Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियानासह राज्यातील चौदा संस्था, व्यक्तींचा “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पुण्यामध्ये गौरव करण्यात आला आहे. थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान पर्यावरणाच्या दृष्टीने लोक चळवळ ठरले असून या अभियानाची दखल जागतिक स्तरावर युनोने देखील घेतली आहे. पुण्याच्या हरित मित्रपरिवार, गुरुकृपा संस्था, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्र यांच्यावतीने “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार” दिले जात असून नुकताच हा सोहळा पुण्यामध्ये पार पडला आहे. पर्यावरण आणि संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध चौदा संस्थांना यावेळी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन…
महाराष्ट्र संवाद न्यूज कोपरगाव : कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर परिचारिकेचा विनयभंग करत कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याच्या कारणावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत मंगळवारी (ता. २९) सकाळपासून कोपरगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले. कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे हे शनिवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत त्यांच्याविरोधात परिचारिकेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा खोटा असल्याचे म्हणत तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काम…
महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय पोलीस सेवेतील पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तिघा अप्पर पोलीस महासंचालकांसह चार विशेष पोलीस महानिरीक्षक आणि एका पोलीस उपमहानिरीक्षकांना राज्य सरकारच्या गृह विभागाने मंगळवारी नियुक्ती दिली आहे. या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृह विभागाने काढले आहेत. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले अप्पर पोलीस महासंचालक बिपिन कुमार सिंह यांची अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई या पदावर, प्रभात कुमार यांची अप्पर पोलीस महासंचालक व उप महासमादेशक होमगार्ड मुंबई या पदावर आणि विनीत अग्रवाल यांची अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी म्हाडा मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण…
सुनिल नेवासकर ॥ संगमनेर संत निरंकारी मिशन आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने व प. पु. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम रविवारी (ता. २६) सकाळी ७ ते १२ या वेळेत विजयघाट, गंगामाई परिसर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्प अंतर्गत विजयघाट व नदीपात्राची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलसंरक्षण हा असून यामध्ये प्रामुख्याने पाण्याचे स्त्रोत शुध्दीकरण आणि स्वच्छ करण्याप्रती जनजागृती करणे हा आहे. हा उपक्रम संपूर्ण भारतात ११०० ठिकाणी राबविला गेला. यामध्ये समुद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज अखेर राज्य सरकार नमलं असून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश आलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले होते. रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला. राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली…
महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमाचा 2022-23 या शैक्षणिक वर्षाचा उत्कृष्ट राज्यस्तरीय प्राचार्य प्रवर्तक पुरस्कार सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसटी महाविद्यालयाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम केले आहे. गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रमामुळे हे महाविद्यालय राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरले आहे . नवीन शैक्षणिक धोरणानुसार बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांप्रमाणे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सेवाभावी…
महाराष्ट्र संवाद न्यूज केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल कधी लागणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच या महत्त्वाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी भाष्य केले आहे. त्यामुळे सामान्यांचं सरकार म्हणून ओळख सांगणारं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार खरंच वैध आहे की नाही, याचा निकाल आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आणखी फार काळ चालणार नाही. तारीख पे तारीख अशी स्थिती या केसची आता होणार नाही तर हा युक्तिवाद याच आठवड्यात संपवून निकालदेखील लवकरच मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबतीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ते प्रा. गंगाधर अहिरे यांना यावर्षीचा स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष के. जी. भालेराव यांनी दिली. रविवारी १२ मार्चला संगमनेरच्या व्यापारी असोसिएशन सभागृहामध्ये समीक्षक प्रा. मिलिंद कसबे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संगमनेरमधील ज्येष्ठ लेखक समीक्षक स्मृतीशेष कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. गतवर्षी हा पुरस्कार शेवगाव येथील लेखक आणि वंचितचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांना देण्यात आला होता. दुसऱ्या वर्षीच्या पुरस्कारासाठी प्रा. अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरयू देशमुख व राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या मेधा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री पार्श्वगायक, गीतकार ,संगीतकार यांच्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांची राहिलेली उपस्थिती हे या मेधाचे वैशिष्ट्य ठरले असून मेधा कपमध्ये अमृतवाहिनी बी फार्मसी प्रथम, अकोले कॉलेज द्वितीय तर इस्लामपूर येथील सांगली कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने मेधा मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, व्यवस्थापक…
महाराष्ट्र संवाद न्यूज बहुतांशी गुन्ह्यामध्ये पोलिसांकडून ५०४, ५०६ हे कलम लावले जाते. अशाच एका कलम ५०६ अंतर्गत प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. यामुळे कडू यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेमध्ये २ नोव्हेंबर २०१५ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. अपंग निधी अखर्चित राहिल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत आक्रमक आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान आमदार बच्चू कडू आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर या संदर्भात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह प्रहारचे मयूर काकडे बलराज रणदिवे बाळासाहेब कसबे आणि चंद्रकांत जाधव या…
