Author: Annant Ppangarkar

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क युवा सेनेच्या कामाला गती येण्यासाठी जेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक आहे तेथे, निश्चित बदल केला जाईल. मात्र ज्याचे काम चांगले आहे त्याचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी केले. साटम यांच्या उपस्थितीत शनिवारी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये युवा सेनेची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, कोपरगाव येथील युवा नेते भैय्या तिवारी, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, माजी शहर प्रमुख संजय…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) ईडीच्या नाचऱ्या मोराला न्यायालयाने अद्दल घडवली हे बरंच झालं. आपल्या मर्जीला येईल तसा सरकारी यंत्रणांचा वापर करू शकतो, असा अहंगड भाजप नेत्यांच्या डोक्यात गेला होता. 2014 पासून हे नेते सुटल्यासारखे वागत होते. ईडी आणि सीबीआयचा कसाही वापर करायचा आणि विरोधकांचा आवाज दाबायचा ही विकृती भाजप नेत्यांनी जोपासली होती. यातून सत्ता आणि मत्ताही हाती लागते. हे त्यांना ठावूक होतं. 2014 ची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फोडून भाजपने अशीच ताब्यात घेतली होती. पुढे हा मार्ग एकहाती अनुसरला गेला आणि फोडाफोडीचं घृण कृत्य भाजपने अवसरलं. लाचार झालेले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याव नोंद करण्याचे आदेश देण्यासाठी मॅडमनी एका मध्यस्थाच्या मार्फत तब्बल ५ लाखाची लाच मागितली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम ३ लाखावर आली आणि २ लाख रुपयांची रोकड स्विकारतांना मध्यस्थ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. मध्यस्थ जाळ्यात अडकताच तहसिलदार मॅडमच्या घरी लाच लुचपतने छापा टाकला आणि मॅडमलाही ताब्यात घेतले. नंतर मॅडमच्या घराची झडती घेतली असता तेथे ७५ हजाराची तर मुंबईतील विक्रोळी येथील घरात एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली. संपत्तीची मोजदाद सुरु केल्यानंतर मॅडमकडे तब्बल ६० तोळे सोने असल्याचे आढळून आले. एखाद्या सामान्य अधिकाऱ्याची ही कथा नाही तर ती आहे अलिबागच्या महिला तहसिलदारांची. मिनल कृष्णा दळवी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात एसएमबीटीच्या कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते, असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये आला. धूम्रपान करणाऱ्या कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तदेखील पडू लागल्याने मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णाची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असे घडत नसते. ती काही जादूची कांडी नाही. फिरवली की आला आणि गेला. कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आरोप कोणीही करू शकतो. मात्र आमचे सरकार उद्योगाला चालना देणारे उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणखीन एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तीन-चार महिन्यांपासून गेल्या अडीच वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे. विकास प्रकल्पांना वॉर रूममध्ये घेतले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जातोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि थांबलेल्या प्रकल्पांना पुढे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका लावला असताना गरिबासाठी अन्नदात्री ठरलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यभरात या थाळ्यांचे यशदा आणि टीस या दोन संस्थांमार्फत ऑडिट केले जाणार आहे. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारांच्या निर्णयांना जशी स्थगिती मिळाली तशाच पद्धतीने शिवभोजन थाळी देखील बंद केली जाण्याची चिन्हे होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्यभरात यशोदा आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने अकोले नगरपंचायतीला विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, याशिवाय पुढील काळात भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले असता त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव, तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेनेच्या आणखी एका खासदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. कीर्तीकर शिंदें सोबत गेल्याने स्थानिक लोकाधिकार समिती देखील त्यांच्या रूपाने शिंदे गटाची ताकद वाढविणारी ठरणार आहे. मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार कीर्तीकर यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षात प्रवेश केला. यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या आता तेरावर गेली आहे.…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, मात्र यातून जर कोणाचे पंचनामे करावयाचे राहिले असतील तर त्यांनी तातडीने तहसीलदारांकडे संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. अहमदनगर जिल्हयामध्ये ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासकीय स्तरावरून देण्यात आले होते. जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पावसामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 202236 शेतकऱ्यांचे 121628.88 हेक्टर क्षेत्राच्या शेती पिकांचे नुकसान झाले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 जणांविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये वर्तक नगर पोलिसांनी आव्हाड यांना अटक केली आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखविणे असल्याचा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान विवियाना मॉल मधील चित्रपटाचा शोध बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकांने शो बंद पाडल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले होते तसेच कोण जितेंद्र आव्हाड अशी विचारणा केली होती. यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दर्शकाला मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये आमदार आव्हाड यांच्यासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून नांदेडमध्ये असून गुरुवारी