Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने आयोजित महेश नवमीनिमित्त बुधवारी (४ जून) निघालेल्या भव्य शोभायात्रेने संगमनेरकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः केरळी बँड आणि माहेश्वरी महिलांच्या टाळ नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय माहेश्वरी समाज बंधू-भगिनींची आकर्षक वेशभूषा आणि शोभायात्रेतील नियोजनबद्धता हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. आमदार अमोल खताळ यांनीही या शोभायात्रेत सहभागी होत माहेश्वरी बंधू-भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा दिल्या. महेश नवमीनिमित्त श्री बालाजी मंदिरात महेश भगवान रुद्राभिषेक यजमान पल्लवी व शैलेश कासट आणि शिवानी व कृष्णा आसावा यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर लगेचच शोभायात्रेचा शानदार शुभारंभ झाला. या शोभायात्रेचे नियोजन आणि रथ सजावट राजस्थान युवक मंडळाच्या सदस्यांनी अतिशय सुंदरपणे केली…
संगमनेर, प्रतिनिधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरणाचे पाणी अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांसह, विशेषतः तळेगाव गटातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहोचले आहे. त्यांच्या पूर्णत्वास गेलेले धरण आणि उजवा व डावा कालवा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घेऊन आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले. चिंचोली गुरव येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून विविध बंधारे भरताना आयोजित पाणीपूजन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की, निळवंडेच्या कालव्यांमधून पाणी आल्याने संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाली आहे. थोरात कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये यंत्रसामग्री पुरवून चारी खोदून बंधारे भरून देण्यात आले आहेत, तर…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेरमध्ये एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली असून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून दोनदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी आदित्य अर्जुन शेटे या आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी विकास काळे पुढील तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. महाविद्यालयात जात असताना बसस्थानकावर तिची ओळख आरोपी तरुणासोबत झाली. आरोपीने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या घरी बोलावले. ५ डिसेंबर २०२४ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. या घटनेची…
मुंबई, विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा प्रलंबित हप्ता कधी देणार या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सन्मान निधीच्या वितरणाची माहिती दिली असून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच आजपासून (५ जून) हा निधी थेट लाभार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. मे महिन्याचा हप्ता जून महिना उजाडला तरी जमा न झाल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी दिसून येत होती. निवडणुकीपूर्वी वेळेवर पैसे जमा करणाऱ्या सरकारकडून निवडणुकीनंतर या योजनेत दिरंगाई होत असल्याची चर्चा होती. मात्र, आता आदिती तटकरे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत महिलांना दिलासा दिला आहे. तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये…
संगमनेर (प्रतिनिधी): माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे निळवंडे धरणाचे डावे आणि उजवे कालवे त्यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले असून, या कालव्यांमधून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये पाणी पोहोचले आहे. यामुळे अनेक बंधारे आणि गावतळी भरली असून, तालुक्यात जलसमृद्धी निर्माण झाल्याचे संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. बुधवारी (४ जून) रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते अंभोरे, पानोडी, मालुंजे, पिंपारणे येथील उजव्या कालव्यातून भरलेल्या बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. यावेळी संचालक सतीश वर्पे, गंगाराम वाकचौरे, अण्णा राहिंज, लहानभाऊ वर्पे, रवींद्र रोहम, अरुणराव देशमुख, शुभम काळे, दिनकर वाकचौरे, नवनीत देशमुख, राजेंद्र देशमुख, सरपंच नारायण मरभळ, अरुण राहिंज, रमेश राहिंज,…
विशेष प्रतिनिधी / मुंबई युती सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना (ठाकरे गट) जमीनदोस्त करण्याचे विधान केल्यापासून राजकारणात एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महाजनांच्या या विधानाला प्रत्युत्तर देत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागले. ज्यानंतर महाजनांनकडूनही उत्तर देण्यात आले. पण आता मात्र, खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले असून त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. महाजनांच्या कार्यालयात बसणारा अभिषेक कौल हा एक दलाल असून तो बिल्डर आहे. त्याने सांगितल्याशिवाय महाजन फाइल्सवर सही सुद्धा करत नाही, असा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…
