Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मनोली येथील राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास व 12 हजार रुपये नुकसान भरपाई भरण्याची शिक्षा ठोठावली आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रदीप नवनाथ गुंजाळ (रा. केडगाव, अहमदनगर) यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे गुंजाळ यांनी विद्युत पुरवठ्यामध्ये काही अडचण आली असेल म्हणून खात्री करण्यासाठी विद्युत सहाय्यक निखिल शेंडे यांच्याशी संपर्क करत माहिती घेतली. त्यांना देखील घटनास्थळी बोलावून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शुक्रवारी होणाऱ्या लग्न समारंभासाठी नवरदेवाला विवाहस्थळी पाठविण्यासाठी निघालेल्या वराच्या मिरवणुकीत असलेल्या डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली समोरचे वऱ्हाड चिरडले गेले. चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८ वर्ष) व भास्कर राधु खताळ (वय ७३ वर्ष) अशी मृतांची नावे असून जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या. पाठोपाठ त्यांच्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात जखमींना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्रभू श्रीरामाबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संगमनेरमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे महापाप त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्यासह वैभव लांडगे, संतोष गायकवाड, संतोष पठाडे, सिताराम भांगरे, हरीश वलवे, राहुल भोईर, केतन भांगरे, सुरेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला. गुजरातच्या गांधीनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगलजीत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केली असून त्यांच्या आदर्श…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या दोघांची भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री विखे यांच्या मतदारसंघातील आश्वीमध्ये आरपीआय नेते गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हे दोघे उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिर्डीकडे परतत असताना लोणी मध्ये चौगुले व आरणे यांची गाडी अडवत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्याचे लक्ष लागलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले उल्हासदादा पवार यांना, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास, सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना जाहीर करण्यात आला. येत्या रविवारी (ता. ७ जानेवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री आमदार…
टी-२० क्रिकेट स्पर्धा दर्शकांसाठी मेजवानी: आमदार सत्यजित तांबे राष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह धुमधडाक्यात क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संगमनेरमधील सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेत असलेला राज्य, देश पातळीवरील खेळाडूंचा सहभाग, क्रिकेट प्रेमींची उपस्थिती, उत्कृष्ट मैदान आणि दर्जेदार आयोजन यामुळे ही क्रिकेट स्पर्धा राज्यात लौकिकास्पद ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने आयोजित २४ व्या सहकार महर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचा थोरात यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील आणखी एका दहशतवादी संघटनेवर बंदी आणली आहे. काश्मीमधील फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला (Tehreek-E-Hurriyat) दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून काश्मिरी फुटीरतावादी संघटनांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यातूनच या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातील मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करत त्यावर बंदी घातली होती. त्या पाठोपाठ आता ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. ‘तेहरीक-ए-हुर्रियत’ला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले. दहशतवादाविरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज मी अंथरुणातून उठलो, तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं, तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता. मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज, रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखतं आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो.” “हो, पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता-बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती. मी ॲक्टिव्हाची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि ॲक्टिव्हा स्टार्ट होत नव्हती. त्याचवेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ सचित्र अभिनेता नाना पाटेकर सध्या बराच मोकळा आहे. कलेतली आपली आदाकारी सादर करता करता तो आता देशाच्या भवितव्याविषयीच्या गप्पा मारण्यासाठी मोकळा आहे. गेल्या आठवड्यात त्याने देशाच्या राजवटीविषयी टिपण्णी केली आणि २०२४ च्या निवडणुकीतही भाजपच बाजी मारेल, अशी भविष्यवाणी त्याने सांगून टाकली. तेव्हा खर्या नानाचे हे बोल नाहीत, असं सहज वाटून गेलं. थेट आणि भडक स्वभावाचा हा अभिनेता विद्यमान सत्तेविषयी खरं बोलत नाही, हे पाहून देश वासीयांनाच नानाचा मत्सर येईल. इंडिया टुडेच्या राहुल कनवल याला दिलेल्या मुलाखतीत आगामीतेच हे भविष्य त्याने वर्तवलंय. ही भविष्यवाणी सांगण्यासाठी नानाने बापुडे शब्द वाया घालवण्याची खर तर काहीही आवश्यकता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या तीन फौजदारी कायद्यांची जागा आता लवकरच नवीन कायदे घेणार आहेत, यात भारतीय दंड संहिता १८६० च्या जागेवर भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या जागेवर भारतीय साक्ष अधिनियम २०२३ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या जागेवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ हे तीन कायदे लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाले आहेत. तसेच नुकतीच या तिन्ही बिलांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्याने या कायद्यांचा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केलेले असून जुन्या भारतीय दंड संहितेतील ५११ कलमांच्या ऐवजी नवीन भारतीय न्याय संहितामध्ये ३५६ कलम आहेत, तर