Author: Annant Ppangarkar

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी आधीच शेतमालाला भाव नाही त्यातच डाळिंबाच्या शेतातून चारशे ते पाचशे किलो डाळिंब चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरालगच्या सुकेवाडी येथे हा प्रकार घडला. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात संजय बबन सातपुते (वय ३०, धंदा शेती, रा. खांजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुकेवाडी येथील एका मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, फिर्यादी संजय सातपुते यांचे सुकेवाडी (संगमनेर) येथे डाळिंबाचे शेत आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) ते दुपारच्या वेळी शेतात आले असताना त्यांना गावातील मुलगा शेतातून त्यांच्या संमतीशिवाय डाळिंब तोडून घेऊन जात होता. फिर्यादीला बघून बांधावरून पळत असताना…

Read More

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी नगरपालिका हद्दीतील अवैध बांधकामे व अवैध कत्तलखान्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अतिक्रमण हटवितांना असे काही समोर आढळले की त्यामुळे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  गुरुवारी (२० फेब्रुवारी) संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्याचा प्रशासक रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील काही कत्तलखान्यांचे अतिक्रमण निष्काशीत करण्याची कारवाई करण्यात आली. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, उपनगर अभियंता महेश गोर्डे, अल्ताफ शेख, भीमाशंकर वर्पे, जयराम मंडलिक, पंकज मुंगसे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पथक व संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक संयुक्तरित्या अवैध बांधकामे व बेकायदेशीर कत्तलखान्याचे बांधकामे पाडण्याचे…

Read More

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी –  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते म्हणून बघितले जाते. अनेक जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने आता काँग्रेसला गळती लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले अहिल्यानगरचे किरण काळे आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. तर पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्याच्या दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांशी बांधिलकी सांगणारे…

Read More

          हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांचे आपणच जणू कर्तेधर्ते आहोत, अशा तोर्‍यात भाजपचे नेते छत्रपतींचे आज पोपटासारखे गुणगाण करत आहेत. शिवरायांवर आपलाच तेवढा अधिकार असल्याची भाजपची मस्ती अजून उतरलेली दिसत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी कंबरेचंही सोडलं. आपल्या टीकेला जनाधार नाही, हे लक्षात असूनही त्या पक्षाचे नेते स्वत:ला आवरू शकत नाहीत, याचं आश्‍चर्य वाटतं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केल्याचं ट्विटचं निमित्त करत भाजपच्या काही नेत्यांनी जिभेवर येईल ती टीका केली. भाजपशी आणि त्या पक्षाची पालकसंस्था असलेल्या संघाशी अर्थाअर्थी संबंध नसलेले नेतेच बडबड करत होते. कोणी राहुल…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी –  दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयटेन कारने जोराची धडक दिल्याने शेजारून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्पे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  या संदर्भात माहिती अशी, सुदाम वर्पे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17 M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्पे दुचाकी वरून…

Read More

शनिवार दि. २१ फेब्रुवारी  सिंधुदुर्ग (सावंतवाडी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्याचे पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून दोघेजण बचावले असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याच्या हडपसर मधून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात ही दुर्घटना घडली. रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी या दुर्घटनेतील दोघा मृतांची नावे आहेत. तर दुर्घटनेतील तिसरा ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुश संतोष गदरे…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर शहरालगत असलेल्या आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी पुण्याच्या रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत संगमनेरमध्ये भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी रजनीकांत राजेंद्र राहणे याला शुक्रवारी न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्याला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस तपासात आता या प्रकरणी नेमके काय समोर येते याकडे लक्ष लागले आहे. बनावट नोटा प्रकरणातील आरोपी रजनीकांत राहणे हा…

