Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर नगरपालिका हद्दीतील संजय गांधी नगर वडारवस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना हक्काचा असेसमेंट उतारा मिळावा, याकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह शिवसेना नेते अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून यामुळे सर्व नागरिकांना हक्काचा उतारा मिळणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. तांबे म्हणाल्या की, संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून त्यांना उतारा द्यावा, याकरता शिवसेनेचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर कतारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी नगरपालीकेकडे वेळोवेळी मागणी करून वेळप्रसंगी आंदोलनही केली. या मागणीचा विचार करून काँग्रेस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : स्थानिक सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या व चाळीस वर्षाच्या कार्यकाळात लोकांचे प्रश्न सोडविता आले नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या संजय गांधी नगर झोपडपट्टी व वडार वस्ती झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडल्याची माहिती संगमनेरचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी दिली. मंगळवारी मंत्री विखे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांच्यासह संजय गांधी नगर वडार वस्ती येथील प्रतिनिधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे, प्रचलित धोरणाप्रमाणे गुणवत्ता यादी जाहीर झाली असून यात बाह्य हस्तक्षेपला संधी नाही. तरीदेखील याप्रकरणी एक आमदार तीस लाख, वीस लाख दिल्याचे आरोप करत आहे. त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी असून अशा प्रकारे सरकारवर बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठीपदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नियुक्त करायची मागणी केली, याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहो, हवे असेल तर वडेट्टीवार यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : भव्य दिव्य स्टेज, लाईट व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एलईडी इफेक्टसह भरतनाट्यमने सुरु झालेल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आसामी बिहू नृत्य, भांगडा, लावणी, धनगरी नृत्य, राजस्थानी नृत्य, बासरी वादन, फ्युजन डान्स, गवळणी या एकापेक्षा एक सरस समूह नृत्यांच्या सादरीकरणाने जयंती महोत्सवातील आनंद सोहळा ‘युवा जल्लोष’ कार्यक्रमात एकच धमाल झाली. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित युवा जल्लोष आनंद सोहळा संस्मरणीय झाला यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन थोरात, शरयूताई देशमुख, गणेश मादास, शोभाताई कडू, कार्यकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रेया अनिल मुंतोडे हिने संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला असून तिची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. संगमनेर पंचायत समिती व संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाच्यावतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात श्रेया मुंतोडे हिचे पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘सीड बॉल्स’ हे उपकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकास पात्र ठरले. त्यामुळे यापुढील जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रदर्शनात तिची निवड झाली असून ती तालुक्याचे नेतृत्व करेल. नाविन्य विषयाची योग्य निवड उत्तम सादरीकरण आणि उपयुक्तता या बळावर श्रेयाने हे यश मिळविले असल्याचे प्राचार्य जनार्दन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संगमनेरकरांना रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची जोरदार राजकीय फटकेबाजी ऐकावयास मिळाली. शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले, संस्था उभ्या करणे सामान्य गोष्ट नाही. सहकारातून संगमनेरचा विकास साधला गेला आहे. त्यामुळे बाजूच्या मतदार संघातून येथे स्पर्धा होत असली तरी आमदार बाळासाहेब थोरात अतिशय थंड डोक्याने ऑपरेशन करतात. त्यामुळे ऑपरेशन तर होतच पण रक्तही येत नाही. एकीकडे दोन माणसं एकत्र आल्याने देशाचं वाटोळ झाल आहे तर, दुसरीकडे दोन माणसांनी एकत्र येत येथे नंदनवन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : केंद्रात आजपर्यंत सहकार खाते नव्हते. राज्याच्या खत्यारीत येणाऱ्या खात्यात केंद्राचा हस्तक्षेप नको ते कायद्याविरोधात केंद्राच्या सहकारातील हस्तक्षेपाविरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. हुकूमशाही प्रवृत्तीने देश चालविल्याने देशाची अधोगती होते. देशाची घटना आणि लोकशाही वाचविण्यासाठी आपण यापुढील काळात काँग्रेस सोबत असणं आवश्यक आहे. मोदींसारख्या व्यक्तीच्या हातात पुन्हा देशाची सत्ता दिल्यास देश देशोधडीला लागेल, अशी भीती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संगमनेरमध्ये व्यक्त केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सिद्धरामय्या संगमनेरमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. यावेळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड रविवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेरात येत असताना भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करीत बस स्थानक चौकात आंदोलन केले. आंदोलकांवरील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याने आंदोलकांनी तेथून धाव घेत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यामुळे आंदोलकांनी तेथेच नाशिक-पुणे मार्गावर पुन्हा ठिय्या देत महामार्ग रोखला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती. माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा भाजपसह विविध संघटनासह निषेध व्यक्त…

