Author: अनंत पांगारकर
मंगळवार, १५ ऑक्टोंबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. २३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू…
मंगळवार, १५ ऑक्टोबर संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले…
मंगळवार, १६ ऑक्टोबर संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली. विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी…
मंगळवार, १५ ऑक्टोंबर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नावे निश्चित झाली असून मंगळवारी दुपारी बारा वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास उरले असतानाच या सात जणांना आमदारकीची संधी मिळाली आहे. राज्यपाल नियुक्त सात सदस्यात महायुतीचा ३-२-२ असा फॉर्मुला वापरण्यात आला असून यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांमध्ये श्रीमती चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील व धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचा समावेश…
असा असेल तुमचा आजचा दिवस मंगळवार, दि. १५ ऑक्टोंबर मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरेल. नोकरीत दिवस नॉर्मल जाईल. वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येतील, मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. मिथुन – आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल. संतती सौख्य मिळेल. कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल.…
सोमवार, १४ ऑक्टोबर अहिल्यानगर – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सोमवारी बैठक पार पडली असून या बैठकीत ऊर्जा मित्र बैठक पूर्ववत सुरू करणे, अवैध गुटखा विक्री, स्वयंपाक गॅस वितरणातील गैरप्रकार, सेतू कार्यालयातील अवैध सेवाशुल्क, भेसळयुक्त मिठाईची विक्री, एसटी थांबा आदी विषयावर चर्चा झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव हेमा बडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुराडे, विलास जगदाळे, शाहूराव औटी, अमित कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, उमा म्हेत्रे, बाबासाहेब भालेराव, डॉ. राजेंद्र कळमकर, विलास सोनवणे, सुनिल दळवी, डॉ. गोरख बारहाते व प्रकाश रासकर आदी उपस्थित होते.…
सोमवार, १४ ऑक्टोबर मुंबई – शिवसेना (ऊबाठा) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६४ वर्षीय ठाकरे यांना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास गिरगाव येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंच्या हृदयात ब्लॉकेज आढळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. तथापि, शिवसेनेच्या (ऊबाठा) सूत्रांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागील आरोग्य समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.…
सोमवार, १४ ऑक्टोंबर विधानसभा निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठका घेत धडाका लावला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत येणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत दगाफटका करून सत्ता बळकवली तेव्हा शहाणपण का सुचले नाही? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे पडक्या भिंतीला पुट्टी लावण्याचा प्रकार म्हणावा लागेल, अशा शब्दात या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. पक्षाने म्हटले आहे, मुंबईतील टोल माफी बंद होणे हे सामान्यांसाठी स्वागतार्ह आहे. टोल घेतले जातात ते रस्त्याच्या डागडूजीसाठी, मात्र अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून…
सोमवार, १४ ऑक्टोबर मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तास बाकी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर या टोल नाक्यांवर ही माफी देण्यात आली आहे. यामुळे राज्यभरातून येणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना या पाचही टोल नाक्यांवर संपूर्ण टोलमाफी मिळणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला…
बाळासाहेब थोरातांची शिर्डी विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी, महाविकास आघाडीची ताकद वाढली सोमवार, १४ ऑक्टोबर संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मालुंजे या गावातील जनसेवा मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ सोडत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप व विखे गटाला मोठे खिंडार पाडण्यात थोरात यशस्वी झाले आहे. अमृतवाहिनी सहकारी बँक येथे मालुंजे येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे, मार्केट कमिटीचे संचालक संजय खरात, युवक…
