Author: Annant Ppangarkar
असे काही घडले तरच महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – बुधवारी (ता. 2 ऑगस्ट) रात्री अकरा वाजता अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मोबाईलची रिंग वाजते, मोबाईल उचलला जातो आणि समोरची व्यक्ती सावेडी परिसरातील आनंद नगर भागात राहत असलेल्या छबुबाई चित्रा कदम या 93 वर्षाच्या एकल महिलेला प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगते. मोबाईल फोन नंतर काय घडते : जिल्हाधिकारी देखील तातडीने अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन करून तातडीने मदतीच्या सूचना देतात. प्रशासनातील हे दोन्ही अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेची संपर्क साधून तिला पिवळी शिधापत्रिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तृतीय पंथीय असल्याचे भासवत कोल्हार-घोटी मार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पकडल्यानंतर संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने गुन्ह्यातील आरोपींची अटकेतून मुक्तता होणार आहे. या आरोपींना झाला जामीन मंजूर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 14 जुलैला गुन्हा रजिस्टर नंबर 577/2023 नुसार संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर (वय 25 वर्षे…
‘अमृत महोत्सवी भारत’ या विषयावर ॲड. असीम सरोदे कॉम्रेड डॉ. अजित नवले मांडणार विचार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कालकतीत प्रेमानंद (बाबूजी) रूपवते यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त संगमनेरमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. संघराज रुपवते यांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात असतील अध्यक्ष : शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. अमृत महोत्सवी भारत या विषयावर हे मांडणार विचार : अभिवादन कार्यक्रमादरम्यान बाबूजी यांच्या स्मृती…
लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी शनिवारी राहुरीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र संवाद न्यूज राहुरी – सातत्याने लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाची प्रकरणे समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथून देखील असेच एक प्रकरण समोर आल्याने सरकारने लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा या मागणीसाठी शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. का काढला जातोय मोर्चा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आल. येथे क्लासच्या नावाखाली अल्पवयीन हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होता. मुलींना धमकी का दिली जात होती : उंबरे गावातील एक मुस्लिम शिक्षिका कोचिंग क्लास घेते. मात्र ईदसारख्या सणांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज एक ऑगस्ट पासून राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमातच निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचखोर नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून त्याला अटक करण्यात आले आहे. काय आहे महसूल सप्ताह : शासनाच्या आदेशाने राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांनी महसूल विभागासह सर्व यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. या माध्यमातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई -राज्यात निर्माण झालेल्या वाळू प्रश्नाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुपारच्या सत्रात सभागृहात गौण खनिजासंबंधी विविध प्रश्न उपस्थित करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. काय म्हणाले आमदार थोरात : घरगुती उपयोगासाठी गौण खनिजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करू नका. ज्यांचा उद्देश व्यापारी नाही त्यांच्यावर कसल्या कारवाया करता? मोठे धेंड सोडून सामान्य माणसाला का त्रास देता? अंगणात किंवा घरासमोर, दुकानासमोर, रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जे व्यापारी उद्देशाने गौण खनिजाची चोरी करतात त्यांना हे सरकार मोकळे सोडते आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी बांधवांना मात्र त्रास दिला जातो. जो शेतकरी आपल्या अंगणात मुरूम…
रूफटॉप सोलर उभारणी करणारा राज्यातील पहिला कारखाना महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने छतावरील सोलर सिस्टीम (रूफटॉप) प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाद्वारे दररोज ७५० किलोवॅट वीज निर्मिती होणार आहे. थोरात कारखान्याने अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रकल्प कार्यान्वित करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला संगमनेर मधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे राज्यासाठी प्रयोगशील व दिशादर्शक राहिला आहे. पुण्यातील बैठकीत कार्यकारी संचालकांचा सत्कार : थोरात कारखान्याने अल्प कालावधीत या प्रकल्पाची उभारणी करत प्रकल्प कार्यान्वित केल्याने पुणे येथे को-जन इंडियाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अमोलराजे म्हस्के पाथर्डी-शेवगाव :-माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील आणि सभापती डॉ. क्षितिजभैय्या नरेंद्र घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घुले पाटील प्रणित असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध योजना सुरू करण्यासाठी शेवगावच्या तहसील कार्यालयावर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. का काढला मोर्चा: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे हजार कोटी रुपये शिल्लक असतानासुद्धा बांधकाम कामगाराच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व कल्याण मंडळाकडे कामगार मागणी करूनसुद्धा मंडळाकडून दखल न घेतल्यान या कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला. या आहेत मागण्या: मोर्चेकरी कामगारांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा आहेत असे गौरवोद्गार काढत आजचा पुरस्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्प देणार आहे. पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी पुण्यात: लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान आज पुण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विधिवत पूजा करत दर्शन घेतले त्यानंतर पुरस्कार सोहळ्यासाठी एस पी महाविद्यालयात हजेरी लावली. यांची उपस्थिती: यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, राज्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बहुजन समाजामधील प्रतिभावान व कर्तबगार ठरलेल्या साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहिर अमर शेख यांना भारतरत्न पुरस्कार गौरव करण्याची मागणी असिफ शेख यांनी केली आहे. यांना दिले निवेदन: प्रांताधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्काराची मागणी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहिर अमर शेख यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप महान असे कार्य करून ठेवले. ते लोक चळवळीतील कार्यकर्ते असल्याने निरपेक्ष वृत्तीने काम केले आहे. त्यांनी कधीच पुरस्कार, मानधन व पदांसाठी कधीच काम केले नाही. त्यांनी सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक व कामगार क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. का केली…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे