Author: Annant Ppangarkar

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गुरुवारी (२८ मार्च) संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार संगमनेर नगर परिषदेच्या प्रांगणातून शिवसेनेच्या हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने पारंपारिक भव्य दिव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापासून संगमनेरात घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे येथील शांततेला गालबोट लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनातील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी संगमनेरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने योग्य ती सतर्कता बाळगत मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला…

Read More

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या दोन समाजातील वादाच्या विविध घटनांमुळे सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या संभाव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सतर्क असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. मोर्चाच्या आयोजकांच्या देखील काही मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जात त्या दृष्टीने कार्यवाही देखील केली जात…

Read More

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने दोन धर्मीयात घडत आहे. काही अपप्रवृत्ती शहरात अशांतता निर्माण करत असून अशा चितावणीखोर व गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय संगमनेरकर एकवटले होते. संगमनेरची शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले. यांची होती उपस्थिती… माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक, उद्योजक मनीष मालपाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, संजय फड, शिवजयंती उत्सव समितीचे सागर बागे, भाजपा युवा मोर्चाचे दीपेश…

Read More

सोमवार दि. २५ मार्च, मुंबई लोकसभा उमेदवारीनंतर प्रामुख्याने पुढे आलेल्या विखे पिता-पुत्र आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर मंथन करण्यात आले. या बैठकीत विखे पिता पुत्र आणि शिंदे यांच्यातील वादावर तोडगा काढत मतभेद मिटले असले तरी मनभेद कायम असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामधून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर याच मतदारसंघातून इच्छुक असलेले विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पाठोपाठ त्यांनी पाथर्डीमध्ये झालेल्या बैठकीवेळी देखील अनुपस्थिती दर्शविल्याने विखेंसोबतचा वाद आणखी स्पष्ट झाला होता. दरम्यान शिंदे यांनी…

Read More

रविवार दि. २४ मार्च, संगमनेर बस स्थानकावरील कॉम्प्लेक्समध्ये औषधे खरेदी करण्यासाठी आलेल्या मुस्लिम तरुणाला रागाने का बघतो, असे विचारणा करत ‘जय श्रीराम’ म्हणण्यासाठी त्याला आठ ते नऊ जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी बस स्थानकावर घडला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या नागरिकांची गर्दी जमली यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलेले आहे. या घटनेमुळे संगमनेर शहराचे वातावरण ढवळून निघाले असून शहराची शांतता धोक्यात आली आहे. शहरात तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून…

Read More

संगमनेरात अशांतता निर्माण करणाऱ्यांना जनतेने ओळखले आहे: थोरात भाजपमध्येही अत्यंत निष्ठेने काम केले परंतु त्या ठिकाणी स्वार्थ: शेजुळ रविवार दि. २४ मार्च, संगमनेर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण भाजपमध्ये जात असताना संगमनेरात मात्र भाजपचे दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष ॲड. रामदास शेजुळ यांनी आपल्या समर्थकांसह रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शॅम्प्रोत हा प्रवेश केला आहे. शेजवळ यांच्यासह ओझर परिसरातील त्यांच्या समर्थकांचादेखील यामध्ये समावेश आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, मीरा शेटे, ॲड. लक्ष्मण खेमनर, संतोष हासे, राजेंद्र चकोर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.…

Read More

रविवार दि. २४ मार्च, अहमदनगर अहमदनगरमधील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात संगमनेरमधून अटक केलेल्या उद्योजक अमित पंडित याची जिल्हा न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठाडीत रवानगी केली आहे. त्यामुळे आता पंडितला जामीन मिळण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात संचालकांसह काही कर्जदार देखील आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले आहे. संगमनेरमधील उद्योजक आणि अमृतवाहिनी बँकेचा काही काळ अध्यक्ष असलेल्या अमित पंडितने ३३ कोटी रुपयाहून अधिक रकमेचा कर्जघोटाळा केल्याचे बोलले जाते. फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आत्तापर्यंत या घोटाळ्यामध्ये १०५ आरोपी निष्पन्न झाले आहे. बडा कर्जदार असलेल्या पंडितचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.…

