Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोल्हार-घोटी मार्गावर वडगाव पान फाटा येथे मोटार सायकल आणि डंपरच्या झालेल्या अपघातात दोन मावस भावांचा डंपर खाली सापडून मृत्यू झाला. तर एक मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपावलीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तात्यासाहेब रोकडे (रा. दुर्गापूर ता. राहाता) आणि सुनील जालिंदर लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) असे मयत युवकांचे नाव आहे. तर कावेरी तात्यासाहेब रोकडे असे जखमी मुलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दिनांक २० ऑक्टोबर २२) सकाळी घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्लास्टिक बंदी आदेश धुडकावत या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक विक्री करणाऱ्या शहरातील विक्रेत्यांवर नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत तब्बल 45 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून 100 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. दरम्यान बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री न करण्याचे आवाहन प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विक्रेत्यांना केले आहे. प्लास्टिक बंदी आदेशाची शहरातील विक्रेत्यांकडून पायमल्ली सुरू होती बंदी असलेले प्लास्टिक पिशव्यांची सर्रासपणे विक्री केली जात असल्याने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या नगर परिषदेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने शहराच्या विविध भागात दोन दिवस ही कारवाई केली. दरम्यान काही प्लास्टिक विक्रेत्यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनते व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दीपावलीनिमित्त दूध फरक, दुध पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट व अनामत, कामगारांचा बोनस आणि पगारापोटी ३३ कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. सरासरी ३५ रुपये भाव, दूध संघाचे रिबेट व स्थानिक संस्थांचे रिबेट म्हणून दूध उत्पादकास सर्वाधिक भाव राजहंस दूध संघाकडून मिळत असतो. १६ ऑक्टोबर २०२२ पासून एक…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मताधिक्याने विजय झाला असून त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल आणि धर्मांध हुकुमशाही शक्तींना पराभूत करेल, असे काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी खरगे यांचे अभिनंदन करत ही प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात म्हणाले, नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना 50 वर्षांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असून या कारकीर्दीत त्यांनी पक्ष संघटना व सरकारमधील विविध पदांवर काम पाहिले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन सह मोठ्या प्रमाणात सर्वच पिके वाया गेली आहेत. शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या कार्यालयाबाहेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या सरकार विरोधी घोषणांनी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना दिले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे मल्लिकार्जुन खरगे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरूर यांचा पराभव केला. खरगे यांना 7897 तर थरूर यांना एक हजारावर मते मिळाली असल्याची माहिती आहे. मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होईल, असा विश्वास निवडणुकीपूर्वीच व्यक्त केला जात होता. खरगे हे काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्ती मानले जातात. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार खरगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला होता. 80 वर्षे वयाचे खरगे हे कर्नाटकातील आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेल्या 24 वर्षात प्रथमताच निवडणूक झाली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मध्यरात्री हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सतर्कता म्हणून जाधव यांच्या घरी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जाधव यांच्या चिपळूण (रत्नागिरी) येथील निवासस्थानासमोर दगड, क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी जाधव यांच्या निवासस्थानी धाव घेत गर्दी करण्यास सुरुवात केली. कुडाळ मध्ये मंगळवारी वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये जाधव सहभागी झाले होते. त्यानंतर रात्रीच ते मुंबईला रवाना देखील झाले होते. मात्र आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी दगड क्रिकेटचे स्टंप आणि काचेच्या बाटल्या…
पालकमंत्र्यांची परवानगी असेल तरच कार्यक्रम घ्या, नाहीतर कार्यक्रम नकोत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्ह्यातील कोणताही शासकीय अथवा समारंभ असेल त्या कार्यक्रमास, शासकीय निधीतून होणारी कामांची भूमिपुजने, उद्घाटने यांचे आयोजन करण्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. अशा कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रमांचे आयोजन केल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे, अशा आशयाचे आदेश नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. शासकीय कामांचे श्रेय घेण्याचे प्रकार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जिल्ह्यात सातत्याने सुरु असतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील केले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विखे पाटलांकडे वजनदार महसूल खात्याची जबाबदारी आली आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर पद्मशाली समाज मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण इटप यांची पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् चे अध्यक्ष महेश कोठे तसेच सरचिटणीस गणेश पेनगोंडा यांनी दिले आहे. संगमनेरात पद्मशाली समाजात अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी केलेल्या कामाची दखल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम् ने घेत त्यांना ही मोठी जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले. समाजाची उन्नती व प्रगतीसाठी भविष्यात संघाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भूमिकेतून नारायण इटप यांनी नेहमीच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडून काढून त्यांची चौकशी करण्याची तसेच या गुन्ह्यात आणखी दोघा आरोपींची नांवे समाविष्ठ करण्याची मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष अमर कतारी व फिर्यादी जतीन बत्रा यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात शहरातील नामांकित वकील व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपूले यांच्यावरदेखील कतारी व बत्रा यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने