Author: Annant Ppangarkar

शुक्रवार, दि.१९ एप्रिल बुधवारी श्रीराम नवमीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दुर्दैवी घटना घडली. पावसे परिवारातील दोन सख्या लहान भावंडांचा शेततळ्यात घडून दुर्दैवी मृत्यू झाला. संगमनेर तालुका एक परिवार समजून कुटुंबप्रमुख असलेले काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सकाळी या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. श्रीराम नवमीच्या दिवशी सायंकाळी खेळता खेळता शेत तळ्यात बुडून पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या रितेश सारंगधर पावसे (वय १२ वर्षे) व तिसरा इफेक्ट शिकणाऱ्या प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष) या दोघा भावंडांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात दुःखद वातावरण तयार झाले. वर्षभरापूर्वीच घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने या कुटुंबावरील छत्र हरपले…

Read More

गुरुवार, दि. १८ एप्रिल  राज्य महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी प्रवेश करतात गुरुवारी वंचित कडून शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता शिर्डीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार आहे. शिर्डीत वंचितच्या उमेदवारामुळे राजकीय गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे. रुपवते यांच्या उमेदवारीचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सर्वाधिक बसण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षापासून मतदार संघात फारसे न फिरकणाऱ्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी मतदारसंघात नाराजीचे वातावरण आहे. अशा स्थितीत रूपवते यांची उमेदवारी या मतदारसंघात काय परिणाम…

Read More

शिर्डी, गुरुवार दि. १८ एप्रिल  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. १३ मे) मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि. १८ एप्रिल) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. मात्र पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. गुरूवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. तसेच याच दिवसापासून २५ एप्रिल २०२४ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, १ ला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे नामनिर्देशन पत्र नाममात्र शुल्कात दिले जात आहेत. नामनिर्देशन…

Read More

गुरुवार, दि.१८ एप्रिल एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असे सांगून अल्पवयीन पुतणीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिरात नेत तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पांडुरंग यशवंत शेंगाळ, रा. शेंगाळवाडी, हिवरगाव पठार ता. संगमनेर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष फरार होता. कोरोना महामारीच्या काळात आरोपी आपल्या घरी आला होता. नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. न्यायालयाने काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेला आरोपीला पोलिसांना पकडता आले. त्यानंतर आरोपी तुरुंगात होता. १९ जुलै २०१३…

Read More

गुरुवार, दि.१८ एप्रिल  राज्य महिला आयोगाच्या सदस्य, काँग्रेसच्या महासचिव पदासह सर्व पदांचा राजीनामा देणाऱ्या उत्कर्षा रुपवते यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार असल्यास या मतदारसंघातील राजकीय गणित बदलणार असून त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत. बुधवारी रुपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवल्यानंतर पाठोपाठ त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंबेडकरांच्या यशवंत भवन निवासस्थानी वंचित मध्ये प्रवेश केला असून आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावेळी वंचितचे राज्य…

Read More

बुधवार, दि.१७ एप्रिल पाटाच्या कडेला खेळण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावंडाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना बुधवारी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली. संगमनेर मध्ये राम नवमी उत्सव जल्लोषात साजरा होत असताना दोघा भावंडाच्या मृत्यूच्या या वृत्तामुळे संगमनेरात दुःखाची छाया पसरली. ऋतिक सारंगधर पावसे (वय १२ वर्ष) व प्रणव सारंगधर पावसे (वय ८ वर्ष, दोघे रा. हिवरगाव पावसा ता. संगमनेर) अशी दोघा मृत भावंडांची नावे आहे. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुर्दैवाची…

Read More

बुधवारी संगमनेर मध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्त शहरातील विविध मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  (सर्व छायाचित्रे आणि व्हिडिओ काशिनाथ गोसावी, संगमनेर) बघा शोभा यात्रेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे…

Read More

बुधवार, दि.१७ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदाचा व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रूपवते यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. रुपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थीपणे अहोरात्र पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतो याबद्दल पक्ष नेतृत्वाने विचार करण्याची गरज त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य…

Read More

बुधवार, दि.१७ एप्रिल  धुळे, सातारा आदि महत्त्वाच्या मतदारसंघातील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात सर्वतोपरी प्रयत्न करत असताना त्यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे थोरातांची कोंडी झाली असल्याचे दिसते. तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाटेला गेली आहे. येथून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. साताऱ्याच्या या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. संभाव्य बंडखोरी आणि काँग्रेस मधील अंतर्गत नाराजी दूर करण्याचे थोरात यांच्यासमोर आव्हान आहे. अशातच सांगलीच्या…

Read More

अहमदनगर, बुधवार दि.१७ एप्रिल नगर जिल्‍हयात जुन ते सप्‍टेंबर, २०२३ या कालावधीत झालेली पर्जन्‍यमानातील तुट तसेच उपलब्‍ध असलेल्‍या भुजलाची कमतरता यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच दुष्‍काळ परिस्थितीच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे टंचाई नियंत्रण कक्ष कार्यान्‍वीत करण्‍यात आला आहे. या कक्षाचा दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री) व 0241-2323844 असा असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Read More

बुधवार, दि. १७ एप्रिल  संगमनेर तालुक्यातील साकुरमध्ये मंगळवारी रात्री चार चाकी वाहनात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मनोज गोविंद वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, पारनेर) असे या तरुणांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. साकुरमधील गव्हाळीत एका झाडाखाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनामध्ये एक तरुण निपचित पडला असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घारगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मिळालेल्या माहितीत मनोज गोविंद वाळुंज असं या तरुणाचं नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप समोर आले नसले तरी घारगाव पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहे.

