Author: अनंत पांगारकर
बुधवार, ३१ जुलै भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून यामुळे धरणात पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा ९१ टक्केपर्यंत गेल्याने धरणातून प्रवरा नदी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. बुधवारपासून धरणात एक हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे भंडारदरा धरण ते निळवंडे धरणापर्यंतच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक देखील सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन कक्षाला कळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहा…
बुधवार, ३१ जुलै मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… १) गृह विभाग महाराष्ट्रातील कारागृहे होणार अद्ययावत सुधारणांसाठी अध्यादेश काढणार महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारने कारागृहातील बंद्यांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाचा विचार करून मॉडेल प्रिझन्स ॲक्ट २०२३ तयार केला आहे. तसेच सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशानी देखील या संदर्भात आवश्यक वाटतील त्या सुधारणा करण्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने कारागृह विभागाच्या प्रमुखाचे नामाभिधान महासंचालक, कारागृह व सुधारसेवा…
मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई उरण हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. दाऊदचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दाऊदचे मित्र, नातेवाईकांची मदत घेतल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्य संशयित आरोपी दाऊदच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली होती. उरणमध्ये एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संशयित आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याला कसं पकडलं याची माहिती दिली. यासह पीडितेची हत्या कशी झाली, यावरही पोलिसांनीही भाष्य केल. तरुणी तसंच आरोपी यांच्यात मैत्री होती. मृत तरुणीचा आरोपीशी गेल्या तीन-चार वर्षांपासून संपर्क नव्हता. त्यातूनच…
मंगळवार, ३० जुलै खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर अहमदनगर जिल्ह्यात नगरच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा भ्रष्टाचार समोर आला असतानाच आता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे देखील हप्तेखोरी समोर आली असून या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हप्ते घेऊन संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात हॉटेल, ढाब्यांवर एसटी बसेससाठी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. हप्ते घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेले अनधिकृत थांबे त्वरित बंद करून अधिकारी, कर्मचारी, बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी कतारी यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यात…
मंगळवार, ३० जुलै अवैध धंद्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे वृत्त असून अहमदनगर एलसीबीने १६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे पोलीस ॲक्शन मोडवर आले असले तरी, दुसरीकडे मात्र संगमनेरमध्ये सर्व काही आलबेल असून येथील अवैध धंदे नियमितपणे सुरळीत सुरू आहेत. या धंद्यांवर कारवाईसाठी पोलिस नावाच्या यंत्रणेकडे वेळ नसल्याचे दिसते. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देऊन कारवायांचा आढावा घेतला आहे. पोलिस ठाण्यांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र अवैध धंद्यांवरील कारवाईचे…
मंगळवार, ३० जुलै सर्वत्र डिजेला बंदी आहे, तरीही संगमनेरमध्ये जमिनीला हादरे देणारे कर्णकर्कश आवाजाचे डीजे सर्रासपणे दणदणाट करत आहे. बंदी असलेल्या या डीजेच्या आवाज बंद करण्याची मागणी संगमनेरमधील जेष्ठ नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील अनेक गावात डीजेचा दणदणात सुरू असल्याने त्याच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. लहान मुले, आजारी असलेले नागरिक यामुळे त्रस्त झाले आहे. सरकारने ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत कायदा करून देखील सर्व नियम धाब्यावर बसवून परिसरात…
मंगळवार, ३० जुलै मोठ्या आवाजातील फटाके फोडणारे सायलेन्सर, कंटाळा बसविणारे सायलेन्सर, चित्रविचित्र हॉर्न वाजवत रस्त्यावर स्टंटबाजी करत रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचविण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या हुल्लडबाजांवर संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कारवाईचा हिसका दाखविला आहे. सोमवारी संगमनेर शहरातील शासकीय विश्रामगृह ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंतच्या जुन्या मार्गावर दोन मोटरसायकलस्वारांनी स्टंटबाजी करत आपल्या दुचाकी भरधाव वेगाने नेल्या होत्या. याच दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या काही दक्ष नागरिकांनी या हुल्लडबाज, स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ काढून ते संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना व्हाट्सअपवर पाठविले होते. बघा व्हिडिओ… वाघचौरे यांनी हे व्हिडिओ फोटोग्राफ्स बघितल्यानंतर ताबडतोब दोन्ही मोटर सायकलस्वार तरुणांचा शोध घेण्याच्या…
मंगळवार, ३० जुलै विशेष प्रतिनिधी / मुंबई – राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात. रोजगार देतात. परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये जुलै २०२० ते जुलै २०२४ या मागील चार वर्षांत राज्यातील बारा हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरात धार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. मात्र या अडीच वर्षातच नाही…
सोमवार, २९ जुलै अहमदनगर – नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अहमदनगर जिल्हा तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये ६४ हजार ७२२ प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये १ अब्ज ३८ कोटी २२ लाख ५१ हजार ३०४ रुपयांची वसुली झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेश गुगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधिक्षक (गृह) हरीश खेडकर, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. सागर पादिर, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. पिंटू…
सोमवार, २९ जुलै अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी एलसीबीतील भ्रष्टाचाराविरोधात एल्गार देत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी संगमनेरमधील अवैध धंदे सुरूच आहे. लंके यांच्या उपोषणाकडे पाठ फिरविणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांकडे देखील दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून एलसीबी भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. खासदार लंके यांनी उपोषणादरम्यान जाहीर केलेल्या या भ्रष्ट शाखेच्या रेटकार्डचा जर विचार केला तर तब्बल तीस कोटी रुपयांचा हप्ता दरमहा एलसीबी गोळा करते. या रेडकार्ड मध्ये लंकेंकडून राहिलेली…
