Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज धुळे – शालेय विद्यार्थी सनी साळवे यांच्या खून प्रकरणात धुळे न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार झालेली ही जन्मठेपेची राज्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळ्यातील देवपूर भागात २०१८ मध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सनी साळवे याचा खून करण्यात आला होता. देवपूरमधील नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादात सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींनी रुग्णालयातही जाऊन जखमींना धमकावण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १९ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्ण पदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस…
महाराष्ट्र संवाद न्यूज साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रिय ददू, अनेक आशीर्वाद ! या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली -हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्याच्या कारणावरून तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. यापूर्वी 14 डिसेंबर रोजी…
स्व. भास्कर गणपतराव देशमाने यांचे प्रथम पुण्यस्मरण संपन्न महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भास्कर देशमाने यांनी कष्टातून आपले जीवन कार्य प्रगतीकडे नेत परिवाराला देखील तेवढेच प्रेम दिले. त्यांचे चिरंजीव स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी देखील सामाजिक कार्यात आपले नाव उंचावले असले तरी त्यांनी आई-वडिलांची सेवा केली. आई-वडिलांचे आशिर्वादाशिवाय आपली प्रगती नाही, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले. धांदरफळ बुद्रुक येथे स्व. भास्कर देशमाने यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्योजक भाऊसाहेब डेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, अशोक देशमुख, दिलीपराव शिंदे, माधवराव कानवडे आदी उपस्थित होते. देशमुख…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत. यासाठी डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपघाताबाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शिर्डी येथून आळंदी वारीसाठी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खंदरमाळ येथे नुकताच अपघात झाला असून यामध्ये चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दहा वारकरी जखमी झाले. घारगाव-संगमनेर दरम्यान डोळासने हे मध्यवर्ती सेंटर असून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले असते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – प्रसिद्ध वकील शरिफखान पठाण यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता या गुन्ह्यातील जखमी आरोपीच्या तक्रारीवरून पठाण यांच्यासह आठ जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील लोकांविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शरीफ पठाण, रिजवान पठाण, आसिफ पठाण, शफीक पठाण, फारुक पठाण, फरहान पठाण, आवेज मोमीन (तब्या) व तला शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी संध्याकाळी जुन्या भांडणाच्या कारणातून वकील शरीफ पठाण यांच्यासह त्यांच्या दोघा भावांवर हल्ल्याचा प्रकार घडला होता. आता या हल्ल्यातील विरोधी गटातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ प्रवीण पुरो राज्यातील पोलिसांनी गल्ले भरायला सुरुवात केलीय. त्यांना वसुलीचं टार्गेट दिलंय, असं काहीसं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडवून दिली होती. कोल्हे यांनी राज्यातल्या तमाम पोलिसांचा अवमान केला, पोलीस प्रशासनाची अवहेलना केली, अधिकार्यांची आणि त्यांच्या एकूणच ‘कर्तव्या’चा मत्सर केला, अशा काहीशा प्रतिक्रिया त्यानंतर पाहायला मिळाल्या. काही उत्साही पोलीस अधिकार्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने स्वत:ची पाठ थोपटून घेताना अमोल कोल्हे कुठे चुकले हे सांगण्याचा प्रयत्न केला. नाक्यावर वाहतुकीच्या नियंत्रणासाठी पोस्टिंग दिलेल्या महिला पोलिसांकडून सरेआम वाहन चालकांची लूट होत असते, त्यांना दिवसाकाठी २५ हजार रुपयांचं टार्गेट दिल्याचं कोल्हे म्हणाले…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – योगासनांच्या प्रचार-प्रसाराच्या कार्याचा भाग म्हणून देशभरात राबविल्या जाणार्या वेगवेगळ्या उपक्रमात महिलांसाठी होणार्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे विशेष आकर्षण असते. या स्पर्धांची घोषणा झाली असून येत्या २४ व २५ डिसेंबरला संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात त्या पार पडणार आहेत. महिलांच्या दोन वयोगटात होणारी ही स्पर्धा योगासनांच्या चार प्रकारांमध्ये होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी स्पर्धकांना क्षेत्रीय स्पर्धेत जाण्याचीही संधी मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली. या स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट् असोसिएशनने ‘अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत वुमेन्स लीग’ स्पर्धा आयोजित केली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या भांडणाच्या कारणातून संगमनेरमधील प्रसिद्ध वकील शरीफखान रशीदखान पठाण आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. रात्री शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक रज्जाक शेख, आयान सादिक शेख, इमरान बशीर शेख, जुनेद सादिक शेख, आयाज रज्जाक शेख, कदीर नुरमुहम्मद शेख व आशफाक इब्राहिम पटेल अशी हल्लेखोर आरोपींची नावे आहेत. पठाण यांनी आरोपी सादिक रज्जाक शेख याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केलेली चोरीची तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींकडून वकिलावर दबाव आणला जात होता. याच कारणातून शुक्रवारी सकाळी आरोपींनी ॲड. पठाण व त्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर (दि. १५ डिसेंबर) -राज्यातील प्रतिष्ठेची व नावाजलेली, क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागून असलेली सहकार महर्षी चषक लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जयहिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात १ ते १७ जानेवारी दरम्यान या स्पर्धा पार पडतील. यंदाचे वर्ष भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्ष असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातील निवडक ३२ संघांना या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुरुवारी दुपारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोघांना बाजूला घेतल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी देखील मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा करीत दोघाजणांनी त्यांच्या अंगावर कागदाचा गठ्ठा भिरकावत धावून जात “तुझे देख लुंगा, मै फिर यही दुकान लगाऊंगा” अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शेख रफिक एजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी आणि सारिज एजाज शेख उर्फ साऱ्या (दोघे रा. लखमीपुरा, संगमनेर) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या…
महाराष्ट्र संवाद न्यूज दूध दरवाढीसाठी आणि कांद्यावरील निर्यात बंदी हटविण्याच्या मागणीकरिता शिवसेना (उबाठा) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यात कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन होत आहे. शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) कोल्हार येथे दूध दरवाढ आणि सरकारने कांद्यावर लाभलेले निर्यात बंदी हटविण्यासाठी दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट, अशोक सातपुते, शहर प्रमुख आपा केसेकर, शहर संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, तालुकाप्रमुख (पठार भाग) संजय फड, गुलाब भोसले, समीर ओझा, योगेश बिचकर, बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान दिल्लीला जाण्यासाठी तिरुअनंतपुरम विमानतळावर जात असताना सीपीआय(एम) ची विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’च्या काही लोकांनी त्यांच्या वाहनाला धडक दिली. यावरून आपल्याला मारण्यासाठी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी गुंड पाठविल्याचा आरोप राज्यपालांनी केला आहे. यामुळे केरळमध्ये राजकीय गोंधळ वाढला आहे. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यातील संघर्ष देखील वाढला आहे. अपघातानंतर कारमधून लगेचच बाहेर आलेल्या राज्यपालांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होता. आपल्याला शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही घटना अपघात नसून जाणीवपूर्वक वैयक्तिक लक्ष्य करून केलेले कृत्य आहे. तिरुअनंतपूरमच्या रस्त्यांवर ‘गुंडांनी’ कब्जा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर, दि. १२ डिसेंबर – संगमनेर तालुक्यात नांदूर खंदरमाळ जवळ वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अधिवेशनात जाहीर केली. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. कार्तिकी एकादशी निमित्ताने शिर्डीहून आळंदीला जात असलेल्या दिंडीमध्ये ३ डिसेंबरला कंटेनर घुसल्याने चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातात दहा वारकरी जखमी झाले होते. वारकऱ्यांवर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत होते. आमदार थोरात यांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न…
