Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज दुचाकी आणि दागिन्यांच्या चोऱ्या नित्याच्याच झालेल्या संगमनेरमध्ये आता दिवसाढवळ्या नागरिकांवर लक्ष ठेवत रोकड पळविण्याच्या घटना सुरू झाल्या आहे. अशीच सात लाखाची रोकड पळविण्याच्या नादात तिघांपैकी दोघा बिहारींना पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही वर्षातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे संगमनेरमध्ये चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरी केल्यानंतर पकडले जात नसल्याने या चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. नव्याने पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेल्या निरीक्षक भगवान मथुरे यांना या चोरट्यांचा बिमोड करण्यासाठी पावले टाकावी लागणार आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताशी अवैध व्यावसायिकांशी अर्थपूर्ण लागेबंधे निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांना या पोलीस ठाण्याबाहेरचा रस्ता दाखवत नवी टीम त्यांना उभे करावी लागणार आहे. बस स्थानक, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखालील भाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- इंपिरियल चौक- माळीवाडा वेस- आयुर्वेद कॉर्नर- अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट या मार्गाच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या निश्चितीसाठी कोणाची सूचना अथवा हरकत असल्यास 30 जुन, 2023 पर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. अहमदनगर शहराच्या हद्दीत डीजे, डॉल्बी सिस्टिम लावून शोभा मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- माळीवाडा वेस- पंचपीर चावडी- तख्ती दरवाजा- कापड बाजार- टेलिखुद-चितळेरोड- चौपाटी कारंजा या मार्गाने काढण्यात येतात. या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत विविध मंडळाच्यावतीने ठेवण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकीकडे वर्षाच्या परिश्रमातून सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा असा निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी येत असताना सर्वांनीच जल्लोष करावा असा दिवस असताना दुसरीकडे मात्र काही लोक संगमनेरमध्ये दंगल कशी होईल, येथील वातावरण खराब कसं होईल याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. निळवंडे येथे तळेगाव गट व संगमनेर तालुक्यासह दुष्काळी 182 गावांच्यावतीने बुधवारी आयोजित जलपूजन कार्यक्रमप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, अविनाश सोनवणे, जगन्नाथ घुगरकर आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सावित्रीबाई फुले वसतीगृहात २१ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते व सुप्रदा फातर्पेकर यांनी आज वसतिगृहातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आयोग त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला. त्यानंतर आयोगाच्या या दोन्ही सदस्यांनी वस्तीगृहाची पाहणी करत संचालक आणि व्यवस्थापनाची भेट घेतली. या भेटीत अनेक त्रुटी आणि प्रशासकीय उणिवा समोर आल्या आहेत. यात प्रामुख्याने वस्तीगृहातील सीसीटीव्ही गेले वर्षभर बंद आहेत. मनुष्यबळाची कमतरता असून महिला सुरक्षा रक्षक नाही. मुलींना तक्रार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – तळागाळातील समाजघटकांसाठी योजना राबवितांना जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, निवासी आश्रम शाळा, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्त्यांचे समाज कल्याण विभागाला नेहमीच सहकार्य लाभले. या पाठबळामुळेच सामाजिक न्याय विभागाच्या योजना तळागाळातील गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल, असे प्रतिपादन नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केले. नाशिक समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त कार्यालय व अहमदनगर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्यावतीने समान संधी केंद्र व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन वाघ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त अनिशा शेख,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भगवा मोर्चाच्या दिवशी संपूर्ण जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असताना संगमनेर शहरातील पुणे नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी हातामध्ये धारदार तलवार घेऊन भर चौकात फिरणाऱ्या एकाला पकडले. लक्षवेधी ठरलेला भगवा मोर्चा शांततेत आणि नियोजित वेळेत पार पडल्यानंतर बराच गदारोळ झाला. पोलीस ठाण्यात दगडफेक, हाणामारीचे गुन्हे दाखल झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने या पार्श्वभूमीवर शहरात वातावरण तणावाचे होते. वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. अशाही परिस्थितीत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. अपवादात्मक घटना