Read More

संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी – संगमनेर रोटरी क्लबच्या वतीने उद्या रविवारी (२३ फेब्रुवारी) स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी मार्गावर आनंदी रस्ते या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आनंददायक ठरणाऱ्या या उपक्रमात संगमनेरमधील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून विविध मनोरंजनात्मक आणि क्रीडा संबंधी कार्यक्रमाचे यात आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमामध्ये झुंबा डान्स, रॉक बँड, मल्लखांब, गाणी सादरीकरण, खेळणी वाटप आणि मनोरंजक गोष्टी सादरीकरण यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे…

Read More

शनिवार, दि. २२ फेब्रुवारी –  बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने देशभरात एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकले. यात बहुतांश ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. गुरुवारी (२० फेब्रुवारी) महाराष्ट्रामधील संगमनेर, कोल्हापूरमध्ये तर हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार या राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली. देशभरात टाकलेल्या ११ छापांमध्ये सात ठिकाणी बनावट चलनी नोटा छपाई सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संगमनेरमध्ये गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या एका कर्मचाऱ्याला तर कोल्हापूरमध्ये दोघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून…

Read More

अहिल्यानगर, दि. २१ फेब्रुवारी –  अपहाराच्या गुन्ह्यात अटक झालेले तसेच कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या अहिल्यानगर महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी डॉ. बोरगे यांच्या निलंबनाचे आदेश आज (२१ फेब्रुवारी) काढले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अत्यंत पातळीवर अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज झाल्याचा ठपका आरोग्य सेवा संचालकांनी ठेवला होता. या संबंधितांनी महापालिकेला देखील कळविले होते. त्यानंतर आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना नोटीस बजावत कामकाजात सुधारणा करण्याचे…

Read More

संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी – संगमनेरमधील साहित्यिक व संगमनेर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक मा. रा. लामखडे यांना यंदाचा विद्रोही जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण शनिवारी (२२ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीतील बहुमोल योगदानाबद्दल लामखडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लामखडे हे सुरुवातीपासूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीत सहभागी राहिले आहेत. विद्यापीठ पातळीवर ग्रामीण साहित्याचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. त्यांच्या पुढाकारानेच पहिले ग्रामीण साहित्य संमेलन संगमनेर तालुक्यातील बोटा या गावी १९७९ मध्ये भरविले गेले होते. दलित…

Read More

संगमनेर – अनाधिकृतपणे सुरू असलेल्या संगमनेर शहरातील कत्तलखान्यांना पालिकेने नोटीसा बजावल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे कत्तलखाने सुरूच असल्याने अखेर गुरुवारी सकाळी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत पाच अवैध कत्तलखाने जमिनदोस्त केले. पालिकेने पाच कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचे वृत्त समाधानकारक असले तरी मुख्य कत्तलखान्यांचे काय असा प्रश्न अद्यापही कायम आहे. कारण शहरात अधिक कत्तलखाने असून काही ठराविक कत्तलखान्यांवरच कारवाई झाल्याचे दिसते. कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या कत्तलखाने सुरू असून याची माहीती पोलीस व पालिका प्रशानला होती. यातील बहुतांशी कत्तलखान्यांवर पोलिसांनी वारंवार छापे देखील मारून कारवाया केल्या…

Read More

संगमनेर, दि. २१ फेब्रुवारी –  बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद तस्करीच्या रूपाने बाहेरच्या देशातून कुरियर कंपनीच्या माध्यमातून भारतात आला असून तो संगमनेरमध्ये देखील आल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटीलिजन्सच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात बनावट नोटा बाजारात येण्यापूर्वीच थांबविण्यात यश आले आहे. संगमनेरमधील रजनीकांत राजेंद्र राहणे (रा. राहणे मळा गुंजाळवाडी) हा त्याच्या राहत्या घरी भारतीय चलनातील खोट्या नोटा बनवत असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळवाडी शिवारामध्ये गुरुवारी सकाळी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान रजनीकांत राहणे याला पकडण्यात आले. राहणे याने हाय सेक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी असलेले पेपरचा वापर…

