Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गोमातेपासून आपणास दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसेला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी होत असते. मात्र यावर्षी लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी कारण पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला. घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित  करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले. वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो. शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगर परिषदेने आपल्याकडे सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध देय रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दीपावली सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतांना कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सण अग्रीम तसेच कायम कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी ही रक्कम अदा करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सणानिमित्त माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन 22 तारखेपर्यंत करणार असल्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून ‘ईडी’ सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली होती, त्या बहुचर्चित बदल्या अखेरीस करण्यात आले आहे. आपल्या पोलीस दलातील पहिल्याच नियुक्तीत श्रीरामपूरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या राकेश ओला यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. शिंदे फडणवीस सरकारने प्रथमत:च आयपीएस अधिकाऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. ऐन दीपावलीच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील 45 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर गृह विभागाने काढले आहेत. यातील 24 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर अन्य अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आली नसून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात अहमदनगरचे सध्याचे एसपी मनोज पाटील यांचाही…

Read More

शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने गरिबांच्या हिताचे निर्णय सरकार घेत आहे. ‘आनंदाचा शिधा’ देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी केले. सर्वसामान्य जनतेची दिवाळी गोड व्हावी; म्हणून शासनाने जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’चे कीट जिल्ह्यात पोहचले आहेत. या शिधा वाटप उपक्रमाचा जिल्ह्यातील शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याहस्ते आज राहाता येथून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  विखे म्हणाले की, आनंदाच्या शिधा’ कीटच्या माध्यमातून गरिबांना १०० रूपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चणाडाळ व एक लीटर पामतेल वाटप केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत शिवसेना विरोधात अंधेरी पूर्व मध्ये पोट निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. भाजपने त्यांच्या विनंतीला मान दिल्यानंतर आता ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये, अशी मागणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ठाकरे यांच्या विनंतीला मान देत भाजपने आपले अधिकृत उमेदवार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात उत्‍तम प्रकारच्‍या सर्व आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून स्‍वस्‍थ भारत बनविण्‍यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण, रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मंडविया यांनी केले. अहमदनगरच्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे आयोजित कॅन्‍सर सेंटर, न्‍युक्लियर मेडिसिन सेंटर, उद्घाटन समारंभात मंडविया बोलत होते. मंडविया यांच्‍या हस्‍ते राळेगणसिध्‍दी येथे प्राथमिक आरोग्‍य केंद्राचा पायाभरणी व पढेगांव येथे नव्‍याने उभारण्‍यात आलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे लोकार्पण दुरदृष्‍य प्रणालीद्वारे करण्‍यात आले. कार्यक्रमाला राळेगणसिध्‍दी येथुन दुरदृष्‍य प्रणालीद्वारे ज्‍येष्‍ठ समाजसेवक, पद्मभुषण आण्‍णा हजारे, कार्यक्रमस्‍थळी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोल्हार-घोटी मार्गावर वडगाव पान फाटा येथे मोटार सायकल आणि डंपरच्या झालेल्या अपघातात दोन मावस भावांचा डंपर खाली सापडून मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपावलीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) आणि सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) असे मयत युवकांचे नाव आहे. तर कावेरी तात्यासाहेब रोकडे असे जखमी मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दिनांक २० ऑक्टोबर २२) सकाळी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्लास्टिक बंदी आदेश धुडकावत या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विक्रेत्यांना केले आहे. प्लास्टिक बंदी आदेशाची शहरातील विक्रेत्यांकडून पायमल्ली सुरू होती बंदी असलेले प्लास्टिक पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहराच्या विविध भागात दोन दिवस ही कारवाई केली. दरम्यान काही प्लास्टिक विक्रेत्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दीपावलीनिमित्त दूध फरक, दुध पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि पगारापोटी ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. सरासरी ३५ रुपये भाव, दूध संघाचे रिबेट व स्थानिक संस्थांचे रिबेट म्हणून दूध उत्पादकास सर्वाधिक भाव राजहंस दूध संघाकडून मिळत असतो. १६ ऑक्टोबर २०२२ पासून एक…