मुंबई, ४ जून २०२५: भाजप महायुतीचं सरकार जनतेच्या हिताऐवजी अदानी समूहाच्या फायद्यासाठी अहोरात्र काम करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या जागा अदानींना दिल्या गेल्या असून, आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळच त्यांना देणं बाकी आहे का, असा संतप्त सवाल सपकाळ यांनी विचारला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, मुंबईतील दोन्ही विमानतळे, धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत डंपिंग ग्राऊंडची जमीन, कुर्ल्यातील ८.५ हेक्टर मदर डेअरीची जमीन आणि वांद्रे येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही अदानींना देण्यात आली आहे. या सर्व गोष्टी अदानींच्या घशात घालून महाराष्ट्राला काय मिळणार आहे, असा प्रश्न त्यांनी…
अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ४ ते ७ जून या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभं राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटी वादळादरम्यान आणि विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांच्यापासून दूर राहावे. तसेच, मोकळं मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे…
संगमनेर, प्रतिनिधी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) संगमनेर तालुका सचिवपदी कॉम्रेड प्रताप सहाणे (सर) यांची पुढील तीन वर्षांसाठी एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. संगमनेर येथील लालबावटा कार्यालयात आयोजित त्रैवार्षिक परिषदेत ही निवड प्रक्रिया पार पडली, यावेळी पक्षाचे सभासद उपस्थित होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड भिका वाघ होते. सुरुवातीला मागील तीन वर्षांच्या कालखंडात दिवंगत झालेले पक्ष सभासद आणि पुरोगामी चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, तंबाखू कामगार युनियनचे सरचिटणीस आणि फॉरेस्ट वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड ॲड. ज्ञानदेव सहाणे यांनी प्रास्ताविक केले. भाकपचे सेक्रेटरी कॉम्रेड प्रताप सहाणे यांनी मागील तीन वर्षांतील घडामोडींचे अहवाल वाचन केले. यावेळी त्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थ आता अधिकच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मासिक सभा आणि ग्रामसभांमधील अनियमिततेसह एप्रिल २०२२ ते मार्च २०२५ या काळातील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामांमध्ये वस्तू खरेदीतील गैरव्यवहारांबाबत ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. या प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी न झाल्यास तीव्र जनआंदोलन व उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाले आहेत. २०२२-२३ या वर्षात तत्कालीन उपसरपंच गोकुळ दिघे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सुमारे रु. ८.५३ लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. यात बाकडे…
संगमनेर, प्रतिनिधी सकल धनगर समाजाच्या वतीने सुकेवाडी-खांजापूर गावात यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती उत्साहात साजरी झाली असली तरी, यावर्षी जयंतीला 300 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गावातील तरुणांनी एकत्र येत एका वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमामागे समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना उत्सवात सहभागी करून घेण्याचा आणि त्यांना अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश होता. यासाठी कोणत्याही प्रकारच्या डीजे किंवा साऊंड सिस्टीमवर खर्च न करता, राजकारण विरहित जयंती साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला. जयंतीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.…
पुणे – ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना अखेर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या योजनेतील त्रुटींची कबुली दिली. “लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत. सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पवार यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हानेही स्पष्ट केली. लाडकी बहीण योजना लागू केली, तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता. निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही, असे त्यांनी नमूद केले. या योजनेसाठी मासिक उत्पन्न जास्तीत जास्त वीस हजार आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – बनावट वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिने एका महिलेकडून ५ लाख ३० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठ दिवसांत स्नेहल कांबळेवर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. यामुळे तिने केलेल्या आणखी फसवणुकीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता वाढली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडली… स्नेहल कांबळेला यापूर्वी एका शेतकऱ्याकडून खंडणी स्वीकारताना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. तिच्या घराच्या झडतीमध्ये अनेक संशयास्पद कागदपत्रे आढळली. यानंतर, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नागरिकांना आवाहन केले होते की, ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी…
