Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी उन्हाची वाढती तीव्रता व लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेली टंचाई विचारात घेऊन, भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या संगमनेर, राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील बहुतांश गावांत पाण्याची टंचाई भासू लागली आहे. गावपातळीवरील पाण्याचे स्रोत कमी पडल्याने तसेच नदीकाठच्या गावांत पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामपंचायतींसह नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रातही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची गरज लक्षात घेऊन धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. आवर्तन सुरू करताना शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच पाण्याचा अपव्यय होणार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर मधील सोनांबेकर रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांवर रुग्णाच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने हॉस्पिटलने ओपन स्पेस मध्ये केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे यांच्याकडे केल्यानंतर पालिका प्रशासनाने लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान ओपन स्पेसमध्ये हॉस्पिटल प्रशासनाने टाकलेली भिंत आणि एका खोलीचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पालिकेच्या पथकाने काढून टाकले आहे. सकाळी केलेल्या या कारवाईमुळे आता धन दांडग्यांच्या अतिक्रमणावर पालिकेचा जेसीबी पडला आहे. त्यामुळे सरकारी जागा बळकवण्याचा रुग्णालय प्रशासनाचा इरादा ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागणीनंतर प्रशासनाने हाणून पाडला आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस सोनांबेकर हॉस्पिटलमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी माजी महापौर अभिषेक कळमकर विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमकर विरुद्धचा हा दुसरा गुन्हा असल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित तरुणीची ओळख आरोपीशी झाली होती. पीडितेने ती बेरोजगार असल्याचे सांगितल्यानंतर कळमकरने तिला नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधून तिला नगर क्लबजवळील एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे कारमध्ये तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची भक्कम सत्ता असताना आणि तालुक्यात महायुतीचे आमदार कार्यरत असतानाही, संगमनेरमध्ये पक्षाची झालेली दयनीय अवस्था सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. “महाराष्ट्र संवाद न्यूज”ने या दुर्दैवी स्थितीवर आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या संकटावर प्रकाश टाकल्यानंतर, आता भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर पक्षातील दोन्ही गट एकमेकांवर थेट पत्रकबाजी करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण अधिकच तापले आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात वर्चस्व राखणारा हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले असून, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होत असल्याचे चित्र निर्माण झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर येथील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या गंभीर हलगर्जीपणामुळे दत्तात्रय दळवी या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील दोन्ही दोषी डॉक्टरांवर न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी, रुग्णालय सील करावे, अशी आक्रमक मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. संगमनेर पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांची कृती संशयास्पद ठरल्याने या गुन्ह्याची माहिती समोर येण्यास तब्बल आठ दिवसांचा कालावधी लागला असून यादरम्यान आरोपी पसार झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | नाशिक भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता एसआयटीच्या प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी दोन पोलीस उपअधीक्षक आणि तीन सहाय्यक पोलीस उप-निरीक्षकांसह एकूण चोवीस जणांचे विशेष पथक कार्यरत आहे. एसआयटीकडे या प्रकरणातील अकरा गुन्ह्यांचा तपास सोपवण्यात आला असून, त्यामध्ये अशोक खरातवर दाखल असलेल्या नऊ गुन्ह्यांचा आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोन गुन्ह्यांचा समावेश आहे. एकूण अकरा गुन्ह्यांच्या तपासामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आठ प्रकरणांची नोंद झाली असून, उरलेली तीन प्रकरणे ही फसवणूक आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याशी संबंधित आहेत. आरोपीच्या…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संगमनेरमधील ‘दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था आणि भ्रष्ट पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ठेवीदारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या पतसंस्थेची आणि गैरव्यवहारात सामील असलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अरुण उंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, संस्थेचे अध्यक्ष, प्रवर्तक, भागीदार, संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि आणखी काही लोकांच्या मालकीच्या ४४ स्थावर मालमत्तांवर कब्जेदार सदरी “महाराष्ट्र शासन” नाव लावण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या पतसंस्थेची संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या लोकांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवीदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पतसंस्थेच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर शहरात उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे आणि डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्यावर मृत रुग्णाच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रुग्णाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार, त्यांचे पती दत्तात्रय दळवी यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना १ मार्च २०२५ रोजी संगमनेर शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉ. अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन टाकण्याचा सल्ला दिला, याला रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने संमती दिली होती. मात्र, स्टेन टाकल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी हाताला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर शहरातील प्रभागांकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून ४७ सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी १४ हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून, या दिव्यांचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जनतानगरमधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाउसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संगमनेर विधानसभा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या या सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध होऊन आपल्या सहजीवनाचा श्रीगणेशा करणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून लग्नावरील होणारी उधळपट्टी टाळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला जात असून, या उपक्रमाची २९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे. विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गरजवंत किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनीही ‘मालपाणी पॅटर्न’ला पसंती दिली आहे. १९९७ मध्ये स्वर्गीय ओंकारनाथजी आणि स्वर्गीय माधवलालजी…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावलं जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, मुंबई/नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यानंतर, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यात तंत्र-मंत्र आणि अंगारे-धुपारे करून महिला व सामान्य नागरिकांचे शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सिन्नर येथील अशोक खरात याच्या कृत्यामुळे अनेक नागरिक शोषणाचे बळी ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूबाबाच्या कारस्थानात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह राज्यातील ३९ आमदार, विविध मंत्री, अधिकारी आणि अनेक राजकीय कार्यकर्ते एकतर सहभागी आहेत किंवा त्या अंधश्रद्धेचे बळी ठरले आहेत. संविधानिक पदांवर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संगमनेर नगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘रक्षक दल’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे संकेत मंत्री तटकरे यांनी दिले आहेत. या भेटीच्या वेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या. दुर्गा तांबे यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. चर्चेदरम्यान आदिती तटकरे यांनी संगमनेरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | आळेफाटा शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन धांदरफळ (ता. संगमनेर) येथे परतत असताना वाटेत नियोजनावरून वाद झाल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सुरेश खुरपे (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते धांदरफळ येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज खुरपे व त्यांच्या गावातील अंदाजे ७० लोक दिंडीनिमित्त शिखर शिंगणापूरला गेले होते. ३० मार्च रोजी ते सर्वजण पायी गावाकडे निघाले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हे लोक आळे रोडने जात असताना चार मोटारसायकलवरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला.  या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे अत्यंत आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव घुले येथील ग्रामस्थांना दिला. सावरगाव घुले येथे आयोजित खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून महाआरती केली. या कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश यापूर्वीच व्हायला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या निंदनीय घटनेतील पीडितेच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून, तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस विशेष उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून तिची उत्तम काळजी घेतली जात असून, विशेष समुपदेशकाद्वारे तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे समुपदेशन…

