Author: अनंत पांगारकर

विधानसभा निवडणूक – अनंत पांगारकर शनिवार, ०९ नोव्हेंबर  संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात राज्यभर उमेदवारांची प्रचार मोहीम राबवत असताना संगमनेरात मात्र कार्यकर्त्यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अनेक जण प्रचार मोहिमेपासून दूर असताना माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली मात्र शिवसेनेतील एक गट प्रचारात सक्रिय झाला आहे. थोरात यांच्यासाठी पंजाचा प्रचार करत ते शहराच्या विविध भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे. थोरात यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नवव्यांदा त्यांना पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्यासाठी मतदार सज्ज असताना शहराच्या विविध भागातून कतारी यांनी काढलेल्या या प्रचार…

Read More

शनिवार, ०९ नोव्हेंबर  फुल उत्पादक शेतकऱ्यांना फुलाच्या मालाच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी अहमदनगर-पुण्याकडे येत असताना उल्हासनगरमध्ये आचारसंहिता भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान कारमध्ये असलेल्या साडेसात लाख रुपयांच्या रोकड संदर्भात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत व्यापाऱ्याकडून ८५ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात उल्हासनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तब्बल तेरा दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. २८ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी १३ दिवसांनंतर ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये तीन उल्हासनगर महापालिका कर्मचारी आणि दोन पोलिसांचा सहभाग आहे. सध्या…

Read More

निवडणूक विशेष – अनंत पांगारकर  संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या दत्तात्रय रावसाहेब ढगे या एकमेव तरुण अपक्ष उमेदवाराने “माझे संगमनेर माझा संकल्प” असं म्हणत मतदारांसमोर आपले संकल्प पत्र ठेवले आहे. या संकल्प पत्राच्या माध्यमातून ढगे मतदारांसमोर जात आपली भूमिका मांडत आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातून राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा महाविकास आघाडीकडून तर त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खताळ महायुतीकडून निवडणूक लढवत आहे. काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यातच या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या दत्तात्रय ढगे शिट्टी या चिन्हाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आपले संकल्प पत्र मतदारांसमोर ठेवणारे ते पहिलेच उमेदवार…

Read More

शनिवार, ९ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पह‍िली ज‍िल्हास्तरीय तपासणी झालेल्या २८८ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ३४५ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. न‍िवडणूक न‍िरीक्षक हौलीनलाल गौईटे, न‍िवडणूक निर्णय अध‍िकारी शैलेश ह‍िंगे, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थ‍िती ही प्रक्र‍िया करण्यात आली. न‍िवडणूक न‍िर्णय अध‍िकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक न‍िवडणूक न‍िर्णय अध‍िकारी धीरज मांजरे व संतोष कोरे उपस्थित होते. संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३४५ बॅलेट युनिट, ३४५ कंट्रोल युनिट आणि ३७५ व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना न‍िवडणूक न‍िर्णय अध‍िकारी ह‍िंगे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. संगमनेर…

Read More

शनिवार, ०९ नोव्हेंबर  राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच सांगलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुधाकर खाडे यांची हत्या झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मिरज-पंढरपूर रोडवरील राम मंदिराजवळ असलेल्या जागेत प्रॉपर्टीच्या कारणावरून खाडे यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. याच वादातून संशयित व्यक्तीने खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. यातच खाडे यांचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीने वार केल्यानंतर खाडे यांना गंभीर जखमी अवस्थेत मिरजेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे…

Read More

शनिवार, ९ नोव्हेंबर  अहिल्यानगर – लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय असं सध्या सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील माझ्या बाबतीत असंच घडल्याची जाहीर कबुली देत वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. धांदरफळमधील त्या सभेमुळे आपली संगमनेरमधील संधी हुकली असल्याची कबुली माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे (भाजप) उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ शिराळ चिंचोडी येथील जाहीर सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. विखे म्हणाले, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या…

Read More

शनिवार, ०९ नोव्हेंबर  पंचवीस वर्षीय महिला घरात अंघोळ करत असताना ओळखीच्या एका तरुणाने तिच्या घरात शिरुन तिला बाथरुमधून बळजबरीने बाहेर ओढून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा महिला चुलत सासरच्या घरी गेली त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेली असताना दोन जणांनी तिचा पाठलाग करुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना शहरातील स्वारगेट परिसरात घडली आहे. याबाबत पिडित महिलेने तीन आरोपी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही स्वारगेट परिसरात राहण्यास आहे. महिला घरात अंघोळ करत असताना सुरुवातीला एक आरोपी तिच्या घरी…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या आठ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखी बंडखोरांनी दिली आहे. महायुतीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही, त्यातील काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली. त्यातील काहींना शांत करण्याचे प्रयत्न महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले. मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली आणि आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही बंडखोर मागे हटायला तयार नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. निलंबनाची कारवाई करताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी…

Read More

शुक्रवार, ०८ नोव्हेंबर  विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येऊ लागला असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी मंत्री अमित देशमुख आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याच्या निमित्ताने येत आहे, अशी माहिती युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या मेळाव्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. तळेगाव दिघे येथे हे दोन्ही नेते विरोधकांवर टीका करताना काय भाष्य करतात याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे…

Read More

शुक्रवार, ०८ नोव्हेंबर संगमनेर – कुटुंबीयांकडे बघून शिवीगाळ करणाऱ्या दारूच्या नशेतील तरुण आणि त्याच्या दहा-पंधरा साथीदारांनी कुटुंबीयांना मारहाण केल्याचा तसेच हाउसिंग सोसायटी मधील वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री संगमनेरच्या घुलेवाडी शिवारातील एकता चौकात घडला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात योगेश मदनलाल तिवारी (वय ४३ वर्ष, रा. कंचन कम्फर्ट हाऊसिंग सोसायटी, एकता चौक, घुलेवाडी, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सागर राऊत व त्याच्या दहा-पंधरा साथीदार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, योगेश तिवारी यांचा गोंदेफाटा, सिन्नर जि. नाशिक येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. तसेच ते शहरालगतच्या घुलेवाडी येथील एकता चौकातील कांचन…

Read More