Author: Annant Ppangarkar

मंगळवार, दि.२२ एप्रिल मंगळवारी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यासह पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. तर १३ इच्छुकांना १५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप केल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारपासून या मतदारसंघात उमेदवारांनी आपल्या अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी दोन, भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी) यांनी एक नामनिर्देशनपत्र, नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, दत्तात्रय आप्पा वाघमोडे ( राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र व गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) यांचा समावेश आहे.…

Read More

मंगळवार, दि.२३ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार पर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या सहावर गेली. तर आणखी ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन पत्र नेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी, महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी देखील अर्ज दाखल केले होते. तर मंगळवारी भारत संभाजी भोसले (समता पार्टी) व नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी) या २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा…

Read More

शिर्डी, मंगळवार दि.२३ एप्रिल  शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. काय सांगतो कायदा… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या ‘कलम १२७ अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक…

Read More

मंगळवार, दि.२३ एप्रिल नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेर मधील कर्जदार आरोपी उद्योजक अमित पंडित यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पंडित याची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार सत्येन्द्र कुमार रावत यांना मात्र तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नगर अर्बन २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा ३३ कोटी रुपयांचा कर्जदार म्हणून आरोपी पंडित याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पंडित गेल्या काही दिवसांपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. तर पंडितची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार रावत आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नव्हती. दरम्यानच्या कालावधीत या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीचे सुजय विखे यांच्यासह चार उमेदवारांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून विखे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. कैलाश निवृत्ती जाधव, समता पार्टीच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी तर ॲड. महंमद जमीर शेख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय सोमवारी पाच इच्छुकांनी बारा नामनिर्देशन पत्र नेले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारी…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल राखीव शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासह दोघा अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सदाशिव लोखंडे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या समवेत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार वैभव पिचड आदींचा समावेश होता. लोखंडे यांनी शिवसेनेकडून तीन तर चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी प्रत्येकी एकेक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामुळे आतापर्यंत या मतदारसंघात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासह आणखी काही अर्ज शेवटच्या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांनी या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला या बांधकाम साइटवरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, तुझे ही साईट बंद करून टाकेल. असा बिल्डरला दम दिल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५ वर्ष, रा. प्रकाश नगर, शिखरेवाडी, नाशिक रोड, नासिक) यांनी यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि.२१ एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोरे हे मालधक्का रोडवरील नुरी मज्जिद नाशिक रोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या साइटवरील ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीच्या…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल  सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता आज होत आहे. या हंगामात कारखान्याने १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी ऊस गाळप केले असून यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ च्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात यांच्या उपस्थितीत झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. समवेत व्यासपीठावर कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, गणेश…

Read More

सोमवार, दि.२२ एप्रिल पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून ते आत्ता वसुलीचे कार्यालय झाले आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इन्कम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २० पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेतून निवडणूक लढवत असून यासाठी या मतदारसंघात त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रविवारी (ता. २१ एप्रिल)…

Read More

रविवार, दि.२१ एप्रिल  गेले ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी आमदार, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार जावई मुश्ताक अंतुले सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. यामुळे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यास मदत होणार असून काँग्रेससाठी हा धक्का असेल. सोमवारी (दि.२२ एप्रिल) मुंबईत सकाळी ११ वाजता एमसीए लाउंज, वानखेडे स्टेडियम येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेतृत्वाखाली सर्वांना सोबत येत राज्य विकासाच्या वाटेवर नेले जात असल्याने अनेक नेते…

Read More

रविवार, दि.२१ एप्रिल कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, विजय वाकचौरे आदी उपस्थित होते. यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते…

Read More

रविवार, दि.२१ एप्रिल नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील निमोण गावात झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातातील मृत नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे गावचे असून जखमी अकोले तालुक्यातील गर्दनी गावचा आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३० वर्ष) व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९ वर्ष, दोघेही रा. नांदूर शिंगोटे, नाशिक) अशी दोघा मृत तरुणांची नावे असून संदीप संतोष आगिवले (रा. गर्दनी, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला सिन्नरच्या दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल…

