Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्यातील चास तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अमितेश बलराज बिडे (वय १०) आणि अनिकेत बलराज बिडे (वय ०६, रा. चास, ता. अहिल्यानगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेने चास परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमितेश आणि अनिकेत हे दोघे भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत असताना पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या एका डबक्यात पडले. ही बाब लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते. त्यांचे चुलते…

Read More

मुंबई, २८ मे:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज नियोजन विभागाने जारी केला. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने बैठका घेऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय वेळेत जारी होऊ शकला आहे. जगातील महान स्त्री राज्यकर्त्यांपैकी एक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार विशेष प्रयत्नशील होते. अर्थसंकल्पीय…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या अडचणी लक्षात घेता, संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयाने यंदाही विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली असल्याची माहिती यशोधनचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड यांनी दिली आहे. या दाखल्यांचा समावेश… राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी आणि जात प्रमाणपत्र यांसारखे आवश्यक दाखले तात्काळ मिळवता येणार आहेत. ऐतिहासिक निर्णयाची आठवण आणि सद्यस्थिती… माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात राज्यभरात ‘शाळेतच दाखले’…

Read More

छत्रपती संभाजीनगर-  वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी ४१ लाखांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर आणि त्यांचा महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर खिरोळकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६७ लाख ४५ हजार रुपयांचे घबाड सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथील ६ हजार १८ गुंठे वर्ग-२ जमीन एका व्यक्तीने नियमानुसार खरेदी केली होती. ही जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी आधीच २३ लाख रुपये घेतले होते. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि चलन देण्यासाठी त्यांनी आणखी १८ लाख रुपयांची मागणी केली. यातील ५ लाख रुपये…

Read More

अहिल्यानगर दि.२७-  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ मे ते १० जुन २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

मुंबई राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारच्या ताब्यात गेलेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अंदाजे ५ हजार एकर जमिनींचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी… सध्या राज्यात सुमारे ५ हजार एकर आकारीपड जमिनी आहेत, त्यापैकी एकट्या पुणे विभागात ५९७ एकर जमीन आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत…

Read More

संगमनेर, अनंत पांगारकर दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०१३ मध्ये सुरू केलेल्या “शाळेतूनच दाखले वाटप” योजनेची आठवण पालकांना होत आहे. थोरातांच्या दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला होता आणि आता तो पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. थोरातांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे फायदे… २०१३ मध्ये महसूल मंत्री असताना, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘सुवर्ण…

Read More

अहिल्यानगर – महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार आनंद भंडारी यांनी सोमवारी स्वीकारला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना येरेकर म्हणाले, आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच कष्ट करण्याची आणि गुणवत्तेची सवय लागली. गडचिरोली ते अमरावती व्हाया अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक अधिकारी आणि विविध विभागांसोबत काम करताना जिल्हा परिषद या संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. येथील विविध उपक्रम आणि प्रगतीचा मला अभिमान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे सतत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शेवगाव येथील शिवसेनेच्या नवप्रविष्ट महिला नेत्या विद्याताई जावेद गाडेकर आणि त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण… अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर), रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाणने अटकळे यांना त्यांच्या विद्यानगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी विद्या गाडेकरही उपस्थित होत्या. पठाणने त्यांना घरातील चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घ्यायला लावले आणि घरातील सोन्याचे दागिने दाखवून आपला सोने…

Read More

अहिल्यानगर, २६ मे:  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी प्रशासन आणि वारकरी यांच्यात समन्वयाची ग्वाही दिली आहे. त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प. अशोक सावंत आदी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी सांगितले की, जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात जातात.…

Read More