Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अचानकपणे २२ जानेवारीचा अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा रद्द केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपला आयोध्या दौरा निश्चित केला आहे. फेब्रुवारीमध्ये ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह अख्ख मंत्रिमंडळच घेऊन रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा २२ जानेवारीचा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दौरा निश्चित होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी २० जानेवारीला रात्री उशिराने आपण अयोध्येला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी त्यांनी लवकरच आयोध्या दौऱ्याबाबतची तारीख जाहीर करू असंही म्हटलं होतं. त्यानंतर आता प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर शिंदे यांनी आपला दौरा निश्चित केला आहे. https://twitter.com/ANI/status/1750075451526271069?s=19 या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली नसली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – फसवणुकीच्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी आरोपीच्या भावाकडे पाच लाखाची लाच मागणाऱ्या आणि त्यासाठी मध्यस्थी करत ४० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या वकिलाला अँटी करप्शनने पकडले असून पोलीस उपनिरीक्षक आणि वकिलाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश वसंत चव्हाण (वय ३५ वर्ष) आणि राहुल जयसिंग फुलसुंदर (वय ३१ वर्ष) असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षक व वकिलाचे नाव आहे. पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराच्या भावा विरोधात पुणे शहरातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाला अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पद गेलं की माणसं पक्षापासून दुरावतात मात्र पद गेल्यानंतर देखील पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवत संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी शिवसेनेच्या चढ-उतारामध्ये देखील वर्षानुवर्ष पक्षासोबत राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना “निष्ठा पुरस्काराने” गौरवत वेळोवेळी पक्ष बदलू पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या कृतीतून सोमवारी चपराक दिली आहे. २३ जानेवारी हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिन. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेचे राज्यव्यापी महा अधिवेशन आणि ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर कतारी यांनी सोमवारी संगमनेरमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. याशिवाय शिवसैनिकांनी रचलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज निळवंडे (अहमदनगर) – निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. मात्र आता त्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला देखील पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तर अनेकांच्या त्यागातून निळवंडे धरण आणि कालवा प्रकल्पपूर्ती झाल्याचे माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सांगितले. मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सोमवारी ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, निळवंडे…
शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असल्याने शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याची आवश्यकता : विजय चौधरी
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षण हा समृद्धीचा अलंकार असून शिक्षणाच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण होत असतो त्यामुळे शिक्षकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नगर विकास मंत्रालयाचे उपसचिव विजय चौधरी यांनी केले. संगमनेर इनरव्हील क्लबच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील ३९ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट सुनिता गाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक सामजिक कार्यकर्ते महेश मयूर, वैशाली मयूर, इनरव्हीलच्या सचिव शिल्पा नावंदर आदी व्यासपीठावर उपस्थित…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकविसाव्या शतकातील भारताला विकासाची वाटचाल करताना मानवी मुल्यांची कास सोडून चालणार नाही. अनेक चढ-उतार सोसुनही भारतीय समाजाच्या हजारो वर्षांच्या अस्तित्वाचा पाया हा समताधिष्ठित, मुल्याधिष्ठित समाज राहिला आहे. ते टिकवायचे असेल तर द्वेषाचं संकुचित राजकारण न करता त्यात समाजकारण वाढवावं लागेल. संगमनेरची महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ओळख आहे, असे प्रतिपादन एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष व कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर -कोयत्याच्या धाकावर दहशत निर्माण करून पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला नगरच्या कोतवाली पोलिसांनी केडगाव परिसरातील एका हॉटेलमधून जेरबंद केले आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये टोळीतील सराईत आरोपींचा समावेश आहे. नगरच्या केडगाव परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये पुण्यातील आरोपींची टोळी बसलेली असल्याची माहिती खबऱ्यामार्फत कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मिळालेल्या माहितीच्या आधारे हेड कॉन्स्टेबल शाहीद शेख, रवींद्र टकले, राहुल शिंदे, योगेश कवाष्टे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम, सत्यजित शिंदे, महेश पवार, शिवाजी मोरे, प्रमोद लहारे आदींच्या पथकाने हॉटेल परिसरात सापळा लावला. संधी मिळताच पथकाने पुण्यात कोयत्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्दयतेने कत्तलीसाठी वाहतूक होत असलेली ३२ जिवंत गोवंश जनावरे संगमनेर पोलिसांनी पकडली असल्याने या गोवंश जनावरांना जीवदान मिळाले. पोलिसांनी या कारवाईत जिवंत जनावरांसह ३ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दरम्यान या संदर्भात रिहान अल्ताफ शेख (वय १९, तीन बत्ती चौक, संगमनेर) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव-पोहेगाव रस्त्याने तळेगाव दिघे मार्गे एका पीकअप मधून कत्तलीसाठी जिवंत जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली जात असल्याची माहिती शनिवारी दुपारी संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने पोलीस नाईक…
पक्षाचं काही झालं तरी देशाची लोकशाही टिकली पाहिजे. ज्यांनी तिला दावणीला लावलीय त्यांना सहज सुटं सोडलं तर आहे त्या लोकशाहीची दैना उडेल. माणूस म्हणून जगणं अवघड जाईल. पक्षांतरबंदीच्या कायद्याचं मूळ रूप आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या फुटीवर दिलेल्या निवाड्याने देशाच्या लोकशाहीलाच हात घातला जात आहे. याचे बोलवते धनी वेगळे असले तरी नार्वेकरांसारखी शहाणी माणसंही त्यामागे फरफटत चालली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाने बोलवलेल्या महापत्रकार परिदेतील या संभाव्य धोक्याची जाणीव करून देत यासाठी काहीही मोजण्याची तयारी ठेवण्याचं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. जे लोकशाही मानणार्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. पीठासीन अधिकारी म्हणून असलेल्या अधिकाराचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखली जावी यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत २ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही, कोठेही बरोबर नेता येणार नाही.दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे याच्यासह जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर जवळील चिंचेवाडी येथे गुरुवारी आढळून आलेल्या वृद्धाच्या खुनाची उकल करण्यात नगर एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. चोवीस तासाच्या आत पथकाने दोघा सराईत आरोपींना पकडले असून दारूसाठी त्यांनी वृद्धाच्या खिशातील पैसे काढून खून केल्याची माहिती समोर आली आहे. नामदेव रंगनाथ सोन्नर (वय २५, रा. चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) व सुरेश बाबुराव कोकरे (वय २५, रा. कोकरेवस्ती, चिंचेवाडी, साकुर, ता. संगमनेर) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील चिंचेवाडी येथील मलीबाबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी देवराम मुक्ता खेमनर (वय ६५) या वृद्धाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सर्रासपणे सुरू असलेल्या संगमनेरातील मटका अड्ड्यांवर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी छापे टाकले. या कारवाईत मटक्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यासह अकरा हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान संगमनेरमध्ये नवा मटका किंग म्हणून परिचयास आलेला शरद द्वारका शर्मा फरार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यासह मटका अड्ड्यावर कार्यरत असलेले पंटर सिद्धांत रमेश जाधव, शुभम बाळू कालेकर, धनंजय धनराज कतारी, राजेंद्र बाबुलाल ओझा, संतोष रूपचंद पवार आणि संतोष विठ्ठल उदावंत यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या १२(A) नुसार गुन्हे दाखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर जवळील चिंचेवाडी येथे गुरुवारी आढळून आलेल्या वृद्धाच्या खून प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या खून प्रकरणाचा उलगडा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. साकुर जवळील चिंचेवाडी येथील मलीबाबा मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी सकाळी देवराम मुक्ता खेमनर (वय ६५) या वृद्धाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली होती. मृतदेहाजवळ दगड, चप्पल, आधारकार्ड आढळून आले. यावेळी दगड पुर्णपणे रक्ताने माखलेले होते. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली होती. या खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेशानंतर उत्तर नगर जिल्ह्यात झालेल्या राजकीय फेरबदलामुळे शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवसेनेचे माजी अकोले तालुकाप्रमुख डॉ. मनोज मोरे यांनी अजित पवारांची साथ धरली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना काँग्रेस भाजप असा प्रवास करत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असतानाच त्या पाठोपाठ पक्षप्रमुखांनी जिल्ह्याच्या कार्यकारिणीत मोठे फेरबदल करत रावसाहेब खेवरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा सोपविली. त्यापाठोपाठ वाकचौरे आणि खेवरे यांच्यावरची सुप्त नाराजी आता समोर येऊ लागली आहे. नव्या पदाधिकारी निवडीनंतर मध्यंतरी नाराज असलेल्या निष्ठावंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – राहाता काँग्रेसने माजी आमदार तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिवस म्हणून साजरा केला असल्याची माहिती राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे यांनी दिली. तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अस्तगावच्या न्यू इंग्लिश स्कुल या माध्यमिक शाळेच्या ग्रंथालयास राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे शिवचरित्र, छत्रपती श्री राजश्री शाहू महाराज, संत गाडगे महाराज, अमृतमंथन, ज्योतिबासावित्री, श्यामची आई, कृषिक्रांतीचे योगीराज, अजुनी चालीतोची वाट, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, गंमत जंमत शाळा, पारंपरिक ओव्या अशी पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी राहाता तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, तालुका सरचिटणीस संजय जेजुरकर, अस्तगाव काँग्रेस अध्यक्ष बबनराव नळे, गणेशचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कुद्रेमानी (बेळगाव) येथे होणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र १८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरमधील सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर यांची निवड झाली आहे. २१ जानेवारीला हे संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कवी बाबासाहेब सौदागर यांनी शंभरपेक्षा जास्त चित्रपटात, २७ मालिकांमध्ये गीत लेखन केलेले आहे. त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २२ चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले आहे. सध्या त्यांचा ‘माझ्या गाण्याची जन्मकथा’ कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्यानी गीतलेखन केलेल्या सत्ताधीश, झुंजार, झुंज एकाकी, राजमाता जिजाऊ, मी सिंधुताई सपकाळ, लग्नाची वरात लंडनच्या घरात, जुगाड,तुझा दुरावा, घुंगराच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसह अनेक विकास कामांसाठी मोठा निधी मिळविला होता. मात्र सरकार बदलताच नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारने या विकास कामांना स्थगिती दिली. विविध विकास कामांवरील ही स्थगिती न्यायालयातून उठवली आहे. त्यामुळे थांबलेली विकास कामे सुरू होतील. यापुढील काळात देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे कुरण-पारेगाव खुर्द-नान्नज दुमाला या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी निसार बशीर शेख, उबेद शेख, लक्ष्मण कुटे, बी. आर. चकोर, निसार गुलाब शेख, के. के.…
महाराष्ट्र संवाद न्यूज एका वाहनातून देशी-विदेशी दारूची अवैधपणे विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती संगमनेर पोलिसांना मिळाली. संगमनेर तालुका पोलिसांनी संशयास्पद वाहन पकडण्यासाठी सापळा लावला. संशयास्पद वाहन पोलिसांच्या नजरेसमोरून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या कारमध्ये ७५ हजार रुपयांचे देशी-विदेशी दारू पोलिसांना आढळून आली. सुगाव फाट्यापासून शिरसगाव धुपे रस्त्यावरील येथील रानवारा ढाबा येथे संगमनेर तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या संदर्भात अजय शांताराम वाकचौरे (रा. निंब्रळ, ता.अकोले) याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईमध्ये अजय वाकचौरे हा बेकायदेशीरपणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करतांना ध्रुवच्या स्पर्धकांनी २१ सुवर्णसह २१ रौप्य पदकांची कमाई केली. स्पर्धेतील एकूण कामगिरीच्या जोरावर ध्रुव ग्लोबल स्कूलने दुसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या १३ वर्षांखालील गटात ईश्वरी गोकुळ खताळने विश्वेश्वर वंदना सादर करतांना प्रथम तर, लोकनृत्य प्रकारातील रासरकेली नृत्य सादर करताना द्वितीय क्रमांक मिळवला. या वयोगटातील सांघिक प्रकारात मुलींच्या गटाने सादर केलेल्या कोनाडू या लोकनृत्य प्रकाराला रौप्य पदकाने सन्मानीत करण्यात आले. या संघात देवश्री अतुल देशमुख, आराध्या सुरेश रहाणे, काव्या स्वप्निल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासासंदर्भात सातत्याने संशय व्यक्त होत असताना आता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चोरीचा तपास शंकास्पद झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आरोपीकडून चोरीचे सोने विकत घेतलेल्या सोनारांना पोलिसांनी सहआरोपी न करता क्लीन चीट दिल्याने या सोनारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी संगमनेरातील तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचल्याने आता या प्रकरणात नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे. संगमनेरमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास लावण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असताना या तपासात वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचे दिसते. यात नगर एलसीबी अग्रभागी असते. या एलसीबीचे अनेक…
