Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी / मुंबई जेष्ठ सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केल्यानंतर राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन निवडणूक आयुक्तांवर असणार आहे. दिनेश वाघमारे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. मंत्रिपरिषदेने नव्या निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचे सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांची दिनेश वाघमारेंच्या नावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्यावतीने वाघमारेंच्या नियुक्तीचा एक आदेश जाहीर करण्यात आला आहे. दिनेश वाघमारे हे पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याचे निवडणूक आयुक्त असतील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई-  बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत. न्यायालायाने चौकशी अहवालात हे एन्काउंटर घडवून आणल्याचं म्हटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत काढण्यात आलाय. पोलिसांकडील बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी…

Read More

संगमनेर – मोहसीन खलील शेख बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे…

Read More

संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने सोमवारी शहरातील प्रभाग १ मधील पी.जे. आंबरे पाटील कन्या विद्यालयात महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात मोफत उपचार घेण्यासाठी सकाळपासून अनेक रुग्णांनी गर्दी केली. अनेक रुग्णांवर शिबिरस्थळी उपचार करण्यात आले तर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचारांसाठी नेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला. अधिक माहिती अशी की, शहरातील नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी दर रविवारी विविध प्रभागात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १० पेक्षा अधिक प्रभागांमधील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील नगरपालिकेच्या शासकीय जागेत असलेल्या अनधिकृत सागर वाईन्स, सरकारमान्य देशी दारूच्या दुकानाविरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदरील दुकानाचे बोगस लायसन्स रद्द व्हावे, नगरपालिकेने अनधिकृत अतिक्रमण हटवावे अशा मागण्या उपोषणकर्त्या सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी केल्या आहेत. सदरील दुकान हे अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे बनवून नगरपालिका व उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यांत धूळफेक करत चालवत असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला असून सदरील दुकान तात्काळ बंद करून खोटे कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. आता नगरपालिका प्राशासन व उत्पादन शुल्क विभाग काय…

Read More

नाशिक – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता केवळ नोटीस देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करून यातील १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देवळा पोलीस ठाण्याच्या सहायक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कैलास जगताप (वय ५४ वर्ष, रा. मुंजवाड, सटाणा) असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. हा पोलीस अधिकारी देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदारावर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करता नोटीस देण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षक कैलास जगताप (५४, मुंजवाड, सटाणा) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. २०…

Read More

संगमनेर – ‘एफडी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो’ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ असा संदेश देणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालपाणी लॉन्स येथे दि. १६ ते २२ जानेवारी पर्यंत सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शन सारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले. ‘एफ डी तोडो, म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि ‘सपनोंको स्किप नही, एसआयपी करो!’ या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्लोगनला संगमनेरकरांनी दाद…

Read More

मुंबई – महायुती सरकार मध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेले मतभेद समोर आले आहे. महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल, त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. या गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या असून १९ जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. पालकमंत्रिपदावरुन रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातच काही मंत्र्यांना पालकमंत्री पदावरून डच्चू देण्यात आल्याने महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे.…

Read More

मुंबई, दि. १९ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. ठाणे – उपमुख्यमंत्री…

Read More

संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

Read More