फौजदारी प्रक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज अयोध्या : एक काळ असा होता की राम लल्ला तंबूत होते, आता फक्त रामलल्लालाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. ‘देशाच्या इतिहासात ३० डिसेंबर ही तारीख अत्यंत ऐतिहासिक ठरली आहे. या दिवशी १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये ध्वजारोहण करून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आज स्वातंत्र्य चळवळीशी निगडित अशा एका शुभदिनी आपण स्वातंत्र्याच्या अमर युगाचा संकल्प पुढे नेत आहोत. विकसित भारताच्या उभारणीला गती देण्याच्या मोहिमेला आज अयोध्या नगरीतून नवी ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. सरत्या वर्षात निरोप देताना अथवा नववर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतांनाच रस्त्यावर वाहन चालविताना स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास नुकसान पोहोचणार नाही याची खबरदारी न घेणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संगमनेर-अकोलेचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर उपविभागाअंतर्गत संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव, आश्वी, अकोले आणि राजुर पोलीस स्टेशनचा समावेश होतो. या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षभरात १३२ प्राणांकित अपघात झाले असून त्यात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील बहुतांशी वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालविल्याचे तसेच…
महाराष्ट्र संवाद न्यूज ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून खिशात ठेवून द्या’, असे सांगत दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाच्या हातातील अडीच तोळ्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर संतू सोनवणे असे फसवणूक झालेल्या ६७ वर्षीय वृद्धाचे नाव असून ते भुसे ता. निफाड येथील रहिवासी आहेत. ते काही कामानिमित्त शनिवारी सिन्नरला आले होते यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिर्डी मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांसमोरून जात असताना लुटमारीची ही घटना घडली. दोघा भामट्यांनी त्यांना रस्त्यात थांबवून ‘आम्ही पोलिस असून, पुढे लुटमार सुरू आहे. तुम्ही तुमच्या अंगठ्या खिशात ठेवून द्या’, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्नर (पुणे) : खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला देण्यासाठी २० हजाराची लाच मागणाऱ्या वकीलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २९) गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शिवम गजानन नायकोडी असे लाच लुचपत विभागाने अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदाराच्या मुलाला जुन्नर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. नायकोडी तक्रारदारांचे खासगी वकील होते. त्यांनी मुलाला लवकर जामीन मिळवून देण्यासाठी तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपये, स्वतःची वकील फी १० हजार रुपये द्यावे लागतील असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याचा कात्रीने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार कैद्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महेश महादेव चंदनशिवे (रा. चिखली) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिकेत श्रीकृष्ण समदूर, महेश तुकाराम माने, आदित्य संभाजी मूरे आणि गणेश हनुमंत मोटे यांच्याविरुद्ध रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महेश चंदनशिवे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. २०२१ मध्ये चंदनशिवे आणि आरोपी गणेश मोटे यांच्यात कारागृहात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना (ऊबाठा) प्रवेशानंतर शिर्डीतील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असतानाच घाईघाईत पक्षाकडून संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. फेरबदलामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने शिवसेनेला ‘विखेसेना’ होण्यापासून वाचविण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांनी एल्गार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदार संघातील निष्ठावंतांची संगमनेरमध्ये आढावा बैठक होत आहे. या बैठकीनंतर अनेकांची पक्षीय भूमिका ठरण्याची चिन्हे आहेत. वर्षाअखेरीस रविवारी ३१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता संगमनेरमध्ये ही बैठक होत आहे. माजी खासदार वाकचौरे यांचा पक्षप्रवेश, कोणताही पक्षीय विचार न करता केलेला संघटनात्मक फेरबदल, निवडीमध्ये निष्ठावंतांना डावलत खास व्यक्तिगत संबंध असणाऱ्यांना दिलेली पक्ष संघटनेतील पदे यामुळे अकोले, संगमनेर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज कॅफे हाऊसच्या गोंडस नावाखाली अश्लील हावभाव अथवा कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याच्या कारणावरून कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी वय १९ वर्षे, रा. कासारवाडी, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर शहरालगतच्या राहणेमळा येथील रिलॅक्स कॅफेमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कॅफेवर छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना रिलॅक्स कॅफेमध्ये तरुण मुली मुलांना अश्लील हावभाव अथवा कृत्य करण्यास सुलभ व्हावे, त्या बदल्यात त्यांच्याकडून तासाप्रमाणे पैसे घेऊन यासाठी जागा उपलब्ध करून देताना तसेच विनापरवाना खाद्यपदार्थाची तेथे विक्री करताना आरोपी गवळी आढळून आला. या कारवाईवेळी कॅफेमध्ये मुला-मुलींच्या सहा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर शहरातील अकोले बायपासनजीक शहर पोलिसांच्या पथकाने एका कॅफे हाऊसवर टाकलेल्या छाप्यात सहा मुली आणि सहा मुले आढळून आली. पोलिसांनी या मुला मुलींचे कॅफे चालक अभय चंद्रकांत गवळी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचारासारखे गंभीर प्रकार संगमनेरमधील कॅफे हाऊसमध्ये घडल्याचे समोर आले आहे. पोलीस काही कॅफे चालक मालकांवर गुन्हे देखील दाखल केले मात्र तरीदेखील संगमनेरमध्ये कॅफेतील गैरकृत्य थांबण्याची चिन्हे नाहीत. शहर आणि परिसरातील कॅफे हाऊसमध्ये अनेक प्रकारचे सर्रासपणे सुरू असतात. या कॅफे हाऊसमध्ये तसेच शहरातील काही लॉजिंगमध्ये अल्प मोबदल्यात जोडताना ‘प्रायव्हसी’ उपलब्ध करून दिली जाते.…
