Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज “भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटद्वारे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे–फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप…
महाराष्ट्र संवाद न्यूज बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण…
महाराष्ट्र संवाद न्यूज सहकाराला दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी १६ ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते होत आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेला हा कारखाना आज राज्यात आणि देशभरात सहकारी चळवळीचा मापदंड ठरला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली आहे. दिवंगत भाऊसाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले असले तरी संगमनेरात गेल्या काही महिन्यात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या संगमनेर तालुक्यातील जनसेवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत ३४४ प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तहसीलदार अमोल निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांमध्ये लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणारी ५०२ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३४४ प्रकरणे तहसीलदारांनी मंजूर केली. उर्वरित प्रकरणांमध्ये किरकोळ त्रुटी आढळल्या. त्यामुळे या त्रुटी दूर करून ही प्रकरणी पुन्हा नव्याने मंजुरीसाठी पाठविण्यात येणार…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक दुचाकी चोऱ्या आणि प्रवाशांना लुटण्याचे प्रकार संगमनेरमध्ये सर्रासपणे घडत आहेत. येथील बस स्थानकामधून आरोपींना कुठेही तातडीने निघून जाता येते, त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी बसस्थानकामधील पोलीस चौकी पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातून भर रस्त्यावर तसेच बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाकींच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकींचा चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसते. बस स्थानकाचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टपोरी मुले नाहक त्रास देण्याचे काम करत असतात. मग ती मुलींची छेडछाड…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे चेंबूर पोट निवडणुकीचा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे येत्या १७ ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी सतरा मतदार पात्र असून त्यापैकी सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमधील आहे. तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरशीची लढत होत असून या निवडणुकीपासून गांधी परिवार प्रथमतः दूर राहिला आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खर्गे आणि थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. यामुळे यावेळी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्वामी समर्थ मंदिरापासून साई मंदिर, प्रवरा नदीवरील घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने या पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी शुक्रवारी शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान गुरुवारी दुपारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, या प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र वाकचौरे व शैलेश कलंत्री, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती सोमेश्वर दिवटे, नितीन पापडेजा आदींनी या पुलाची पाहणी केली आणि कामासंदर्भात पालिका प्रशासनाला सूचना केल्या. मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत या पुलाचे बांधकाम येते. त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई महापालिकेने आपला राजीनामा स्वीकारावा, यासाठी न्यायालयात गेलेल्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारण्याच्या दिलेल्या आदेशामुळे लटके यांचा चेंबूर पोट निवडणुकीतील उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली…
महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. शहरात प्रस्तावित असलेल्या एसटीपी प्लांटसाठी आवश्यक असणारी आणि नुकतीच बांधण्यात येत असलेली ड्रेनेजची लाईन देखील तुटली असल्याचे निदर्शनास आले. संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन या पुलावरून समांतर गेली आहे. आज दुपारच्या वेळी ही पाईपलाईन आणि त्याखालील पुलामध्ये मोठ्या प्रमाणात फट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. तसेच पूल देखील काही ठिकाणी खचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हाळुंगी नदीला पाणी असल्याने पुलाच्या खाली असलेली…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य राहणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित लघु उद्योग भारतीच्यावतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, या क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नोकरी निमित्त बाहेरगावी असलेल्या पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याची घटना शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात घडली. घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञातांकडून शहरात दुचाकी जाळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांची उकल पोलीस उपाधीक्षकांचे पथक करत असले तरी या पथकालाही दुचाकी जाळणाऱ्यांचा शोध घेता आलेला नाही. सध्या ठाण्याच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या आणि भातसा धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या व संगमनेरच्या ढोलेवाडीमध्ये राहणाऱ्या पोलीस नाईक राजेश सावित्रा माळी यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तातडीने या संदर्भातील सुनावणी गुरुवारी निश्चित केली आहे.अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला लटके यांनी निवडणुकीसाठी पालिकेकडे मुभा मागितली होती मात्र पालिकेने ती नाकारली. त्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाण्यातून सुरु झालेल्या शिवसेनेच्या महा प्रबोधन यात्रेत पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवरील टिका शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल व मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत या तिघांसह पाच जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अंधारे व जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती, तर राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. शिवसेना नेत्यांची ही कृती मुख्यमंत्री शिंदे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात वीज प्रवाहाचा धक्का लागून चार मुलांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बर्डे कुटूंबियांवर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून या कुटूंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे दिले. तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथे एका छोट्याश्या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात पडलेल्या वीज तारेमुळे शॉक बसून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे येथे घटनास्थळी जात बर्डे कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मालमत्ता धारकांकडून बेकायदेशिरपणे संगमनेर नगरपालिका आकारत असलेल्या शास्तीचा विषय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आता नव्या सरकारच्या नगरविकास मंत्रालयात चर्चीला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार आणि माजी नगरसेवक शिरीष मुळे यांनी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर नगरपरिषदेकडून बेकायदेशिरपणे अनधिकृत बांधकामावरील शास्ती व त्यावर चालु आर्थिक वर्षात लावण्यात येणारी प्रतिमहिना २ टक्के शास्तीचा विषय त्यांच्यासमोर मांडला. यासंदर्भात विखे पाटील यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. संबधीत विषय नगरविकास मंत्रालयाशी संबधीत असल्याने नगरविकास मंत्रालयासोबत बैठक…
महाराष्ट्र संवाद न्यूज विवेक बुध्दीचा वापर न करता बलात्काराच्या याचिकेसोबत आक्षेपार्ह छायाचित्रे जोडल्याप्रकरणी न्यायालयाने एका वकीलाला पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय याचिकेसोबत छायाचित्रे जोडतांना विवेकबुध्दीचा वापर केला नाही म्हणून संबधीत वकीलाला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. पतीविरोधातील बलात्काराचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आरोपी पतीच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. दाखल याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर यासंबधीची सुनावणी सुरु होती. सुनावणीदरम्यान याचिकेसोबत जोडण्यात आलेली आक्षेपार्ह छायाचित्रे बघितल्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना याबद्दल चांगलेच फटकारले. शिवाय अशा प्रकारची छायाचित्रे जोडणे म्हणजे पक्षकाराच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे सांगत संबधीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला वेगवेगळ्या नावाने मान्यता मिळाल्यानंतर आता चिन्ह देखील निश्चित झाले आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ‘मशाल’ तर त्या पाठोपाठ मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला अखेर ‘ढाल तलवार’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या ‘मशाली’ला ‘ढाल तलवारी’ने प्रत्युत्तर देणार आहे.सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशा नावाने मान्यता देत त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले होते. शिंदे गटाने दिलेले चिन्हाचे पर्याय आयोगाकडून नाकारण्यात आल्यानंतर त्यांना आज…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कट्टर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी चिन्हावरुन ठाकरे गटावर निशाणा साधत ‘आपल्याला काय घरांना आग लावायची नाही’ असा उपरोधीक टोला ठाकरेंना लगावला आहे.सध्या ठाकरे-शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टिकेकडे लक्ष न देण्याचा सल्ला आपल्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यांच्याच गटाचे मंत्री असलेल्या सत्तार यांनी हा सल्ला धुडकावत आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने परवानगी देत त्यांची नांवे निश्चीत केली आहे.ठाकरे गटाला ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे’ हे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी समोर आलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.बियाणी यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे बियाणी यांचे हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात खासदार प्रीतम मुंडे आणि पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील धाव घेतली असून बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष असलेले बियाणी यांचा जनसंपर्क मोठा आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बियाणी यांनी त्यांच्या राहत्या घरात गोळी झाडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कार्यभार येत्या 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांनी पुढील सरन्यायाधीशपदी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे लळीत यांच्यानंतर चंद्रचूड नवे सरन्यायाधीश असतील.निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस एक महिना आधी करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपत असल्याने केंद्र सरकारने त्यांना देशाच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नावांची शिफारस करण्याविषयी विचारणा केली होती.लळीत यांच्यानंतर चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती असतील. त्यांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजेच दोन वर्षाचा असेल. ललित यांच्या पाठोपाठ देशाला पुन्हा मराठी सरन्यायाधीश लाभणार आहेत.…