Read More

रविवार दि. २४ मार्च, संगमनेर अनंत पांगारकर तब्बल सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील व्हाईट कॉलर आरोपींपर्यंत पोलिस यंत्रणेला पोहोचण्यात अपयश आले आहे. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित समजला जाणारा मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटेसह जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारलेल्या आरोपीपैकी एकही आरोपी नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागलेला नाही. नगर अर्बन बँकेत एकापाठोपाठ आरोपींवर कारवाई करत ठेवीदारांना दिलासा देणारी आर्थिक गुन्हे शाखेची यंत्रणा दूधगंगा प्रकरणी मात्र राजकीय दबावाखाली देखील असल्याचे चर्चिले जात आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ हाच एकमेव आरोपी सध्या अटकेत असून…

Read More

ॲड. गोरक्ष कापकर आज २३ मार्च, चार वर्षापूर्वी देशात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन, त्यानंतर देशात कोरोनाच्या महामारीने उद्भवलेली परिस्थिती ज्यांनी पाहिली आणि भोगली, ती त्यांच्या मरेपर्यंत स्मरणात राहील. खरं तर २०२० साल हे ‘माणूस आणि माणुसकी’ या दोन गोष्टी जगाला शिकवणारे वर्ष होते. अंतराळात जाऊन मंगळावर वस्ती करण्याच्या कल्पना करणारा माणूस, रस्त्या-रस्त्यावर अनवाणी पायाने अश्मयुगातील टोळ्यासारखा अदृश्य आजाराच्या भयाने जीव वाचवण्यासाठी पळू लागला होता. ना त्याच्या जवळ खायला होतं, ना जवळ पाणी प्यायला होतं. माणूस माणसाला परक्या माणसासारखा दूर लोटू लागला होता. एरव्ही समूहाने राहणारा माणूस उपाशीपोटी माणुसकीने अस्पृश्य समजून दूर लोटले म्हणून शहरातुन गावाच्या ओढीने आपल्या माणसाकडे…

Read More

प्रवीण पुरो – मुंबई भारतीय जनता पक्ष हा सत्तेशिवाय कोणाचाच होऊ शकत नाही, हे त्या पक्षाने आणि आजच्या त्या पक्षाच्या नेत्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत काहीही करू शकतात. कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. राजकीय पक्ष म्हणून असलेले अभिनिवेष त्या पक्षाने आणि त्यांच्या नेत्यांनी कधीच गुंडाळून ठेवल्याने येनकेन प्रकारेन सत्ता हेच केंद्र त्यांनी प्रमाण मानलं. आपलं काम भागलं की ते सोबत केलेल्यांची काहीही ठेवायची नाही हा त्या पक्षाचा आणि नेत्यांचा मूलमंत्र. तुम्ही कितीही खरे असा, त्यांच्या खोटेपणापुढे तुमचं काहीच चालत नाही, हे देशाच्या नव्या राजकारणाने दाखवून दिलं आहे. आज हे सांगण्याची वेळ म्हणजे येऊ घातलेल्या…

Read More

शनिवार दि. २३ मार्च, संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावर समनापुर लागत असलेल्या हॉटेल नेचर जवळील मैदानात २३ वर्षीय तरुणाचा गळा कापून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे तणावपूर्ण परिस्थिती असताना पोलीस अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत अवघ्या तीन तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला. या संदर्भात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून कौटुंबिक कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. शनिवारी सकाळी हॉटेल नेचर जवळील मैदानात खून झालेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह पोलीस पथकाने…

Read More

शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह…

Read More

शुक्रवार दि. २३ मार्च, संगमनेर शासकीय वसुलीच्या दृष्टीने मार्च महिना महत्त्वाचा समजला जात असल्याने शनिवार, रविवार आणि सोमवारी शासकीय सुट्ट्यांचे दिवस असतानादेखील संगमनेर नगर परिषदेचा वसुली विभाग सुरूच राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे. २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वसुली पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय करांचा भरणा वेळेत व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत २३ ते २५ मार्च दरम्यान शासकीय सुट्ट्या असताना देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने वसुली विभाग सुरूच ठेवला जाणार आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या उपस्थितीत उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कर निर्धारण…

