Author: Annant Ppangarkar

रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ मेष: तुम्ही नवीन सहवास किंवा भागीदारीत प्रवेश करू शकता. तुम्ही व्यावसायिक प्रकल्पांबाबत उत्साही आणि आत्मविश्वासी आहात. त्यामुळे भविष्यात तुम्ही पूर्ण यश मिळवू शकाल. कोणतीही कायदेशीर बाब प्रलंबित असल्यास, न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश सूचित केले जाते. आर्थिक उपक्रम आणि गुंतवणुकीतून नफ्याचा आवाज तुम्हाला आनंदी ठेवेल. वृषभ: आज तुमच्यापैकी काहींची सर्जनशीलता शिखरावर असेल परंतु आर्थिक दबाव असू शकतो. पैशाशी संबंधित प्रकरणे शहाणपणाने हाताळावी. व्यवसायाच्या संदर्भात, आपण काही सर्जनशील कार्यासाठी आपल्या फायद्यासाठी मालमत्ता वापरू शकता. कुटुंबासह बहुप्रतिक्षित सहल पुढे ढकलावी लागेल. मिथुन: व्यवसायाच्या चांगल्या संधी तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी खूप उपयुक्त ठरतील. नवीन क्षेत्रात तुमचा ठसा उमटवण्यासाठी तुम्ही तयार…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर मुंबई – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या या यादीत २२ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर शहरमधून अभिषेक कळमकर यांना तर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जिल्ह्यात सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले असून शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन जागांवर काँग्रेस, नेवासे व श्रीगोंदा या दोन जागांवर शिवसेना व उर्वरित विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट झाले. महायुतीच्या उमेदवारांचा अद्यापही घोळ सुरूच आहे. अद्याप ज्या जागांवरील उमेदवार शिल्लक आहे त्यांची यादी आज रात्री किंवा उद्या सकाळी पत्रकार…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत राजकारणाची राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुजय विखे यांनी सभा घेऊन भडक वक्तव्य केली. यातूनच काही लोकांना प्रोत्साहन मिळाल्याने युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यासह महिला भगिनींविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले याचबरोबर सुजय विखे यांना संगमनेर तालुका प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. महिलांचा अपमान करणारे वसंत देशमुख व सुजय विखे यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याबाहेर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ खुर्द येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला. ही संगमनेरच्या राजकारणाची संस्कृती नसून या घटनेचा निषेध करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना कैलास कासार म्हणाले, निवडणूक अथवा कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचा, कामांबद्दल प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने सर्वच नागरिकांना दिला आहे. मात्र ही टीकाटिप्पणी करताना कुठल्याही महिला संदर्भात बोलताना शब्दांचा संयम बाळगणे गरजेचे आहे. माइक हातात आला म्हणून…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता काही तासांचा अवधी उरला असताना काँग्रेसने आपली २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापले असून श्रीरामपूरमधून आता हेमंत उगले काँग्रेसचे उमेदवार असतील. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून तर काँग्रेसवासी झालेल्या प्रभावती घोगरे यांना शिर्डीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत आता श्रीरामपूरमधून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाविकास आघाडी जिल्ह्यात काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा मिळाल्या आहेत. गेला काही दिवसापासून श्रीरामपूरमधून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता होती.…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर  संगमनेर – भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील सभेत अध्यक्ष स्थानी असलेल्या वसंत गुंजाळ याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात संतप्त वातावरण निर्माण झाले असून विजय विखे पाटील आणि वसंत देशमुख यांच्या अटकेसाठी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांना रात्रभर ठिय्या दिला असून शनिवारी दुपारपर्यंत कार्यकर्ते भाषणातून आपला रोष व्यक्त करत होते. दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील मध्यरात्री आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या घटनेचा…