संगमनेर, प्रतिनिधी – अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील प्रतिभावान विद्यार्थी प्रज्वल दीपक साळुंके याची कॅरिबियन बेटांवरील सेंट किट्स अँड नेव्हिस येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तब्बल $180,000 (सुमारे ₹15 लाख) वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली आहे. प्रज्वलने आपले उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन, प्रभावी नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्याच्या बळावर ही महत्त्वपूर्ण संधी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल बोलताना प्रज्वलने आपले श्रेय अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयाला दिले. तो म्हणाला, अमृतवाहिनी एम.बी.ए. मध्ये विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिकच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. महाविद्यालयात नियमितपणे विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, मॉक इंटरव्ह्यू यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक…
राजकारणात कसंही वागलं तरी काहींना त्याचं काहीच वाटत नाही. निर्ढावलेले तर मी नाही त्यातली.. अशा प्रकारचा देखावा करतात आणि झालं गेलं, असं मानून चक्क खोटारडेपणा करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उपरती झालेले अनेकजण आहेत. ज्यांनी सोबतीच्या साथीदारांना आपलं काम भागल्यानंतर वार्यावर सोडलं आणि पुन्हा तोंड वर करून स्वत:ला निर्दोष असल्याचा स्वत:च निवाडा दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तोच मार्ग अवलंबलेला दिसतो आहे. सत्तेत चढ-उतार दिसू लागले की त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचं अवमुल्यन झाल्याची स्वप्न पडतात. हे करायला परिस्थिती भाग पाडते, असं ते बेमालूम कबुलही करतात. सत्ता हवी असली की हातावर हात ठेवून थांबता येत नाही, म्हणून मग अवमुल्यन करावं लागतं असं…
पुणे – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत शनिवारी सायंकाळी एका मद्यधुंद कारचालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत १२ जणांना उडवले. या भीषण अपघातात जखमी झालेले सर्वजण MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही धक्कादायक घटना भावे हायस्कूलजवळ, श्री साईनाथ अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनेक विद्यार्थी दिवसभर अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून चहा पिण्यासाठी भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या टपरीवर थांबले होते. याचवेळी जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) नावाच्या चालकाने भरधाव वेगात आपली कार (पर्यटक टॅक्सी) चालवत आणली. प्राथमिक अंदाजानुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा गाडीवरील ताबा…
संगमनेर – प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याची कन्या आणि महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे मोठ्या उत्साहात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यादेवी होळकर यांना ‘देशातील आदर्श राज्यकर्त्या’ असे गौरवले. संगमनेरमधील आशीर्वाद पतसंस्थेसमोर आयोजित कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, अहिल्यादेवींचे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. विशेषतः, पाण्याचे महत्त्व ओळखून जलव्यवस्थापनात त्यांनी मोठी क्रांती घडवली, ज्यामुळे त्या खऱ्या अर्थाने आदर्श राज्यकर्त्या ठरल्या. भारतीय इतिहासात ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या, त्यात अहिल्यादेवींचा गौरव आदर्श राज्यकर्त्या म्हणून केला…
संगमनेर – प्रतिनिधी नाशिक परिक्षेत्रातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विश्वास लक्ष्मण भान्सी यांची संगमनेर (अहिल्यानगर) येथून नंदुरबार येथे बदली झाली आहे. नाशिक परिक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळाच्या ३० मे २०२५ रोजीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या आदेशाने परिक्षेत्रातील २६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी यातील काहींना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे. आदेशात बदली झालेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असेही म्हटले आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी…
मुंबई, ३१ मे २०२५ – विशेष प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने शनिवारी संघटनात्मक बदल करत उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या नावाची आज घोषणा केली. यापूर्वी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्या पाठोपाठ आता उर्वरित जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांच्या सहीने या संबंधित पत्र संबंधितांना देण्यात आले आहे. आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व आले आहे. यापूर्वी घोषित न झालेल्या जिल्ह्यांसाठीच्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: कोकण: * पालघर: भरत राजपूत * वसई विरार: श्रीमती. प्रज्ञा पाटील उत्तर महाराष्ट्र: * अहिल्यानगर शहर: अनिल मोहिते * नाशिक शहर: सुनील केदार * नाशिक…
मुंबई – प्रतिनिधी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ समोर आला आहे. तब्बल २ हजार ६५२ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेच्या निकषांचे उल्लंघन करत आर्थिक लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले असून, त्यांच्यावर सरकारकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या पडताळणी मोहिमेदरम्यान हा गैरप्रकार समोर आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सामान्य प्रशासन विभागाला १ लाख ६० हजार कर्मचाऱ्यांचा युआयडी डेटा उपलब्ध करून दिल्यावर पोर्टलवरील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत, सरकारी कर्मचारी असूनही ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या २,६५२ महिलांची नावे समोर आली. योजनेच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता…