महाराष्ट्र संवाद न्यूज क्रिप्टोचा खेळ संपलेला आहे, कोणतीही गुंतवणूक असो त्याला नियमन, कायदे आणि सरकारी नियंत्रण आवश्यक असते. क्रिप्टो हा एक सट्टा आहे, त्यात गुंतवणूक करण्याऐवजी सामान्य व्यक्तीला कोट्याधीश करण्याची क्षमता असलेल्या म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करा व आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हा असा सल्ला अन्फ्फि (AMFI) एमएफडी सुनील कडलग यांनी दिला. नारायणगाव येथील हॉटेल सचिन एक्झिक्यूटिव्ह कॉन्फरन्स हॉलमध्ये जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे शनिवारी आयोजित नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे व रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ. हनुमंत भोसले होते. डॉ. निलेश थोरात, एनजे वेल्थचे शुभम…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल आहे. आयोगाच्या या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधून क्रिया प्रतिक्रियांचा महापूर आलेला असतानाच विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उदाहरण दिलं होत. ते म्हणाले होते, राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार आहे. या एकमेव आमदाराने जर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझा पक्ष, आणि इंजिन हे निवडणूक चिन्ह देखील माझेच असल्याचा दावा केला तर, तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजाच नव्हते तर ते संत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ घटनाकार नव्हते तर संत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ योद्धा नव्हते तर ते संत होते. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. असे प्रतिपादन शंकर गायकर यांनी केले. गायकर म्हणाले, सध्या गोहत्या प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्याला देशपातळीवरील काही राजकीय पक्षाचे नेते खतपाणी घालत आहेत. गोर-गरिबांना चुकीचे आणि खोटे इतिहास सांगून धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहाद प्रकार ग्रामीण भागात पोहोचला आहे. अखंड हिंदुस्तानची फाळणी देखील लव्ह जिहादसारख्या गोष्टीतून झाली आहे. सनातन हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही, मात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज २० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपाच्या अनुषंगाने साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यासंदर्भात अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारामध्ये पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामध्ये महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची संगमनेर येथील संघटना देखील सहभागी झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सतत याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे. सविस्तर मागण्या पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या असून त्यात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकूर आणि माहुली येथे रविवारी रात्री घडलेल्या दोन घटनांनी पठार भाग हादरला आहे. तीन अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत त्याला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली तर त्यापाठोपाठ काही वेळातच साकूरमधील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत कर्मचाऱ्यांना रिव्हाल्व्हर आणि चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटल्याची घटना घडली. पठार भागात असलेल्या स्वतंत्र घारगाव पोलीस ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाच चोरट्यांनी आव्हान दिल्याचे यातून समोर आले. पेट्रोलपंपावरील घटनेतदेखील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. पहिल्या घटनेत माहुली येथे तीघा चोरट्यांनी एका लक्ष्मी टायर वर्क्समध्ये असलेल्या अनुदेव शैले या तेवीस तरुणाला रात्री दहा वाजण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज भाऊसाहेब वाकचौरे ॥ अकोले आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पैठण येथील मुलींच्या आश्रम शाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्बल दीडशे विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. यातील काही विद्यार्थिनी आपल्या गावी परतल्या असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यातील पैठण येथे असलेल्या मुलींच्या आश्रम शाळेमध्ये जवळपास चारशे विद्यार्थिनी असून दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने साधारणत: दीडशे विद्यार्थिनींना थंडी, ताप, उलट्या व जुलाबाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तातडीने कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यातील काही विद्यार्थिनींना लोणी आणि संगमनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा. विखे पाटील यांनी स्व. अशोकराव मोरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, रोहीदास डेरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर रोटरीच्या ११८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संगमनेरतर्फे आनंदी रस्ते या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचे रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह मान्यवर संगमनेरकरांचा या उपक्रमास प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लबने धकाधकीच्या जीवनात संगमनेरकरांना काही आनंदी क्षण मिळावेत या हेतुने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचेसमवेत संगमनेरचे नागरिक, बाळगोपाळ, रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावर्षी या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष होते. परिसराची साफसफाई, रस्त्यांवर आकर्षक चित्र, सजावट, रंगेबीरंगे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव जिल्ह्याला देणे भूषणावह आहे. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करू. अशा शब्दात राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतरास अनुकूलता दर्शविली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानताना अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांना केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची मागणी केल्यानंतर महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिकेशी केलेले असभ्य वर्तन कोपरगांवच्या तहसीलदारांच्या चांगलेच अंगलट आले असून आपल्या वर्तनाने कहर करणाऱ्या तहसीलदार बोरुडे यांच्यावर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरुन आता तहसीलदारांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते पुढील तपास करत आहे. दरम्यान या प्रकरणी तहसीलदार बोरुडे यांच्यावर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. कोपरगाव तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालयात अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व…
