Author: Annant Ppangarkar

मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये तुकाराम मुंढे यांना ‘कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पहा’ असे आदेश देण्यात आले असले तरी, त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली असल्याचे दैनिक सामनाने म्हटले आहे. तर शिर्डी संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली नागपूरला सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंढे यांची बदली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या उद्योगधंद्यावरुन पंतप्रधान मोदींना सुनावले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधीत केले, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रिज मधून खोके कोठे गेले… याचा आपण शोध घेणार असल्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे गटातील वाद थांबावयास तयार नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली होती. “बोक्यांना खोके हवे होते, म्हणून ते भाजपाला मिळाले”, तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या, तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला अंधारे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय त्यांनी शिंदे गटात नाराज आमदारांची संख्या वाढत असल्याने लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी थेट नावे घेत सांगितले की, “नाशिकमधील सुहास कांदे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरातमध्ये सरकार कोणाचे असेल हे येत्या ८ डिसेंबरला ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदान होत आहे. ८९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत करोडपती असलेल्या उमेदवारांचा भरणा सर्वाधिक आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष या वेळच्या निवडणुकीत उतरला असल्याने गुजरातची निवडणूक प्रामुख्याने भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन मोठ्या पक्षात होत आहे. सुरुवातीपासूनच चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हाती राहणार याची उत्सुकता असली तरी देखील ही निवडणूक सामान्य माणसाची राहिलेली नाही. निवडणुकीच्या पहिल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अक्षय (नाव बदललेले) तो आदिवासी समाजातील, साधारणपणे वय १९ वर्ष, त्याचे आई-वडिल मोठया बागायतदाराकडे १० ते १२ वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करायचे, तो ८ वीत गेल्यावर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण बंद झाले होते, मालकाचे घरी गोठ्यावर शेण-कुराचे काम करू लागला, सातत्याने त्याचा मालकाचे घराशी संपर्क येऊ लागला, मालकांचे घरात सर्वात मोठी तरुण मुलगी ती साधारणपणे साडेसतरा वर्षाची, घास कापणी आणि इतर गोठयावरील कामात तिचा आणि त्याचा संपर्क वाढला, वयाचे अंतर फार जास्त नसल्याने प्रेम वाढत गेले. मुलगी लग्नासाठी जास्तच दबाव आणत होती. सामाजिक दडपणामुळे त्याला ह्या सर्वांची भीती वाटत होती. दोघांत संबंध वाढल्याने मुलीने लग्न केले नाहीतर, आत्महत्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संगमनेरमधील वैशाली डावखरे, जिल्हा उपाध्यक्षपदी कल्पना काळे यांची व मंजू माचरेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष कौसर हुसेन शेख यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नांवाच्या घोषणा केली. संगमनेरमध्ये नवभारत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र फौडेशनच्या माध्यमातून हजारो नागरिकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले जाते. अहमदनगरच्या शासकीय विश्रामगृहात संघटनेची आढावा बैठक झाली. श्रीमती भारती मनसावले यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय हक्कासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. बैठकीसाठी संघटनेचे रमेश शिंदे, मझहर खान,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज माणसाने किती कोडगं असावं, हे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिकावं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली व्यक्ती राज्यपाल म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरते, असं म्हटलं जातं. मात्र तो राज्यपाल म्हणून स्वत:शी आणि त्या राज्याशी प्रामाणिक असायला हवा. त्याच्या डोक्यात राजकारण शिरलं तर राज्यपाल पदाची तो गरिमा घालवून बसतो. महाराष्ट्राच्या राज्यपालाने अशीच राज्याची लाज घालवली आहे. मुख्यमंत्री पद उपभोगूनही राज्यपाल म्हणून कोश्यारी महाराष्ट्रात प्रभाव पाडू शकले नाहीत. उलट राज्यपाल कसा नसावा, याचे धडेच त्यांनी देशाला दिले आहेत.  कोश्यारी हे महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहेत, हे तमाम महाराष्ट्रवासीयांचं दुर्देवं म्हटलं पाहिजे. कार्यरत माणसांकडून काहीबाही चुका होणं हे समजून घेण्यासारखं असतं.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विनाअनुदानित शिक्षकांसाठी तब्बल ११६० कोटींचा निधी जाहीर केला आहे. आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना तसेच शिक्षक बांधवांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेले हे खूप मोठे यश असल्याचे सांगत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शिक्षण मंत्र्यांचे आभार मानले आहे. तांबे म्हणाले, शिक्षकांच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर सर्व शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात सामील होत आमदार सुधीर तांबे यांनी सातत्याने विधिमंडळामध्ये शिक्षकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा चालू होता. तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. शिक्षक संघटनांसह आमच्या या सर्व पाठपुराव्याला, प्रयत्नांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर रोटरी क्लब आणि मुंबईच्या रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अपंग व्यक्तींसाठी यांत्रिक हात, जयपुर फुट, कॅलिपर्स, क्रचेस आदींचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संतोष करवा, उद्योजक आर. एम. कातोरे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे सहाय्यक प्रांतपाल गौरव भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात एकूण २४२ दिव्यांग व्यक्तींना हाथ, पाय, कुबड्या, कॅलीपरचे उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष करवा म्हणाले, संगमनेर रोटरी क्लब करीत असलेले काम कौतुकास्पद आहे ज्यामुळे दिव्यांग बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करता आला. कातोरे म्हणाले, सामाजिक उपक्रम राबविणार्‍या रोटरी क्लबचे कार्य देवत्वाची प्रचिती देणारे आहे. यावेळी त्यांनी रोटरीसाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सोलापूर मध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाईफेक करत घोषणाबाजी केली. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशा घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मला शरद पवार, उद्धव ठाकरे,अजित पवार यांची कीव येते. “त्यांना माझा संवाद होऊ द्यायचा नाही. आज संविधानाच्या दिवशी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तुझी प्रकृती खराब असल्यामुळे वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेत आहोत, असे कारण सांगत एका दहशतवाद्याला मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमधून बाहेर काढण्यात आले. आणि योग्य ती सुरक्षेचे सर्व प्रकारची काळजी घेत या दहशतवाद्याचा प्रवास पुण्याच्या येरवडा जेलच्या दिशेने सुरू झाला. केवळ दोन अधिकाऱ्यांशिवाय तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला याबाबत माहिती नव्हती की आपण कोणाला आणि कोठे घेऊन चाललो आहोत. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर सर्वांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी येरवडा जेलमध्ये कुख्यात दहशतवादी अजमल कसाब याला फाशी दिल्यानंतर पथकातील सर्वांना समजले की आपल्या सोबत कोणाला आणण्यात आले होते. 26/11 ला मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला अजूनही थरकाप उडवणारा अनुभव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मराठी नाटक, चित्रपटांसह हिंदी सिनेसृष्टीने आज एक ख्यातनाम अभिनेता गमावला आहे! पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेल्या विक्रम गोखले यांचे निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मराठी हिंदी चित्रपट सृष्टीवर अनेक दशक त्यांनी आपल्या अभिनयामुळे गाजवली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार जाणवत होते. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे चाहते बाळगून होते. शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये आश्वासक सुधारणा दिसून आल्या. ते डोळे उघडत होते, हात पाय हलवत होते. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघेल, त्यांचा रक्तदाब…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातलं नाही तरी छान दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. महिलांविषयी विकृत मानसिकता दाखवणाऱ्या रामदेव बाबांचा शिवसेना उपनेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध केला आहे. अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांच्या महिलांविषयीच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापले आहे. महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा रामदेव बाबा यांच्याकडून खुलासा मागविला जाणार आहे, त्या संदर्भात महिला आयोगाकडून नोटीस बजावली जाणार आहे. नेमके…

