Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला. अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा…
महाराष्ट्र संवाद न्यूज वाळू लिलावासाठी शासनाच्या नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळूचे डेपो उभे करून ऑनलाईन पद्धतीने वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वाळूचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महसूल यंत्रणेच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत मंत्री विखे बोलत होते. त्यांनी जनावरांच्या लम्पी स्किन संदर्भात देखील आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नंदूरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी महेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण…
महाराष्ट्र संवाद न्यूज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अनुवादित ‘सिटीझनविल’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 डिसेंबरला साडेतीन वाजता मुंबईमध्ये होत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ‘सिटीझनविल’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. प्रकाशनापूर्वीच तांबे यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी शहरांचा विकास नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेच झालंय, किंबहुना ती काळाची गरजच बनली. ही नियोजनबद्धता आणण्यासाठी हवा असतो एक वेगळा दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न.…
महाराष्ट्र संवाद न्यूज टपाल विभागाच्या दीनदयाळ स्पर्श शिष्यवृत्ती योजनेत राज्य पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर विभागातील दहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे निवडले गेलेले सर्व विद्यार्थी संगमनेर मधील विविध शाळांचे आहेत, अशी माहिती श्रीरामपूर डाक अधीक्षक हेमंत खडकेकर व संगमनेरच्या मुख्य डाकघर येथील विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नक्ष चंद्रकांत खामकर (इयत्ता सहावी), स्वामिनी संदीप चव्हाण (इयत्ता सातवी), प्रज्योत प्रदीप शेळके (इयत्ता नववी), मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालयातील श्रद्धा विलास ताजने (इयत्ता आठवी), सुमित महेश देशमुख (इयत्ता आठवी), तनिष्क संतोष दिवे (इयत्ता नववी), अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधून समरजीत विश्वास वाघ (इयत्ता सातवी), दिव्याल…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभरात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंचपदासह सदस्य निवडीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना इच्छुक उमेदवारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे वारंवार वेबसाईट मध्ये खंडितपणा येत असल्याची दखल आयोगाने घेतली असून पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षक, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोगाने (दि. ०९/११/२०२२) च्या आदेशान्वये राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केलेला असून या…
महाराष्ट्र संवाद न्यूज हळूहळू सगळेच राज्य समान नागरी कायदा लागू करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील यासाठी योग्य वेळी विचार करू, असं सूचक विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी बाबत व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस गुजरातमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, उत्तराखंडमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात येणार आहे. हिमाचल आणि गुजरात देखील करणार आहे. मला वाटतं हळूहळू सगळेच राज्य हे करणार आहेत. मात्र आज मी याबद्दल अधिकृत घोषणा करू शकत नाही. कारण अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो, असेदेखील ते म्हणाले. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे अधिकार दिले…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडीमध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये बनावट मद्य निर्मितीचा कारखाना आढळून आला होता. राज्यात प्रतिबंधित असलेली दारू नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे वितरण केले जात असल्याचे समोर आल्यानंतर संगमनेर आणि अकोल्यातील परमिट रूमवर कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सील केलेले हे परमिट रूम पुन्हा चालू झाल्याने दारूबंदी समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. रायतेवाडी येथील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून एका घरावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बंदी असलेले गोवा आणि दमण येथील दारू आढळून आली होती. घरगुती पद्धतीने नामांकित कंपन्यांच्या बॉटलमध्ये या दारूचे रिफिलिंग केले जात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नगर जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 13 डिसेंबर पर्यंत हे जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेत हे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या-लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का…
महाराष्ट्र संवाद न्यूज रस्त्यातील खड्ड्यांपाठोपाठ आता भाजपने क्रीडा संकुलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी दिली. जहागिरदार म्हणाले, संगमनेर नगरपालिकेत ३० वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. त्यावेळी मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने सुमारे पाच एकर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल ही शासकीय मालमत्ता आहे.…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हितकारक असलेल्या या प्रकल्पाच्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज आणि गौण खनिज या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अधीक्षक अभियंता अरुण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतात सध्या महापुरुषांचे विभाजन सुरू आहे. संबंध मानव जातीसाठी जात, धर्म, प्रांताच्या पुढे जाऊन ज्या महामानवांनी काम केलं त्यांना एका चौकटीत बसवू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अर्शद शेख यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अब्दुल्ला हसन चौधरी, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, कारभारी देव्हारे, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, जावेद युनूस शेख, मुजाहिद पठाण, जाविद शब्बीर शेख, माजी गटविकास अधिकारी बी. डी. पारखे आदी उपस्थित होते. शेख म्हणाले, जोपर्यंत शिक्षण माणसाला माणूस बनवत…
अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या २७ शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपकरणाने यश मिळविले आहे. या उपकरणाची विभागीय पातळीवर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती अकोले आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे उद्योजक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी, पारंपारिक ऊर्जा, पाणीबचत, फॅशन, खाद्यपदार्थ, यांत्रिक मॉडेल्स यावर आधारित जवळपास ७०…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात दुसऱ्या महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्या प्रकरणी एका 38 वर्षीय महिला आरोपीला मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरविले आहे. त्याशिवाय विनयभंग प्रकरणी एखादी महिलाही दोषी ठरू शकते असे स्पष्ट करत त्या महिलेला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एक वर्ष कारवासाच्या शिक्षेसह या महिलेला सहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार महिला दोघीही एकमेका शेजारी राहत असून या महिलांच्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद आणि भांडण होत असे. दोन वर्षांपूर्वी आपसात झालेल्या भांडणांमध्ये आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली. त्यानंतर चप्पलने तिला मारहाण केली.…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये तुकाराम मुंढे यांना ‘कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पहा’ असे आदेश देण्यात आले असले तरी, त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली असल्याचे दैनिक सामनाने म्हटले आहे. तर शिर्डी संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली नागपूरला सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंढे यांची बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या उद्योगधंद्यावरुन पंतप्रधान मोदींना सुनावले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधीत केले, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रिज मधून खोके कोठे गेले… याचा आपण शोध घेणार असल्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे गटातील वाद थांबावयास तयार नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली होती. “बोक्यांना खोके हवे होते, म्हणून ते भाजपाला मिळाले”, तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या, तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत…
महाराष्ट्र संवाद न्यूज “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला अंधारे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय त्यांनी शिंदे गटात नाराज आमदारांची संख्या वाढत असल्याने लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी थेट नावे घेत सांगितले की, “नाशिकमधील सुहास कांदे…
