Author: Annant Ppangarkar
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या…
मुंबई, दि. २ जुलै २०२५: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कधीही न झालेल्या थेट मुलाखतींद्वारे तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आणि ॲड. गणेश पाटील यांचा समावेश आहे. पक्ष निरीक्षकांनी केलेल्या शिफारसी आणि मुलाखतींच्या आधारे ही…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील…
पंढरपूर: आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, महाराष्ट्र राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आता 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, वारीदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. आता या नव्या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे…
अहिल्यानगर: बिगरशेती (Non-Agriculture – NA) कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत, सातबारा उताऱ्यांमध्ये विनापरवाना फेरफार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या गंभीर प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांचीही चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली असून, यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जवळपास वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण असून, या प्रकरणी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे, आणि महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?- संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील जागांशी संबंधित हे प्रकरण आहे. ४२ ब, ४२…
महाराष्ट्र संवाद न्यूज: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नवनियुक्त नाशिक महानगरप्रमुख सुनील बागुल यांचे खंदे समर्थक मामा राजवाडे यांच्यासह अन्य काही जणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून तोडफोड करणे, मारहाण करणे, चोरी करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे आरोप त्यांच्यावर आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस समर्थक आणि सराफ व्यावसायिक किशोर उर्फ गजू घोडके यांनी ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांच्या गैरव्यवहाराचे आरोप करणारे व्हिडिओ २७ जून रोजी फेसबुकवर अपलोड केले होते. बागुल यांनी समाजसेवेच्या नावाखाली पैशांचा गैरव्यवहार करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप घोडके यांनी या व्हिडिओतून केला होता…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द आणि बुद्रुकला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन प्रवरा नदीवरील पुलासह राज्यातील जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली आहे. याशिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांच्या दिरंगाईवरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार खताळ यांनी हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रवरा नदीवरील हा पूल वाहतुकीसाठी जुना झाला असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. याचवेळी, संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारी रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उचलून धरला. शासन निधी उपलब्ध करून देत असतानाही कामे वेळेत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत न्यायालयाच्या दोन लिपिकांना 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. भाडेकरूकडून सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी या लिपिकांनी सदनिका मालकाकडून लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाचे लिपिक रवींद्र हिंदुराव पवार (40) आणि अमित बबन भुसारी (34) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात कार्यरत आहेत. सिंहगड रोड येथील हिंगणे खुर्द येथील विशाल पार्क सोसायटीत तक्रारदारांची सदनिका आहे, ती त्यांनी भाड्याने दिली होती. भाडेकरू सदनिका सोडण्यास तयार नसल्याने तक्रारदारांनी भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल…
अहिल्यानगर: प्रेमाचे नाटक करत, अल्पवयीन मुलीचे (वय १७) फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने सोमवारी (३० जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, कर्जत येथील एका अल्पवयीन मुलावर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील रहिवासी असलेली पीडित मुलगी कर्जत येथील महाविद्यालयात शिकत असताना, डिसेंबर २०२४ मध्ये तिची व्हॉट्सअॅपवरून संशयित आरोपीशी ओळख झाली. जानेवारी २०२५ मध्ये त्यांची कर्जत येथील कॅफेमध्ये पहिली भेट झाली. यानंतर मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला नकार दिल्यानंतर, पीडिता ‘नीट’ परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. याच…
जामखेड: जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती कैलास वराट यांच्या विरोधात बाजार समितीच्या १२ सदस्यांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला आहे. वराट हे बाजार समितीच्या सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याची तक्रार या सदस्यांनी केली असून, त्यांना उपसभापती पदावरून दूर करण्याची मागणी अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ नुसार, जिल्हाधिकाऱ्यांना असे पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत समितीची विशेष सभा बोलावून या विषयावर समिती सदस्यांच्या मतदानाद्वारे निर्णय घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर…
संगमनेर, प्रतिनिधी- खरीप हंगामाच्या सुरुवातीला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असली तरी, युरियाच्या तुटवड्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत राज्याचे माजी कृषी मंत्री आणि काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेतली. त्यांच्या सूचनेनुसार, कृषी विभागाने सोमवारी शेतकऱ्यांसाठी युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाला बफर स्टॉक मधील 50% युरिया तात्काळ उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. शेतकरी हा देशाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत करावी, अशी भूमिका थोरात यांनी नेहमीच मांडली आहे. थोरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात गौण खनिज आणि वाळू तस्करीचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील चारही दिशांना वाळू, मुरूम, खडी, डबर आणि मातीसारख्या गौण खनिजांची सर्रासपणे तस्करी सुरू आहे. निमज गावाच्या शिवारात खासगी रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुरूमाचा अवैध उपसा करून वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती स्थानिक तलाठी यांना मिळाल्यानंतर, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतला. मात्र, कारवाई सुरू होताच जेसीबीसह इतर ट्रॅक्टर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संगमनेर तालुक्यातील नद्यांचे आणि जमिनीचे अक्षरशः लचके तोडले जात आहेत. राजकीय दबावामुळे कर्मचारी आणि…
