Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर, दि. ७ – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित आवश्यक निधीसह प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे धार्मिक पर्यटनात मोठी…
अहिल्यानगर दि. ७- शासनाच्या ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्तनोंदणी जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र एस. महाबरे यांनी दिली आहे. शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम १ मे पासून सुरु केला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातील समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावाचे, मौजेचा दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यावर पुढील काळात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ यावर अंमलबजावणी होणार…
नवी दिल्ली- अखेर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईमुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रत्येक भारतीयाची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांची अचूक माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यावर अचूक हल्ला चढवला. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या एअर स्ट्राईकनंतर देशात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमाभागावर विशेष लक्ष ठेवले जात असून, कोणत्याही…
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची आज, मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या ऐतिहासिक बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विविध सामाजिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा मिळणार आहे, तसेच राज्यातील महिला, धनगर समाज आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे: *…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान येथील उपबाजारात आज (मंगळवारी ६ मे) लूज कांद्याच्या लिलावाला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. बाजारात तब्बल ३४ ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला उच्चांकी १२७३/- प्रति क्विंटल भाव मिळाला, तर गोल्टी कांद्याने ५०० ते ८०० प्रति क्विंटलचा भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे. वडगावपान उपबाजारात कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याने त्यांना हा बाजार सोयीस्कर वाटत आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी आपला लूज कांदा विकल्यानंतर त्यांना त्वरित…
नवी दिल्ली- राज्यात तब्बल चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (६ मे २०२५) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येत्या चार महिन्यांच्या आत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. राज्यातील प्रमुख महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगर पालिकांच्या निवडणुका मागील जवळपास पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित होत्या. या दिरंगाईमुळे राज्यात प्रशासकीय राजवट लागू असल्याची…
अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे धनगरी काठी, घोंगडी, अहिल्यादेवींची मूर्ती आणि पुस्तक देऊन पारंपरिक स्वागत केले. मंत्र्यांसाठी खास कांस्य धातूच्या थाळी-वाट्यांमध्ये पुरणपोळी, आमरस, शिपी आमटी, मासवडी अशा १८ पदार्थांची मेजवानी असून कर्जतची खास ओळख असलेली शिपी आमटी स्थानिक महिलांकडून तयार करून घेण्यात आली. एका कास्य थाळीची किंमत ३,९९९ रूपये आहे. ग्रामीण भागात पहिल्यांदाच होत असलेल्या या बैठकीसाठी चौंडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे स्वतः दोन…
घारगाव (संगमनेर) घारगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, संगमनेरच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) थांबवून तपासणी केली असता या गाडीतून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) सकाळी ११:०० वाजता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घारगावातून संगमनेरच्या दिशेने एका पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. आमदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी स्वतः कारवाई करत रविवारी रात्री समनापूर येथून वाळू भरून रायतेवाडीकडे निघालेला डंपर तनपुरवाडी रस्त्यावर पकडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोन वाळू तस्करांसह डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी रात्री जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावर वाळूने भरलेला डंपर येताना दिसला. तात्काळ त्यांनी आपले वाहन थांबवून डंपर चालकाची विचारपूस केली असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाणीवाटपावरून संगमनेर तालुक्यात संघर्ष पेटला आहे. जलसंपदा विभागाच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत, “आम्हालाही सहआरोपी करा,” अशी मागणी केली आहे. सध्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातील अनधिकृत पाइपलाइन काढण्याची मोहीम जलसंपदा विभागाने हाती घेतली होती. मात्र, शेतकऱ्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचे नेतृत्व करत इंद्रजीत थोरात यांनी प्रशासनाच्या भूमिकेला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निमगाव पागा ते खळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे कालव्यातील पाणीवाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा विभागाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. “लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला त्यांच्या हक्काचे पाणी मिळायलाच हवे आणि ही पाटबंधारे विभागाची जबाबदारी आहे. यासाठी योग्य वेळापत्रक तयार करून ते काटेकोरपणे पाळले जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे,” असे मत थोरात यांनी व्यक्त केले. थोरात म्हणाले की, हा प्रश्न केवळ राहुरी किंवा राहत्याला पाणी देण्यापुरता मर्यादित नाही, तर ज्यांचा हक्क आहे, त्यांना पाणी मिळायलाच पाहिजे. या संदर्भात पाटबंधारे विभागाचा संवाद कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चेतून मार्ग काढण्याची आवश्यकता…
महाराष्ट्र संवाद न्यूज – सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोखा असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठे पदाधिकारी अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्या विरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांची फसवणूक उघडकीस आली असून, फसवणुकीचा आकडा ९ कोटी ४९ लाख ३५ हजारांवर पोहोचला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भात राहुल रामराजे मक्तेदार…
काँग्रेस रिकामी करा, फोडा आणि त्यांना आपल्याकडे आणा… बड्या मंत्र्याचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र!