Read More

शुक्रवार दि. २२ मार्च, अहमदनगर नगर दक्षिणमधून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद सुरूच असल्याचे दिसते. भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी अहमदनगरच्या दौऱ्यावर आल्या असताना या दौऱ्यावेळी आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती समोर आली आहे. अद्यापही शिंदे नाराज असल्याचे बोलले जाते. भाजपच्या बीडमधून उमेदवार असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. पाथर्डीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली. खासदार…

Read More

शुक्रवार दि. २२ मार्च, संगमनेर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या आत्महत्या कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. अद्यापही या गुन्ह्यातील एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रुबाब पान शॉपमध्ये दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून सौरभ रावसाहेब खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने २९ फेब्रुवारीला सकाळी आठ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान अत्याचार केला होता. सौरभ खेमनर मुलीवर अत्याचार करत असताना त्याचा जोडीदार योगेश रामा खेमनर (रा. हिरेवाडी, साकुर) याने पान स्टॉलचे शटर बाहेरून बंद करून त्याला कुलूप लावून घेतले होते. तर त्यांचे आणखी दोघे मित्र प्रशांत…

Read More

शुक्रवार दि. २२ मार्च, अकोले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या जिद्दीच्या बळावर सामान्य कुटुंबातील एखादा तरुण अथवा तरुणीही यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते. घरात फारशी सुबत्ता नाही, रोज कमवायचे आणि खायचे अशा परिस्थितीत सामान्य कुटुंबात एखादा दिवा पेटला की त्याचा उजेड संपूर्ण कुटुंबासोबतच गावालाही जाणवतो. आणि गावासाठी ती अभिमानाची बाब ठरते, याचा वस्तुपाठ घालून देणारे उदाहरण संगमनेर नजीकच्या अकोले तालुक्यातील आदिवासी गाव असलेल्या कोतुळमध्ये समोर आले आहे. घरात सदासर्वदा दारिद्र शेळके कुटुंबात आई विडी कामगार, पेंटर काम करताना फावल्या वेळात एखाद्या वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणारे वडील अशोक शेळके आणि चार मुले यांच्या कुटुंबात परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या स्वप्नाला संतोष (शिवा) शेळके याने…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, मुंबई निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, संगमनेर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादात असलेल्या जोर्वे नाका पहाटेच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटची मॅच खेळून आपल्या जोर्वे गावाकडे परतणाऱ्या मुलांवर हल्ला करण्यात आला आहे. या मुलांना त्यांच्याकडील बॅटनेच बेदम मारहाण केल्याचा प्रकार पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदूर शिंगोटे (ता. सिन्नर, नाशिक) येथे सुरू असलेल्या क्रिकेटच्या मॅच संपवून काही मुले घराकडे परतत असताना तीन बत्ती चौक ते जोर्वे नाका परिसरात त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. या संदर्भात साई महेश जाधव यांच्या तक्रारीवरून एका दुचाकी चालकासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

गुरुवार दि. २१ मार्च, अकोले राज्यात दुधाचे भाव सातत्याने कोसळत असताना शेतकरी श्रीमंत होणार, शेतकऱ्याला दुधाचे पैसे मिळणार, मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार अशी जाहिरातबाजी करून राज्याचे दुग्धविकास तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी व्यक्त करत दुग्ध विकास मंत्री आणि सरकारचा तीव्र निषेध केला आहे. डॉ. नवले यांनी मंत्र्यांच्या या जाहिरातबाजीवर संतप्त होत सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारवर जबरदस्त टीका केली आहे. दुधाचे भाव आणखी कोसळलेले असताना दुग्धविकास मंत्री काय जाहिरात करत आहेत पहा असे म्हणत सोशल मीडियावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले…

Read More