Author: अनंत पांगारकर

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी संगमनेर तालुका एकवटला बुधवार, ०४ डिसेंबर – संगमनेर सततच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुक्याला विकसित आणि वैभवशाली बनवणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात आनंद निर्माण केला. संगमनेर तालुक्याच्या विकासाची घडी बसवली. कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना अनपेक्षित निकालामुळे संपूर्ण राज्यात हळहळ निर्माण झाली. यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर अनेकांना अश्रू अनावर झाले. प्रगतशील व सुसंस्कृत तालुका – १०० किलोमीटर विस्तार असलेल्या तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवर सातत्याने विकास कामे राबवताना संगमनेर तालुका त्यांनी परिवार मानला. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या…

Read More

स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आहे लढणार आहोत मीही हिंदू पण इतर धर्माचा आदर करतो संगमनेरमध्ये विराट कार्यकर्ता स्नेह संवाद मेळावा बुधवार ०४ डिसेंबर – संगमनेर गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील ४० वर्ष अविश्रांत काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला. ही परंपरा आपल्याला यापुढेही जपायची आहे. तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले, मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. संकटे आली तरी घाबरायचे नाही, स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. जनता सोबत असल्याने आपण लढणार आहोत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

Read More

मंगळवार ३ डिसेंबर – संगमनेर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पक्ष प्रवेशाची चर्चा अखेर अफवा ठरली आहे. मंगळवारी थोरात यांनीच स्नेहसंवाद मेळावा घेत आपली वाटचाल स्पष्ट केली. आपल्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, मी तुमच्यासोबत असल्याचे स्पष्ट करत थोरात यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये थोरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून मंत्रिमंडळ शपथविधीवेळी त्यांना जलसंधारण खाते दिल्या जाण्याच्या चर्चा शहरात सुरू होत्या. थोरात कोठेही जाणार नाही, हे अनेकांना माहिती असताना देखील जाणीवपूर्वक अशा पद्धतीने अफवा पसरविल्या गेल्या. अखेरीस थोरात यांनी या चर्चांना…

Read More

मंगळवार, ०३ डिसेंबर – संगमनेर व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी करून त्यांना फोन पे वर पैसे पाठविल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीची जोडी अखेर संगमनेर पोलिसांच्या ताब्यात आली आहे. एका व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे शहरातील नाटकीनाला परिसरात सोमवारी दुपारी या जोडीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हा दाखल – गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरातील विविध व्यापाऱ्यांना फसवणुकीचा हा प्रकार सुरू होता. बंटी-बबलीची ही जोडी सिन्नरमधील असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महेश कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बंटी बबलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील करत आहेत. याबाबत माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील बंटी-बबलीचे हे जोडपे तीन ते…

Read More

सोमवार ०२ डिसेंबर – मुंबई  शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे आणि शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोरी करणारे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे. हे दोन्ही माजी आमदार पवार यांच्या पक्षात प्रवेश करत हाती घड्याळ बांधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दादांचा काकांना पुन्हा धक्का – शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंधित असलेले हे दोन्ही माजी आमदार विधानसभा निवडणूक संपतात सरकार स्थापनेपूर्वी अजित पवारांसोबत जाणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे समोर येत आहे. डॉक्टर अपूर्व हिरे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

सोमवार, ०२ डिसेंबर – संगमनेर  तब्बल चार दशके संगमनेरकरांचे लोकप्रतिनिधी व करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. त्यानंतर विविध पद्धतीने पराभवाचे विश्लेषण होत असतानाच आता मंगळवारी (३ डिसेंबर) प्रथमत:च स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात संगमनेरकरांशी संवाद साधणार आहे. या मेळाव्यात थोरात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे होणार – थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयालगतच्या पटांगणात मंगळवारी दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह थोरात यांच्यावर विशेष स्नेह असलेल्या राज्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. डॉ. तांबे…

Read More

सोमवार, ०२ डिसेंबर – मुंबई  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पाटील, जानकर प्रतोदपदी – तर, दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील तसेच, आमदार उत्तम जानकर यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली. क्षीरसागर गैरहजर – शरद पवारांनी कमी वयात मोठी जबाबदारी रोहित पाटील यांच्यावर टाकल्याचं पाहायला मिळत आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत रविवारच्या बैठकीत निर्णय झाला नाही. बैठकीसाठी दहा पैकी नऊ सदस्य उपस्थित होते, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते.…

Read More

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई  लाडक्या बहिणींच्या बळावर मोठ्या बहुमताने महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होईल तत्पूर्वी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होणार आहे. त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर १ एप्रिलपासून दरमहा १५०० ऐवजी २,१०० रुपये दिले जाणार आहे. बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा – राज्यात महायुतीला २३० पेक्षा अधिक जागांवर स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर निवडणुकीपूर्वी पाच महिने आधी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळतो याची प्रतीक्षा राज्यातील दोन कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना लागली आहे. ६०० रुपयांची वाढ – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा…

Read More

रविवार, ०१ डिसेंबर – मुंबई  राज्यभरात सातत्याने महागाईत वाढ होत असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणलेल्या योजनांमध्ये आता बदल सुरू केला आहे. रविवारी झालेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीपाठोपाठ आता लालपरीचा प्रवास देखील महागणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, फळे, साबण, खाद्य तेल अशा कित्येक गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसणार आहे. पंधरा टक्के वाढ होणार – समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसच्या तिकिटामध्ये कोणतीही दरवाढ केली गेली नसल्याने विधानसभा निवडणूक संपतात एसटी महामंडळाकडून १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. यामुळे लालपरीच्या तिकीट दरात आता…

Read More

महायुतीने विधानसभेच्या २३४ जागा पटकवत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ५०%अधिक मते घेत बाजी मारली. महाविकास आघाडीला फक्त ४९ जागेवरती समाधान मानावे लागले. युती सरकारच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे दिसून येते. तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ४८ पैकी ३० जागा मिळवलेल्या विरोधक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जाऊ लागले आहे. खरंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून निवडणूक प्रक्रिया बदलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. खरतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हरियाणा निवडणुका पार पडल्या, त्यात जनता अनेक वर्ष सरकार असल्यामुळे व प्रबळ गुज्जर व जाट समाज भाजप सरकारवर नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. परंतु भाजपाच्या…

Read More