Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीच्या दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंना लोणचं-भाकरीची शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे प्रेम आहे त्यांच. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीत. उद्धव ठाकरे शुक्रवारी संगमनेर, शिर्डी, कोपरगावच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. या दौरा दरम्यान त्यांनी दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या आपुलकी आणि आशेने आपल्या व्यथा ठाकरेंसमोर व्यक्त केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, असा धीर दिला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – “तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, अथवा जे काय करावे लागेल, ते करू” अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांची संवाद साधत आपल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचा सल्ला दिला. रिमझिम पावसात संवाद: संगमनेर, कोपरगाव, शिर्डीच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर सोबत पाऊस घेऊनच आलेले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमझिम पावसातच शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीची घेतली माहिती: शेताच्या बांधावरच दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधताना त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती होत आहे. ही यात्रा देशाच्या भविष्याला व राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. या यात्रेचा आपणा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार या यात्रेचे समन्वयक काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरात पदयात्रा: राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भारत जोडो यात्रा पार पडली. यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी थोरात बोलत होते. यांचा सहभाग: संगमनेर नगरपरिषदेपासून सुरू झालेल्या या पद यात्रेचा समारोप नवीन नगर रस्त्यावर झाला. यावेळी थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदारांना 81 कोटी रुपयांचा गंडा घालून या रकमेचा अपहार करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शुक्रवारी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चौकशीसाठी उपस्थित राहणार असून संबंधित ठेवीदार कर्जदार तक्रारदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी केले आहे. राजकीय प्रतिष्ठितांचा समावेश: 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी प्रतिष्ठित राजकीय नेता भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य, राहुरीतील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय यांच्यासह पंधरा मुख्य आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची मालमत्ता संरक्षित करणार: याप्रकरणी…

