Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोल्हार घोटी राज्यमार्गावर निर्जन ठिकाणी वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची पाच जणांची टोळी उघडकीस आणण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना पकडले असून टोळीचा मोहरक्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तृतीय पंथीयांचा वेश परिधान करत राज्य मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी तीन दिवसांपूर्वीच पकडण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पोलिसांना लागोपाठ दुसरे यश मिळाले आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  मुंबई – न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता असं वाटतंय की, राष्ट्रवादीमुळेच हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एकच पक्ष आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये येणं बाकी आहे तोही आला तर काय हरकत आहे असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित करत अजित दादा मुख्यमंत्री होतील याला मी होही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही, सध्या अंदाजाच्या पलीकडे राज्याच राजकारण गेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी देखील भाजप शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन काही बोलले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्‍या महाराष्ट्रात त्यांचा निषेध केला. राज्याच्या भल्याची ज्यांना अक्कल नाही ते ही यानिमित्त बाहेर आले. स्पष्ट बोललं की माणसाला झोंबतं. जे स्पष्ट बोलतात तेच दिसतात. महाराष्ट्रात असं उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नसते. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत थेट नागपूरमध्ये जाऊन दाखवली आणि कोण गजहब झाला. आपल्या नेत्याची कोणी निंदा नालस्ती केली तर त्याचा निषेध करायचा अधिकार त्याच्या समर्थकांना असायलाच हवा. पण ज्याच्या समर्थनार्थ आपण हे करतो, तो त्या समर्थनाच्या पात्रतेचा आहे काय, याची जाणीव समर्थकांनी ठेवली पाहिजे.  जो कलंकित शब्द उध्दव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  उस्मानाबाद – पाझर तलाव आणि साठवण तलावाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे 26,56,017/- व 4,31,798/- रुपयांचे दोन धनादेश उस्मानाबादच्या प्रांताधिकारी कार्यालयातून काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा खाजगी उस्मानाबाद एसीबीने रंगेहात पकडले. पकडलेल्या लाचखोरात एका संपादकाचा समावेश आहे. अनिरुद्ध अंबऋषी कावळे (वय 52 वर्ष, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) व बाबासाहेब हरिश्चंद्र अंधारे (वय 42 वर्ष, संपादक दैनिक मराठवाडा योद्धा, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी, तक्रारदादाच्या पत्नीच्या नावे असलेले शेत जमीन शासनाने पाझर तलाव आणि साठवण तलावासाठी संपादित केली आहे. संपादित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला न्यायालयाने दिलेल्या…

Read More

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – महिलांचे सबलीकरण व त्यांचे आरोग्य याचबरोबर समृद्ध कुटुंब व्यवस्थेकरता जयहिंद महिला मंचच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून संगमनेर-शिर्डी या पायी वृक्षदिंडीत मार्गातील 9 गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. संगमनेर ते शिर्डी या पायी दिंडीत समनापुर, वडगाव पान, निळवंडे, कवठे कमलेश्वर, कासारे, काकडी, कोऱ्हाळे, नांदुरखी, शिर्डी, या गावांमध्ये दंडकारण्य अभियानांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. या अभियानाचे हे 17 वे वर्षे आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्य सरकारने शुक्रवारी गेल्या तीन वर्षांपासूनचे क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान या पुरस्काराद्वारे राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेरची कन्या सायकलपटू प्रणिता सोमण हिच्यासह राज्यातील 116 जणांचा समावेश आहे. सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षातील एकत्रित पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केली. प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला सायकलिंग साठी सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रणिता ही संगमनेर मधील वैद्यकीय व्यावसायिक प्रफुल्ल सोमण यांची कन्या आहे. महाजन म्हणाले, राज्यात क्रीडा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे –  आंबी (ता. मावळ) येथे एका बंद खोलीत शुक्रवारी (ता.१४) रात्रीच्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महाजनी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  मुंबई – शपथविधीच्या तब्बल बारा दिवसानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अखेर राज्याच्या अर्थ खात्याच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या आहे. शिवाय त्यांच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहे. अजित पवार 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर खाते वाटपाचा घोळ सुरूच होता. त्यातच मुख्यमंत्री शिंदे गटाकडून पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध दर्शविला जात होता. परिणामी पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खाते सोपविले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेरीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली दरबारात झालेल्या…