Read More

अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. २००९ साली झालेल्या निवडणुकीत सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करत या मतदारसंघातून शिर्डीच्या साई संस्थांचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. रामदास आठवलेसारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करणारे वाकचौरे या मतदार संघात जायंट किलर ठरले. त्यामुळे देशभर या मतदारसंघाची चर्चा झाली. या मतदारसंघातून म्हणजेच पूर्वीच्या कोपरगावमधून शिवसेनेच्या तिकिटावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाठोपाठ वाकचौरे दुसरे खासदार ठरले. शिवसेनेकडून मिळालेली खासदारकी गमविल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करत वाकचौरे दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहे. सध्याच्या राजकारणात…

Read More

प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ ३ डिसेंबर १९८४ ची काळी रात्र देशातल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारी ठरली होती. मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात किटकनाशकं बनवणार्‍या युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीतून सोडण्यात आलेल्या विषारी वायूने शहरातील सुमारे १६ हजार लोकांचा बळी घेतला आणि सुमारे ४० हजार लोकांना कायमचं अपंगत्व आलं. जगभरातल्या अशा घटनांची नोंद झालेली ही देशातील पहिली सर्वात मोठी दुर्घटना ठरली. आज या भीषण घटनेची आठवण येण्याचं कारण सिडको अधिकार्‍यांच्या अर्धवटपणात आहे. या अधिकार्‍यांना उरणचं भोपाळ करायचं आहे. लोकं जीवानिशी गेली तरी चालतील पण कमाई झाली पाहिजे, असल्या मतलबी कारणाने त्यांनी उरणला भीषण संकटात लोटण्याचं पातक हाती घेतलंय. भरवस्तीत असले प्रकल्प नको, असे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतणाऱ्या काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांनी अद्याप प आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुख्य सूत्रधार यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिर्डीच्या डीवायएसपींना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आश्वी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २ जानेवारीला झालेल्या एका कार्यक्रमाहून परतत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यासाठी रविवारी (ता. ७) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध मान्यवर संगमनेरमध्ये येत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासह पाच दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते रविवारी पहिल्याच दिवशी माजी आमदार उल्हासदादा पवार यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने, जळगावच्या जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने तर कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांना सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मनोली येथील राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास व 12 हजार रुपये नुकसान भरपाई भरण्याची शिक्षा ठोठावली आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रदीप नवनाथ गुंजाळ (रा. केडगाव, अहमदनगर) यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे गुंजाळ यांनी विद्युत पुरवठ्यामध्ये काही अडचण आली असेल म्हणून खात्री करण्यासाठी विद्युत सहाय्यक निखिल शेंडे यांच्याशी संपर्क करत माहिती घेतली. त्यांना देखील घटनास्थळी बोलावून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शुक्रवारी होणाऱ्या लग्न समारंभासाठी नवरदेवाला विवाहस्थळी पाठविण्यासाठी निघालेल्या वराच्या मिरवणुकीत असलेल्या डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली समोरचे वऱ्हाड चिरडले गेले. चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८ वर्ष) व भास्कर राधु खताळ (वय ७३ वर्ष) अशी मृतांची नावे असून जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या. पाठोपाठ त्यांच्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात जखमींना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्रभू श्रीरामाबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संगमनेरमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे महापाप त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्यासह वैभव लांडगे, संतोष गायकवाड, संतोष पठाडे, सिताराम भांगरे, हरीश वलवे, राहुल भोईर, केतन भांगरे, सुरेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला. गुजरातच्या गांधीनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगलजीत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केली असून त्यांच्या आदर्श…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या दोघांची भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री विखे यांच्या मतदारसंघातील आश्वीमध्ये आरपीआय नेते गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हे दोघे उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिर्डीकडे परतत असताना लोणी मध्ये चौगुले व आरणे यांची गाडी अडवत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या विविध व्‍यक्तिगत लाभाच्‍या योजनांपोटी संगमनेर तालुक्‍यातील १९ हजार १९३ लाभार्थ्‍यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे हे अनुदान लाभार्थ्‍यांच्‍या खात्‍यात वर्ग झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. राज्‍य शासनाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्‍ये प्रामुख्‍याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्याचे लक्ष लागलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले उल्हासदादा पवार यांना, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास, सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर करण्यात आला. येत्या रविवारी (ता. ७ जानेवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार…

Read More

टी-२० क्रिकेट स्पर्धा दर्शकांसाठी मेजवानी: आमदार सत्यजित तांबे राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगमनेरमधील सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेत असलेला राज्य, देश पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रिकेट प्रेमींची उपस्थिती, उत्कृष्ट मैदान आणि दर्जेदार आयोजन यामुळे ही क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित २४ व्या सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थोरात यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत…

Read More