Author: Annant Ppangarkar
मुंबई, दि. १५ – विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा तपशील खालीलप्रमाणे…. १. चिखलोली-अंबरनाथ येथे नवीन दिवाणी न्यायालय: ठाणे जिल्ह्यातील चिखलोली-अंबरनाथ येथे कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांनाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील नागरिकांना न्याय मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. २. कैद्यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई धोरणाला मंजुरी: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार, कैद्यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पीडित…
महाराष्ट्र संवाद न्यूज – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेर आणि पारनेरला दिलेला जोरदार झटका विरोधकांच्या कायम लक्षात राहील. आता श्रीरामपूरकडे लक्ष देणार असून, योग्य वेळी त्यांनाही झटका देऊ, असा स्पष्ट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले की, राजकारण हे गरीब लोकांना घरे मिळवून देणे, शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या मोठ्या गोष्टींवर आधारित असावे. श्रीरामपूरमध्ये बदल घडवायचा असेल, तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी…
संगमनेर, दि. १४ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात,…
अहिल्यानगर, दि. १४ प्रतिनिधी – जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या जलसंपदा पंधरवड्याचा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान आणि जल पुनर्भरण यावर भर दिला जाईल. १८ एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांच्यात संवाद साधला जाईल, तर १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणींचे…
संगमनेर दि.१४ – प्रतिनिधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जनतेला हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यामुळेच भारताच्या संविधानाचा संपूर्ण जगात होणारा गौरव सर्वांना अभिमानास्पद आहे. देशामध्ये संविधान दिन सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यघटनेच्या पवित्र ग्रंथाचे महत्व अधोरेखित केले असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून लोणी खुर्द येथे समता युवा संघटनेच्यावतीने तसेच लोणी बुद्रुक येथे जनसेवा युवा प्रतिष्ठाणच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहीक वाचन करण्यात आले. संविधान…
संगमनेर, प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेतील समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींनी जगाला शांतता आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व संत आणि समाजसुधारकांच्या विचारांना एकत्र…
नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका २३ वर्षीय तरुणाचा डीजेच्या कर्कश आवाजामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. नितीन रणशिंगे असे मृत तरुणाचे नाव असून तो फुलेनगर, पेठ रोड येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आज आंबेडकर जयंती असल्याने शहरात विविध ठिकाणी मिरवणुका निघाल्या होत्या. नितीन देखील एका मिरवणुकीत सहभागी झाला होता. दरम्यान, डीजेचा आवाज असह्य झाल्याने तो अचानक कोसळला. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळल्यानंतर त्याच्या नाकातून आणि कानातून रक्तस्राव सुरू झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीनला क्षयरोगाचा त्रास असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याचा…
शिर्डी – शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात गंभीर जखमी झालेल्या साखरबाई साहेबराव भोसले (वय अंदाजे ६०) यांचा रविवारी (दि. १३ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बळी गेला आहे. या दुर्दैवी घटनेत ५ एप्रिल रोजी चोरट्यांनी साहेबराव पोपट भोसले (वय अंदाजे ६५) आणि त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय अंदाजे ३०) यांची हत्या केली होती. त्यावेळी साहेबराव यांच्या पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या होत्या. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी केलेल्या या क्रूर कृत्यामुळे भोसले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वडील आणि मुलाचा दशक्रिया…
संगमनेर, दि. १३ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १३३ उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून एका अर्जावरील प्रलंबित निर्णय आता मंगळवारी (दि. १५) होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार छाननी शुक्रवारी (दि. ११) पार पडली. परंतु चार अर्जांवर हरकती आल्यामुळे त्या सदर्भात निर्णय घेण्यात आला असून एका उमेदवाराच्या अर्जावरील निर्णय प्रलंबित असल्याने तो मंगळवारी दिला जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. थोरात कारखान्याच्या निवडणुकीतून विरोधकांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुरू केलेलं मराठीसाठीचं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर स्वत:च मागे घेतलं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून मराठी तरुणांची राज्यात होत असलेली घुसमट लक्षात घेता असं आंदोलन सुरू होणं ही आता काळ्या दगडावरची रेघ बनली आहे. राज्यात कायद्याचं राज्य राखणं ही दुय्यम बाब बनली आहे. बिहारसारख्या राज्यात निवडणुका असल्याने कायद्याहून निवडणुका जिंकण्याला महत्व अधिक. यामुळे कोणत्याही कारणासाठी महाराष्ट्रात प्रांतीय आंदोलनाची सत्तेला अपेक्षा नाही. यातूनच मुख्यमंत्र्यांनी आंदोलन थांबवण्याचं आवाहन राज यांना केलं आणि राज यांनी ते थांबवलंही. गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मराठी मोहीम सुरू करण्याची हाक दिली होती. मराठी बोलण्यास नकार देणार्यांना थपडेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक, दि.