Read More

शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४ मेष – रोजची दैनंदिन कामे लवकर पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढल्यामुळे आपल्या महत्वाच्या कामांना वेळ देऊ शकाल. व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वृषभ – नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. केलेल्या नियोजनात काही बदल करावे लागतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे जरुरीचे. मिथुन – कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहमधील अडथळे दूर होतील. तसेच संततीचे असलेले प्रश्न मार्गी लागतील. आप्तेष्ट व नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूवर विजय मिळवाल. कर्क – नियोजनाद्वारे हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. परंतु त्यासाठी कार्यमग्न राहणे आवश्यक ठरेल. तसेच कोणाबरोबरही वाद- विवाद करू नयेत. कलहसदृश्य घटनांपासून…

Read More

सभा आटोपती घ्यावी लागली, महिलांसह ग्रामस्थांचा सभास्थानी ठिय्या.. सुजय विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, वसंत देशमुखला भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे अशा नीच लोकांना त्यांची जागा दाखविण्याची – आमदार सत्यजित तांबे शुक्रवार, २६ ऑक्टोबर संगमनेर – सुसंस्कृत तालुका अशी ओळख असलेल्या संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने थेट खालच्या पातळीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संगमनेरमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात महिलांचा संताप दिसून आला. विखे-थोरात वाद विकोपाला गेला असून वाहनाची देखील जाळपोळ, तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर येत…

Read More

शुक्रवार, २६ ऑक्टोबर  संगमनेर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी आणखी पाच इच्छुक उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज नेले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ३१ इच्छुकांनी ६३ उमेदवारी अर्ज नेले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शनिवार, रविवारची सुट्टी वगळता शेवटच्या दोन दिवसात प्रमुख उमेदवारांचे अर्ज नेले जाणार असून लगेचच त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप त्यांनी देखील उमेदवारी अर्ज नेलेला नाही. तर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळालेल्या अजिज व्होरा यांनी देखील अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. व्होरा आज उमेदवारी अर्ज…

Read More

शुक्रवार २५ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – भरारी पथकाने अहिल्यानगर शहरात दोन ठिकाणी वाहतूक करण्यात येत असलेली रोकड पंचनामा करुन ताब्यात घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अवैध मद्य, रोकड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्यासाठी अहमदनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चेकपोस्ट, आठ भरारी व स्थाई पथके नेमण्यात आली आहेत. भरारी पथकाने १६ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता नालेगाव भागातील अमरधाम येथे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये एवढी रोख रक्कम दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबतचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत. तर कायनेटीक चौक येथे २४…

Read More

शुक्रवार, २५ ऑक्टोंबर  संगमनेर – बाहेरचे लोक तालुक्यात येऊन हावभाव करत भाषणे करत आहे. त्यांच्यासारखी भाषणे ही आपली संस्कृती नाही, ते घाबरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी जशी शांत, संयमी बाळासाहेब थोरातांची कन्या आहे, तशीच भाऊसाहेब थोरातांची नात देखील आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, अशा थेट शब्दात काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना उत्तर दिले आहे. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली युवा संवाद यात्रा गुरुवारी रात्री संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आली होती. घुलेवाडी येथील यात्रेत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात देखील सहभागी झाले होते. डॉ. थोरात म्हणाल्या, विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब…

Read More

त्यांचे समर्थकच सांगतात… संगमनेर चांगले तर खरी दडपशाही त्यांच्याकडेच! राहता तालुका देखील आता दहशतमुक्त करायचाय! थोरात यांचा शुभारंभानंतर प्रथमच युवा संवाद यात्रेत सहभाग शुक्रवार, २५ ऑक्टोंबर  संगमनेर – गोरगरिबांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी येथील राजकारण आहे. राज्यभरात सुसंस्कृत आणि प्रगतशील अशी संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या तालुक्यात खऱ्या अर्थाने दहशत निर्माण करणारेच लोक इकडे येऊन खोटे आरोप करतात. त्यांच्या तालुक्यात जाऊन त्यांच्या समर्थकांना विचारा ते सांगतील राज्यात संगमनेर सगळ्यात चांगला तर खरी दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे. दडपशाहीच्या जोरावर त्यांचे राजकारण इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून या दडपशाहीच्या व्हायरसला इकडे येऊ द्यायचे नाही, असे आवाहन विधिमंडळ पक्षाचे नेते…

