Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या अमर कतारी यांच्यावर सातव्यांदा शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविले गेली. त्यानंतर कतारी यांनी पक्षप्रमुख ठाकरे यांचा “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत शहरात एकाच दिवशी सर्व प्रभागात पंधरा शिवसेनेच्या शाखा सुरू केल्या. या शाखांची उद्घाटन करताना संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शहरप्रमुखांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. संगमनेर शहरातील सर्वच्या सर्व पंधरा प्रभागामध्ये बुधवारी (५ एप्रिल) शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे व जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख आदींच्या हस्ते या शाखांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोपरगावचे जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज रात्रंदिवस माणसांची वर्दळ असलेल्या बस स्थानकासमोरील काश्मीर हॉटेललगत अज्ञात चोरट्याने दोन किराणा दुकान फोडत दुकानातील रोकड रकमेसह सिगारेट, विलायची असा पावणेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असलेला परिसर आणि सातत्याने 24 तास माणसांची वर्दळ असलेल्या ठिकाणी झालेली ही चोरी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तुषार अशोक राठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातून जाणाऱ्या नासिक-पुणे महामार्गावर बस स्थानक आणि हॉटेल काश्मीर या गजबजलेल्या परिसरात काश्मीर हॉटेल लगत राठी यांच्या मालकीची किराणा दुकाने आहेत. फिर्यादी तुषार राठी हे सोमवारी रात्री दहा वाजता दुकान बंद करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपापल्या करियरसाठी धावत आहे. मात्र, तुमच्याकडे कौशल्ये नसतील तर केवळ पदवीला काहीही अर्थ नाही. आता तुमच्या थेट कामातून उच्च गुणवत्ता अपेक्षित आहे, म्हणूनच कामाचा निखळ आनंद मिळवून समर्पितवृत्तीने कार्य करणारे तरुणच भारताला सामर्थ्य संपन्न बनवतील, असे प्रतिपादन संगमनेर येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग यांनी केले. मास्टर लर्नर्स फोनिक्स फाऊंडेशन तर्फे आयोजित प्रज्ञावंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी फोनिक्स फाऊंडेशनच्या संस्थापक माया परदेशी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुचित गांधी उपस्थित होते. कडलग म्हणाल्या, परंपरागत शिक्षण कुचकामी ठरत असतांना विद्यार्थ्यांनी नाविन्याची कास धरून आत्मविश्वासाने पुढे जावे. प्रामाणिकपणा जपा, विचलित होऊ नका.…
महाराष्ट्र संवाद न्यूज सध्या सुरू असलेल्या कामांचा निधी मागील मविआ सरकारच्या काळातील आहे. मात्र सध्याचे पालकमंत्री मागील सरकारच्या काळातील मंजूर झालेल्या कामे व निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रह करत आहेत. काम कोण करते आणि प्रसिद्धीसाठी कोण पुढे येते, हे सर्व जनतेला माहिती आहे. असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर. बी. राहणे होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी महाविकास…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशाच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. महिलांना स्वावलंबी व आर्थिक सक्षम करण्यासाठी या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजनेची घोषणा करण्यात आली होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी या योजनेचा शुभारंभ देशभरातील १ लाख ५९ हजार पोस्ट ऑफिसेसमधून करण्यात आला. संगमनेरमध्ये गणेशनगर मधील रहिवासी अपर्णा जोशी या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रथम महिला मानकरी ठरल्या. संगमनेरमधील मुख्य डाकघर येथे यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित व्याजदर व जास्त परतावा यामुळे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विपणन अधिकारी अमोल गवांदे यांनी व्यक्त केला. निश्चित आर्थिक ध्येयपूर्ती करण्यासाठी महिलांनी या खात्याचा लाभ घ्यावा,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऐतिहासिक शहागडाच्या पायथ्याशी असलेल्या पेमगिरी येथे सर्वात उंच मारुतीरायांच्या ३० फूट गदेचा लोकार्पण सोहळा हनुमान जन्मोत्सव दिनी गुरुवारी (६ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, अभिनेता देवदत्त नागे, प्रा. नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. पेमगिरी हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक गाव असुन शहागड व भारतातील सर्वात मोठा वटवृक्ष या गावात आहे. याचबरोबर आता नव्याने सर्वात उंच मारुतीरायांची ३० फूट गदा या ठिकाणी उभारली आहे. हनुमान जन्मोत्सव दिनी या ऐतिहासिक गदेचा लोकार्पण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर, प्रतिनिधी शहराच्या व्यापार क्षेत्राला दिशा देणार्या शारदा नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदार व ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आगामी वर्षभरात संस्थेतील ठेवींचा आकडा दोनशे कोटींच्या पार नेण्याचा संकल्प आहे. विविध ग्राहकोपयोगी सुविधा, स्वच्छ व पारदर्शक व्यवहार आणि उच्च कोटीची कामकाज प्रणाली यामुळे आधुनिक संस्थांच्या पंक्तितही संस्थेने भरारी घेतली आहे. ठेवीदारांच्या याच विश्वासाच्या जोरावर संस्थेने गेल्या आर्थिक वर्षात १६९ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडतांना विक्रमी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक गिरीश मालपाणी यांनी दिली. संस्थेच्या ३१ मार्च अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देतांना विद्यमान अध्यक्ष विशाल पडताणी म्हणाले, कोविड संक्रमणाच्या कालावधीनंतर जगभरात निर्माण…
महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर दीर्घकाळ मुदतवाढ मिळालेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसा अखेर तब्बल 109 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत प्रथमताच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोरात विरोधक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. 28 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरचा दिवस होता. राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसते. त्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: उभी हयात सामाजिक योगदान देणारे ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहेत. ज्या संस्कृतीमध्ये संवेदनशीलतेने ज्येष्ठांना सन्मान दिला जातो, ती संस्कृती जगाला विश्वशांतीची दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्य भगवान जोशी यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर तर्फे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या ५० नागरिकांना आधारवड कृतज्ञता समारंभात छत्री व काठी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सोमनाथ कळसकर गुरुजी होते. व्यासपीठावर इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या अध्यक्ष रचना मालपाणी, अध्यक्ष वृषाली कडलग, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी ज्योती पलोड आदी उपस्थित होते. अनिता कोदे व विजय कोदे यांनी छत्री व काठी दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शुक्रवारी (7 एप्रिल) जागतिक आरोग्य दिनानिमित्त लायन्स क्लब संगमनेर सफायर, माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक, नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वॉकेथॉन (चालण्याची) स्पर्धेचे आयोजन केल्याचे एमजेएफ ला. गिरीश मालपाणी, ला. श्रीनिवास भंडारी, सफायर अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी यांनी सांगितले. सहा गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहे. स्पर्धेत वय वर्ष 45 ते 55, वय वर्ष 56 ते 65, वय वर्ष 66 ते 75 या वयोगटातील पहिल्या तीन पुरुष आणि महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास रोख 1100/- रुपये, मेडल आणि प्रशस्तीपत्रक,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील साडेसहा लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा कीट वाटप करण्यात येणार आहे. या योजनेत रेशन दुकानदारांनी पारदर्शकता ठेवत तत्परतेने कीटचे वाटप करावे, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. राहातामधील खंडोबा चौक येथे आनंदाच्या शिधा कीट वाटपाचा कार्यक्रम महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पुरवठा अधिकारी श्री.खरात, रेशन दुकानदार राजू वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, अॅड. रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, कैलास सदाफळ, चंद्रभान…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सोनेतारण घोटाळ्यानंतर आता सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्य पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू झाली आहे. संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्षाची कार्यकारिणी नव्याने जाहीर झाल्यानंतर “आता जिंकेपर्यंत लढायचं” हा आदेश मानत नवे पदाधिकारी कामाला लागले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये शाखा बांधणीचा धडाका सुरू झाला असून एकाच वेळी १५ प्रभागांमध्ये १५ शाखांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली. संगमनेरमध्ये एकाच दिवसात पंधरा शाखांचा शुभारंभ प्रथमत:च होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना बांधणीला संगमनेरमध्ये वेग आल्याचे मानले जाते. या संदर्भात कतारी म्हणाले, आगामी काळात शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनात्मक बांधणी नव्याने करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर सहकारात दिशादर्शक आणि अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरमधील सेवा सोसायट्यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून उचललेल्या कर्जफेडीची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च अखेर ८८ टक्के वसुली देत जिल्ह्यात संगमनेर प्रथम क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्याने सर्वाधिक वसुली दिल्याने तालुका प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय तालुक्यातील ५७ सेवा सोसायट्यांनी जिल्हा बँकेला शंभर टक्के वसुली दिली असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी अशोक थोरात यांनी दिली. सहकारातील दिवंगत नेते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सहकाराची पायामुळे भक्कम केल्याने तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण झाले आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्न पाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवत मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे हा प्रकार घडला असून सारंगधर गंगाधर पावसे (वय ६० वर्ष) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात त्यांच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून माधुरी प्रभाकर गोडसे (रा. लहीत लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मु. आठरके वस्ती, हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती अशी, फिर्यादी माहेरी गेल्यानंतर तिचा पती सारंगधर गंगाधर पावसे यांना २९…
रविवार विशेष ○ प्रवीण पुरो सावरकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपेयींचा शिवरायांवरील प्रेमाचा उमाळा कमालीचा आगलावा ठरला आहे. सावरकरांच्या बदनामीच्या निषेधार्थ गौरव यात्रेची घोषणा करणाऱ्या या पक्षाला छत्रपतींची बदनामी चालली. त्यांच्या गौरवार्थ यात्रा काढावीशी वाटली नाही. यावरून या मंडळींचा हेतू किती कलुषित आहे हे स्पष्ट होतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद होती. अदानीच्या संकटातही राज्यातील वाढत्या उद्योगाची स्थिती सांगण्यासाठी ते पत्रकारांना माहिती देत असावेत, असं वाटल्याने सर्वच जण या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते. पण अदानींच्या उद्योगाऐवजी सावरकरांचं तुणतुणं वाजवण्याच्या त्यांच्या या पत्रकार परिषदेने सगळेच आश्चर्य व्यक्त करत होते. राज्य सरकारच्या सावरकर गौरव यात्रेची भलामण करता करता…
महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. गावपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करताना गावात जावून योजनेतील त्रृटी दूर कराव्यात, वेळ पडली तर पुन्हा सर्वेक्षण करा, एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती मात्र करू नका, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांच्या कामांचा गावनिहाय आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक पदाधिकारी दिपक…
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका: काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात आणि देशात हुकूमशाही पद्धतीने सध्या कारभार सुरू आहे. भाजप जाती-जातीत आणि धर्मामध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. हे लोक देशातील लोकशाही आणि संविधान संपवण्याचे काम करत असून, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे याचाच भाग आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी भाजपाच्या धर्मांध व्यवस्थेला उखडून टाका, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. पटोले म्हणाले, मनुवादी व्यवस्थेने अन्नदाता, गरीब माणूस, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. मोदी- अदाणींचा संबंध काय? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्यांचे २० हजार कोटी रुपये कुठून आले? फक्त अदानीलाच देशातील आणि परदेशातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज देश सध्या एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे. सार्वभौम लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने संविधान वाचावं, लोकशाही वाचावी या उद्देशाने काँग्रेसने राज्यात वेगवेगळी आंदोलने सुरू केली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी मधुकरराव नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत मिलिंद कानवडे होते. नवले म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही जगातील सर्वात सामर्थ्यवान राज्यघटना असून सध्या याच घटनेच्या तत्त्वांची पायमल्ली होत आहे. विरोधात बोलणाऱ्या विरोधकांचा आवाज बंद करण्याचे काम लोकशाहीला घातक असून सर्वांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज स्वतःला महाविकास आघाडीचे नेते म्हणून घेणारे सोयीनुसार राजकारण करत आहे. पदवीधर निवडणुकीत त्यांना महाविकास आघाडी आठवली नाही, तेव्हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केला. आत्ताही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करत पोपटपंची करणारे महाविकास आघाडीशी तरी प्रामाणिक आहेत का? असा सवाल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत २७ कोटी रुपयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला. अध्यक्षस्थानी बापूसाहेब गुळवे…