निश्चित झाले असून या पदावर विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधीमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारी कायम राहणार आहे. त्यामुळे आता सभागृहात वडेट्टीवार-थोरात विरोधकांचा किल्ला लढवताना दिसतील. चार वर्षानंतर काँग्रेसला पुन्हा संधी: ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार त्यांचा विरोधी पक्ष नेता आणि विधान परिषदेचेही विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडेच असे सूत्र ठरलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा गट घेऊन बाहेर पडल्यानंतर सभागृहात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये भीषण दुर्घटना घडली असून काल रात्री ग्रेडर मशीन (क्रेन) पडून त्याखाली १७ जणांचा दबून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनही काही लोक या गर्डर मशीनच्या खाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथेही दुर्घटना घडली आहे. यात १७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून चार-पाच लोक जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून रात्रीच्या वेळी हे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. काय आहे नेमकी घटना: समृद्धी महामार्गावर सुरू असलेल्या कामाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – शिर्डी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमात सर्व विभागांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या. आढावा बैठक: शिर्डी विमानतळ, काकडी येथे 6 ऑगस्टला आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या पूर्व तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री विखे पाटील बोलत होते. यांची होती उपस्थिती: बैठकीला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे म्हणाले, शासन…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – भंडारदारा आणि मुळा धरणातून गोदावरी लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याच्या सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पालकमंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक: भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाण्याची सद्यस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी जलसंपदा विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता महेश आमले, कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, नगर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, कैलास ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना दिले निर्देश: पावसाचे प्रमाण अजूनही अत्यल्प असल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. बहुतांशी भागातील पाण्याची मागणी वाढत असल्याचे मंत्री विखे पाटील…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तीचा घातपात झाल्याने या खून प्रकरणाची उकल देखील झाली आहे. या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातील एका सायं दैनिकाच्या मालकासह दोघांना अटक केली आहे. मनोज वासुमल मोतीयानी (वय ३३) व स्वामी प्रकाश गोसावी (वय २८, दोघे रा. सावेडी गाव, अ.नगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. नेमकी काय होती घटना: अहमदनगर शहरातून बेपत्ता झालेल्या निवृत्त लष्करी जवानाचा मृतदेह लोणी येथे रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. बोल्हेगावमधील गणेश चौक येथे राहणाऱ्या सुरेखा भोर यांनी आपले पती निवृत्त लष्करी जवान असलेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वाढत्या गुन्हेगारीला पायबंध घालण्यासाठी संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. जून-जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयामार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (superintendent of police) तब्बल 48 गुन्हेगारी व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. का केली कारवाई: प्रस्तावित प्रस्तावानुसार आगामी काळामध्ये येणारे सण उत्सव शांततेमध्ये पार पडावे. त्याचप्रमाणे संगमनेर पोलीस उपविभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या, सुरक्षेच्या दृष्टीने संगमनेर पोलीस उपविभागाकडून कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी रेकॉर्डवरील या सर्व गुन्हेगारांविरोधात विविध कारवाया करण्यात येत आहेत. त्यापैकी ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. प्रत्येकाच्या नावावर पाच पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद: संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करावी, अशी मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने भिडे गुरुजीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. संगमनेर बस स्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात, जावेद शेख, पद्मा थोरात, अर्चना…
इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेने ‘शहाणे’सह दहा खातेदारांच्या नावे केली बोगस सोनेतारण प्रकरणे, मिलीभगत आली समोर महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आधीच चार बँकांना गंडविणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेसह इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेचा नवा फ्रॉड समोर आला आहे. आरोपींमध्ये म्हसे, शहाणे या दोघा सोनारांसह पाच जणांचा समावेश आहे. बँकेचे शाखाधिकारी निवृत्ती काळू नव्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 27 जुलैला आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 120 B, 34, 420, 465, 467, 474 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये यांचा आहे समावेश: जगदीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी महात्मा गांधी यांच्या विषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामळे चांगलेच वादात सापडले असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग न देण्याचे आवाहन करताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून महात्मा गांधी असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असो कोणाच्याही विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काय म्हणाले फडणवीस: महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता आहेत देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा महानायकाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे अनुचित आहे. भिडे गुरुजींनी नव्हे तर कोणीही अशा प्रकारचे वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यांमुळे करोडो लोकांमध्ये संताप…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – कारमधून येत-जात असल्याचे भासवत तिघेजण रस्त्यावरील प्रवाशांना अडवून त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पकडलेले तिघेही आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आहेत. हे आहेत आरोपी: शुक्रवारी (दि. 28 जुलै) रात्री पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात पोलिसांनी पकडलेल्या या टोळीकडून मोबाईल आणि त्यांच्या ताब्यातील कार (एम.एच. 15 जी.एफ. 7288) जप्त केली आहे. प्रशांत अण्णासाहेब जाधव (वय 23 वर्ष) सचिन जयराम पवार (वय 30 वर्ष) व शिवतेज चंद्रहर्ष नेहे (वय 26 वर्ष, तिघेही रा. सावरगाव पाट, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी मोबाईल चोरीत पकडलेल्या तिघांची…
