Author: Annant Ppangarkar

नांदेड –  बीड जिल्ह्यात सातत्याने घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मराठवाडा दौऱ्यावर असताना नांदेड येथे माध्यमांशी बोलताना थोरात यांनी, “बीडमधील घटना दुर्दैवाने महाराष्ट्राला लाज वाटाव्या अशा आहेत. सरकार यावर काय करतेय?” असा संतप्त सवाल विचारला. थोरात म्हणाले की, बीडमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी आहे. या गुन्हेगारीचा संसर्ग इतर जिल्ह्यांमध्ये पसरतो की काय, अशी भीती वाटत असताना सरकारची निष्क्रियता हा मोठा प्रश्न आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर राज्याचे आणि देशाचे भवितव्य काय, अशी मोठी काळजी त्यांना वाटत असल्याचे थोरात यांनी सांगितले. सरन्यायाधीश भूषण गवई…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत युवक काँग्रेसने प्रशासनाला निवेदन दिले असून, २३ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. आता नव्याने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे चंदनापुरी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री थोरात…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांवरील शास्तीकर माफीच्या निर्णयावरून आता स्थानिक राजकारण तापले आहे. माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अपुऱ्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार सत्यजीत तांबे हे शास्तीकर माफीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले. या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास आकारण्यात येणारा २% शास्तीकर आणि अनाधिकृत बांधकामांवरील शास्तीकर माफ करावा, ही संगमनेरमधील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने…

Read More

मुंबई –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीदवाक्य असलेले नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आले असून, यात ७० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच विविध सिंचन प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांच्या सुधारित खर्चांना आणि प्रशासकीय मान्यतांना मंजुरी देण्यात आली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित होते. गृहनिर्माण आणि नगरविकास क्षेत्रातील निर्णय… नवीन गृहनिर्माण धोरण – राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण ‘माझे घर-माझे अधिकार’ या ब्रीदवाक्यासह जाहीर करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम यात समाविष्ट असून,…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने ‘अभय योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक थकीत मालमत्ता करावरील शास्तीच्या ओझ्याखाली दबले होते. आमदार खताळ यांनी नागरिकांची ही समस्या शासनाकडे प्रभावीपणे मांडली. त्यांनी वेळोवेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्ती माफीसाठी ‘अभय योजना’ मंजूर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  मंदिरांबरोबरच शिक्षण मंदिरे समृद्ध झाली आणि वृषाली कडलग यांच्यासारख्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पिढी घडवली, तर निश्चितच एका सामर्थ्यसंपन्न समाजाची निर्मिती होईल. समाजासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती नेहमीच इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, असे गौरवोद्गार ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. लातूर येथे मानव विकास संस्थेतर्फे आयोजित ‘मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार २०२५’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रमाकांत व्यासजी, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, सुप्रसिद्ध गायक डॉ.अंबरीष महाराज देगलूरकर यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्यात, मानव सेवा जीवन गौरव पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना त्यांच्या सामाजिक…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून, याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली, तर काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, भाजीपाला, फळपिके आणि जनावरांसाठी असलेला चारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच, वादळामुळे अनेक घरांवरील…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात थैमान घालत असलेल्या अवकाळी पावसाने आज अक्षरशः कहर केला. संगमनेर शहर आणि पश्चिम तसेच पूर्व भागाला जोरदार तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा, भाजीपाला आणि साठवणुकीतील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आज (सोमवार, १९ मे) निमगाव भोजपूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर, चिकणी या परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या भागातील प्रमुख…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये पाच दिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ११ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांना साहस, कला आणि क्रीडा यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाद्वारे समृद्ध जीवनाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमातून विज्ञानवादी विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. तांबे बोलत होते. या वेळी शरयू देशमुख, प्रा. हिरालाल पगडाल, प्रकल्प प्रमुख अनंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी अकोले आणि संगमनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर १ मे २०२५ ते १८ मे २०२५ दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र. २, श्रीरामपूर आणि संगमनेर विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली गेली. या कारवाईत अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे, विरगाव फाटा, तांभोळ, अंभोळ, बेलापूर, आंबित, केळंगण, खिरविरे, लिंगदेव आणि राजूर तसेच संगमनेर तालुक्यातील अवैध मद्य विक्रीची ठिकाणे आणि ढाब्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण १९ गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी दारू ३५०.१ बल्क लिटर, विदेशी दारू ४३.०२ बल्क लिटर, बीयर ९.५५ बल्क लिटर…

Read More

संगमनेर/सिन्नर – संगमनेरमधील दोन गांजा तस्करांना सिन्नर पोलिसांनी मोठ्या कारवाईत अटक केली आहे. हे आरोपी अवैधरित्या गांजाची वाहतूक करत असताना सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो २० ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली होंडा सिव्हिक कार असा एकूण ८ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे संगमनेर आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १६ मे रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल न्यू वैष्णवीसमोर पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात सिल्व्हर रंगाची होंडा सिव्हिक कार (क्रमांक एम. एच. ०१/ई.सी. ५७४८) अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता,…