Read More

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मताधिक्याने विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी खरगे यांचे अभिनंदन करत ही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले, नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना 50 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत त्यांनी पक्ष संघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सह मोठ्या प्रमाणात सर्वच पिके वाया गेली आहेत. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या कार्यालयाबाहेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या सरकार विरोधी घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना दिले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. खरगे यांना 7897 तर थरूर यांना एक हजारावर मते मिळाली असल्याची माहिती आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होईल, असा विश्वास निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला जात होता. खरगे हे काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार खरगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. 80 वर्षे वयाचे खरगे हे कर्नाटकातील आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या 24 वर्षात प्रथमताच निवडणूक झाली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सतर्कता म्हणून जाधव यांच्या घरी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जाधव यांच्या चिपळूण (रत्नागिरी) येथील निवासस्थानासमोर दगड, क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी जाधव यांच्या निवासस्थानी धाव घेत गर्दी करण्यास सुरुवात केली. कुडाळ मध्ये मंगळवारी वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जाधव सहभागी झाले होते. त्यानंतर रात्रीच ते मुंबईला रवाना देखील झाले होते. मात्र आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी दगड क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या…

Read More

पालकमंत्र्यांची परवानगी असेल तरच कार्यक्रम घ्या, नाहीतर कार्यक्रम नकोत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही शासकीय अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास, शासकीय निधीतून होणारी कामांची भूमिपुजने, उद्घाटने यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. अशा कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशा आशयाचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. शासकीय कामांचे श्रेय घेण्याचे प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जिल्ह्यात सातत्याने सुरु असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विखे पाटलांकडे वजनदार महसूल खात्याची जबाबदारी आली आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर पद्मशाली समाज मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण इटप यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् चे अध्यक्ष महेश कोठे तसेच सरचिटणीस गणेश पेनगोंडा यांनी दिले आहे. संगमनेरात पद्मशाली समाजात अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या कामाची दखल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् ने घेत त्यांना ही मोठी जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले. समाजाची उन्नती व प्रगतीसाठी भविष्यात संघाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून नारायण इटप यांनी नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडून काढून त्यांची चौकशी करण्याची तसेच या गुन्ह्यात आणखी दोघा आरोपींची नांवे समाविष्ठ करण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी व फिर्यादी जतीन बत्रा यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात शहरातील नामांकित वकील व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपूले यांच्यावरदेखील कतारी व बत्रा यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले आहे. शेखर याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना शहराध्यक्ष कतारी व भाजपचे शहराध्यक्ष गणपूले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात सहकार मंत्रालय स्थापन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सहकारी साखर कारखानदारीबद्दल अनेक मोठे निर्णय घेत आहेत. तर सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम होत आहे. आपल्या कारखान्याने संघर्षाचे दिवस बघीतले, आता चांगले दिवस आपण बघत आहोत. आपल्या सर्वांच्या पाठबळाने नामदार विखे पाटील मोठ्या मंत्रीपदावर पोहोचले याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत विखे पाटील सर्वांच्या पूढे असेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या गळीताची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याचे माजी अध्यक्ष भास्करराव खर्डे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमधून 23 गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारी पिकअप चालकास मारहाण करून पेटवून देण्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. यासंदर्भात जावेद पठाण याच्या तक्रारीवरून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद मुसा पठाण (वय 28 वर्ष रा. ममदापूर ता. राहता) हे आपल्या पिकअपमध्ये संगमनेर येथून 23 लहानमोठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असताना नगरच्या शेंडीजवळ ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. शेंडी बायपासवर या पिकअप गाडीचा काही लोकांनी पाठलाग सुरू केला होता. ही बाब पिकअप चालक पठाण यांच्या लक्षात आली असता या दरम्यान चालकाचा पिकअपवरील ताबा सुटून पिकअप पलटी झाली. त्यानंतर शेंडी बायपासवरील बर्डे…

Read More