तातडीने नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरानजीकच्या समनापुर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दगडफेक प्रकरणामुळे संगमनेर तालुक्याच्या शांततेला गालबोट लागले असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंदू समाजावरील अन्याय अत्याचारा विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाने भगवा मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद लाभला. याशिवाय संगमनेरकरांनी उत्स्फूर्तपणे शंभर टक्के बंद पाळला होता. प्रांताधिकारी कार्यालय समोर झालेल्या भगवा मोर्चाच्या समारोपानंतर नागरिक आपापल्या गावाकडे परतत असताना संगमनेर नजीकच्या समनापुर येथे दगडफेकीची घटना घडली. यात चारचाकी, दुचाकी वाहनांचे नुकसानदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले. याशिवाय दोन कुटुंबीयांवर दगडफेक व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कोल्हापुर – महाराष्ट्रात अचानकपणे औरंग्याच्या इतक्या औलादी कुठून पैदा झाल्या? याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचा आवाहन केलं आहे. कोल्हापूरमध्ये औरंगजेब, टिपू सुलतानच स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून ठिय्या आंदोलन आणि कोल्हापूर बंद करण्यात आलं होतं. आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे. फडणवीस म्हणाले, जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे यासाठी या औलादी पैदा झाल्या नाहीत ना? हे तपासाव लागेल. कोल्हापूर मध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली असून पूर्णपणे बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कोल्हापूर – कायदा मोडणाऱ्याला हे सरकार पाठीशी घालणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरकरांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती संभाजीनगर – राज्यात वारंवार धार्मिक जातीय तणावाच्या घटना समोर येत आहे. यातील एक घटना मंगळवारी संगमनेरमध्ये तर दुसरी घटना कोल्हापूरमध्ये घडली. राज्य सरकारचा अशा घटनांना प्रोत्साहन असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. शरद पवार यांनी संगमनेर आणि कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेवर छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाष्य केले. मंगळवारी संगमनेर नजीकच्या समनापुरमध्ये दोन गटात दगडफेकीचा प्रकार घडला होता. तर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाच्या फोटोवरून तणाव निर्माण झाला. या दोन्ही घटनांवर पवार यांनी भाष्य केले. पवार म्हणाले राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगलसदृश्य घटना घडत आहे. मात्र या घटना त्या-त्या परिसरापुरत्या मर्यादित राहिल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लव्ह जिहाद सारख्या वाढत्या घटनांसह विविध अत्याचारा विरोधात संगमनेरमध्ये हिंदू समाज एकवटला होता. अभूतपूर्व असा भव्य भगवा मोर्चा मंगळवारी सकाळी संगमनेरमध्ये काढण्यात आला. मोर्चाला हजारोंची उपस्थिती होती. यात महिला तरुणींची संख्या देखील लक्षणीय होती. याच बरोबरीने संगमनेर शहर आणि तालुक्यात आज स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चानंतर देखील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय विविध आस्थापना बंदच होत्या. मंगळवारी सकाळी नगरपरिषदेसमोरून या भव्य भगवा मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा ज्यावेळी नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला त्यावेळी त्याचे दुसरे टोक बाजारपेठेत होते. यावरून उपस्थितीचा अंदाज येतो. 25 ते 30 हजारावर नागरिक या मोर्चात सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अभूतपूर्व असा भगवा मोर्चा संगमनेरमध्ये शांततेत पार पडल्यानंतर संगमनेर जवळील समनापुर गावात दगडफेकीची घटना समोर आले आहे. दगडफेकीत काही चार चाकी आणि दुचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, देविदास ढुमणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. संगमनेरमधील मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्यांनी मुस्लिम कुटुंबीयांवर हे दगडफेक केल्याचे म्हटले जाते. संगमनेरहून आपल्या गावाकडे परतत असताना काही समाजकंटक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सकल हिंदू समाजाच्यावतीने संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी काढण्यात आलेला भगवा मोर्चा हजारोंच्या उपस्थितीत सुरू आहे. मोर्चा कार्यामुळे सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले. अकराच्या सुमारास मोर्चाचे शेवटचे टोक सभासदाने पोहोचले होते. महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीमध्ये साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या, शहर व तालुक्यात होणारी गोवंश कत्तल लव्ह जिहादसारख्या घटना किरकोळ वादातून ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शालेय विद्यार्थी युवक यांना