Read More

शिर्डी लोकसभेत १७०८ मतदान केंद्र : १६ लाख ६० हजार मतदार : ८४२७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया – ‍निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांची माहिती मंगळवार, दि. १६ एप्रिल  सर्व उमेदवार व पक्षांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने, त्याचप्रमाणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व अनुसूचित पध्दतीच्या वापरावर निर्बंध आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने व समन्वयाने काम करावे. निवडणूकी कामी ‍नियुक्ती अधिकारी- कर्मचाऱ्यांनी अतिशय तत्पर व दक्ष राहत नि:पक्ष पध्दतीने कामकाज करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी आज येथे केल्या. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विविध पथक प्रमुख (नोडल अधिकारी) यांची आज राहाता‌ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या…

Read More

मंगळवार, दि. १६ एप्रिल  योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी मागितलेल्या बिनशर्त माफीची दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने…

Read More

मंगळवार दि. १६ एप्रिल अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा २२ जानेवारीला झाल्यानंतर आता संगमनेरात पुन्हा एकदा राम जन्मोत्सवाची व भव्य शोभायात्रेची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजता रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रेला नवीन नगर रोड येथील राम मंदिर येथून प्रारंभ होवून बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक व चंद्रशेखर चौक येथील राम मंदिर येथे महाआरती होवून सांगता होणार आहे. या मार्गात असणाऱ्या मंदिर व घरांवर विद्युत रोषणाई करून सडा- रांगोळी करावी, शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी करावी. संगमनेर शहर व तालुक्यातील सर्वांनी या भव्य दिव्य शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग…

Read More

मंगळवार, दि. १६ एप्रिल  संगमनेरच्या पोलीस निरीक्षकांवर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले असतानाच आता पोलीस उपनिरीक्षकाचे नवे प्रकरण समोर आले आहे. ३३ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून या पोलीस उपनिरीक्षकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून समोर आलेल्या या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिल्याने तिला जामखेड मधील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचे या युवतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माणिक महामुनी (वय ३८, रा. नागपूर) असे…

Read More

सोमवार, दि. १५ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदान केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी गावातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. २०२४ च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर…

Read More

सोमवार, दि. १५ एप्रिल काही गट दबाव निर्माण करून, चुकीची माहिती पसरवून आणि सार्वजनिक अपमान करून न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकुचित राजकीय हितसंबंध आणि वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन काही घटक अशा प्रकारचे कृत्य करत आहे, यापासून न्यायव्यवस्था वाचविण्याची गरज असल्याच्या आशयाचे न्यायव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयातील चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा अशा २१ निवृत्त न्यायाधीशांच्या समूहाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेवर येणारा दबाव थांबवायला हवा. न्यायव्यवस्थेला अवाजवी दबावापासून वाचविण्याची आवश्यकता आहे. राजकीय संबंध, वैयक्तिक फायद्यासाठी काही घटक न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास उडेल…

Read More

सोमवार, दि. १५ एप्रिल  देशात लोकसभा निवडणूक आचारसंहिता १६ मार्चपासून सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरीदेखील आचारसंहिता भंगाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्याची व त्यातील बहुतांशी तक्रारीचे निराकरण केल्याची माहिती आचारसंहिता कक्षाकडून देण्यात आली आहे. सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता नियंत्रण कक्षाकडे आलेल्या शंभर टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार किरण देवतरसे यांनी दिली. अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी निवडणूक होत आहे. सत्ताधारी महायुती आणि…

Read More

गबरूच्या देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. गबरूच्या अंगातही निवडणुकीचे वारे संचारले आहे. त्यामुळे रात्री उशिराने झोपलेला गबरू सकाळी जरा उशिराच उठला मात्र त्याचा आळस रात्रीच्या जागरणामुळे दूर झाला नव्हता. तशाही अवस्थेत गबरूने आपला मोबाईल हातात घेत त्याचं इंटरनेट चालू केलं. आणि व्हाट्सअप मेसेज वाचू लागला. व्हाट्सअप ग्रुपवरचा एक मेसेज पाहिला आणि गबरूच्या अंगात पुन्हा निवडणुकीचे वार संचारलं. त्यामुळे गबरू घाईघाईनं अंथरुणातून दूर झाला आणि आपले सकाळचे विधी आवरू लागला. त्याची आंघोळ होऊन कपडे घालून तो हॉलमध्ये येईपर्यंत त्याच्या आईने त्याच्यासमोर नाश्ता आणून ठेवला. मात्र आईने आणलेला नाश्ता न घेताच दहा वाजल्याने तो घाई घाईने घराबाहेर पडला. गबरूच्या गावात…

Read More

रविवार, दि. १४ एप्रिल  रोज काही ना काही घटना घडणाऱ्या संगमनेर मध्ये शनिवारी दाखल झालेल्या गुन्ह्यातून नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील एका महिलेने एका सलूनमध्ये आपला विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली तर सलून चालकाने सदर महिलेने आपल्या दुकानात गोंधळ घालून धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही तक्रारीवरून शहर पोलिसांनी विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरामध्ये जावेद हबीब सलून या दुकानाची फ्रेंचाईजी आहे. या दुकानांमध्ये कृष्णा सारडा नावाची एक महिला स्वतःचे केस वॉश करण्यासाठी गेली होती. सदर महिलेला तेथील स्टाफमध्ये काम करणाऱ्या एका शाकिब नावाच्या मुस्लिम कर्मचाऱ्याने हेअर वॉशच्या वेळी मॅडम…

Read More