Read More

शहर पोलिसांच्या नव्या टीमची लक्षवेधी कामगिरी परजिल्ह्यातील टोळीकडून दरोड्याच्या साहित्यासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केलेल्या खांदेपालटानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांची टोळी पकडण्यास शहर पोलिसांना यश आले. शहर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर याचे जम्मू काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबत होते, असं एनआयएच्या तपासात निष्पन्न झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जयेश पुजारीने उर्फ शाकीरने जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळा गडकरींना धमकी दिली होती. या धमकी प्रकरणी नागपूर पोलिसांनी यापूर्वीच जयेश पुजारी याच्या विरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता त्याच गुन्ह्यांमध्ये बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशाला सहआरोपी बनवण्यात आले आहे. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नाही. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही तसेच मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याने या पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत. खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आत्तापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी देखील अंतिम निर्णय समोर येताना दिसत नाही. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रोटरी क्लबसह विविध संस्थांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकाच वेळी 327 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना एक लाखाचे अपघाती विमा संरक्षण आणि छत्री भेट देण्यात आली. रक्ताची वाढती गरज लक्षात घेत रोटरी क्लब, टीएलसी ग्रुप, इनरव्हील क्लब, संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, निमा, आयएमए, आयडीए, आयएचएमए आदी संस्थांनी शुक्रवारी (7 जुलै) आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते औद्योगिक वसाहतीमध्ये तर जागतिक स्तरावर संगमनेरचे नाव उंचावणाऱ्या सायकलपट्टू प्रणिता सोमन हिच्या हस्ते रोटरी नेत्र रुग्णालयात करण्यात आले. रक्तदात्यांमध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आपल्या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या आणि मंत्रिपदावर गंडांतराची शक्यता निर्माण झालेल्या राज्याच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात न्यायालयाने खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी आणि अपुरी माहिती दिल्याच्या कारणावरून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडच्या प्रथम वर्ग न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी 2021 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हे आदेश देण्यात आले आहे. या संदर्भात न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी 204 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 ‘अ’…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना बेघर करण्यात आले. गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज आम्ही एक दिवसाचे मौन सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलन संपले असून आता भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी बुधवारी केला. मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माध्यमांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एन.एच.एस. फाउंडेशन या नामांकित संशोधन संस्थेच्या दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीमधील फेलोशिप पूर्ण केल्याची माहिती डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली. इंग्लंड मधील सर्वात जुन्या व सुप्रसिद्ध असलेल्या एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्टचे दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची स्थापना 1909 मध्ये झालेली असून या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असून तेथे असलेल्या 17 सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये नामांकित व निष्णात ऑर्थोपेडिक सर्जनद्वारा दररोज सुमारे 50 मोठ्या व जखमेच्या आर्थोपेडिक सर्जरी होत असतात. या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीचे महिनाभराचे विशेष प्रशिक्षण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करत यावर्षी देखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मंगळवारी माजी मंत्री, आमदार थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम कुऱ्हे, पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. यावेळी डख यांनी यशोधन कार्यालयातील कामकाजाची पद्धत समजावून घेतली. भेटी दरम्यान डख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्या नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याचा धक्का बावीस वर्षे वयाच्या एका बेरोजगार तरुणाला जीएसटीच्या आलेल्या 24 लाख 61 हजार रुपयांच्या बिलाच्या नोटीसमुळे बसला आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा पोलिसांपुढे मांडली. पोलिसांनी देखील या बेरोजगार तरुणाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरातील रहिवासी असलेल्या देवेंद्र कुमारला 24 लाख 61 हजार रुपयांच्या थकीत जीएसटी बिलाची नोटीस आली. बांधकाम मजूर असलेल्या देवेंद्र कुमारला या नोटीसमुळे चांगलाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात…

Read More