होणारी मारहाण यामुळे शहरात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा सुरू आहे. संगमनेर नगरपरिषदेपासून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी निघणाऱ्या भव्य मोर्चाला प्रशासनाने अटी शर्तींवर अखेरच्या क्षणी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चाचा परवानगीचा अडथळा दूर झाला आहे. मोर्चातील नागरिकांचा मोठा अभूतपूर्व सहभागाचे शक्यता लक्षात घेता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. पोलीस प्रशासनाने मोठ्या लवाजम्यात मिरवणूक मार्गावरून रूट मार्च काढला होता. महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीमध्ये साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या, शहर व तालुक्यात होणारी गोवंश कत्तल लव्ह जिहादसारख्या घटना किरकोळ वादातून ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शालेय विद्यार्थी युवक यांना होणारी मारहाण यामुळे शहरात ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – बेलगाम सुरू असलेली प्रवरा नदी पात्रातील वाळू तस्करी पुन्हा एकदा जीवावर बेतली आहे. प्रवरा नदीपात्रात सोमवारी तीन विद्यार्थी बुडाले. पाण्यात बुडालेल्या तिघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले तर उर्वरित दोघांचे मृतदेह शोध मोहिमेनंतर नदीपात्रात आढळून आले. सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुदैवाने आसपास असलेल्या नागरिकांमुळे यातील एकाला वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. निलेश माधव अस्वले (वय 18 वर्ष, रा. नवलेवाडी, अकोले जि. अहमदनगर) व अमोल उत्तम घाणे (वय 18 वर्षे, रा. धुमाळवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी मृत झालेल्या दोघा विद्यार्थी मित्रांची नावे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी सातत्याने काम करणारे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले. निळवंडेचे पाणी संगमनेर तालुक्यात येतेय, हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले आहे. पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत संगमनेर तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी या धरणाचे व कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, विश्वास मुर्तडक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील सायखिंडी येथील ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. मनोहर बाबा विद्यालयात सोमवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संदीप सातपुते होते. यावेळी वनरक्षक जयश्री श्रीमती पवळे यांचे प्रमुख व्याख्यान झाले, वृक्षारोपण व संवर्धन केल्यास आपला भविष्यकाळ उज्ज्वल असेल, कोरोना महामारीत लोकांना प्राणवायूचे महत्व समजले. झाडे जगली तरच माणसं जगतील म्हणून झाडांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक सातपुते यांनी शाळेला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते मिळाला असल्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर वनरक्षक गिताराम गोर्डे, अशोक चारुडे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे गट) विना परवानगी केलेल्या आंदोलनाबद्दल आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे. या संदर्भात सोमवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव मथुरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. रविवारी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख रमेश काळे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकासमोर आंदोलन करत राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. राऊत यांनी शिवसेनेविषयी (शिंदे गट) वाईट वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावरून स्थानिक शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने ५२ कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. त्यातून शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी शहरातील विविध भागातील नागरीकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शहरातील जोर्वे नाका येथे घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. अद्यापही काही आरोपींचा शोध सुरू असून यापुढे कोणत्याही गुन्ह्यातील ‘गुन्हेगाराला’ पाठीशी घातले जाणार नाही. कोणाचीही गय केली जाणार नाही. या उपविभागात वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार आता तडीपार होतील किंवा तुरुंगात असतील, अशा पद्धतीने पोलीस कारवाई होणार असल्याचे संकेत संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिले आहे. वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागाचा पदभार हाती घेतल्यानंतर रविवारी प्रथमत:च पत्रकार परिषद घेत आपल्या कामाची पद्धत विशद केली. नागपूर, भुसावळ येथे केलेल्या लक्षवेधी कामासंदर्भात माहिती देताना त्यांनी या संगमनेर उपविभागात देखील काही वेगळे प्रयोग करून गुन्हेगारीचा बिमोड…

Read More