Author: अनंत पांगारकर
गुरुवार, २७ जून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारी (२७ जून) मुंबईमध्ये प्रारंभ झाला. १२ जुलै पर्यंत अधिवेशन चालणार आहे. अधिवेशना दरम्यान उद्या शुक्रवारी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. गुरुवारी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभा कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाकडून दोघांची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकाची, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एकाची व काँग्रेसकडून एका आमदाराची निवड यासाठी करण्यात आली आहे. यात अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा समावेश आहे. असे आहेत तालिका अध्यक्ष … कालिदास कोळंबकर…
गुरुवार, २७ जून भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना बुधवारी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री १०.३० वाजता त्यांना एम्समध्ये आणण्यात आले. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात ठेवण्यात आले असून त्यांना यूरोलॉजीशी संबंधित समस्या असल्याने युरोलॉजीचे अमलेश सेठ त्यांच्यावर उपचार करत आहेत. एम्सने आपल्या जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षी भारत सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. ते देशाचे उपपंतप्रधानही राहिले आहेत. अडवाणी १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते सामील झाले. स्वातंत्र्यानंतर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून अडवाणींनी…
बुधवार, २६ जून स्कूलबसच्या धडकेत दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी नाशिक शहरातील सिडको परिसरात त्रिमूर्ती चौकात घडली. मयूर दत्ता गुंजाळ (वय १८ वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अंबड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर दत्ता गुंजाळ हा त्याच्याकडील इलेक्ट्रिक दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सिटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडाजवळ एका स्कूल बसने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मयूरला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सदर अपघाताची माहिती तात्काळ अंबड पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघात स्थळाची पाहणी केली. यानंतर याप्रकरणी…
बुधवार, २६ जून शेतकऱ्यांचे फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात कृषी केंद्रांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे बोलले जाते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने पेरणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर नजर ठेवली जात असून या सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. बाजारपेठेत कपाशी, सोयाबीनसह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे.…
बुधवार 25 जून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. या मतदारसंघात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. या मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानात सुरुवात झाली असून नऊ वाजेपर्यंत ची पहिल्या दोन तासाची टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. बघा कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले…
बुधवार, २६ जून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाचे बिल स्वाक्षरी करून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी दहा टक्के प्रमाणे लाच मागणाऱ्या मेडिकल ऑफिसर विरुद्ध लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. डॉ. अंबर श्रीराम मडावी (वय ४४ वर्ष) असे लाचखोर मेडिकल ऑफिसरचे नाव असून त्याची नेमणूक वैद्यकीय अधिकारी म्हणून बाराभाटीच्या आयुर्वेदिक दवाखान्यात आहे. याशिवाय त्याच्याकडे महागाव तालुका अर्जुनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार हे प्राथमीक आरोग्य केंद्र महागाव येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्या वेतन निश्चिती, नक्षलभत्ता, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीच्या फरकाचे ६ लाख ७ हजार ३२० रुपये…
बुधवार, २६ जून पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत. पुणे शहरात अमली पदार्थ विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश दिले. पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी. यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
मंगळवार, २५ जून शेतकरी, नागरिकांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाच्या प्रधान…
मंगळवार, २५ जून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून २७ जून मुंबईत सुरू होत असून अधिवेशन १२ जुलैपर्यंत चालणार आहे. यादरम्यान राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पदेखील अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (२८ जून) दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे…
दूधगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे सिव्हिल रुग्णालयात करतोय आराम! ठेवीदार आक्रमक, चौकशीची मागणी मंगळवार, २५ जून दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे ८१ कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवीला चुना लावत आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी, राजकीय आसामी असलेला भाऊसाहेब कुटे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात आराम करत असल्याचे समोर आले आहे. आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी संगमनेरातील त्या बहुचर्चित डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून कुटेच्या पाहुणचारासाठी तालुकास्तरावरील वैद्यकीय यंत्रणेपाठोपाठ आता जिल्हास्तरावरील यंत्रणा सरसावली असल्याचा आरोप होत आहे. दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण आरोपी बडी राजकीय असामी असल्याने सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तब्बल नऊ महिने मुख्य आरोपीला न्यायालयाने…