Read More

आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याच्या, राज्यातील जनतेच्या हिताचा जराही विचार न करता मनाला वाटेल तशा योजना जाहीर करणार्‍या सत्ताधार्‍यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा पुरता दोलायमान बनला आहे. करदात्यांच्या कष्टाच्या रक्कमेची ही लूट ज्यांनी केली ती त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे. या योजना जाहीर करताना राज्याचं काय होईल, इतकाही विचार त्यांनी केला नाही. केवळ सत्ता मिळावी, इतक्या कुटील हेतूने जाहीर झालेल्या योजनांनी महाराष्ट्राला बेजार केलंच पण राज्य जगावं म्हणून जे आपल्या खिशाला ताण देतात त्यांनाही जगणं मुष्कील करून टाकलं आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेने जनतेच्या सुमारे 21 हजार कोटी इतक्या रक्कमेला चुना लावल्याचं नुकतंच उघड झालंय. सुधारलेल्या महाराष्ट्राने देशाला लूट करण्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विशेष दौऱ्यावर येत आहेत. मंत्री तटकरे यांनी आपला नियोजित विदर्भ दौरा रद्द करून रविवारी थेट लोणी (ता. राहाता) येथील रुग्णालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या भेटीला प्राधान्य मंत्री तटकरे आज शनिवारी या पिडीत मुलीची व मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांचा शनिवारचा दौरा अचानक रद्द झाला होता. संगमनेरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि पीडित मुलीला मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी तातडीने आपला दौरा बदलला आहे. पीडित मुलगी सध्या लोणी येथील हॉस्पिटलमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, ​नाशिक नाशिकमधील सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेत एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा समोर आला असून, त्याने गेल्या दोन दशकांपासून अनेक गरीब महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ​रवींद्र एरंडे (वय ६३) असे या संशयित पत्रकाराचे नाव असून, तो एका साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहे. एरंडे हा सातपूर भागातील कामगारनगर आणि श्रमिकनगरमध्ये लघू उद्योगांसाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असे. लघू उद्योग सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्याने सन २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या काळात अनेक गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. या महिलांच्या हतबलतेचा…

Read More