Author: अनंत पांगारकर
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच…
संगमनेर | प्रतिनिधी राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवून महायुती सरकारने महिलांच्या विश्वासाला तडा दिला असून ही महिलांची सरळसरळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून मतदान केले म्हणूनच हे सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. ८१ लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे थोरात म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातून बुलेट दुचाकीच्या सायलेन्सर मधून मोठमोठे आवाज काढत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू साळुंखे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून बस स्थानक आणि नवीन नगर रोड परिसरात हा युवक आपल्या बुलेटमधून फटाक्यांसारखे मोठे आवाज काढून नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून स्थानिक व्यापाऱ्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर आणि गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सावंत यांनी या तरुणावर पाळत ठेवली. दुपारच्या सुमारास हा युवक पुन्हा बस स्थानक परिसरात आपल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: समनापूर बायपास चौफुली येथे महिनाभरापूर्वी झालेल्या गंभीर आणि प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी अरबाज जहागीरदार आणि जुनेद शेख यांना अटक करण्यात संगमनेर शहर पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अरबाजला पोलिसांनी थेट पुण्यातून ताब्यात घेतले, तर जुनेदला संगमनेरमधील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे संगमनेर आणि परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सुमारे एका महिन्यापूर्वी संगमनेर जवळील समनापूर बायपास चौफुली येथे दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फिर्यादीवर चाकूने तब्बल ७ वार केले होते.…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या मोठ्या बदलांमधून जात आहे. बँक खात्यांची पडताळणी आणि ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेतील तब्बल ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असून, सध्या लाभार्थी महिलांची संख्या २ कोटी ६६ लाखांवरून १ कोटी ८५ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातीला २.४० कोटी लाभार्थी असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र बँकांकडून मिळालेल्या माहितीनंतर बनावट लाभार्थी, पुरुष, सरकारी कर्मचारी आणि प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींनीही याचे लाभ घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे राज्य सरकारने पडताळणीची प्रक्रिया कडक केली असून, यामुळे शासनाची दरमहा १२०० कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. याशिवाय, ६५ वर्षांवरील वयोमर्यादेच्या अटीमुळे सुमारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील वडझरी बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर खाणकाम, तीव्र ब्लास्टिंग आणि स्टोन क्रेशरच्या त्रासाला कंटाळून अखेर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आजपासून (१ जून) उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. गावालगत अव्याहतपणे सुरू असलेल्या या खाणकामामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत होणाऱ्या जोरदार ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे गेले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाणी पातळीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. याशिवाय, क्रेशरमधून उडणाऱ्या धूळ प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले आणि…
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीची लगबग पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांचे सत्र अखेर संपले असून, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांपैकी तब्बल ११ जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचा तिढा सुटून उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आता राज्यातील विधानपरिषदेचा हा रणसंग्राम अधिकच चुरशीचा आणि रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित जागांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ४ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. जागावाटपाचा हा फॉर्म्युला निश्चित होताच भारतीय जनता पक्षाने…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मानसिक शांतता लाभेल आणि जुन्या चिंता दूर होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील, विशेषतः जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल असून आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत कमालीचे यश मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज गतीने पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन भागीदारी किंवा करार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा फायदा होईल. समाजात मान-सन्मान…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शोरूमचे मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी मिळून एका ग्राहकाला आणि त्यांच्या ज्येष्ठ सासऱ्यांना लोखंडी रॉड, स्क्रू-ड्रायव्हर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह १० ते १५ अनोळखी कर्मचाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोरूमसारख्या सार्वजनिक आणि व्यावसायिक ठिकाणी ग्राहकाला झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात स्वप्निल रोहिदास सातपुते (वय २५, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी…
प्रवीण पुरो – राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी आपल्याकडे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेवर खरोखरच उपकार केले आहेत. महेश झगडे यांच्यानंतर त्या तोडीचा अधिकारी या खात्याला मिळाला आणि राज्यातील जनतेला हायसे वाटले असल्यास नवल नाही. मुंढेजी, सनदी अधिकारी म्हणून आपल्याकडे आजवर आलेल्या जबाबदाऱ्यांना आपण न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी कमी पडलात, तिथे आपल्यावर टीकाही झाली. तरीही जिथे जाऊ तिथे जनतेला न्याय देऊ, हे ब्रीद घेऊन आपली वाटचाल सुरू आहे, याचे समाधान आहे. राज्यातील भ्रष्ट खात्यांचा आणि त्या खात्यांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याचे काम आपल्या नावावर नोंदले गेले आहेच. पण तिथे वावरणाऱ्या दलालांचाही बिमोड आपण…