Read More

निवडून येण्याची क्षमता, मतदार संघाची परिस्थिती बघून मविआच्या बैठकीत निर्णय होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी राज्यातील 48 जागांवर चर्चा होईल त्यावेळी जागा वाटपा संदर्भातील निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता मतदार संघाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद: काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संदर्भात गुरुवारी संगमनेरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत यासंबंधी महत्त्वाचे विधान केले. थोरात म्हणाले, राज्यातील 48 जागा संदर्भात चर्चा होईल. त्यानंतर काही गोष्टी ठरतील. कोणी उमेदवारी जाहीर केली असं आज म्हणू शकत नाही. महाविकास आघाडी म्हणून शिर्डीच्या जागेचा निर्णय घेतला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महत्त्वाच्या विषयाकडून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्षाने केला आहे. केंद्र सरकारने केला आहे. राज्य सरकार आता करत आहे. जनतेचे लक्ष पुन्हा मुख्य विषयाकडे वेधण्याचे काम राहुल गांधी यांच्या पदयात्रेतून झाले असून या पार्श्वभूमीवर पदयात्रेच्या वर्षपूर्ती निमित्ताने देशभरात मुख्य शहरांमध्ये आज पदयात्रा काढल्याची माहिती काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. थोरात म्हणाले, 7 सप्टेंबरला राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. कन्याकुमारीपासुन सुरु झालेली ही पदयात्रा 12 राज्याची परिक्रमा करत 3560 किलोमीटर श्रीनगरपर्यंत ही यात्रा गेली. जागतिक पातळीवर उच्चांकी नोंद व्हावी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नवीन नगर रस्त्यावर असलेल्या हृदयरोग तज्ञ डॉ. गिरीश सावंत यांच्या राहत्या घरातून चोरट्यांनी तब्बल अर्धा किलोहून अधिक वजनाचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर सावंत यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. गॅलरीतून प्रवेश: सावंत यांचे नगर रोडवरील ताजने मळ्यात ‘साई सुमन हृदयालय व क्रिटिकल केअर सावंत हॉस्पिटल’ आहे. या रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर सावंत आपल्या कुटुंबासह राहावयास आहे. अज्ञात चोरट्याने हॉस्पिटल वरील गॅलरीतून घरात प्रवेश केला आणि तब्बल अर्धा किलो वजनाचे दागिने चोरून नेले. बाहेरगावी गेल्याची संधी साधली: शनिवारपासून (2…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – जनआरोग्यम परिवार व जाणीव फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडझरी खुर्द येथील पदवीधर शिक्षिका श्रीमती सुरेखा आनंदराव भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नाशिक जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीन ठाकरे, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील आदींच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयात नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पुरस्कार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाची दखल: भालेराव गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेवा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रस्ता ओलांडताना एसटी बस जवळून गेल्याचा राग आल्याने बसवर दगडफेक करत बस चालकाच्या केबिनमध्ये शिरून कंडक्टरला मारहाण करणे आरोपीला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी तीन महिने सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय होती घटना: आठ वर्षांपूर्वी 2 सप्टेंबर 2015 रोजी नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रवरा नदी पुलाजवळ ही घटना घडली होती. नाशिक-पलूस-सांगली (MH 14 BN 4239) ही एसटी बस संगमनेर बस स्थानकातून सांगलीच्या दिशेने जात असताना प्रवरा नदी पुलापाशी रस्ता ओलांडणाऱ्या इसमाच्या जवळून बस गेल्याने त्याला याचा राग आला. त्यामुळे त्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरण हे उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाकरता बांधले गेले आहे. या भागात अत्यंत कमी पाऊस झाला असून पिके वाया गेली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने तातडीने निळवंडे धरणातून कालव्यांद्वारे पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे. का केली मागणी: निळवंडे कालव्यांमधून पाणी सोडण्याबाबत आग्रही मागणी करताना थोरात म्हणाले, यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यंत कमी पावसामुळे खरीप पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भाग उध्वस्त झाला. दुष्काळी परिस्थितीत सरकारने काळजी म्हणून बैठका घेऊन पिण्याच्या पाण्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी 5 सप्टेंबर राज्यातील 108 शिक्षकांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळच्या देशमुख मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचा समावेश होता. कार्यक्रमावेळी हे होते उपस्थित: मुंबईच्या नरिमन पॉईंटवरील टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कपिल पाटील, कौशल्य विकास विभाग तथा मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – दोन रुपयासाठी एसटी कंडक्टर सोबत हूज्जत घालने तिघा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने या तिघा तरुणांना तीन महिने कारावास आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यांना झाली शिक्षा: सोमेश उर्फ सोमनाथ सुखदेव बोंबले, शुभम सुखदेव बोंबले व शुभम पांडुरंग गुंजाळ अशी न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर खटला सुरू होता. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. बी. जी. कोल्हे यांनी काम बघितले. अशी होती घटना: 11 जून 2016 रोजी संगमनेर-साकुर या बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाने साकुर फाट्यापर्यंतची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्‍ह्यात साजरे होणारे आगामी गणेशोत्‍सव व ईद-ए-मिलाद सण निर्विघ्‍नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन अहमदनगरचे जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी करताना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यांची उपस्थिती: जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, म‍हापालिका आयुक्‍त डॉ. पंकज जावळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्‍हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्‍हाधिकारी सालीमठ म्‍हणाले, गणेश मंडळांनी परिसरात सीसीटीव्‍ही कॅमेरे लावावेत. गणेश मंडळांच्‍या विविध परवान्‍यासाठी, महानगरपालिका कार्यालयात, “एक खिडकी योजना” सुरू करुन या माध्‍यमातुन गणेश मंडळांना सर्व परवानग्‍या एकाच ठिकाणी देण्‍यात याव्‍यात. या कक्षात संबंधित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येथे झाली बैठक: अध्यक्ष निवडीची बैठक नाशिकच्या विभागीय माहिती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्ष निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. बिनविरोध निवड: अधिस्वीकृती समितीचे सदस्य किरण लोखंडे यांनी सुधीर लंके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे सुचविले. त्यांच्या सुचनेला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. लंके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यांची होती उपस्थिती: सदर निवडणूक प्रक्रिया नाशिकच्या विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य विजयसिंह होलम, अभिजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचा ओढा बाजार समितीकडे वाढला आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून मंगळवारी (5 सप्टेंबर) उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला 2200 ते 2601 रुपयांचा भाव मिळाला. असे होते बाजारभाव: मंगळवारी झालेल्या कांदा लिलावात दोन नंबर कांद्याला 1700 ते 2000 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1700 रुपये तसेच गोल्टी कांद्याला 200 ते 900 रुपये भाव मिळाला आहे. टोमॅटो डाळिंबालाही उच्चदर: बाजार समितीत टोमॅटोला पन्नास ते दीडशे रुपये पर्यंत भाव मिळाला असून डाळिंबाची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली. एक नंबर डाळिंबास प्रति किलो 251 ते…

