Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तालुक्यातील नान्नज दुमाला येथील जयवंत विलास कडवे (वय २२) या तरुण सलून व्यावसायिकाने शुक्रवारी (ता. १८ ऑगस्ट) आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या आईसह नातेवाईकांनी केला असून, या संदर्भात चौकशी व्हावी यासाठी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे (DYSP) निवेदन देण्यात आले आहे. काय झाले: नान्नज दुमाला येथे जयवंत विलास कडवे हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरातील अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. याची माहिती संतोष सुखदेव वाघ यांनी कडवे यांच्या मामास रवींद्र भाऊसाहेब वाघ यांना फोनवरुन कळविली. त्यानंतर वाघ तात्काळ संगमनेर बसस्थानकावरुन घरी परतले. त्यानंतर त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगातील सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढली आहे, अशावेळी शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. धावपळीच्या जीवनात जगताना शरीरस्वास्थाकडेही तितक्याच गांभीर्याने पाहण्याची गरज असते. विद्यार्थ्यांनी तर लहान वयापासूनच योगासनांची सवय लावली पाहिजे. कारण आपण बुद्धीने कितीही तेज असलो तरीही आपले स्वास्थ उत्तम नसेल तर आपल्यातली पूर्ण क्षमता आपण सिद्ध करु शकत नाही. आता तर केंद्र सरकारने योगासनांचे महत्व लक्षात घेवून त्याला खेळाचा दर्जा दिल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनही करिअर करण्याची संधी मिळाल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. योग सोपान उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा: गीता परिवार व अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनच्या संस्कार सिद्धा समितीने राबविलेल्या…
दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरण: व्यवस्थापकासह पाचही आरोपींच्या कोठडीबाबत न्यायालयाने घेतला हा निर्णय…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी अटकेत असलेल्या पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने वाढ केली आहे. या आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. एक मुख्य आणि चार सहकार्य करणाऱ्यांचा अटकेतील आरोपीत समावेश: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच रात्रीतून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुख्य 17 आरोपींना सहकार्य करणाऱ्या तीन तत्कालीन रोखपालांसह एका लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यानंतर पतसंस्थेच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एवढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या आर्थिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81 कोटीचा अपहार करणाऱ्या चेअरमन मास्टरमाईंड भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये आता नव्याने MPID चे कलम तीन वाढविले आहे. आत्तापर्यंत पाच आरोपी अटकेत: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी संस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली होती. त्या पाठोपाठ बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ याला देखील अटक केली होती. मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे आपल्या कुटुंबीयासह तसेच अन्य आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लोकशाही प्रणालीमध्ये मतदान हा अत्यंत पवित्र व महत्त्वाचा अधिकार असून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व युवक व युवतींनी 8055987777 या नंबरवर मिस कॉल देऊन नवीन मतदार नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घेऊन आपली मतदार नोंदणी करावी असे आवाहन युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली. लोकशाही व राज्यघटनेमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. वयाच्या अठराव्या वर्षी प्रत्येक युवकाला मतदान करण्याचा पवित्र अधिकार मिळाला आहे. लोकशाही व राज्यघटना मजबूत करण्यासाठी…
अज्ञात चोरट्याचा प्रताप; रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घुलेवाडी (संगमनेर) ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट मधून तब्बल साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी दुपारी समोर आला. यामुळे रुग्णालयाच्या प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील उघड झाला आहे. मविआ सरकारच्या काळात मिळाले होते साहित्य: कोरोना रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी कोरोना काळात तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने विशेष प्रयत्नातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन उपलब्धतेसाठी युनिट उभे केले होते. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये असलेले सर्व साहित्य शासनाकडून कोरोना काळात मिळाले आहे. रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ट्रॉमा केअर…