Read More

संगमनेर, दि. १८ मे – आजचा दिवस संगमनेरकरांसाठी अभिमानाचा, गर्वाचा आणि निष्ठेचा ठरला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी सैनिकी कारवाईस मानवंदना देण्यासाठी आज संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. संगमनेर नगरपालिकेपासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा शहरातील विविध मार्गावरून नवीन नगर रोडपर्यंत गेली. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारती समोर या यात्रेचा समारोप झाला. या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्या देशाबद्दलचा विश्वास आणि अभिमान दिसत होता. यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमेला नतमस्तक होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महिला, तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ…

Read More

नवी दिल्ली –  संसदरत्न पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली आहे. राज्यातील तब्बल सात खासदारांना प्रतिष्ठित ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यासह सात जणांचा समावेश आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कार्यापासून प्रेरणा घेत, उत्कृष्ट संसद सदस्यांचा सन्मान करण्यासाठी 2010 मध्ये ‘संसदरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारासाठी खासदारांच्या वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली जाते. संसदेच्या तीनही अधिवेशनांमधील खासदारांचा सहभाग, विचारलेले प्रश्न आणि एकूण सक्रियता यांसारख्या विविध निकषांवर आधारित ही निवड प्रक्रिया…

Read More

रविवार, दि. १८ मे – संगमनेर  प्रत्येकाच्या आयुष्यात एक अनमोल कथा दडलेली असते आणि जीवनात मागे वळून सिंहावलोकन करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशवाट हे पुस्तक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. या पुस्तकाचे लेखक संतोष खेडलेकर संगमनेरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या जीवनप्रवासावर आधारित डॉ. संतोष खेडलेकर लिखित ‘प्रकाशवाट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचनताई थोरात, संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्री थोरात आणि माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर घुलेवाडीतील विकासकामांच्या श्रेयवादावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या कामांचा शुभारंभ नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्याने गावात तीव्र नाराजी पसरली आहे. एक रुपयाचाही नवीन निधी न आणता थोरातांच्या कामांवर हक्क सांगणे योग्य नाही, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केला आहे. यामुळे घुलेवाडीत राजकीय वादंग पेटले आहे. काय आहे नेमके प्रकरण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी 2024-25 या आर्थिक वर्षात विविध विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात यश आले आहे. या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये घुलेवाडी येथील सव्वादोन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले. कामाचा दर्जा चांगला राखल्यास ठेकेदार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम करू शकतील, अन्यथा त्यांनी इतरत्र कामे शोधावी लागतील, असा सज्जड दमही त्यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासांतर्गत मंजूर झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते…

Read More

आपल्या लोकशाही संविधानातील राष्ट्रपतींची देश प्रमुखपदाची गरीमा पूरती तळाला गेली आहे. मोदी सरकारच्या काळात या पदाची अवस्था रबर स्टॅम्पसारखी झाली आहे. अगदी इंदिरा गांधींच्या सरकारपासून चालत आलेली ही परंपरा नरेंद्र मोदींच्या सत्तेने त्याहून खाली आणली आणि देशाच्या प्रमुखाला कणाहीन बनवलं. इतकं की एका मंदिरातला पुजारीही राष्ट्रपतींना ते आदिवासी आणि मागास असल्याच्या कारणास्तव मंदिर प्रवेश नाकारतात. अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयांना रोखण्याची हिंमत कोण दाखवेल? राजेंद्र प्रसादांपासून ग्यानी झैलसिंग, के. आर. नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा काही मोजक्याच राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला आरसा दाखवला. के. आर. नारायणन यांनी तर गुतरातच्या दंगलीवेळी अटलबिहारींच्या सरकारला खडेबोल सुनावले होते. यानंतर अटलबिहारींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संपूर्ण देश सध्या लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेमुळे एकत्रितपणे राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावलेला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात नागरिकांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विजयी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली उद्या, (रविवार दि. १८ मे) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व लष्कराच्या योगदानाबाबत जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये शहरातील युवक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल – शास्त्री चौक, मेनरोड, विठ्ठल मंदिर, बस स्टँड (अकोले रोड), पेटीट कॉलेज, श्रमिक कार्यालय, चैतन्य नगर, गणेश नगर, नाशिक-पुणे…

Read More

छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या नोंदीतील दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अपर तहसीलदारासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत. अपर तहसीलदार नितीन गर्जे (वय ४५) आणि त्यांचे कथित मध्यस्थ नितीन धुमा चव्हाण (वय ३८) व सोहेल जुबेर बहाशवान (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ५० वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मिटमिटा येथील भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीसंबंधी पाच प्रकरणे डिसेंबर २०२४ पासून अपर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित होती. तक्रारदार एप्रिल २०२५ मध्ये सुनावणीसाठी हजर झाले असता, निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी अपर तहसीलदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे  वाघोली येथील दहा एकर जमिनीच्या मालकी हक्कासाठी झालेल्या घोटाळ्यात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील सुमारे दहा एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत केले. त्यांनी एका बनावट महिलेला मूळ मालक म्हणून उभे केले आणि या महिलेच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला, असा आरोप आहे. या प्रकरणी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा यांच्या विरोधात चंदननगर…

Read More