१२ एप्रिल – नाशिक जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश आर.आर. राठी यांची तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झाली असून, जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. जगमलानी यांनी यापूर्वी या प्रकरणाची चौकशी केली होती. या कारवाईमुळे न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.११ एप्रिल) सकाळी जिल्हा न्यायालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले आणि न्यायाधीश राठी यांनी सकाळी १० वाजता कार्यालयात नियमितपणे हजेरी लावली. त्यांनी आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर, त्यांची प्रमुख जिल्हा न्यायाधीशांशी (Principal District Judge) काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांना बदलीचे पत्र देण्यात आले. दरम्यान राठी यांच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजात काही…
संगमनेर, दि.१२ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित रथाच्या मिरवणुकीत एक ब्रिटिशकालीन अनोखी परंपरा पाहायला मिळाली. परंपरेनुसार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणलेला मानाचा ध्वज रथावर लावण्यात आला. त्यानंतर महिलांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात हनुमान रथाचा दोर धरून ओढण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीत संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनीही सहभाग घेतला होता. महिलांनी रथ ओढल्यानंतर काही वेळातच मिरवणुकीत सहभागी असलेल्या ढोल पथकाला रथापुढे ढोल वाजविण्यापासून रोखत रथ पुढे नेण्याचा प्रयत्न झाल्याने निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले. हिंदू राजा प्रतिष्ठानच्या ढोल पथकातील कार्यकर्ते आणि मिरवणूक आयोजक कार्यकर्त्यांमध्ये…
घारगाव (संगमनेर) – संगमनेर तालुक्यातील घारगाव भागातील एका गावात शुक्रवारी (दि. ११) एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती ‘उडान हेल्पलाईन’ आणि सजग नागरिकांकडून मिळाल्यानंतर घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘स्नेहालय’च्या ‘उडान’ प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, पंचायत समिती पदाधिकारी व बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर कुटुंबीयांची ‘लग्नाची घाई नाही, मुलगी बालग्राममध्ये सुरक्षित आहे, त्यामुळे गैरसमज झाला आहे,’ अशी भूमिका घेत दिशाभूल करण्याचा…
मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने तातडीने १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित वेतन मंगळवारी जमा होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा केवळ ५६ टक्के भागच जमा झाला होता. यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, पूर्ण वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने मंत्रालयात वित्त सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एसटी महामंडळाच्या विविध सवलतींच्या बदल्यात शासनाकडून येणे असलेले १०७६ कोटी रुपये त्वरित…
पुणे, दि. ११ एप्रिल – पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने तिचा झालेला मृत्यू हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने नियम व अटींचा भंग केला असून, दोषींवर कारवाई करण्यास सरकार दिरंगाई करत आहे. रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून सरकारने ताबा घ्यावा. तसेच, डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी.अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आज (शुक्रवार ११ एप्रिल) महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर आणि भिसे कुटुंबीयांची…
संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शोषित आणि वंचित यांच्या प्रश्नांना सर्वप्रथम वाचा फोडली. त्यांनी बहुजनांच्या विकासाचा, समतेचा आणि पुरोगामी विचार जगाला दिला. सर्वधर्म समभाव, बंधुता आणि समता जपणारा त्यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, मालती डाके, अरुण हिरे, अभिजीत ढोले, निखिल पापडेजा, नितीन…
संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर शहरात एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली असताना हा घृणास्पद प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पाऊले उचलत आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली असून, समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी या संघटनेने या घटनेचा तीव्र…
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीने रुग्णांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा अंत्योदय कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असल्यास, त्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे आणि पुढील प्रक्रिया नंतर पूर्ण करण्याचे आदेश समितीने दिले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलेल, अशी भावना व्यक्त केली आहे. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे…
संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी…
संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे…