Read More

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी –  गेल्या काही दिवसांपासून संगमनेर महसूल प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्यानंतर नव्याने होऊ घातलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावावरून संगमनेर तालुक्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले असून तालुक्यातील महसूल मंडळाचे जनतेच्या दबावानंतर फेररचना होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्याचे मोडतोड होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनारा दिला होता. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील यासाठी मंत्रालयात पाठपुरावा केला. नव्या तहसील कार्यालयाच्या…

Read More

संगमनेर, दि. २० – प्रतिनिधी महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथील अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर करू नका अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूल विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली असून, तशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या असल्याचे खताळ यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव संगमनेर तहसिल कार्यालयाने वरिष्ठांना सादर केला होता.  अप्पर तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव पाठविण्यापुर्वी महसूल मंडळाची फेररचना होणे अत्यंत गरजेचे होते. मात्र याबाबत संगमनेर तहसिल कार्यालयाने लोकप्रतिनीधीशी कोणतीही चर्चा न करता व संबधित गावातील लोकांच्या…

Read More

संगमनेर दि. २० फेब्रुवारी – अनंत पांगारकर मृत्यूनंतर माणसाचा शेवटचा प्रवास किमान सुखकर व्हावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र मृत्यूनंतर त्याचे क्रिया कर्म करण्यासाठी जाणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावे लागत असल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर असलेल्या शांती घाटावर जाण्यासाठी गटारगंगा ओलांडून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर संगमनेर नगर परिषदेने दशक्रिया विधीसाठी शांती घाट बांधला आहे. शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी, पोखरी हवेली, खांजापूर, समनापुर आदी ग्रामीण भागातून येथे नागरिक मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात. नगरपरिषदेने बांधलेल्या शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही…

Read More

गुरुवार, दि. २० फेब्रुवारी राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नासिक जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दोन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर मात्र अवघ्या दोन तासातच न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे मंत्रीपद आणि आमदारकीचे संकट तूर्तास तळले आहे.  मंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुधीर कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिला जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. तर या खटल्यातील दोघांची न्यायालयाने मुक्तता केली. गुरुवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. निकालानंतर कोकाटे यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.  कोकाटे…

Read More

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – संगमनेर शहरांनाजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारामध्ये बनावट नोटांची छपाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी थेट दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी कारवाई केली असून काही साहित्यासह एकाला ताब्यात घेतले आहे.  संगमनेर मधील गुंजाळवाडी परिसरात एका घरात नोटा छापल्या जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. यासंदर्भात दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर मध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित ठिकाणी छापा टाकला.  या छाप्यात बनावट नोटा बनविण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर कागद आणि चलनातील काही बनावट नोटा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More

नाशिक, दि. २० फेब्रुवारी  कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल २९ वर्षांनी या खटल्यचा निकाल लागला आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. तर या खटल्यातील अन्य दोन आरोपींना न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठोठावली नाही. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्या संबंधाने माणिकराव…

Read More

महाराष्ट्र संवादसाठी लंडनहून विशेष वृत्त | अनुराग फुटाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे. महाराष्ट्राच्या या राज्याची जयंती साता समुद्रा पार लंडनमध्ये देखील मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. लंडनमध्ये मराठी युवकांनी साजरी केलेल्या या सोहळ्याला वेलविन हटफिल्ड बॉरो कौन्सिलचे महापौर फ्रॅंक मार्श यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या.   युनिव्हरसिटी ऑफ हार्डफोर्टशायरमध्ये गर्जा महाराष्ट्र मंडळाने यासाठी पुढाकार घेतला होता. मार्श यांच्यासह हटफिल्डचे नगरसेवक कार्तिक बंकर हेही शिवजयंतीच्या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.  छत्रपती शिवरायांना मराठी, हिंदी, राजस्थानी, गुजराती विद्यार्थ्यांनी यावेळी अभिवादन केलं. विद्यार्थ्यांनी मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे यांची रूपं रेखाटली…

Read More