Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  मुंबई विशेष प्रतिनिधी / संगमनेर:  संगमनेर शहरातील इंदिरानगर व शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात तात्काळ संबंधितांना निर्देश दिले आहे. https://www.facebook.com/share/p/1AMAUE11k8/ या भेटीत आमदार तांबे यांनी, संगमनेर बुद्रुक येथील सर्वेक्षण क्रमांक १०४, १०५, १०६ (४४२) आणि २१९ मधील ‘पोकळीस्त’ आणि इतर हक्कांच्या नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर सात-बारा (7/12) आणि सिटी सर्व्हे अभिलेखात नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची विनंती करत व या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. https://x.com/satyajeettambe/status/1952684256733679652?t=AVPYxI1ZUXjBgZA9uTZ4Ug&s=19 या महत्त्वपूर्ण मागणीवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: सत्ताधारी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेल्या व्यक्तीची थेट न्यायाधीशपदी नेमणूक करण्याच्या संभाव्य निर्णयामुळे राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत ही नियुक्ती म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. आमदार पवार यांनी या प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना या पदावर नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? संविधानाने सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी आणि ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ (नियंत्रण आणि संतुलन) राखण्यासाठी ‘सेपरेशन ऑफ पॉवर’ (अधिकारांचे विभाजन) हे तत्त्व स्वीकारले आहे. राजकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिक: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका जाहीर भाषणात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या तिरंग्याऐवजी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन करतानाच सर्वधर्म समभावाला ‘ढोंगीपणा’ म्हणत ‘भारत मातेच्या भविष्याशी केलेली प्रतारणा’ असं संबोधलं. नाशिक दौऱ्यावर असताना राणेनगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने उभारलेल्या 51 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.  ‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर बोलताना भिडे म्हणाले, “आपण तिरंगा आणि संविधान मानले पाहिजे, पण भगवा ध्वज हे हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं आहे. मंगळवारी (5 ऑगस्ट) वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. https://x.com/ANI/status/1952643366279061747?t=7Y3jHGgQ2YWlsZapmBai-A&s=19 सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयावेळी राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर:  अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष (ग्रामीण) जयंत वाघ यांनी अखेर सोमवारी (४ ऑगस्ट) आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी वाघ यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती, परंतु काही व्यक्तिगत कारणांमुळे त्यांनी पदाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता येत नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. जानेवारी २०२३ पासूनच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींमुळे अनेकांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. काँग्रेसचे तत्कालीन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे राज्यात निवडणुका लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील आणि यामध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचा अधिकार न्यायालयाने प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारने निश्चित केलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. लातूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी:  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सातत्याने चर्चेत असलेल्या महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. स्वाती संतोष अंकाराम यांची अध्यक्षपदी तर आरती पवन पासकंटी व गीतांजली शैलेंद्र शेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या आणि गणेशोत्सवामध्ये सामाजिक देखाव्यातून प्रबोधन करणाऱ्या महाराणा प्रताप मंडळाच्या देखाव्याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागलेले असते. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर महिला मंडळाचे नवे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.  कार्यकारिणीमध्ये यांचा आहे समावेश…  वैशाली काशिनाथ आडेप व साईसुधा विलास वन्नम (कार्याध्यक्ष), ललिता हिरालाल दुस्सा व लता किसन कोम्पेल्ली (सहकार्याध्यक्ष), वैशाली अंबादास आडेप (खजिनदार), जयश्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: राष्ट्र उभारणीसाठी समर्पित असलेल्या माजी विद्यार्थी व स्काऊट्स सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण इटप यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली. या सभेमध्ये उपाध्यक्षपदी संभाजी कानवडे आणि दिगंबर बंदावणे, तर सचिवपदी नारायण उगले आणि खजिनदारपदी डॉ. संजय गुंजाळ यांची निवड झाली. कायदेशीर सल्लागार म्हणून भाऊसाहेब हांडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेशाम गुंजाळ हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या विश्वस्त मंडळातही फेरबदल करण्यात आले असून, शिवाजी डेंगळे, लक्ष्मण डांगे, याह्याखान पठाण, मुरलीधर बारेकर, विश्वनाथ वर्पे आणि भरत कुटे यांचीही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पारनेर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या अपघाती निधनामुळे नैराश्य आलेल्या एका महिलेने आपल्या एकुलत्या एक मुलीसह शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे १:३० च्या सुमारास पारनेर तालुक्यातील कन्हेर ओहळ परिसरात उघडकीस आली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) आणि शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी, पारनेर रस्त्यावर झालेल्या एका अपघातात सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे निधन झाले होते. पतीच्या अकाली निधनामुळे सुरेखा नैराश्यात होत्या. पारनेर शहरात राहणाऱ्या सुरेखा आणि त्यांची मुलगी शिवांजली,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी:  भोजापूर चारीद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळाल्यानंतर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल आणि पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सातत्यपूर्ण काम आणि निसर्गाच्या मदतीमुळे पाणी आले. यात तुमचं योगदान काय? तुम्ही आठ महिन्यात चारी केली का? असा परखड सवाल थोरात यांनी विखे पाटलांना विचारला आहे. थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले. तसेच, कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी पोहोचावे यासाठीही आपला कायम प्रयत्न राहिला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…

Read More