Read More

शुक्रवार, २५ ऑक्टोंबर  मुलाच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हामध्ये त्याला अटक न करण्यासाठी आणि दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या मदतीने २५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजार रुपये मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्ती विरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली. पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे आणि खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करू नये तसेच त्याला मदत करू यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे याने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली…

Read More

शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ मेष – कौटुंबिक सौख्य लाभून संततीकडून त्यांच्या प्रगतीपर बातम्या मिळतील. व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील. आत्मविश्वासात वाढ होऊन जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. वृषभ – आरोग्य उत्तम राहून उत्साहात भर पडेल. दैनंदिन आपली रोजची कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. काही महत्त्वाच्या गाठीभेटी झाल्यामुळे दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करता येतील. मिथुन – महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नियोजनात आयत्या वेळेस काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. कुटुंबातून सहकार्य लाभेल. सरकारी कामांना विलंब लागण्याची शक्यता. कर्क – आपल्या कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे तसेच हाताखालील मंडळींचे अपेक्षित असलेले सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासाठी तसेच स्वतःसाठी काही नवीन…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत अपेक्षेप्रमाणे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पाठोपाठ काँग्रेसने देखील उमेदवारी यादी जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे बहुतांशी उमेदवार स्पष्ट झाले आहेत. विधिमंडळाचे सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा संगमनेरमधून निवडणुकीला सामोरे जात आहे. काँग्रेसचे उमेदवार पुढीलप्रमाणे… अक्कलकुवा -…

Read More

गुरुवार, २६ ऑक्टोबर  मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पाठोपाठ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, कोपरगाव, शेवगाव आणि कर्जत-जामखेड मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, जयप्रकाश दांडेगावकर, गुलाबराव देवकर, हर्षवर्धन पाटील, बापूसाहेब पठारे, रोहिणी खडसे, युगेंद्र पवार, रोहित आर आर पाटील यांचा प्रमुख उमेदवारांमध्ये समावेश आहे. पारनेरमधून अहिल्या नगरचे विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, राहुरीमधून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे, कोपरगावमधून संदीप वर्पे, शेवगावमधून प्रताप ढाकणे आणि कर्जत जामखेड मधून विद्यमान आमदार…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोंबर संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे दाखल केला. तर आतापर्यंत २६ इच्छुकांनी ५३ उमेदवारी अर्ज नेले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शासकीय सुट्ट्यांचा कालावधी वजा जाता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्ह आहेत. गुरुवारी भारत संभाजी भोसले, विठ्ठल संतोष अभंग, अब्दुल अजीज अहमद शरीफ व्होरा (वंचित बहुजन आघाडी), संपत मारुती कोटकर (वंचित बहुजन आघाडी), विक्रमसिंह सतीशराव खताळ पाटील (भारतीय जनता…

Read More

गुरुवार, २६ ऑक्टोंबर  संगमनेर – संगमनेर तालुक्यात विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून चांगला सहकार आणि निर्माण झालेली चांगली संस्कृती यापुढील काळात जपायची असल्याचे प्रतिपादन करताना सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी ३०१५ रुपयांचा मागील हंगामाचा प्रति टनाचा ऊस भाव माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. गुरुवारी थोरात यांच्या हस्ते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्यासह सहकारातील संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोंबर  विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया (राजहंस दूध) दूध उत्पादक, कर्मचारी आदींच्या बँक खात्यावर ३७ कोटी रुपये वर्ग केले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे. दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दूधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी आदींचा यात समावेश आहे. देशमुख म्हणाले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल कायमच कौतुकास्पद राहिलेली आहे. दूध संघाची मागील वर्षाची उलाढाल ५३८.१० कोटी रूपये झाली. दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार समोर आला. गॅस पाईपलाईनच्या कामासाठी दोघांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याची तक्रार बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय ३० हल्ली रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे आहे. ठेकेदाराच्या तक्रारीवरून सोमनाथ कराळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस कंपनीचे ठेकेदार ५ ऑक्टोबरला एमआयडीसी कार्यालय बाहेर उभे असताना तेथे आलेल्या सोमनाथ कराळे याने…

Read More