Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. २९ मार्च – जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच…
मुंबई, दि. २९ मार्च – विशेष प्रतिनिधी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे पोलीस कर्मचारी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीने तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून सातारा जिल्ह्यातील केडंबे गावात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. २००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात अजमल कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कामा रुग्णालय, लिओपोल्ड कॅफे, ताज हॉटेल यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला होता. कामा रुग्णालयात हल्ला केल्यानंतर पळून जात असलेल्या अजमल…
संगमनेर, दि.२९ मार्च – प्रतिनिधी संगमनेर येथील कृषी कार्यालयात एका कृषी सहाय्यकाने मंडळ कृषी अधिकाऱ्याला शिवीगाळ करून खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी (दि. २८) सकाळी १०:१५ वाजता ही घटना घडली. कृषी सहाय्यक लक्ष्मण मनोहर जुंधारे यांना मोजमाप पुस्तिकेतील नोंदी दुरुस्त करण्यास सांगण्यात आले होते. या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी मंडळ कृषी अधिकारी धनेश सखाराम कोते यांना शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर त्यांनी कोते यांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर धनेश सखाराम…
संगमनेर, दि. २९ मार्च – प्रतिनिधी राज्यातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब नागरिकांना दिलासा देण्यासाठी १५०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांवरील शास्तीकर पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली. सध्याच्या शास्तीकर धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे यांनी संगमनेर शहरातील ३९६४ अनधिकृत निवासी मालमत्तांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “या घरांमध्ये कोणताही व्यावसायिक उपक्रम नाही. तरीही या रहिवाशांवर शास्तीकर लादणे अन्यायकारक आहे. सरकारने त्यांना दिलासा द्यावा आणि शास्तीकर पूर्णपणे माफ करावा.” सध्या ६०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना शास्तीकर माफ आहे, तर ६०० ते…
संगमनेर, दि. २७ मार्च – प्रतिनिधी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्थाकडून विद्यार्थ्यांना फी साठी वेठीस धरले जात असल्याचा तक्रारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मधील शिक्षण सम्राटांनी विद्यार्थी पालकांना फी साठी वेठीस धरू नये, अन्यथा अशा शिक्षण संस्थांमधील भानगडी बाहेर काढण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख रवींद्र कानकाटे यांनी दिला आहे. कानकाटे यांनी म्हटले आहे की, सध्या विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू आहे. यादरम्यान संगमनेर मधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणारे काही शिक्षण सम्राट, संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य नागरिकांना मुलांच्या फी करिता वेठीस धरत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे फी बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून दादागिरीच्या पद्धतीने बोलत जर फी भरली नाही…
अहिल्यानगर, दि. २८ मार्च – राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राहुरी येथे दोन दिवसांपूर्वीच्या घटनेनंतर मंत्री विखे यांनी राहुरी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांसमवेत…
संगमनेर, दि. २८ मार्च – प्रतिनिधी संपूर्ण संगमनेर तालुक्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित मोक्का खटल्याचा गुरुवारी (२७ मार्च) निकाल लागला. या खटल्यातील सर्व चारही आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी संतोष शिवाजी जाधव, चंदर दादाभाऊ गाडे, संजय दत्तू धांडे आणि शरद बन्सी निचित यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या आधारे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१),(२), ३(४) प्रमाणे या आरोपींविरोधात कारवाई केली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, तत्कालीन निरीक्षक निघोट यांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध २०१७ मध्ये दोषारोपपत्र दाखल केले…
अहिल्यानगर, दि. २८ मार्च – अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये ९ एप्रिल २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता राखण्यास…
मुंबई, दि. २८ मार्च – प्रतिनिधी मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘मंत्रालय सुरक्षा प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात चेहऱ्याद्वारे ओळख पटवून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ (Visitor Management System) म्हणजेच अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांना प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे. मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी: * अभ्यागतांना ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच विभागात आणि दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल. * मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे कोणतेही एक…
नाशिक, दि. २७ मार्च – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रच्या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील ॲग्री हायटेक शाखेतील तत्कालीन शाखाधिकारी सुभाष विठ्ठल कौटे (वय ४०, रा. संगमनेर) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तब्बल ५ कोटी ५५ लाख ६६ हजार ५१३ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणातील अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न करता ती स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे. कौटे यांनी ३६ खातेधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर करताना संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जाची रक्कम…
