Author: Annant Ppangarkar
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पात पालकमंत्र्यांनी मोडता घालू नये; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा घणाघात
संगमनेर, प्रतिनिधी – नाशिक-पुणे रेल्वे सर्व मार्गे होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे मात्र बदल करण्यात आलेला प्रकल्पाच्या माध्यमातून पालकमंत्री संगमनेर आणि अकोले या दोन तालुक्यांमध्ये वादाची ठिणगी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप करत पालकमंत्र्यांनी या मार्गामध्ये मोडता घालण्याचे काम करू नये असा घणाघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेली रेल्वेची आखणी तांत्रिकदृष्ट्या योग्य होती. पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि हा प्रकल्प मूळच्या सरळ मार्गानेच…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांना स्व. राधावल्लभ कासट, स्व. कुंदनसिंग परदेशी आणि स्व. कैलास (आप्पा) केसेकर यांची नावे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन पालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना दिले आहे. निवेदनानुसार, या तिन्ही नेत्यांनी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी राबविलेले विविध उपक्रम आणि सामाजिक कार्याचा ठसा आजही जनमानसात उमटलेला आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श नवीन पिढीसमोर राहावा आणि त्यांच्या…
मुंबई, विशेष प्रतिनिधी राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या कोट्यातून ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत थोरात यांच्या नावावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, त्यांच्या नावामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला दिल्लीच्या राजकारणात मोठी संधी मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया २६ मार्चपासून सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू आहेत. या जागेसाठी सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा झाली होती, तर शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने आपला उमेदवार देण्याचा विचार सुरू…
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अलाईनमेंटवरून (मार्ग निश्चिती) सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. हा रेल्वे प्रकल्प कोणत्याही अनावश्यक वळणाशिवाय मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गानेच व्हावा, या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अधिवेशनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तांत्रिक बाजू तपासण्यासाठी केंद्रातील तज्ज्ञ सल्लागारांची एक विशेष उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे. ही समिती पुढील ३ ते ४ महिन्यांत आपला सविस्तर अभ्यास अहवाल सरकारला सादर करेल. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख औद्योगिक शहरांना जोडणारा हा प्रकल्प…
संगमनेर, प्रतिनिधी – साखर कारखानदारी हा राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाचा स्तंभ आहे. या माध्यमातून सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा महसूल मिळतो. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार या क्षेत्राला दर दहा वर्षांनी नैसर्गिक किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशा कठीण काळात सरकारने कारखानदारीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सरकारने साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे, एमएसपी (आधारभूत किंमत) ४ हजार रुपये करावी, बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि पेट्रोलला सक्षम पर्याय असलेल्या इथेनॉलला योग्य भाव द्यावा, अशा विविध प्रोत्साहनपर योजना तातडीने राबवाव्यात, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…
संगमनेर, प्रतिनिधी – बालरंगभूमीच्या माध्यमातून संगमनेर येथे आगामी काळात विविध कार्यशाळा आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार असून, हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बालरंगभूमीच्या अध्यक्षा तथा ख्यातनाम अभिनेत्री ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेतर्फे दि. ग. सराफ विद्यालयातील बंडूलाल बाफना सभागृहात आयोजित १७ व्या कला स्पर्धा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. बाल शिक्षण मंडळाच्या सचिव नीलाताई जोशी आणि संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना नीलम शिर्के यांनी कलेच्या माध्यमातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर : पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका युवकाला मारहाण करत त्याची दुचाकी आणि रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांना पाथर्डी पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी पाचपैकी तिघा आरोपींना अटक केली असून, यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, माणिकदौंडी चौक परिसरातील फ्लेक्स व्यावसायिक अमिर हबिब शेख हे २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बॅनर लावण्यासाठी घराबाहेर पडले असता, त्यांच्या दुचाकीची वायर तोडत असलेल्या पाच संशयितांना त्यांनी हटकले. यावेळी आरोपींनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
संगमनेर, प्रतिनिधी – काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संगमनेरमध्ये उमटले आहेत. राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र (TEAM RGSS) यांच्या वतीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून न्याय मिळवून द्यावा, अशी भावना यावेळी उपस्थित समर्थकांनी व्यक्त केली. पुणे येथे तुषार दामगुडे नामक व्यक्तीने हनुमंत पवार यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये अशा हिंसक घटनांना स्थान नसून हा हल्ला लोकशाही मूल्यांवर झालेला मोठा आघात आहे. राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला असून पोलीस…
दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल आणि नवीन करारातून लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला आज मोठ्या संकटातून वाचवू शकतो. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी असेल. कामाचा…
मुंबई: संगमनेर शहराच्या सुनियोजित विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि ‘व्हिजन २.०’ ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिका अभ्यास दौरा सुरू आहे. शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून आधुनिक नागरी सुविधा आणि प्रगत व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीचे सर्व नगरसेवक व नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ वॉर्ड कार्यालयाला भेट दिली. यावेळी प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि वेगवान निर्णयांची प्रक्रिया समजून घेण्यावर…
