Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी: कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रॉम्बे पोलिसांच्या मोहल्ला कमिटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एका हॅकरने प्रवेश करत एपीके (APK) फाईल शेअर केली. या फाईलवर क्लिक करताच एका पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल साडेसात लाख रुपयांना फसवणुकीचा फटका बसला आहे. सायबर भामट्याने त्यांच्या नावाने कर्ज काढून ती रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस आणि सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणारे एक पोलीस शिपाई सप्टेंबर २०२४ पासून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार आणि…

Read More

मुंबई: नियंत्रक शिधा वाटप व संचालक कार्यालयातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम याला गॅस एजन्सी चालकाकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल, (२९ जुलै) रंगेहाथ पकडले. निकमने मासिक ‘हफ्ता’ म्हणून ही रक्कम मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कांदिवली येथील एका गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या नातेवाईकांची ठाण्यात गॅस एजन्सी आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर, तर ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या ठाणे येथील गॅस एजन्सीवर कारवाई केली होती. १६ जुलै २०२५ रोजी निकमने तक्रारदारांना कार्यालयात बोलावले. १७ जुलै रोजी झालेल्या भेटीत निकमने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर पुढील कारवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (आज) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते. या निर्णयांमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करणे, १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारणे, ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे, अशा विविध घोषणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने घेतलेले प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे:  * ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’: राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबवले जाईल. एकूण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी:  आमदार सत्यजित तांबे मित्र परिवार आणि जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यावतीने संगमनेरकरांना नागपंचमीच्या शुभेच्छा देणारा फलक विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने फाडला असल्याचा प्रकार मंगळवारी पुन्हा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात राजकीय वर्चस्वातून फ्लेक्स फाडले जात आहेत की नशेडी, गंजडी हे प्रकार करत आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या मुक्त आशीर्वादाने संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये फ्लेक्स वॉर सुरू आहे. आम्हीच कसे समाजाचे उद्धारकर्ते आहोत हे फ्लेक्स च्या माध्यमातून दाखविण्याच्या नादात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त –  अनंत पांगारकर – संगमनेर:  माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे बाळकडू मिळालेले आमदार सत्यजित तांबे यांनी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीत कार्यरत असलेल्या तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील यांच्यासह समाजातील विविध घटकांचे ११४ प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या सर्व प्रश्नांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे आणि आगामी काळात त्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सोशल माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले. संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एनएसयूआय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – अहिल्यानगर:  महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा मोठ्या वादंगात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण आले असून, देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी आधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी संशयास्पद परिस्थितीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शनिशिंगणापूर आणि अहमदनगर जिल्ह्याभरात “देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि चौकशीच्या भीतीमुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का?” अशा चर्चांना उधाण आले आहे. गावातील अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त – पुणे:  दारूचे व्यसन सोडण्यास नकार देणाऱ्या पतीसोबत नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती प्रेम जाधव (वय २७) याला अटक करण्यात आली आहे. ममता जाधव (वय २१) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी रेश्मा राठोड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ममता जाधव आणि आरोपी प्रेम जाधव यांचा विवाह २०२० मध्ये झाला होता. प्रेम जाधव याला दारूचे व्यसन होते. ममता वारंवार दारू सोडण्याची विनंती करत होती, परंतु प्रेम दारू सोडत नव्हता. याच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त राहुरी: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.  राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई:  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. तब्बल २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६ लाख ३४ हजार लाभार्थी विविध कारणांमुळे अपात्र ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या योजनेचा लाभ १४ हजार २९८ पुरुषांनीही घेतल्याचे उघड झाले आहे. या अपात्र लाभार्थ्यांमुळे गेल्या वर्षभरात राज्याचे सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (२७ जुलै) समाजमाध्यमांवर स्वतः अपात्र लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर या योजनेतील अर्जांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  शांतता, समृद्धी आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक असलेल्या संगमनेर तालुक्यात गेल्या आठ महिन्यांपासून अशांततेचे आणि तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप होत आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शुभेच्छा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजात अशांतता पसरवणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वडगाव पान येथील टोलनाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिरापाशी श्रावण मासानिमित्त बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावण्यात आला होता. मात्र, श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी काही समाजकंटकांनी या फ्लेक्सची छेडछाड केल्याचा प्रकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  पुणे:  पुणे शहरानजीकच्या खराडी भागात सुरू असलेल्या एका हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत तिचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. खेवलकर हे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती असल्याने या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘हाऊस पार्टी’च्या नावाखाली सुरू असलेल्या या पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिला आणि पाच पुरुष अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली…