संगमनेर, अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेरच्या जमजम कॉलनीत एका पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून 2700 किलो गोमांसासह एकूण 34 लाख 84 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या कारवाईत देखील आरोपी नेहमीप्रमाणे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. संगमनेर शहर आणि तालुका पोलीस अवैध कत्तलखान्यांवर नियंत्रण असल्याचा कितीही दावा करत असले तरी, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे त्यांचे पितळ उघडे पडले. संगमनेरातील गोवंश कत्तली राजरोसपणे सुरू असल्याचे आणि स्थानिक पोलिसांचा याकडे असलेला अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा यामुळे समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, रणजीत जाधव, बाळासाहेब…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहर आणि तालुका हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच एकसंध परिवार म्हणून राहिला आहे, मात्र काही लोक राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून यंग नॅशनल ग्राउंडच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि कामाला सुरुवातही झाली होती. मात्र, हे काम कोणी थांबवले, हे सर्वांना माहीत आहे, असे अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद शेख यांनी म्हटले आहे. जावेद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले की, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विभागात विकासाच्या अनेक योजना राबवण्यात आल्या. एसटीपी प्लांटच्या जागेचा वाद असो किंवा इतर विकासकामे, नेतृत्वाने नेहमीच सर्व जनतेला…
मुंबई, विशेष प्रतिनिधी: महायुती सरकारने तृतीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या आपल्या निर्णयाला अखेर स्थगिती दिली आहे. मराठी भाषिक संघटना आणि राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होत असताना, ५ जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि आदित्य ठाकरे) प्रस्तावित मोर्च्याआधीच हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय मराठी भाषेवर अन्याय करणारा असल्याची टीका होत होती. या वाढत्या विरोधाची दखल घेऊन सरकारने हा निर्णय मागे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटार स्वच्छता आणि रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश आमदार अमोल खताळ यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहेत. दिल्ली नाका येथील नागरी दलितोत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार काँक्रिटीकरण आणि सर्व्हिस रोड तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार खताळ म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून शहरावर ज्यांची सत्ता होती, त्यांनी गटारी आणि रस्त्यांच्या कामाचे ठेके त्यांच्याच ठेकेदारांना दिले. मोर्चा काढायलाही तेच ठेकेदार पुढे होते. त्यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे: रस्त्यावरून चाललेल्या एका तरुणाचे अपहरण करून, केवळ दोन हजार रुपयांसाठी त्याचा निर्घृण खून करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ४० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली, यामुळे आरोपींना शिक्षा होण्यास मदत झाली. पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुमित ऊर्फ सोन्या सुधीर काळे आणि अक्षय ऊर्फ भीमा बाळू दिवटे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. जन्मठेपेसोबतच प्रत्येकाला सहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ही दुर्दैवी घटना १८ मार्च २०१७ रोजी सकाळी आठच्या…
बीड: अकरावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी बीड पोलिसांनी उमाकिरण शैक्षणिक संकुलातील दोन शिक्षकांना अटक केली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या आरोपी शिक्षकांची नावे आहेत. शनिवारी, (२८ जून) मध्यरात्री बीड तालुक्यातील मांजरसुभा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलात ही विद्यार्थिनी अकरावीत शिक्षण घेत होती. ३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांनी तिला वारंवार आपल्या केबिनमध्ये बोलावले. तिथे त्यांनी तिचा लैंगिक छळ केला. इतकेच नाही तर, तिला नग्न करून तिचे फोटोही काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी,…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नगर परिषदेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी दिलेल्या ठेकेदाराच्या कामात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केला आहे. ठेकेदार काही विशिष्ट लोकांची जनावरे पकडून ती पुन्हा पिंजऱ्यातून सोडून देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील घासबाजार, देवी गल्ली यासह इतर भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने एका ठेकेदाराला काम दिले आहे. मात्र, ठेकेदाराकडून या कामात अनियमितता केली जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. काही जनावरे पकडल्यानंतर ती पुन्हा…
काँग्रेस नेत्या आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणलेल्या 21 महिन्यांच्या आणीबाणीला 50 वर्षं पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करून भाजप आणि त्यांच्या सत्तेने स्वत:ची खाज भागवून घेतलेली दिसते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या 352(1) या कलमाचा आधार घेत तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहंमद यांनी आणीबाणी लागू करायला संमती दिली आणि त्या दिवसापासून आणीबाणी लागू झाली. 25 जून 1975 हा तो दिवस. मध्यरात्री रेडिओवरून या आदेशाची स्वत: इंदिरा गांधींनी घोषणा केली. या दिवशी लागू झालेल्या आणीबाणीला 50 वर्षं पूर्ण झाल्याचं निमित्त करत सत्ताधार्यांनी निषेधाचा ठराव पारित करून निर्लज्जपणा सिध्द केला. सत्ता चालवण्यात येत असलेल्या अपयशापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी जे काही…