Read More

भाग तिसरा | प्रवीण पुरो  कोणत्या संकटाचा फायदा कसा उपटावा याचा चौकीदार कंपनीला जणू पूर्वानुभवच असावा. पुलवामाच्या संकटाला निवडणुकीचं निमित्त करत सैनिकांच्या नावाने स्वैराचार करणारे कशाचीही परवा करण्याची शक्यताच नव्हती. रफेलचा घोटाळ्यात हात मारणारे आणि इलेक्टोल बॉण्डच्या माध्यमातून कोट्यवधींची धुळधाण करणारे मृतांच्या टाळूवरील लोणी ओरपायलाही कमी करत नाहीत, असा घृणास्पद अनुभव सारा देश घेत आहे. जगात कोरोनाच्या महामारीने डोकं वर काढल्यावर याचा फायदा चौकीदाराचं सरकार घेईल, असं यत्किंचितही वाटत नव्हतं. अनेक देशांत लाखोंच्या संख्येने लोकं मृत्यूमुखी पडत होते. प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशात याची झळ पोहोचणार हे स्पष्टच होतं. सरकार म्हणून कशाकशाला तोंड देणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांनाही पडत होता. लोकांच्या असल्या…

Read More

अहमदनगर, शनिवार दि.२० एप्रिल  अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे.  जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक…

Read More

शनिवार, दि.२० एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून आज ९ इच्छुक उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज नेले असण्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवार पर्यंत २० इच्छुकांनी ४३ उमेदवारी अर्ज नेले होते. त्यात आणखी नऊ जणांची भर पडली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असली तरी गेल्या तीन दिवसात एकही उमेदवारी अर्ज या मतदारसंघात दाखल झाला नाही. सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता गुरुवारपर्यंत (दि.२५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसात प्रमुख उमेदवारांसह अन्य इच्छुकांचे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

शिर्डी, दि.२० एप्रिल   लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शनिवार, २० एप्रिल २०२४ रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. तर आजच्या तिसऱ्या दिवशी १२ व्यक्तींनी २३ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्रे भरण्यास १८ एप्रिल २०२४ पासून सुरूवात झाली. मागील तीन दिवसात आतापर्यंत ४८ इच्छूक उमेदवारांनी ८९ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली. नामनिर्देशन पत्रे प्राप्त करून घेतलेल्यांपैकी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी १९ एप्रिल रोजी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. उर्वरित ४७ नावे इच्छूक उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे… सतिष भिवा पवार, संजय हरिश्चंद्र खामकर, बाळासाहेब हिरामण भोसले, ॲड. सिध्दार्थ दिपक बोधक, चंद्रकांत संभाजी दोंदे, अभिजित…

Read More

शनिवार, दि.२० एप्रिल  अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे १० कोटींचे मालक असून वाकचौरे पती-पत्नीत पत्नी सरस्वती संपत्तीच्या बाबतीत वरचढ आहे. वाकचौरे यांनी शुक्रवारी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आपल्या मालमत्तेचे शपथपत्र जोडले आहे. या शपथपत्रांत वाकचौरे दांपत्याकडे सुमारे दहा कोटी रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. शंभर तोळे सोने या दाम्पत्याकडे आहे. संपत्तीचे विवरण पुढील प्रमाणे:- उमेदवार वाकचौरे यांच्याकडे पन्नास तोळे सोने आणि पाच किलो चांदी असून त्याचे बाजार मूल्य तेहतीस लाख बारा हजार पाचशे रुपये दाखवण्यात आले आहे. तर वाकचौरे यांच्या…

Read More

शनिवार, दि.२० एप्रिल एप्रिल महिना निम्म्याहून अधिक उलटून गेला तरीदेखील मार्च महिन्याचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळू शकलेले नाही. मानधनाअभावी राज्यातील दोन लाख दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू आहे. प्रचारात रममाण असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या राज्य अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी केली आहे. शिवूरकर यांनी म्हटले आहे की, सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱ्यांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष…

Read More

शनिवार, दि.२० एप्रिल उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या धांदरफळ येथील देशमुख मळा शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी जिजाई कुलदीप देशमुख हिने मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. जिजाई देशमुख हिने राज्यात एकविसावा तर जिल्ह्यात सोळावा आणि संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात दोन लाखाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावणाऱ्या शाळेच्या या नेत्रदीपक यशामुळे उपक्रमशील मार्गदर्शक शिक्षिका वृषाली सुनील कडलग व मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांचे अभिनंदन होत आहे. जिजाई देशमुख हिने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल सरपंच उज्वला नवनाथ देशमाने, विस्ताराधिकारी एकनाथ भांगरे, केंद्रप्रमुख अशोक आवारी, मुख्याध्यापक…

Read More