रात्री यात्रेत सहभागी झालेल्या दोघा यात्रेकरूंना ट्रकने उडविण्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये असून या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या यात्रेतून एक दुःखद घटना समोर आली. नवीन मोंढा परिसरातील सभा संपल्यानंतर यात्रा महादेव पिंपळगाव येथील कॅम्प कडे रवाना झाली. रात्री नऊच्या सुमारास पिंपळगाव येथील नांदेड अकोला पाळी चालणाऱ्या गणेशन (वय ६२वर्ष) आणि सययुल (वय ३० वर्ष) या दोघांना ट्रकने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा पुढे येऊ लागली आहे. वेगळ्या विदर्भ राज्यासाठी नितीन गडकरी यांच्यासह दहा खासदारांचा राजीनामा मागितला जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे. या संदर्भात समितीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांनी म्हटले आहे की, संसदेत या खासदारांनी विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी ठराव न केल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. विदर्भा संदर्भात खासदारांना प्रेम राहिले नसल्याने या खासदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना राजीनामा मागितला जाणार आहे. वेगळ्या विदर्भासाठी भुवनेश्वर मधील अधिवेशनात भारतीय जनता पक्षाने ठराव केला होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ करू असं आश्वासन यावेळी देण्यात आलं मात्र ते पाळले गेले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राजकारणातली कटूता संपली पाहिजे. एका पक्षाने ठरवून ती संपणार नाही. सर्वांनीच ती संपवली पाहिजे. पण सोबतच नेत्यांनी शांत राहायचं आणि कुणाला तरी बोलायला सांगायचं ही प्रथा पण बंद झाली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राजकारणातील कटूतेवर भाष्य केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राजकारणातील कटुता संपवायला हवी’ या आपल्या विधानाचा पुनरुच्चार करत खासदार राऊत यांना चिमटा काढला आहे. खासदार राऊत यांच्या जामीनाबद्दल माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, न्यायालयाने निर्णय दिला आहे. तो योग्य की अयोग्य यावर ईडी बोलेल, ते उच्च न्यायालयात गेले आहे. त्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘विशेष मोहीम’ राबविण्यात आली. या मोहीमेत बारा तासाच्या आत 142 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले. शैक्षणिक प्रकरणांच्या त्रुटी पूर्ततेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. सध्या सीईटी-नीट परीक्षेच्या प्रवेश फेऱ्या चालू आहेत. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची शैक्षणिक कागदपत्र जमवाजमव करण्याची धावपळ सुरू आहे. या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अखंड भारताची संकल्पना घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील या यात्रेत जनसागर उसळला असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हजारो कार्यकर्ते यात्रेत सहभागी होत आहेत. कन्याकुमारी येथून निघालेली ही भारत जोडो यात्रा ६० दिवसांचा प्रवास करून ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूरला आली. तेथे काँग्रेसच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभारी एच. के .पाटील, पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संजय राऊत यांच्या धाडसाचं तसेच त्यांच्या कुटुंबीयांचही कौतुक वाटतं. संजयला बेकायदेशीररित्या पत्राचाळ प्रकरणात अडकवण्यात आल. मी न्यायदेवतेचे आभार मानतो, कारण त्यांनी योग्य तो न्याय केला. या प्रकरणावरून सिद्ध झाले की केंद्रीय तपास यंत्रणा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करत आहे. खासदार राऊत यांनी जामीनावर सुटल्यानंतर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. खासदार राऊत यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात नवं सरकार सत्तारूढ झाल, त्यावेळी मी तुरुंगात होतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातल्या सरकार तेच चालवत आहे आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या फडणीसांविषयीच्या कौतुकास्पद उद्गाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बुधवारी रात्री तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन विहित मुदतीत न दिल्याच्या कारणावरून आणि उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करत शासनाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावरून तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. असे असताना देखील राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही. पुरेसे अनुदान उपलब्ध करून देऊन देखील वेळेत शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे. वितरित करण्यात आलेले अनुदान हे केवळ नियमित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते व खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुगांतून तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर सुटले आहे. शिवसेनेची बुलंद तोफ असलेले राऊत तीन महिन्यानंतर पुन्हा परतले असून ‘टायगर इज बॅक’ अशा घोषणा देत संगमनेरमध्ये त्यांच्या सुटकेचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.बसस्थानक चौकात शहरप्रमुख प्रसाद पवार, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जालिंदर लहामगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जालींदर लहामगे आदींसह शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या सुटकेचे स्वागत केले. फटाक्याच्या आतीषबाजीने बसस्थानकाचा परिसर दुमदुमला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल १०१ दिवस तुरुंगात असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी त्यांची आर्थररोड कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊतांची सुटका झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. गळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे कारागृहाबाहेरील परिसर कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. बाहेर येताच राऊत यांनी स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि गाडीत बसून गेले. यावेळी माध्यमांशी…

Read More