या गुन्ह्याने वेगळे वळण घेतले आहे. शेखर याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना शहराध्यक्ष कतारी व भाजपचे शहराध्यक्ष गणपूले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशात सहकार मंत्रालय स्थापन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सहकारी साखर कारखानदारीबद्दल अनेक मोठे निर्णय घेत आहेत. तर सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम होत आहे. आपल्या कारखान्याने संघर्षाचे दिवस बघीतले, आता चांगले दिवस आपण बघत आहोत. आपल्या सर्वांच्या पाठबळाने नामदार विखे पाटील मोठ्या मंत्रीपदावर पोहोचले याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत विखे पाटील सर्वांच्या पूढे असेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या गळीताची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याचे माजी अध्यक्ष भास्करराव खर्डे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमधून 23 गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारी पिकअप चालकास मारहाण करून पेटवून देण्याची घटना नगर तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. यासंदर्भात जावेद पठाण याच्या तक्रारीवरून नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद मुसा पठाण (वय 28 वर्ष रा. ममदापूर ता. राहता) हे आपल्या पिकअपमध्ये संगमनेर येथून 23 लहानमोठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असताना नगरच्या शेंडीजवळ ही घटना घडली असल्याचे सांगितले जाते. शेंडी बायपासवर या पिकअप गाडीचा काही लोकांनी पाठलाग सुरू केला होता. ही बाब पिकअप चालक पठाण यांच्या लक्षात आली असता या दरम्यान चालकाचा पिकअपवरील ताबा सुटून पिकअप पलटी झाली. त्यानंतर शेंडी बायपासवरील बर्डे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क समृद्ध सहकाराचा वारसा लाभलेल्या संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोस्टाच्या टपाल पाकिटावर सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांची छबी आणि सहकारातील अग्रेसर राजहंस दुधची लोगोसह माहिती झळकली आहे. या टपाल पाकिटाचे लोकार्पण राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय डाक विभागातर्फे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अंतर्गत राजहंस दूध या विशेष टपाल पाकिटाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष टपाल पाकिटाचे विमोचन डाक अधीक्षक हेमंत खडकीकर आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्या पाठोपाठ थोरात यांनी या पाकिटाचे एका कार्यक्रमात लोकार्पण केले. यावेळी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखाना चालविणे येड्या गबाळ्याचे काम नाही. कारखान्याने एखादे कर्ज पाच-सात वर्षात फेडणे अपेक्षित आहे. मात्र आख्खी पिढी गेली तरी कारखान्याच्या कर्जाचा बोजा कायम आहे. ऋण काढून सण साजरा करण्यासारखं कर्ज काढून भाव द्यायचा नसतो, असे सहकाराचे धडे देत जर संचालक मंडळाने माझ्या सूचना अमलात आणल्या नाही तर येथेच सभा घेऊन या संचालक मंडळाला निवडून दिल्याची चूक केल्याचे जाहीररित्या सांगेल, अशा कानपिचक्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या संचालक मंडळाला दिल्या. अकोलेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडल्यानंतर 29 व्या ऊस गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे चार भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर बर्डे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. १७ ऑक्टोंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील अकलापुरमध्ये जाऊन या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तात्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे तुटून पाण्यात पडलेल्या विज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारे देखील सामान्य व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार येथील श्री सिद्धिविनायक कार्पोरेशनतर्फे आयोजित सुतारांसाठीच्या कौशल्य निर्मिती ‘संवाद ‘ प्रशिक्षण कार्यशाळेत सुतारांनी आर्थिक नियोजनाचे धडे गिरविले. ‘भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य गुंतवणूकदारांचे संपत्ति निर्माण’ या विषयावर कडलग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायकचे संचालक संदीप चोथवे तर अतिथी म्हणून ग्रीन प्लाईचे व्यवस्थापक राहुल साहू, मेरीनो लैमिनेट्सचे शाखा व्यवस्थापक जितेन्द्र पाटील, यूनिकोलचे नायर उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगणक विषयक सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांच्या कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ संगमनेर या संस्थेच्या अध्यक्षपदी मोहित मंडलिक, उपाध्यक्षपदी चेतन कोतुळकर तर संस्थेच्या सेक्रेटरीपदी संदीप जोंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संगमनेर शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. शहरात सुमारे ६० पेक्षा जास्त व्यावसायिक या उद्योगात आहेत. ग्राहकांना योग्य दरात जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याची या बैठकीत चर्चा झाली. बैठकीमध्ये ऑनलाइन मार्केटमुळे बाजारात निर्माण झालेली स्पर्धा तसेच ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या आवडींविषयी यावर उपाध्यक्ष कोतुळकर यांनी चर्चा केली. तसेच संबंधित व्यावसायिकांनी या संस्थेचे सभासद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुप्रसिध्द चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची मुंबई येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालकपदी निवड झाली आहे. कवी बाबासाहेब सौदागर हे २५ वर्षांपासून मराठी चित्रपट क्षेत्रात गीतकार पटकथा संवाद लेखक म्हणून कार्यरत आहेत. यशवंत भालकर यांच्या ‘सत्ताधीश’ चित्रपटात त्यांनी पहीला अभंग लिहीला. हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते. या चित्रपटात भजनी मंडळ प्रमुखांच्या भुमिकेपासून त्यांनी अभिनयासाठी सुरुवात केली. यानंतर त्यांनी गीतलेखन क्षेत्रात पंचविस वर्षांत अनेक चित्रपटात गीत लेखनासोबत पटकथा संवाद लेखन आणि अभिनय केला. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘अंतर्दाह’ चित्रपटातील गीत लेखनासाठी भारत सरकारच्या सह्याद्री वाहिनी मुंबई दुरदर्शनचा देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची सहकार क्षेत्रात लौकिकास्पद वाटचाल सुरू आहे. गतवर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप करत चांगला भाव दिला होता. यावर्षी देखील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे ऊस उत्पादक व कामगारांसाठीचे 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये येथून ‘ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं’ अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना…