Read More

शासनाला अन्नदात्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला भाग पाडू: अमर कतारी नाफेड मार्फत कांदा खरेदीसाठी अटी शर्ती शिथिल करा: भाऊसाहेब हासे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संगमनेर शिवसेना (ठाकरे) आक्रमक झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात शेतीचे प्रश्न गंभीर बनले त्यामुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची व टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. अशी आहे स्थिती: संगमनेर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बाजरी, सोयाबीन, मका, कापूस, भुईमूग ही पिके पूर्णपणे जळाली असून जनावरांचा चारासुद्धा खाण्यायोग्य राहिला नाही. तालुक्यात पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकलापूर देवस्थान विकासाकरिता जिल्हा परिषदेअंतर्गत 65 लाख रुपयांची कामे मार्गी लागली असून अकरा लाखाच्या निधीतून अद्यावत व्यासपीठ निर्माण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे यांनी दिली. फटांगरे म्हणाले, श्री दत्त देवस्थान अकलापूर हे पठार भागासह जुन्नर व संगमनेर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानच्या विकासाकरता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. या निधीमधून देवस्थानकडे येण्याकरता रस्ते, पेव्हींग ब्लॉक इत्यादी कामे करण्यात आली. स्वतंत्र व्यासपीठ: याचबरोबर सहकारातील दीपस्तंभ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पिंपरी चिंचवड – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साळी समाजाच्यावतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव चिंचवडगाव येथे मंचर येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. मोहन साळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम: यावेळी आरोग्य शिबिर, तज्ञ डॉक्टरांचा सन्मान, विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील तरुण तरुणींच्या युवा मंचची स्थापना करण्यात आली. या मान्यवरांची होती उपस्थिती: रविवारी 3 सप्टेंबरला चिंचवडगाव येथील प्रभू रामचंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश माथेसुळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याशिवाय लोणावळा नगर परिषदेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी (शिर्डी) – गोदावरीच्या पाण्याच्या आवर्तन काळात अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून नियोजन करावे. तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. लोणीत बैठक: मंत्री विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथे गोदावरी आणि निळवंडे धरण आवर्तनाच्या नियोजना संदर्भात आढावा बैठक झाली. या अधिकाऱ्यांची उपस्थिती: यावेळी नाशिकचे अप्‍पर जिल्‍हाधिकारी राजेंद्र वाघ, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जलसंपदा विभागाच्‍या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता आमले, नगरचे कार्यकारी अभियंता स्‍वप्‍नील काळे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक स्‍वाती भोर, नाशिकचे उपविभागीय पोलिस आधिकारी गोकावे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जालना – राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. सरकारनं तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. या लोकांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही. आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढवत आंदोलकांना पाठिंबा दिला यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. का आले होते: जालन्यामध्ये एक सप्टेंबरला मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये आंदोलकांसह आणि पोलीसही जखमी झाले या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) जालना येथे मराठा आंदोलकांची भेट घेतली. राजकारण पेटलं: जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा…

Read More