Read More

संविधान दिन म्हणजे काय? यापूर्वी हा दिवस साजरा केला जात नव्हता? संविधान दिन साजरा केलाच पाहिजे? संविधान सरनामा-प्रास्ताविका म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार का म्हटले जाते? २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिन’ का साजरा केला जातो? भारतीय संविधानाविषयी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशात भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारत देशावर इंग्रजांनी येथील संस्थानिक, राजे यांच्या मदतीने दीडशे वर्ष राज्य कारभार केला. स्वातंत्र्य लढयातील महापुरुषांनी आंदोलन, उपोषण, सविनय कायदेभंग या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महापुरूषांच्या बलिदान व त्यागामुळे सरतेशेवटी ब्रिटिशांनी भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेले भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये यशस्वी ठरली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांनी यात्रा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे एका पत्राद्वारे आभार मानले आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता उत्स्फूर्तपणे राबत १४ दिवसाच्या या कालखंडात सर्वांनी यात्रा यशस्वीतेसाठी मोठे सहकार्य केले. राहुलजींबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुलजी यांनीही त्या ऐकून घेतल्या. भारतयात्रींच्या आदरातिथ्यात आपण कुठेही कमी पडलो नाही. ही यात्रा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल, ढाबे, चायनीज गाड्यांसह सहा अवैध मद्य विक्रेत्यांसह पिणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. याशिवाय जिल्ह्यात अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री व मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर तसेच अवैधरित्या मद्य पिणाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशावरुन नगर जिल्ह्यात कारवाया सुरु करण्यात आल्या आहे. मद्य पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जागामालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात नगरच्या हॉटेल साहिबाच्या मालकास २५ हजार रुपयांचा दंड, तेथे मद्य पिणाऱ्या चार जणांना प्रत्येकी १…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील सहकारी साखर कारखान्यांसाठी अनुकरणीय व आदर्शवत ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने आत्तापर्यत उच्चांकी भावाची परंपरा जपली आहे. कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या या चालू हंगामाकरीता पहिली उचल २५०० रुपये प्रति टन जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू असून थोरात सहकारी साखर कारखान्याने शेतकरी, सभासद, व कामगारांचे हित जोपासताना कायम उच्चांकी भाव दिला आहे. मागील वर्षी सन २०२१-२०२२ या हंगामामध्ये १५ लाख ५३ हजार मेट्रीक टनाचे उच्चांकी गाळप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आणि राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या संगमनेर शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संपतराव विष्णू डोंगरे यांची तर उपाध्यक्षपदी सुनील कडलग यांची निवड झाली. संघाच्या अतिथीगृहामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या देखरेखीखाली व आमदार बाळासाहेब थोरात, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी डोंगरे यांच्या नांवाची सूचना दिलीप वर्पे यांनी मांडली. शिवाजी दिघे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी कडलग यांच्या नांवाची सूचना सचिन दिघे यांनी मांडली. त्यास तुकाराम कोठवळ यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक साहेबराव बारवे, दिलीप वर्पे, बाळकृष्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंचायत राज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देताना सहकार साहित्य, समाजकारण, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रोवला. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने यशवंत तीर्थ येथे चव्हाण यांच्या ३८ पुण्यतिथी अभिवादन समारंभात संगमनेरमध्ये थोरात बोलत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बी. एम. लोंढे, डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्राचार्य जे. बी. शेट्टी,…

Read More