Author: अनंत पांगारकर

संगमनेर – आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांनी नोंदवलेल्या ३३ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, त्यात किरकोळ बदल करून ही अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभारी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ही माहिती दिली. यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली असून, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांनी त्या दृष्टीने आपल्या परीने आता प्रयत्न सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रारंभी १५ प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर संभाव्य इच्छुक…

Read More

मेष – दैनंदिन कामांमध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास कामे मार्गी लागतील. वृषभ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्साहात आणि उमेदवारीत वाढ होईल. प्रॉपर्टीसंबंधी कामांसाठी दिवस चांगला आहे. मिथुन – भाग्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. संवाद स्पष्ट ठेवा. कर्क – व्यवसायात वाढ आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घ्या. सिंह – कामाच्या ठिकाणी नवी दिशा आणि मार्ग सापडेल. आपल्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. कन्या – वस्तूंची काळजी घ्या आणि कोणताही महत्त्वाचा कागद गहाळ होणार नाही याची दक्षता घ्या. अध्यात्माकडे कल वाढेल. तुळ – आपल्या विचारांमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कर्तव्य बजावत असताना मद्यसेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या एका चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानकात गुरुवारी (दि. २) सायंकाळी उशिरा घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय ५४, रा. सारोळा कसार) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चालक सुरेश धामोरे हे तारकपूर-घोसपुरी बसवर (क्र. एमएच ४० एन ८८८७) कर्तव्यावर होते. त्यांनी दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ते तारकपूर बसस्थानकात परतले. यावेळी वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांना ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला. त्यांनी लागलीच ही बाब आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांच्या निदर्शनास…

Read More

मुंबई- भावी नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडत कार्यक्रम निश्चित केला आहे. या संदर्भात विभागाकडून सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्ष, सचिव यांना पत्र पाठवण्यात आले आहे. सोमवारी (०६ ऑक्टोबर) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून राज्यातील २४७ नगरपरिषदा व १२७ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. राजकीय पक्षांना या आरक्षण सोडतीसाठी त्यांच्या पक्षाकडून दोन प्रतिनिधींची शिफारस करून पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांच्या सहीने ०३ ऑक्टोबरला यासंबंधीचे पत्र काढण्यात आले आहे. मंत्रालयात…

Read More

संगमनेर – शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली कोळवाडे येथील जयहिंद आदिवासी आश्रम शाळा आज राज्यातील इतर आश्रम शाळांसाठी एक आदर्श मॉडेल ठरली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे त्यांना मोठी संधी मिळाली आहे, तसेच नव्याने होत असलेल्या वस्तीगृह आणि ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक चांगली संधी मिळेल, असा विश्वास माजी शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. कोळवाडे येथे जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा वर्धापन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि फादर रॉबर्ट यांच्या…

Read More

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० उमेदवारांच्या शासकीय नियुक्ती आदेश वितरणाच्या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले आहे. हा कार्यक्रम आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐवजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून आयोजित केला जाणार आहे. राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शिफारस झालेले आणि अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या एकूण २९० उमेदवारांना हे नियुक्ती आदेश वाटप करण्यात येणार आहेत. हा महत्त्वाचा कार्यक्रम आता जनसेवा कार्यालय, लोणी–हसणापूर रोड, लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे. यापूर्वी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना या…

Read More

संगमनेर – निळवंडे धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वितरिकांची कामे आणि कालव्याशेजारील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (शुक्रवार दि. ०३ ऑक्टोंबर) घुलेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्च्याचे नेतृत्व करताना आमदार सत्यजित तांबे यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सचिन दिघे, मारुती कवडे, सुमित पानसरे ,रमेश नेहे, सनी ठोंबरे, अक्षय दिघे, संतोष नागरे, आनंद वर्पे, निर्मला राऊत, संतोष हासे, सुहास आहेर, किरण रोहम, प्रदीप हासे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन दसरा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त घोषित केलेल्या मद्य विक्री बंदीच्या दिवशीही नियम मोडत अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. विभागाने श्रीरामपूर शहरातील दोन वाईन शॉपवर छापे टाकून १२,४४,३४५/- किमतीचा अवैध मद्यसाठा व मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत किशोर भूतकर, अनिल भूतकर, आणि अरुण अक्षय काळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध मद्य विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, छाप्यांमध्ये सापडलेले ‘सेंट्रल वाईन्स शॉप’ हे एका माजी नगरसेवकाच्या नावावर असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही दानधर्मात खर्च कराल. सामाजिक स्नेहमेळावे आणि सहली तुम्हाला आनंद देतील. आरोग्याकडे थोडे लक्ष द्या. वृषभ (Taurus): तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. मिथुन (Gemini): प्रदीर्घ काळापासून सुरू असलेला तणाव कमी होईल. कामात बदल केल्यास फायदा होईल. कामात प्रगती दिसून येईल. कर्क (Cancer): दूरचा प्रवास टाळा, कारण प्रकृती आज साथ देणार नाही. पैशाच्या बाबतीत काळजी घ्या. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. सिंह (Leo): तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर चांगला प्रभाव टाकेल. कामात तुमची क्षमता वाढलेली दिसेल आणि वरिष्ठांकडून तुमच्या प्रयत्नांचे कौतुक…

Read More

अहिल्यानगर – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील २९० पात्र तरुणांना शासकीय नोकरीची संधी मिळाली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. या एकूण २९० नियुक्तींपैकी १८१ जणांना अनुकंपा तत्त्वावर तर १०९ उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) लिपिक पदांसाठी नियुक्ती मिळणार आहे. अनुकंपा तत्त्वावर निवड झालेल्या १८१ उमेदवारांमध्ये गट ‘क’ मधील ६७ आणि गट ‘ड’ मधील ११४ उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात गती दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की,…

Read More