Author: अनंत पांगारकर
शनिवार, दि. १ मार्च काँग्रेसने विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची तर विधानसभा मुख्य प्रतोदपदी अमित देशमुख यांची निवड केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (१ मार्च) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया ‘X’ अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. सपकाळ यांनी म्हटले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहे. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद अमित देशमुख, विधानसभा सचिव विश्वजीत कदम, विधानसभा प्रतोद शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम, विधानपरिषद गटनेता सतेज उर्फ बंटी पाटील, विधान…
संगमनेर, दि. १ मार्च मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर…
विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीने लोकप्रिय योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडून विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविले. त्यातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गेमचेंजर ठरली. पण सत्तेत पुन्हा आल्यानंतर आर्थिक भाराची जाणीव झाल्याने महायुतीने थेट ३० टक्के खर्चकपात करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी, सरकारी आकडेवारी शेअर करत महायुतीवर टीका केली आहे. राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रक निश्चित करताना, वित्त विभागाने प्रत्येक विभागाची खर्चमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानुसार निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, सहाय्यक अनुदानित वेतन, कर्ज…
विशेष प्रतिनिधी / मुंबई इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून खात्मा करण्यात येईल, अशी धमकी सावंत यांना दिली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने फोन करून चार दिवसांपूर्वी इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला आहे. कोरटकर सध्या फरार आहे. यातच इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी दिल्यानं त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून सावंत यांना धमकावले आहे. ‘सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू,’ अशी धमकी वैद्यने…
राहुल जाधव पाटील रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो. सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा…
संगमनेर, दि. २८ फेब्रुवारी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या सीटवर गळ्यातील मंगळसूत्रामधील मनी पडले असता महिलेला आपल्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र गायब झाल्याचे लक्षात आले. गुरुवारी (२७ फेब्रुवारी) संगमनेर बस स्थानकावर हा प्रकार घडला. संगमनेर बस स्थानकामधून महिलांच्या गळ्यातील दागिने वारंवार चोरी जात आहे. दागिने चोरट्यांचा शोध लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून दिवसाढवळ्या ते महिलांच्या गळ्यातील दागिन्यांच्या चोऱ्या करत आहे. दागिने चोरट्यांसाठी संगमनेर बस स्थानक आणि बसस्थानकावरील गर्दी फायद्याची ठरत आहे. बस स्थानकावर असलेल्या एखाद-दोन पोलिसांचा डोळा चुकवून बस स्थानकावरील सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीतही चोऱ्या होऊ लागल्याने संगमनेरचे बस स्थानक महिलांसाठी असुरक्षित बनू लागले आहे. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील…
नागपूर : जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने याचिकाकर्ता मुलाच्या वडिलांना जातवैधता प्रमाणपत्र दिले, त्याच्या भावाला आणि बहिणीला देखील दिले. मात्र याचिकाकर्ता मुलाने समितीकडे अर्ज केल्यावर कागदपत्रे पुरेशी नसल्याचे कारण सांगून अर्ज नाकारण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या या कृतीला बेकादेशीर ठरवत वडील, भाऊ-बहिणीकडे जातवैधता असताना समितीने इतर कागदपत्रे तपासण्याची गरजच नव्हती, असे निरीक्षण नोंदवले आणि समितीचा आदेश रद्द केला. तसेच एका महिन्यात याचिकाकर्त्याला जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही मुख्य न्या. आलोक आराध्ये आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने समितीला दिले. ऋषी बळवंत दडमल या विद्यार्थ्याने नागपूरच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ‘माना’ जनजाती समूहाचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज केला होता.…
नीरज बाबासाहेब गाढे – साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहिल्यानगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येथे स्थापित केलेले वाळूचे शिवलिंग पुढे जाऊन कोल्हाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. याच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे ७ मे १९५९ रोजी राजेंद्र शिवाजीराव गाढे यांचा गाढे पाटील कुटुंबात जन्म झाला. पुढे “गाढे काका” या नावाने संगमनेर, घुलेवाडी परिसरात ओळखले जाणारे हे सुंदर नेतृत्व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने काळाआड गेले व सर्वांचे आवडते, सर्वाना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणारे, कुठेही भेटल्यावर पोटभरून गप्पा…
पुणे, दि. २८ फेब्रुवारी २६ वर्षीय तरुणीवर स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये अत्याचार करणाऱ्या आरोपीला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला त्याच्या गावातून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसांपासून फरार होता. फरार असलेल्या आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर १ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. बड्या राजकीय नेत्याच पोरग तीन तासात सापडतं आणि अत्याचार करणारा नराधम आरोपी…
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी विधान परिषदेच्या उपसभापती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत गुरुवारी संगमनेरमध्ये राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत प्रतिमा दहन करण्यात आली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा बाहेर महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला, अशी माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यावेळी आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख कावेरी नवले, भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चाच्या सरचिटणीस पायल…