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे “काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा,” असा कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना दिला. भाजपच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसचे लोक आपल्याकडे आले तरी तुमचा आधी विचार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात मंत्री दोन दिवस वेळ देतील. तुम्ही घाबरू नका.” ते पुढे म्हणाले, “संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सर्वस्व दिले, तरी त्यांना पक्ष सोडावा लागला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. काँग्रेसला कोणतेही धोरण नाही. जो-जो काँग्रेस किंवा इतर पक्षातून आमच्याकडे येईल, त्याचे स्वागत आहे. तुम्ही थकून जाल, इतके लोक आमच्याकडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – रात्री जेवण झाल्यानंतर बहिणी सोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २९ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री अकरा वाजता विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगर शहरातील सावेडी भागात पाईपलाईन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात विनायक नन्नवरे (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, यशोदानगर कॉलनी, पाईपलाईन रस्त्यावर राहणारा विनायक नन्नवरे याने महिलेकडे टक लावून पाहिले आणि अश्लील हावभाव केले. तसेच, त्याने हातातील प्लास्टिकच्या पिशवीतून काहीतरी काढून महिलेला दाखवत असभ्य वर्तन केले. यानंतर, आरोपीने पीडितेला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – सध्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात गुगल पे आणि फोन पे चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याच ऑनलाइन पेमेंटमुळे एका तरुणीला मनस्ताप सहन करावा लागला आहे. वाघोली ते विमाननगर असा प्रवास करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणीने रिक्षाभाडे म्हणून केवळ २० रुपये गुगल पे द्वारे भरले आणि याच कारणामुळे एका रिक्षाचालकाने तिला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. या घृणास्पद कृत्याबद्दल पुण्याच्या हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाघोलीहून विमाननगरला रिक्षाने जात होती. तिने रिक्षाचे भाडे ऑनलाइन पद्धतीने चुकते केले. त्यामुळे तिचा मोबाईल नंबर रिक्षाचालकाकडे गेला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – राजुर (अहिल्यानगर) राजूर गावात काविळीचा वाढता प्रादुर्भाव गंभीर बनला आहे. आतापर्यंत २६३ रुग्ण आढळले असून, दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांचे पथक पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. डॉक्टरांकडून सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी आमदार किरण लहामटे, माजी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या, (सोमवार ५ मे) जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकालाची घोषणा पत्रकार परिषदेत केली जाईल. त्यानंतर, विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली गुणपत्रिका डाऊनलोड करू शकतील. उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी संधी: ऑनलाईन निकालानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात मिळालेल्या गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी यासाठी ६ मे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप जलसंपदा विभागाने पोलीस बळाचा वापर करून काढण्यास सुरुवात केल्याने संतप्त शेतकरी संतप्त झाले असून “पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा,” अशा शब्दांत आपला आक्रोश व्यक्त केला आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह जलसंपदा विभागाचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. चाऱ्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर “काँग्रेसने नेहमीच सर्वधर्मसमभावाचा विचार जपला आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय काँग्रेसच्या सततच्या पाठपुराव्याचे यश आहे,” युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना या निर्णयाचे संगमनेरमध्ये युवक काँग्रेसने जोरदार स्वागत केले. यशोधन कार्यालयाच्या मैदानावर युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेचा जल्लोष केला. यावेळी निखिल पापडेजा, डॉ. विजय पवार, शरद पावबाके, प्रीतम साबळे, रमेश गफले, शुभम शिंदे, रमेश नेहे, वैष्णव मुर्तडक, शुभम काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. जातीनिहाय जनगणनेच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीचा निकाल १५ मे २०२५ पर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल साधारणपणे ५ ते १० जून २०२५ दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस लवकर झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक योजनांसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी निकालाची प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांकडून आलेल्या…
