Author: Annant Ppangarkar

संगमनेर –  नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील कामे मार्गी लागणार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांना तात्काळ मंजुरी देत, संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे, रामभाऊ राहाणे आणि अंकुश राहाणे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील अपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोणी येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आले असता, त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला…

Read More

सिन्नर, नाशिक:  मान्सूनच्या आगमनासोबतच नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून, सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. पावसामुळे राज्यात सर्वोत्कृष्ट व हायटेक गणल्या जात असलेल्या सिन्नरच्या अद्ययावत बसस्थानकाचा काही भाग तुफानी पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एक शिवशाही बस आणि काही इतर वाहने ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसस्थानकातील दुर्घटनेने खळबळ… आज राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, या पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नर बसस्थानकाला बसला आहे. सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण…

Read More

संगमनेर –  अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ जूनपर्यंत शहरातील सिग्नल पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. शनिवारी (२४ मे रोजी) अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित होते. या निमित्ताने घार्गे यांनी…

Read More

अहिल्यानगर, दि. २५ मे:  राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (रविवारी) अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, डॉ. सामंत यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली. डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या आई-वडिलांकडे ही मदत देण्यात आली. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर आणि ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान, डॉ. उदय सामंत यांनी गायकर…

Read More

शिर्डी:  शिर्डीतून चोरी झालेल्या २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रुपये किमतीचे, २ किलो ६८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे. गुजरात राज्यातील बनासकाटा येथील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५) हे होलसेल सोन्याचा व्यवसाय करतात. १३ मे २०२५ रोजी ते आपला ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान) याच्यासोबत शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी होते. याच रात्री ड्रायव्हरने ३ कोटी २६ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले.…

Read More

सत्ता असली म्हणजे आपण काहीही करायला मोकळं, अशी स्वत:ची समज करून घेणार्‍या भाजपच्या नेत्यांना मनाची तर नाहीच, पण आता जनाचीही काही वाटत नाही, असंच दिसू लागलंय. आपल्याच मुख्यमंत्र्याच्या पत्नीला कधी देवरच्याही सोबत चला, असं सांगणारा माणूस एका राज्याचा मंत्री बनू शकतो, इतकी तर्‍हेवाईक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे. देवर बनू पाहणार्‍या या माणसाच्या लाथ हाणून त्याला शिवराजसिंह चौहाण यांनी आपल्या मंत्रिमंडळातून दूर केलं. पण चार महिन्यातच हा माणूस पुन्हा चौहाण यांच्या मंत्रिमंडळात दाखल झाला. यावरून त्याचे दिल्लीपर्यंत पोहोचलेले हात काय ते सांगून जातात. एकदा आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतीगृहाला भेट देताना या माणसाने विद्यार्थीनीच्या टीशर्टवर फाजील वक्तव्यं केलं होतं. तेव्हाही मध्यप्रदेशात…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्णत्वास गेलं आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर, त्यांच्याच कार्यकाळात साकार झालेल्या निळवंडे धरणाचं पाणी कालव्यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील चिंचोलीगुरव गावात दाखल झालं आहे. यामुळे चिंचोलीच्या नागरिकांनी प्रचंड जल्लोष करत आनंद व्यक्त केला असून, थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण… तळेगाव पट्ट्यासह संपूर्ण दुष्काळी भागासाठी वरदान ठरलं आहे. या धरण आणि कालव्यांचं काम पूर्ण करणं हा थोरात यांच्या जीवनाचा ध्यास होता. त्यांनी केवळ धरणच नाही तर त्याचे कालवेही पूर्णत्वास नेले. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी शेंडेवाडी, साकूर आणि पिंपळगाव देपा येथील कारवाईत अटक करण्यात आलेले ॲट्रॉसिटी, बालमजूर कायदा आणि वेठबिगार कामगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुभाष राठोड आणि मधुकर दळवी यांना संगमनेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हृषीकेश वाणी यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. फिर्याद दाखल करण्यास तब्बल १० वर्षांचा उशीर झाला असून, फिर्यादीत नमूद केलेले गुन्हे आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून, त्यांना या प्रकरणात फसवण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ॲड. हृषीकेश वाणी यांच्यासोबत ॲड. प्रशांत…

