भेटीनंतर मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहतील याबाबत त्यांना आशा आहेत. प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपल्या मर्यादित अशा प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. प्रस्थापित आणि धनशक्ती विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अजीज वोहरा यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. वाड्या वस्त्यांवर जात ते आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत. शहरातील मतदारांच्या गाठीभेटीनंतर वोहरा यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बुधवारी त्यांनी…

Read More

गुरुवार, १४ नोव्हेंबर नाशिक – राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले भाजप नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यामुळे या मतदारसंघात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पेठ-सुरगाणा या…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहेत. दोन्हीही बाजूंनी प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरलेली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. असाच तिढा मुख्यमंत्रि‍पदाबद्दल होणार का असा प्रश्न निर्माण आहे. मविआचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांना वहिनीने केला असता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन निवडणूक काळात गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. केवळ गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांनी तात्काळ डॉ. विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ, अशी आक्रमक…

Read More