२,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने करणार खरेदी महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे कांद्याच्या प्रश्नावर काय तोडगा काढतात याकडे लक्ष लागले असतानाच. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर मुंडेंनी ‘ऐतिहासिक खरेदीदरा’ची घोषणा करण्याआधीच जपान दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी ती केल्याने मुंडेंच्या श्रेयावर पाणी फेरले गेले. मुंडे करणार होते घोषणा: केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील तीन मूर्ती मार्गावरील सरकारी निवासस्थानी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंडे कांदाप्रश्नी चर्चा करत होते. या चर्चेनंतर मुंडे व गोयल पत्रकारांशी बोलतील असे सांगण्यात आले होते. मुंडेंच्या घोषणेआधीच फडणवीसांची घोषणा: या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – समाज माध्यमातून चुकीचा मेसेज व्हायरल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी अफवा पसरविल्याचा कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल: अभिषेक पांडुरंग जोर्वेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 505 (2) अन्वये मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय होता नेमका प्रकार: रविवारी सायंकाळी शहरातील जोर्वेनाका भागात एका हायमॅक्सच्या खांबावर पाकिस्तानचा ध्वज फडकविल्याचे मेसेज समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करत सुमारे 600 किलो जनावराच्या गोमांसासह सुमारे सव्वाचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून एक जण घटनास्थळावरून पसार झाला आहे. या कर्मचाऱ्यांनी केली कारवाई: नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या आदेशावरून गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक संतोष लोंढे, गणेश भिंगारदे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गुंजाळ, अमृत आढाव, सचिन अडबल यांचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी संगमनेरमध्ये गस्त घालत होते. या पथकाला जुने जोर्वे रोड परिसरातील जमजम कॉलनीत अब्दुल हमीद कुरेशी हा गोवंश जनावरांची कत्तल…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या आदर्श सहकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या दूधगंगा नागरी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संगमनेर पोलिसांनी अटक केलेल्या व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला संगमनेरच्या न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी: व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी त्याला संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात पोलीस कोठडी मिळण्यासाठी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी हजर केले. न्यायाधीश एस. एम. वाघचौरे यांनी आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कोठडी दरम्यान आरोपी कडून आणखी काय माहिती समोर येते. हे 24 ऑगस्टला समजणार आहे. सहकाराची विश्वासार्हता धोक्यात: संगमनेरचे अर्थकारण सहकारावर…
सर्व पशुधनाचे लसीकरण सात दिवसात पूर्ण करा राज्यातील लम्पी उपाय योजनांचा मंत्र्यांकडून आढावा महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये विषाणूजन्य व संसर्गजन्य लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात ७३ टक्के लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असून, उर्वरित लसीकरण येत्या ७ दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. आढावा मंत्री: विखे पाटील यांनी राज्यातील लम्पी चर्मरोगाविषयी दूरदृष्य प्रणालीव्दारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे उपस्थित होते. दुरदृष्य प्रणालीव्दारे आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या सहकार विश्वाला बदनाम करणाऱ्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या मुख्य आरोपींपैकी व्यवस्थापकाला अटक केली आहे. राजकीय वरदहस्त असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. उद्या न्यायालयात हजर करणार: संगमनेरच्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या तब्बल 81 कोटीच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बँकेच्या तीन कॅशियरसह लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यांना येत्या 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता पोलिसांनी बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला अटक केली आहे. गुंजाळ याला उद्या न्यायालयासमोर हजर केले…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या चौथ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अहमदनगरच्या संघाला अजिंक्यपद मिळाले. सब ज्युनिअर आणि ज्युनियर वयोगटातील चार प्रकारात झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर संघातील योगा खेळाडूंनी अवघड श्रेणीतील योगासनांच्या सादरीकरणातून परीक्षकांना अचंबित करत तब्बल 12 सुवर्णपदकांसह 21 पदकांची कमाई केली. याशिवाय एक सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह दहा पदके मिळविणाऱ्या नागपूर संघाने दुसरे तर दोन सुवर्णपदकांसह सहा पदके मिळवणाऱ्या मुंबई संघाने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये या स्पर्धांचे आयोजन केले होते. पारंपारिक योगासनांच्या सब ज्युनिअर गटात नगरच्या तृप्ती डोंगरे व मुलांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज एका विशेष कारवाईमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोंगाट करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत तब्बल 16 लाख 9 हजाराचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात पोलीस एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करून दंड वसूल करत असताना संगमनेरात मात्र अशा पद्धतीने वेगवेगळे आवाज काढत सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या बुलेटस्वारांना पोलीस प्रशासनाकडून अभय मिळत आहे. असे निघतात आवाज: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 1 जानेवारी ते 15 ऑगस्टदरम्यान ही कारवाई केली. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांसह काही टवाळखोरांमध्ये बुलेट, अथवा अशा आवाज करणाऱ्या दुचाकींची क्रेझ पाहायला मिळत आहे. दुचाकी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर टाकून दुचाकीचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पवारांवर चढवला आहे. स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री: वळसे पाटील मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही. भाजप सोबत का:…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शिवसेनेने खासदारकीची संधी दिल्यानंतर शिवसेनेसोबत गद्दारी करत अपक्ष-भाजप असा प्रवास करीत पुन्हा उमेदवारीसाठी शिवसेनेत येण्याच्या तयारीत असलेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशाला उत्तर नगर जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. उद्धव साहेब! “आम्हाला गद्दार नको, निष्ठावंत हवा” असा आवाज देतानाच नगर दक्षिणेतील त्या नाराज पदाधिकाऱ्याने उत्तरेत वाद लावण्याचे काम करू नये, असा सल्लादेखील देण्यात आला. जागा गमावण्यासाठी नाराजांची खेळी: राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीनंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाची वाट धरली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्याने माजी खासदार 2024 च्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा शिवसेना प्रवेशाच्या तयारीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातील पंतप्रधानांचं भाषण कसं नसावं, याचं उत्तम उदाहरण म्हणून नरेंद्र मोदी यांच 15 ऑगस्टच्या मंगळवारी पार पडलेलं लाल किल्ल्यावरचं भाषण म्हणता येईल. या पीठावरून द्यायच्या भाषणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे कोणाची उणीदुणी काढायची नसतात. माझा देश पुढे कसा गेलाय आणि त्याच्या आगामी वाटचालीचा आलेख पंतप्रधानाने द्यायचा असतो. देश विदेशातील पाहुणे या सोहळ्याला हजेरी लावतात. यामुळे तर प्रमुखाची जबाबदारी आणखी वाढत असते. पाहुण्यांच्या समोर आपलं आणि आपल्या देशाचं हसं होऊ नये, इतकी समज राष्ट्रप्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी दाखवली पाहिजे. पण स्वत:वरचा विश्वास उडाला की माणूस बेफिकीर होतो, तोल सुटलेल्या माणसासारखं भाषण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनु असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेस राष्ट्रीय स्तरावरील बँको या संस्थेचा ब्ल्यू रिबन पुरस्कार – 2023 जाहीर झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी व उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी दिली आहे. वाटचाल: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर बँकेची वाटचाल सुरू असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अमृतवाहिनी बँकेने नुकताच दुग्धविकास कर्ज योजनेअंतर्गत सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्याचे काम सुरू केले असून छोटे शेतकरी व…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर मधील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापक, चीफ अकाउंटंटसह 21 जणांविरोधात आर्थिक घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून चार जणांना अटक केली. अटक केलेल्या चारही आरोपींना शनिवारी न्यायालयाने सहा दिवसांची (24 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. छापा सत्रात कागदपत्रांची पडताळणी सुरू: बँकेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह अन्य आरोपी पसार झाले असून पोलीस पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान सकाळपासून पोलिसांच्या चार पथकांनी अध्यक्ष कुटे आणि व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्या घरी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. आक्षपार्ह आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तपास अधिकारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एका अल्पवयीन मुलीच्या चुलत मामे बहिणीला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाने त्या मुलीबरोबर बोलायचे आहे, असे सांगून अल्पवयीन मुलीचा मोबाईल नंबर मिळवला. नंतर त्या अल्पवयीन मुलीशी फोनवरून संपर्क साधत तिची फसवणूक करत लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार केला. सदर मुलगी गर्भवती राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. असा प्रताप करणाऱ्या तरुणाविरुद्ध जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. ओतूर पोलिसांकडून गुन्हा वर्ग: प्रवीण जाधव (अंबेगव्हाण, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा दिनांक ९ जून रोजी २०२३ रोजी घडला असून ओतूर पोलीस…