Read More

संगमनेर, दि. २४ मे जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहीद गायकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत असलेले संदीप गायकर यांना २२ मे रोजी तिसवाड सेक्टर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या पथकांनी हवेत…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (२२ मे) दुपारी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. सध्या काही अडचणींचा सामना करत असले तरी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेची त्यांनी प्रशंसा केली. या रुग्णालयाची स्थापना आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात झाली असल्याने ही वास्तू आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही तांबे यांनी सांगितले. रुग्णालयाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर आमदार तांबे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद बांबळे आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणींचा आढावा घेतला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांच्या विरोधात लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी त्यांनी ७०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय व्यक्तीने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अहमदनगर येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या भावाने चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गु.र.क्र. ५६९/२४, भा.द.वी. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी, सहायक पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी त्यांच्याकडे ७०,००० रुपयांची मागणी केली होती. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ९…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार होणारे व्होल्टेजचे चढ-उतार आणि विजेचे झटके यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या संगमनेरच्या संभाजी ब्रिगेडने तात्काळ वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याची आणि कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संगमनेर येथील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून हे निवेदन सादर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठ्यात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे, विशेषतः फेज जाणे, कमी किंवा जास्त व्होल्टेज यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आरोग्य विभागाचे लक्ष वेधल्यानंतर व ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांबाबत प्रकाशित केलेल्या दोन भागांच्या विशेष वृत्तांकनानंतर आरोग्य विभागाने संगमनेरमधील काही डॉक्टरांना रडारवर घेतले आहे. या वृत्तांकनामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आता हे डॉक्टर आरोग्य विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मुलींचा घटता लिंगदर आणि वाढते बेकायदेशीर गर्भपात यामुळे समाजात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. काय आहे प्रकरण… महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वृत्तांकनात संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात…

Read More

अहिल्यानगर / संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील एका कृषी सेवा केंद्रात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घरफोडीतील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंप्रीलौकी येथील व्यापारी संदीप पोपट गिते यांच्या कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानातील शेती उपयोगी साहित्य आणि रसायने चोरून नेली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्वी पोलीस या प्रकरणी तपास करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेरला सध्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून ती कधीही येते आणि कधीही जाते, अशी परिस्थिती उद्भवल्याने याचाच परिणाम म्हणून आज (गुरुवारी) काँग्रेससह शहरात नागरिकांनी महावितरण कार्यालयाला घेराव घालून निवेदन दिले. यावेळी आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विजेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा महावितरणवर संताप, यांनी दिले निवेदन… संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, रामदास सोनवणे, तुषार अरगडे, श्रावणी…

Read More

मुंबई – विशेष प्रतिनिधी राज्य सरकारकडून राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. गुरुवारी गृह विभागाने राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून २२ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा समावेश असून त्यांच्या रिक्त जागेवर रायगड येथून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घार्गे आता अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक असतील. बदल्या करण्यात आलेल्या २२ अधिकाऱ्यांपैकी २१ अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले असून संजय वाघ यांना अद्याप नियुक्तीचे नवे ठिकाण देण्यात आलेले नाही. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या….

Read More

संगमनेर-  संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत यांच्या घराजवळ लावलेली टेम्पो ट्रॅव्हलर आणि टाटा विंगर अशी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गंगाधर राऊत (वय ४६, रा. घुलेवाडी) यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची टाटा विंगर (क्र. एमएच ०८ आर ८८०४, किंमत २ लाख ९८ हजार रुपये) आणि टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४ जीपी ३३३२, किंमत ६ लाख ९५ हजार रुपये) ही दोन वाहने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर पार्क केली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात…

Read More

अहिल्यानगर- अहिल्यानगर जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या आणि अपहरण, खून, चोरी, घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या एका कुख्यात टोळीवर तोफखाना पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. ११ जणांच्या या टोळीच्या अटकेमुळे अहिल्यानगरमध्ये पसरलेल्या भीतीला चाप बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवनागापूर आणि आसपासच्या परिसरात या टोळीने गुन्हेगारीचा कळस गाठला होता. चोरी, खंडणी, मारामारी यांसारख्या कृत्यांसोबतच एका व्यक्तीचे अपहरण करून निर्घृण खून करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत तोफखाना पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. कसून तपास करत या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांच्यावर ‘मकोका’ कायद्यान्वये…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर शहरातील सागर वाईन्स या देशी दारू दुकानाचे स्थलांतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शासकीय जागेवर झाल्याने तो आदेश संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणी सध्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून योग्य कारवाईची अपेक्षा मूळ तक्रारदार बानोबी शेख यांनी व्यक्त केली आहे. नेमके प्रकरण काय आहे?… दिल्ली नाका परिसरात असलेले सागर वाईन्स हे देशी दारू दुकान अनेक वर्षांपासून खोटी कागदपत्रे वापरून नगरपालिका आणि उत्पादन शुल्क विभागाची दिशाभूल करत सुरू असल्याचा आरोप बानोबी शेख यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला, परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने २० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला स्थानिक नागरिक,…

Read More

संगमनेर, दि. २१ मे २०२५ संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळालेल्या माहितीनंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संगमनेर शहरात दरोड्याचा कट उधळून लावला आहे. २१ मे २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सावजी हॉटेलसमोरील पुणे-नाशिक हायवे ब्रीजखाली दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१० (५) सह शस्त्र अधिनियम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहन अनिल अभंग (वय…

Read More