Read More

हिंदी सक्तीच्या मुद्यावर सातत्याने पळ काढणार्‍या राज्यातल्या युती सरकारच्या मौनी भूमिकेचा परप्रांतीय कसा फायदा घेतात हे सातत्याने समोर येत असताना महाराष्ट्राविषयी आग ओकणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडूकला खासदार निशिकांत दुबे याला भर संसदेच्या लॉबीत खडेबोल सुनावणार्‍या काँग्रेस पक्षाच्या महिला खासदार रणरागिणींचं करावं तितकं कौतुक कमीच. या खासदारांनी महाराष्ट्राची मान ताठ केलीच नाही तर तमाम मराठी माणसाला त्याच्या स्वत्वाचीही जाणीव करून दिली. इनमीन तीन महिला खासदारांच्या या अवतारामुळे सत्तेचा माज चढलेल्या निशिकांतला या महिलांच्या गराड्यातून पाय काढता घेणंही अवघड झालं आणि ‘आप हमारी बहेन है’, असं सांगत त्याला पळ काढावी लागली. मराठीबाणा काय असतो, हे दाखवणार्‍या धारावीच्या वर्षा गायकवाड, धुळ्याच्या शोभा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर/संगमनेर:  एक महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर येत आहे. संततधार पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना विशेषतः प्रवरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नदीपात्रात न उतरण्याचे आणि आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू-  अहिल्यानगर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता भंडारदरा धरणातील एकूण पाणीसाठा ९१६५ दशलक्ष घनफूट (दलघफु) इतका झाला होता. धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS)…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त रत्नागिरी:  संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील कोसुंब रेवाळेवाडी येथे सासऱ्याने घरातील कामे सांगितल्याच्या रागातून सुनेने जेवणात विषारी द्रव्य मिसळून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पतीलाही विषबाधा झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. देवरूख पोलिसांनी संबंधित सुनेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (वय ३४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव स्वप्नाली सचिन सोलकर (वय ३२) असे आहे. सचिन आणि स्वप्नाली यांचा विवाह याच वर्षी १३ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. स्वप्नालीला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे आणि इतर कामे व्यवस्थित करण्यास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त भंडारदरा, दि. २६ जुलै:  भंडारदरा व निळवंडे परिसरात पर्यटनविकासातून रोजगारनिर्मिती साधण्यासाठी जलसंपदा विभागाच्या जागा अतिक्रमणमुक्त करून विकसित करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. राज्य शासनाच्या ‘हरीत महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या १० कोटी वृक्षलागवड मोहिमेत जलसंपदा विभागाने सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ भंडारदरा येथे जलसंपदा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, कार्यकारी अभियंता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  संगमनेर, प्रतिनिधी: विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या शुभेच्छा फलकासह शहरात लावण्यात आलेला माजी खासदार सुजय विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार खताळ यांचा खांडगाव फाट्यावरील फिक्स फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्या पाठोपाठ हा दुसरा प्रकार समोर आला. अकोले नाका येथे जाजू पेट्रोल पंपासमोर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या फ्लेक्स लावण्यात आला होता या फ्लेक्स वर असलेले माजी खासदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त अहिल्यानगर:  एका कांदा व्यापाऱ्याला ट्रान्सपोर्टद्वारे कांदा विक्री करूनही २६ लाख ४१ हजार ३७९ रुपये न मिळाल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आंधळे यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केटमध्ये कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० या कालावधीत मोहम्मद नदिम (रा. सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश), अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन आणि छोटे मिया अँड कंपनी (पूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त  शासनाकडून भरमसाट पगार मिळत असतानाही, अतिरिक्त कमाईच्या हव्यासापोटी लाच मागणाऱ्या चार महसूल अधिकाऱ्यांसह एका मजुराला यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ गुरुवारी (२४ जुलै २०२५) ही कारवाई करण्यात आली. मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा असताना, मंडळ अधिकारी जितेंद्र पांडुरंग ठाकरे (५७), ग्राम महसूल अधिकारी जय गणेश सोनोने (२६), पवन तानसेन भितकर (३०) आणि नीलेश भास्कर तलवारे (३०) यांनी कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराकडे मुरूम वाहतुकीच्या सर्व कायदेशीर पावत्या असतानाही, या कर्मचाऱ्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या (राजहंस दूध संघ) संचालकपदी खांडगाव येथील रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २५ जुलै २०२५ रोजी राजहंस दूध संघ येथे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपनिबंधक सहकारी संस्था संगमनेर तथा अध्यासी अधिकारी संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळातील रिक्त जागेवर गुंजाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्राचे राजकारण सध्या प्रचंड गदारोळात आहे. केवळ सत्तेच्या सिमेंटमुळे महायुती सरकार राज्यात टिकून असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असून, जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळल्याचा ठपका ठेवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना महायुती सरकारवर तोफ डागली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली, पण त्यांना काहीही दिले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही फसवणूक केली आहे, असे थोरात म्हणाले. थोरात यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर आणि वाढत्या भ्रष्टाचारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.…

Read More