संगमनेर, प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त निर्मित ‘शतक’ या चित्रपटाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असताना, संगमनेरमधील मालपाणी मल्टीप्लेक्समध्ये अद्याप हा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देऊन तातडीने शो सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालपाणी मल्टीप्लेक्सच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रदीर्घ समाजकार्याचा इतिहास आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, हा ‘शतक’ चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. स्थानिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता असूनही तो प्रदर्शित…
संगमनेर | अनंत पांगारकर – संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवंश हत्या आणि अवैध मांस विक्रीचे प्रमाण वाढल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील सराईत कसाई आणि गो-तस्करांच्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्याला असलेला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी गोवंश हत्या रोखणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अनेकदा कारवाया…
संगमनेर | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महिला व युवतींच्या सक्षमीकरणाचा वारसा पुढे चालवत, संगमनेरमध्ये एकविरा फाउंडेशनच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत ७ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत टेनिस बॉल क्रिकेट, रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा रंगणार आहेत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेर मध्ये या स्पर्धा होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धांचे हे सलग पाचवे वर्ष असून, अल्पावधीतच या उपक्रमाने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय विद्यार्थिनींपासून…
दैनिक राशीभविष्य: २४ फेब्रुवारी २०२६ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचा ठसा उमटेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. आर्थिक आघाडीवर काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मात्र, घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. वृषभ आज तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे नियोजित बजेटनुसार चालावे. व्यवसायात मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. संवादातील गोडव्यामुळे कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. आरोग्यासाठी योगासने आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मिथुन तुमच्यासाठी आजचा दिवस प्रगतीकारक असेल. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान…
संगमनेर | अनंत पांगारकर सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या अधिष्ठानाची नितांत गरज आहे. या महापुरुषांचे विचार पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न हे लोकशाहीसाठी घातक असून, त्यांना नाकारणे म्हणजे आधुनिक भारताच्या अस्तित्वालाच नाकारण्यासारखे आहे, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी केले. संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘सत्यशोधक व्याख्यानमाले’तील दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. “गांधी, नेहरू का नकोत?” या विषयावर रविवारी व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या व्याख्यानासाठी जनसमुदायाची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय थोरात होते, तर व्यासपीठावर…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर नगरपरिषदेच्या विशेष अर्थसंकल्पीय बैठकीत सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावित केलेल्या करवाढीला शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी तीव्र विरोध दर्शवला. पालिकेच्या या बैठकीत जनसामान्यांवर लादल्या जाणाऱ्या संभाव्य दरवाढीवरून जोरदार चर्चा झाली, यामध्ये सूर्यवंशी यांनी आक्रमक भूमिका घेत सर्वसामान्यांची बाजू लावून धरत या दरवाढीला तीव्र विरोध दाखविला. यासंदर्भात त्यांनी, नगराध्यक्ष, पीठासन अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे आपला लेखी विरोध सादर केला. या अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वीच शहरात मोठ्या प्रमाणावर करवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. संगमनेर नगरपालिकेतील एकमेव विरोधी नगरसेविका सूर्यवंशी यांच्यासह व्यापाऱ्यांनी या दरवाढीबाबत आधीच चिंता व्यक्त करत आपला विरोध नोंदवला होता. वाढत्या लोकभावनेची दखल घेत आमदार सत्यजित तांबे यांनी संबंधितांची बैठक…
संगमनेर, प्रतिनिधी – सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य आणि आदर्श संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ बुधवारी (२५ फेब्रुवारी) होणार आहे. सकाळी ९ वाजता आयोजित या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांचा वारसा जपत या कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने दिलासा दिला आहे. यंदाच्या हंगामातही कमी पर्जन्यमान आणि ऊस टंचाईचे आव्हान असताना, कारखान्याने यशस्वीरित्या गाळप पूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात एकीकडे पोलीस कडेकोट बंदोबस्त आणि रूटमार्च काढून आपण सज्ज असल्याचे मिरवत असताना, दुसरीकडे गुन्हेगारांनी पोलिसांना उघड आव्हान दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात नशेबाजांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून किरकोळ कारणावरून इंदिरानगरमध्ये रविवारी रात्री एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील रहिवासी आणि रुद्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रोहित वाळके याच्यावर अज्ञात इसमाने कोयत्याने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की रोहित वाळके यामध्ये गंभीर जखमी झाले असून…
संगमनेर, प्रतिनिधी – रोटरी क्लब संगमनेरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंदी रस्ते’ या उपक्रमाने रविवारी संगमनेर शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण केले. रोटरी इंटरनॅशनलच्या १२१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या सोहळ्याला संगमनेरकरांनी आबालवृद्धांसह मोठी गर्दी करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रो. दिलीप मालपाणी यांनी दहा वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये रुजवलेली ही संकल्पना आता जनचळवळ बनली आहे. यावर्षीच्या उपक्रमात सांस्कृतिक आणि…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नगरपरिषदेचा महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कर वेळेत भरणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व मालमत्ता व पाणीपट्टी कर धारकांनी आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा वेळेत करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा डॉ. सौ. मैथिली तांबे यांनी केले आहे. विशेषतः ज्या मालमत्ता धारकांकडे अनेक वर्षांपासून कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्यासाठी नगरपरिषदेने ‘अभय योजना’ जाहीर केली असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीनुसार, थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या करावर दरमहा दोन टक्के या दराने शास्ती (दंड) आकारली जाते. मात्र, अभय योजनेअंतर्गत या शास्तीच्या रकमेत ५०…
